आमच्याबद्दल – लेखकाची टिप्पणी(About Us)
लेखकाची टिप्पणी हा एक उत्साही मराठी ब्लॉग आहे, जो तंत्रज्ञान विषयक ताज्या-बातम्या, उपयोगी माहिती, आणि डिजिटल टिप्स मराठी भाषेत सादर करतो. आमचा उद्देश म्हणजे सर्वसामान्य मराठी वाचकांना तंत्रज्ञानाचं सुलभ आणि विश्वासार्ह ज्ञान उपलब्ध करून देणं.
आमची प्रेरणा
तंत्रज्ञान हे आमचं व्यसन नाही, तर एक हौस आहे!
मी शशिन, एक उत्साही टेकप्रेमी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वर्षाचा अनुभव असलेला लेखक. नवीन तांत्रिक घडामोडी जाणून घेणे, त्यांचा अभ्यास करणे आणि ती माहिती सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवणे ही माझी आवड आहे.
हा ब्लॉग माझ्या त्या आवडीचे डिजिटल रूप आहे. येथे तुम्हाला ताज्या तांत्रिक बातम्या (Fresh Marathi News), नवीन स्मार्टफोन्स, गॅझेट्स, अॅप्स, तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या टेक टिप्स आणि मार्गदर्शक लेख मराठीत वाचायला मिळतील.
विश्वासार्हता आमचं ब्रीद
जरी माझ्याकडे व्यावसायिक अनुभव नसला, तरी मी इथे दिलेली माहिती अचूक, पारदर्शक आणि तपासलेली असेल याची काळजी घेतो.
- कोणतीही बातमी पोस्ट करण्याआधी अधिकृत स्रोत तपासले जातात.
- फसव्या किंवा चुकीच्या ट्रिक्स या ब्लॉगवर केव्हाही दिसणार नाहीत.
- तुमचा डेटा किंवा माहिती गुप्त ठेवण्याचं पूर्ण आश्वासन.
आम्ही कोणासाठी लिहितो?
- मराठीत तंत्रज्ञानाची माहिती आणि जागरूकता मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी.
- मराठीतून माहिती मिळवू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी.
- Tech Blog वाचण्याची आवड असलेल्यांसाठी.
- टेकमध्ये रुची असलेल्या मराठी वाचकांसाठी
- नवशिक्या मोबाईल युजर्ससाठी