Tecno Spark 50 5G Pro Marathi
Tecno ने त्यांच्या SPARK स्मार्टफोन च्या लाइनअप मध्ये आणखी एक नवीन एडिशन Tecno Spark 50 Pro जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. याआधी Tecno ने सुमारे एका महिन्यापूर्वी Tecno Spark 50 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. त्यानंतर हाँगकाँगमध्ये आयोजित करण्यात आलेल्या Tecno च्या कार्यक्रमात Tecno Spark 50 Pro हे मॉडेल जागतिक स्तरावर सादर करण्यात आले.
प्रो मॉडेल मध्ये Tecno ने विशेषत लाँग-टर्म ड्युरेबिलिटी आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी यावर अधिक लक्ष दिलं आहे. जसे की जास्त क्षमतेची बॅटरी जी अधिक वेळ टिकेल, एआय-पॉवर्ड फोटोग्राफी फीचर्स, मॉडर्न डिझाइन आणि फास्ट चार्जिंग सारख्या गोष्टींवर कंपनीने विशेष फोकस केलं आहे.
ब्रँड ने या लाइनअप मध्ये दोन व्हेरिएंट्स सादर केले आहेत. पहिला व्हेरिएंट Tecno Spark 50 Pro 5G असून दुसरा व्हेरिएंट Tecno Spark 50 Pro 4G आहे. Tecno ने त्यांच्या कार्यक्रमात सर्वप्रथम (Tecno Spark 50 Pro 5G Marathi) हे मॉडेल प्रेक्षकांसमोर सादर केले आहे.
Tecno Spark 50 Pro 5G डिझाइन & डिस्प्ले
डिझाइन कडे पाहिलं तर Tecno ने या स्मार्टफोन ला मॉडर्न आणि स्लिम डिझाइन दिलं आहे. Tecno Spark 50 Pro ची रचना काही प्रमाणात Apple च्या नवीन मॉडेलस सारखी केली आहे. यातील कॅमेरा मॉड्यूल हे iPhone 17 Pro सारखे दिसते तर कॅमेरा लेन्सेस ची मांडणी iPhone 17 Air प्रमाणे वाटते.
मात्र Apple च्या या मॉडेलस ची फक्त नक्कल न करता Tecno ने Spark 50 Pro मध्ये स्वतःची वेगळी आणि आकर्षक डिझाइन वापरण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामुळे हा स्मार्टफोन इतरांपेक्षा थोडा वेगळा दिसतो.
Pro मॉडेल मध्ये Tecno ने 6.78 इंचाचा HD+ डिस्प्ले दिला आहे आणि यामध्ये 120Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट मिळणार आहे. या मध्ये मोठी बॅटरी असूनही त्याची जाडी फक्त 7.8mm ठेवण्यात आली आहे ज्यामुळे तो हातात धरायला अधिक स्लिम आणि आकर्षक वाटतो. डिझाइन कडे पाहिल्यास Tecno ने Tecno Spark 50 Pro मध्ये कम्फर्ट आणि प्रीमियम फील यावर विशेष लक्ष दिले आहे.
सोबतच धूळ आणि पाण्यापासून संरक्षण मिळावे यासाठी Tecno ने या स्मार्टफोन मध्ये IP68 आणि IP69 सर्टिफिकेशन दिली आहेत. याशिवाय हा फोन स्विस एसजीएस फाइव्ह-स्टार प्रीमियम ड्रॉप रेझिस्टन्स सर्टिफिकेशन सह येतो. चुकून फोन पाण्यात पडला तरी IP68 आणि IP69 सर्टिफिकेशन मुळे तो पाणी आणि धुळीपासून अधिक सुरक्षित राहतो, त्यामुळे फोनची महत्त्वाची फंकशनल सहजपणे बंद पडण्याची किंवा खराब होण्याची शक्यता कमी होते.
Tecno Spark 50 Pro 5G कॅमेरा
कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 50 मेगापिक्सेल Sony LYTIA 600 प्रायमरी सेन्सर (1/1.953 इंच) देण्यात आला आहे. Tecno च्या म्हणण्यानुसार, मोठा सेन्सर असल्यामुळे फोटोस मधील प्रकाश, डिटेल्स आणि लो-लाईट फोटोग्राफी यामध्ये अधिक चांगली सुधारणा पाहायला मिळते. विशेषतः याच किंमत श्रेणीतील इतर सेन्सरस सोबत तुलना केली तर.
Tecno Spark 50 Pro च्या कॅमेरा सिस्टम मध्ये कंपनीने एक नवीन टेकनॉलॉजि सादर केली आहे. ही टेकनॉलॉजि शटर स्पीड 1/10000 सेकंदांपर्यंत वाढवण्यास मदत करते. त्यामुळे वेगाने हालचाल करणाऱ्या वस्तूंचे फोटो काढताना अधिक स्पष्ट आणि शार्प इमेजेस मिळू शकतात. ज्याला फ्लॅशस्नॅप टेकनॉलॉजि असे म्हटले जाते. याशिवाय फ्लॅशस्नॅप टेकनॉलॉजि मुळे मोशन ब्लर कमी होण्यास मदत होते.
यासोबतच Tecno ने आणखी एक नवीन टेकनॉलॉजि दिली आहे, तिला टेक्नो युनिव्हर्सल टोन टेकनॉलॉजि असे म्हटले जाते. ही टेकनॉलॉजि फोटोस मधील स्किन टोन्स अधिक अचूक दिसण्यासाठी मदत करते. सेल्फी साठी या स्मार्टफोन मध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
कॅमेरा फीचर्स मध्ये तुम्हाला एआय-पॉवर्ड इमेज एन्हान्समेंट, एआय इरेझर 2.0 आणि एआय एक्स्टेंडर सारखे AI फीचर्स तुम्हाला Tecno Spark 50 Pro मध्ये मिळणार आहे.
Tecno Spark 50 Pro 5G प्रोसेसर
परफॉर्मन्स साठी Tecno ने ह्यात मीडियाटेक हेलिओ G100 अल्टिमेट हा प्रोसेसर दिला आहे. हा चिपसेट 4nm फॅब्रिकेशन वर आधारित ऑक्टा-कोर प्रोसेसर असून तो 2.2GHz पर्यंतच्या क्लॉक स्पीड वर कार्य करू शकतो. Tecno च्या म्हणण्यानुसार या प्रोसेसर चा AnTuTu बेंचमार्क स्कोअर जवळपास 5,50,000 इतका आहे.
हे ही वाचा – तुमचं बोलणं Instagram ऐकत आहे का? बोलताच किंवा एखादी वस्तू शोधल्यानंतर Instagram वर तिच्या जाहिराती का दिसतात? सत्य जाणून घ्या आणि त्यावरचा उपाय सुद्धा.
मेमरी परफॉर्मन्स आणखी वाढवण्यासाठी Tecno ने मेमरी फ्युजन 4.0 चा वापर केला आहे. हे फीचर व्हर्च्युअल मेमरी एक्सपान्शन च्या माध्यमातून 24GB पर्यंत डायनॅमिक RAM ला सपोर्ट करते.
Tecno Spark 50 Pro 5G बॅटरी
Tecno ने या मॉडेल साठी बॅटरी कॉन्फिगरेशन चे दोन व्हेरिएंट्स उपलब्ध करून दिले आहेत. पहिल्या व्हेरिएंट मध्ये ड्युअल-सेल बॅटरी देण्यात आली आहे, ज्याची क्षमता 5600mAh आहे. तर दुसऱ्या व्हेरिएंट मध्ये सिंगल-सेल बॅटरी देण्यात आली असून तिची क्षमता 6000mAh आहे.
दोन्ही व्हेरिएंट्स ला 60W सुपर चार्ज टेकनॉलॉजि चा सपोर्ट मिळणार आहे. म्हणजेच बॅटरी सुमारे 50% ते 60% पर्यंत केवळ 30 मिनिटांत चार्जे होऊ शकते तर पूर्ण चार्जे होण्यासाठी अंदाजे 50 ते 55 मिनिटे लागू शकतात. टेकनो ने या स्मार्टफोन मध्ये 3 चार्जिंग मोड्स चे पर्याय देखील दिले आहेत.
- हायपर मोड -> हा मोड कमी वेळेत फोन वेगाने चार्जे करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
- लो-टेम्परेचर मोड -> हा मोड चार्जिंग दरम्यान फोनचे तापमान नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो आणि अधिक चांगले थर्मल प्रोटेक्शन प्रदान करतो.
- स्मार्ट मोड -> हा मोड चार्जिंग स्पीड आणि तापमान व्यवस्थापन यामध्ये संतुलन राखून बॅटरी चार्जे करतो.
Tecno Spark 50 Pro 5G Specifications (वैशिष्ट्ये)
| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 16(HiOS) |
| प्रोसेसर | मीडियाटेक हेलिओ G100 अल्टिमेट |
| इंटरनल स्टोरेज | 256 GB |
| रॅम | 8GB |
| सुरक्षा | साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर |
| बॅटरीची क्षमता | 6000 mAh 5600 mAh |
| अॅडॉप्टर | 60W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.78 इंच |
| रिझोल्यूशन | 720 × 1600 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IP68, IP69 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)120 हर्ट्झ रिफ्रेश रेट 2)एचडी+ |
| सेंसर | – |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 8 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल Sony LYTIA 600 प्रायमरी सेन्सर 3)फुल एचडी रेकॉर्डिंग |
| ऑडिओ | स्टीरिओ स्पीकर्स |
| रंग | 1)मिडनाईट ब्लू 2)इंक ब्लॅक 3)क्लाउड व्हाईट 4)डायनॅमिक ऑरेंज 5)टायटॅनियम ग्रे |
| कनेक्टिविटी | 5G, 4G ब्लूटूथ v5.4, Wi-Fi 2 |
| किंमत | ₹18999 (अपेक्षित) |
Tecno Spark 50 Pro 5g Marathi Price
भारतात tecno spark 50 pro 5g marathi या स्मार्टफोन ची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र मोबाइल बाजारातील चर्चेनुसार या स्मार्टफोन ची किंमत 20,000 रुपयांच्या खाली असू शकते असे बोलले जात आहे. Tecno कडून अद्याप किंमतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
