मिड-रेंज सेगमेंटमध्ये Redmi ने लॉन्च केला गॅमेर्स साठी Redmi Turbo 5! ज्यामध्ये असणार MediaTek Dimensity 8500 सारखा पॉवरफुल प्रोसेसर आणि 7450mAh सारखी मोठी बॅटरी

Redmi Turbo 5 Features Marathi

Xiaomi ने शेवटी त्यांची Turbo सिरीज चीनमधून आता भारतीय बाजारात लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. हो, चिनी स्मार्टफोन निर्मात्यांनी असे सांगितले आहे की भारतात Turbo सिरीज मधील पहिला स्मार्टफोन Redmi Turbo 5 असणार आहे.

चीन मध्ये Redmi Turbo 5 हा स्मार्टफोन जानेवारी महिन्यातच लॉन्च करण्यात आला होता आणि आता भारतात हा स्मार्टफोन 16 जून म्हणजेच आज Xiaomi च्या कार्यक्रमात लॉन्च करण्यात येणार आहे.

Redmi आणि त्यांच्या अधिकृत वेबसाइट वर Redmi Turbo 5 बद्दल टीझर व्हिडिओज आणि काही महत्त्वाची माहिती शेअर करण्यात आली आहे. जसे की यामध्ये कोणता प्रोसेसर असणार आहे, डिस्प्ले किती इंचांचा असणार आहे, बॅटरी किती mAh ची असणार आहे, तसेच या स्मार्टफोन मध्ये आणखी कोणती नवीन फीचर्स देण्यात आली आहेत याबाबतची माहिती देखील समोर आली आहे.

चला तर मग पाहूया, (redmi turbo 5 features marathi) सारख्या जबरदस्त गेमिंग स्मार्टफोन मध्ये नेमके कोणते फीचर्स देण्यात आले आहेत.

Redmi Turbo 5 डिस्प्ले

भारतातील व्हेरिएंट Redmi Turbo 5 मध्ये Xiaomi ने 6.59 इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले सोबत 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे जो स्मूथनेस आणि प्रतिसादचा अनुभव आणखी वेगवान बनवतो. तसेच या स्मार्टफोन मध्ये 3500 nits ची पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे आणि डिस्प्ले ला डॉल्बी व्हिजन चा देखील सपोर्ट मिळतो.

Redmi ने या डिस्प्ले ला फ्लुइड डिस्प्ले असे नाव दिले आहे. आपण याची तुलना Full HD+ पॅनेल्स सोबत केली, तर 1.5K रेझोल्यूशन मुळे यामध्ये अधिक शार्प व्हिज्युअल्स आणि स्पष्ट पिक्चर क्वालिटी पाहायला मिळते. डिस्प्ले प्रोटेक्शन साठी यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i देण्यात आला आहे. यासोबतच मागील बाजूस (बॅक पॅनेल) मॅट-फिनिश्ड ग्लास बॅक देण्यात आला आहे.

Redmi Turbo 5 मध्ये तुम्हाला IP66, IP68 आणि IP69 रेटिंग्स मिळणार आहेत ज्यामुळे हा स्मार्टफोन धूळ आणि पाण्यापासून अधिक चांगले संरक्षण करतो. बाकीच्या गेमिंग स्मार्टफोन्स कडे पाहिलं तर त्या फोन्स चे डिझाइन बहुतेक वेळा अ‍ॅग्रेसिव्ह असते पण Redmi Turbo 5 चे डिझाइन खूप क्लीन आणि मॉडर्न पाहायला मिळते.

फ्लॅट डिझाइन आणि कॉम्पॅक्ट आकारामुळे हा स्मार्टफोन जास्त वेळ हातात धरला तरी वापरताना अस्वस्थ वाटत नाही. तसेच तुम्ही दीर्घकाळ गेमिंग करत असाल तर हा स्मार्टफोन तुम्हाला अधिक आरामदायी अनुभव देऊ शकतो.

Redmi Turbo 5 प्रोसेसर

Xiaomi ने Redmi Turbo 5 हा एक पॉवरफुल स्मार्टफोन म्हणून लॉन्च केला आहे, जो हेवी परफॉर्मन्स सहजपणे हँडल करू शकतो. या फोनचा प्रोसेसर हा त्याचा सर्वात मोठा स्ट्राँग पॉइंट आहे, जो या स्मार्टफोन ला बाजारातील इतर स्मार्टफोन्स पेक्षा वेगळं बनवतो. हेवी परफॉर्मन्स हँडल करण्यासाठी Xiaomi ने यामध्ये मीडियाटेक डिमेन्सिटी 8500 अल्ट्रा हा प्रोसेसर आणि ARM Mali-G720 MC8 GPU दिला आहे जो इतर हेवी टास्क्स सहजपणे हाताळू शकतो.

redmi turbo 5 features marathi

ब्रँड ने फक्त जबरदस्त प्रोसेसर दिला नाही तर त्याच्या परफॉर्मन्स ची देखील काळजी घेतली आहे. जास्त वेळ गेमिंग केल्यास फोन गरम होऊ लागतो आणि ही हीटिंग कमी करण्यासाठी Xiaomi ने यामध्ये 3D आइस-लूप कूलिंग टेक्नॉलॉजी दिली आहे. फोन जास्त गरम झाल्यावर 3D आइस-लूप कूलिंग टेक्नॉलॉजी आतील उष्णता फोनमधून बाहेर फेकण्याचे काम करते, ज्यामुळे हीटिंग कमी होते आणि फोनला जास्त गरम होण्यापासून रोखता येते.

Redmi Turbo 5 कॅमेरा

फोटोग्राफी साठी Redmi Turbo 5 मध्ये तुम्हाला ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप पाहायला मिळणार आहे. बॅक पॅनेल कडे पाहिल्यास यामध्ये व्हर्टिकल आकाराचे कॅमेरा मॉड्यूल देण्यात आले आहे. या मॉड्यूल मध्ये Xiaomi ने एक खास गोष्ट देखील दिली आहे. ती म्हणजे कॅमेरा रिंग्स मध्ये LED लाइट्स देण्यात आल्या आहेत ज्या नोटिफिकेशन्स आल्यावर चमकतात होतात.

हे ही वाचा :- 200 रुपयांमध्ये Jio देत आहे Amazon Prime सोबत 13 OTT प्लॅटफॉर्म्स मोफत!

कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये तुम्हाला ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. यात 50 मेगापिक्सेल Sony IMX882 प्रायमरी सेन्सर सोबत ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स देण्यात आली आहे ज्याच्या मदतीने तुम्ही लँडस्केप फोटोग्राफी करू शकता.

redmi turbo 5 features marathi

सेल्फी साठी Xiaomi ने यामध्ये 20 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या कॅमेरा मधून तुम्ही सोशल मीडिया कॉन्टेंट तयार करू शकता, पोर्ट्रेट्स काढू शकता तसेच व्हिडिओ कॉल्स देखील करू शकता. अल्ट्रा-वाइड कॅमेरा असल्यामुळे फोटोग्राफी करताना अधिक फ्लेक्सिबिलिटी मिळते. जसे की ग्रुप फोटोस, ट्रॅव्हल फोटोग्राफी किंवा आर्किटेक्चर चे फोटोस काढताना मोठा व्ह्यू एका फ्रेम मध्ये सहज कॅप्चर करता येतो.

यामुळे फोटोचा कोणताही महत्त्वाचा भाग फ्रेम च्या बाहेर राहण्याची शक्यता कमी होते आणि संपूर्ण सीन अधिक चांगल्या प्रकारे कॅप्चर करता येतो. फोटो क्वालिटी पाहिली तर लो-लाईट मध्ये सुद्धा फोटोस आणि व्हिडिओ एकदम नॅचरल तसेच वायब्रंट कलर्स सह मिळतात. मेन कॅमेरा मधून तुम्ही 4K 60FPS, 1080p 30fps/60fps, 720p 30fps वर व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता.

Redmi Turbo 5 बॅटरी

Redmi Turbo 5 ला वेगळं बनवण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे त्यामधील बॅटरी. हो, Redmi ने यामध्ये 7540mAh सारखी मोठी बॅटरी दिली आहे. आतापर्यंत कोणत्याही Redmi स्मार्टफोन मध्ये इतकी मोठी बॅटरी देण्यात आली नव्हती. यासोबतच 100W हायपरचार्ज फास्ट चार्जिंग आणि 27W रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देखील मिळणार आहे.

7540mAh ची मोठी बॅटरी असल्यामुळे हा स्मार्टफोन एकदा 100% चार्ज केल्यानंतर दिवसभर सहज वापरता येऊ शकतो. मग तुम्ही मोबाईल वर विविध टास्क्स करा, गेमिंग करा, कॉन्टेंट क्रिएशन करा किंवा व्हिडिओ एडिटिंग करा, या सर्व गोष्टी केल्यानंतरही बॅटरी लगेच संपण्याची शक्यता कमी असते.

Redmi Turbo 5 Specifications Marathi

टर्बो व्हाईट
अॅस्फाल्ट ब्लॅक
नायट्रो ब्लू
ऑपरेटिंग सिस्टमअँड्रॉइड 16(HyperOS 3)
4 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 6 वर्षे सुरक्षा अपडेट्स
प्रोसेसरस्नॅमीडियाटेक डिमेन्सिटी 8500 अल्ट्रा
इंटरनल स्टोरेज256GB, 512 GB
रॅम12 GB
सुरक्षाअंडर-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर
बॅटरीची क्षमता7540 mAh
अ‍ॅडॉप्टर100W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार6.59 इंच (AMOLED डिस्प्ले)
रिझोल्यूशन2756 x 1268 पिक्सेल
पाणी संरक्षणIP67, IP68, IP69 जल-प्रतिरोधक डिझाइन
डिस्प्ले तंत्रज्ञान1)पीक ब्राइटनेस :- 3500 निट्स
2)टच सॅम्पलिंग रेट :- 480Hz
3)इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेट :- 2560Hz
4)120Hz रिफ्रेश रेट
5)HDR10+
सेंसर1)अल्ट्रासॉनिक प्रॉक्सिमिटी सेन्सर
2)ई-कंपास
3)लाईट सेन्सर
4)ॲक्सेलरोमीटर
5)जायरोस्कोप
6)बारोमीटर
7)फ्लिकर सेन्सर
8)एक्स-अॅक्सिस लिनिअर मोटर (व्हायब्रेशन मोटर)
9)इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 20 मेगापिक्सेल
2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल Sony IMX882 प्रायमरी सेन्सर + 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स
3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K,1080P, 720P
ऑडिओस्टीरिओ ड्युअल स्पीकर्स
रंग1)टर्बो व्हाईट
2)नायट्रो ब्लू
3)अॅस्फाल्ट ब्लॅक
कनेक्टिविटी5G, 4G
ब्लूटूथ 6.0, Wi-Fi 6
किंमत₹37,999

Redmi Turbo 5 Price In India

भारतात Redmi ने Redmi Turbo 5 हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. पहिला व्हेरिएंट 8GB + 256GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 37,999 रुपये आहे. तर दुसरा व्हेरिएंट 12GB + 256GB स्टोरेजसह उपलब्ध असून त्याची किंमत 40,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या मॉडेल मध्ये Redmi ने टर्बो व्हाईट, नायट्रो ब्लू आणि अॅस्फाल्ट ब्लॅक असे तीन रंगांचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

तुम्हाला जर हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर Redmi Turbo 5 ची सेल 19 जूनपासून सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन तुम्ही Redmi च्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon वरून खरेदी करू शकता.

Redmi ने खरोखरच बाजारात एक शानदार स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो 30,000 ते 40,000 रुपयांच्या किंमत श्रेणीत येतो. अनेक लोकांना मिड-रेंज सेगमेंट मध्ये चांगला परफॉर्मन्स देणारा स्मार्टफोन हवा असतो आणि Redmi ने यामध्ये फक्त परफॉर्मन्स वरच भर दिलेला नाही पण परफॉर्मन्स सोबतच बॅटरी, डिझाइन, डिस्प्ले आणि कॅमेरा या बाबतीतही उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत.

माझ्या मते, हा स्मार्टफोन विशेषतः गेमिंग साठी किंवा जे लोक दिवसभर मोबाईल वर जास्त वेळ काम करतात, जसे की एडिटिंग, व्हिडिओ शूटिंग किंवा कॉन्टेंट क्रिएशनकरतात, त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

आपण जर पाहिलं तर Redmi ने आता गेमिंग स्मार्टफोन च्या स्पर्धे मध्येही सहभाग घेतला आहे. याआधी Redmi ची ओळख मुख्यतः बजेट स्मार्टफोन सेगमेंट मध्ये होती पण आता कंपनीने गेमिंग स्मार्टफोन्स च्या बाजारातही दमदार प्रवेश केला आहे.

Leave a Comment