WhatsApp वर ‘NO’ स्कॅम पासून सावध राहा! एका रिप्लायमुळे बँक खात्यातील पैसे धोक्यात येऊ शकतात.

WhatsApp वर ‘NO’ स्कॅम पासून सावध राहा! एका चुकीच्या रिप्लायमुळे तुमच्या बँक खात्यातील पैसे धोक्यात येऊ शकतात. WhatsApp No Scam in Marathi मध्ये जाणून घ्या हा स्कॅम कसा काम करतो, कसे ओळखावे आणि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे, आत्ताच वाचा आणि सतर्क राहा.

WhatsApp वर याआधीही आपल्याला अनेक प्रकारचे स्कॅम्स पाहायला मिळाले आहेत. आता याच स्कॅम्स मध्ये आणखी एक स्कॅम समोर आला आहे आणि हा स्कॅम कोणत्याही अननोन लिंक वर आधारित नाही. याआधी स्कॅमर्स अननोन लिंक पाठवून किंवा OTP मागून लोकांची फसवणूक करत होते पण आता बँक ट्रान्झॅक्शन च्या नावाखाली हा स्कॅम केला जात आहे.

या स्कॅम मध्ये यूजर कडून OTP मागण्याची किंवा अननोन लिंक वर क्लिक करण्याची गरज नाही. फक्त एका ‘NO’ रिप्लाय ची स्कॅमर्स वाट पाहत असतात आणि ‘NO’ रिप्लाय मिळाल्यामुळे तुमचं बँक अकाउंट पूर्णपणे रिकामं होऊ शकतं.

आता हा (whatsapp no scam in marathi) स्कॅम नेमका काय आहे आणि लोकांची फसवणूक कशी होते, हे समजून घेऊया.

WhatsApp वरील “NO” स्कॅम नेमका काय आहे? एका मेसेजमुळे कशी होऊ शकते फसवणूक?

whatsapp no scam in marathi

तर या ‘NO’ स्कॅम ची सुरुवात हैदराबादपासून झाली आहे आणि हा स्कॅम हैदराबादचे पोलीस कमिशनर V. C. Sajjanar यांनी लोकांसमोर आणला आहे. V. C. Sajjanar यांनी लोकांना एका सायबर फ्रॉड बद्दल सांगितलं आहे, ज्यामध्ये WhatsApp च्या मदतीने यूजर चं बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं, तेही OTP न देता किंवा अननोन लिंक वर क्लिक न करता.

हैदराबादचे पोलीस कमिशनर V. C. Sajjanar यांनी असं सांगितलं आहे की, स्कॅमर्स हा मेसेज अननोन किंवा इंटरनॅशनल नंबर वरून पाठवतो. या मेसेज मध्ये असं लिहिलेलं असतं की, “Money has been debited from the recipient bank’s account”. यानंतर एक फॉलो-अप मेसेज येतो, ज्यामध्ये असं लिहिलेलं असतं की, “Reply NO if the transaction was not authorized”, म्हणजेच जर तुम्ही असा कोणताही ट्रान्झॅक्शन केला नसेल, तर ‘NO’ असा रिप्लाय करा.

आता असे मेसेजेस आल्यामुळे यूजर्स घाबरून जातात. खासकरून, बँकेशी संबंधित असा मेसेज येतो ज्यामध्ये आपण कोणताही ट्रान्झॅक्शन केलेला नसतो तेव्हा आपण घाबरून जातो किंवा घाई करतो आणि याचाच फायदा स्कॅमर्स घेतात.

आता तुम्ही या मेसेजला ‘NO’ असा रिप्लाय दिला, तर तुमचं बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं.

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, WhatsApp वर फक्त ‘NO’ असं लिहून पाठवल्यामुळे बँक अकाउंट रिकामं होतं, या गोष्टीची पूर्णपणे तांत्रिक पुष्टी होणं गरजेचं आहे. साधारणपणे, एखाद्या मेसेज ला रिप्लाय केल्यामुळे तुम्ही तुमच्या फोन चा अॅक्सेस समोरच्या व्यक्तीला देऊ शकत नाही. त्यामुळे या गोष्टीची पूर्णपणे चौकशी केल्याशिवाय आपण असा दावा करू शकत नाही.

पोलीस कमिशनर V. C. Sajjanar यांनी एका सोशल मीडिया अॅपवर तेलुगू भाषेत पोस्टच्या माध्यमातून असा दावा केला आहे की, हा फ्रॉड “Auto Execution File Attack” आहे. या पोस्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की एका व्हिक्टिम च्या बँक अकाउंट मधील सर्व पैसे गायब झाले, जेव्हा त्यांनी WhatsApp वर ‘NO’ असा रिप्लाय दिला.

व्हिक्टिम ने कोणतेही बँक डिटेल्स त्यांच्यासोबत शेअर केले नव्हते, कोणत्याही अननोन लिंक वर क्लिक केले नव्हते किंवा OTP सुद्धा शेअर केला नव्हता.

पोलीस कमिशनर V. C. Sajjanar यांनी सांगितलं आहे की, त्यांच्याकडे आलेल्या या स्कॅमच्या रिपोर्ट्स मध्ये स्कॅमर्स हे प्रोफेशनल्स ना देखील टार्गेट करत आहेत ज्यामध्ये एका CA (Chartered Accountant) चा देखील समावेश आहे ज्यांच्या सोबत अस घडलेल आहे.

WhatsApp ‘NO’ स्कॅम सुरुवात कशी होते आणि लोक त्यात कसे अडकतात?

  • सर्वप्रथम, यूजर ला WhatsApp वर एक अननोन नंबर वरून मेसेज येतो, ज्यामध्ये त्यांच्या बँक अकाउंट मधून पैसे डेबिट झाल्याचं लिहिलेलं असतं.
  • यानंतर आणखी एक मेसेज येतो, ज्यामध्ये लिहिलेलं असतं की “तुम्ही हा ट्रान्झॅक्शन केला नसेल, तर ‘NO’ असा रिप्लाय करा”.
हे पण वाचा :- WhatsApp वर आता मोबाइल नंबर ऐवजी दिसणार Username! आताच तुमचे युजरनेम बुक करा.
  • जेव्हा यूजर ‘NO’ असा रिप्लाय करतो, त्यानंतर काही मॅलिशस स्क्रिप्ट्स अॅक्टिव्हेट होतात.
  • यानंतर स्कॅमर्स ला यूजरच्या डिव्हाइस चा पूर्ण अॅक्सेस मिळवतात आणि त्यानंतर बँक संबंधी माहितीचा गैरवापर करतात.

एका चुकीमुळे होऊ शकते फसवणूक! Scam टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.

1. सर्वात आधी, YES किंवा NO सारखा मेसेज आल्यावर त्याला रिप्लाय करणं टाळा.

2. बँकेसंबंधित कोणताही मेसेज WhatsApp वर आला, तर त्याला रिप्लाय न करता बँकेच्या अधिकृत अँप मध्ये जाऊन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तपासा.

3. अननोन नंबर वरून आलेली कोणतीही APK किंवा फाइल डाउनलोड करू नका.

4. ज्या नंबरवरून मेसेज आला आहे, तो नंबर ब्लॉक करून मेसेज लगेच डिलीट करा.

5. तुमचे बँक डिटेल्स किंवा बँकेसंबंधित OTP कोणासोबतही शेअर करू नका. बँक सामान्यतः ट्रान्झॅक्शन अलर्ट्स साठी तुमच्याकडून ATM PIN, कार्ड सिक्युरिटी कोड, इंटरनेट बँकिंग पासवर्ड किंवा OTP यांसारख्या गोष्टींची माहिती मागत नाही.

स्कॅम झाल्यावर घाबरू नका! त्वरित करा ही महत्त्वाची कामे.

पोलीस कमिशनर V. C. Sajjanar यांनी आठवण करून दिली आहे की, बँका त्यांच्या कस्टमर्स ना ट्रान्झॅक्शन व्हेरिफाय करण्यासाठी WhatsApp वर सहसा मेसेज पाठवत नाहीत.

ज्यांच्यासोबत (whatsapp no scam in marathi) असा काही स्कॅम किंवा इतर काही झाला तर लगेच National Cybercrime Helpline नंबर 1930 वर संपर्क साधू शकतात किंवा cybercrime.gov.in या वेबसाइटवर कम्प्लेंट दाखल करा.

Leave a Comment