iPhone 18 Series लॉन्च! Apple घेऊन आलं आतापर्यंतचं सर्वात अॅडव्हान्स्ड कॅमेरा, मोठी बॅटरी आणि नवीन A20 Pro चिपसेट.

iPhone 18 Series Launch Features in Marathi

iPhone 18 Series भारतात लॉन्च झाली! Apple घेऊन आलं आतापर्यंतचं सर्वात Advanced Camera, मोठी बॅटरी आणि नवीन A20 Pro चिपसेट सह येणाऱ्या या सिरीजची संपूर्ण माहिती iPhone 18 series launch features in marathi मध्ये जाणून घ्या, किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आत्ताच वाचा.

जगातील सर्वात प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनीज पैकी एक असलेल्या Apple ने शेवटी आपली iPhone 18 सिरीज लॉन्च केली आहे. 9 September 2026 रोजी Apple ने “Surprise & Shine” इव्हेंट मध्ये iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max हे दोन मॉडेल्स लॉन्च केले आहेत.

एवढंच नाही तर Apple ने या इव्हेंट मध्ये आपला पहिला फोल्डेबल iPhone देखील लॉन्च केला आहे जो iPhone Duo असणार आहे.

iPhone 18 Pro मॉडेल्स हे Apple चे आतापर्यंतचे सर्वात अॅडव्हान्स्ड स्मार्टफोन्स असणार आहेत. iPhone च्या लाइनअप मधील सर्वात मोठी बॅटरी, वेगवान परफॉर्मन्स आणि नव्याने अपग्रेड केलेल्या कॅमेरा सिस्टम चा समावेश यामध्ये असणार आहे. यासोबतच Apple ने या इव्हेंट मध्ये AirPods, Apple Watch आणि प्रत्येक मॉडेल मध्ये नवीन AI फीचर्स देखील दिले आहेत.

आज आपण iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max बद्दल बोलणार आहोत. तसेच Apple चा पहिला फोल्डेबल iPhone असलेल्या iPhone Duo साठी मी एक वेगळा ब्लॉग बनवणार आहे, ज्यामध्ये iPhone Duo मधील प्रत्येक गोष्ट तुम्हाला सविस्तर समजावून सांगणार आहे.

चला तर पाहूयात, Apple च्या (iphone 18 series launch features in marathi) लाइनअप मधील या दोन व्हेरिएंट्स मध्ये असे कोणते नवीन फीचर्स देण्यात आले आहेत, जे त्यांना इतर iPhones पेक्षा वेगळे बनवतात.

iPhone 18 Pro Series मध्ये डिझाइनचा मोठा बदल? नवीन Finish आणि डिस्प्ले मध्ये काय खास?

डिझाइन कडे पाहिलं तर, या मॉडेल्स मध्ये याआधीच्या iPhones सारखीच फॅमिलिअर डिझाइन पाहायला मिळणार आहे. मात्र डिझाइन मध्ये काही छोटे बदल देखील पाहायला मिळणार आहेत.

जसं की, आता iPhone 18 सिरीज मध्ये डायनॅमिक आयलंड पुन्हा रिडिझाइन करण्यात आला आहे, ज्यामध्ये अधिक अॅडव्हान्स्ड डिस्प्ले टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात आला आहे. iPhone 18 सिरीज च्या डायनॅमिक आयलंडमध्ये आता “लाइव्ह अॅक्टिव्हिटीज अॅट वन्स” हे फीचर देण्यात आलं आहे. म्हणजेच तुम्ही टाइमर सेट केला असेल, त्यासोबत फूड डिलिव्हरी आणि क्रिकेट स्कोअर यांचे अपडेट तुम्ही एकाच वेळी पाहू शकता.

iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ला आजूबाजूला, मागच्या बाजूला आणि कॅमेरा ला युनिबॉडी अॅल्युमिनियम बॉडी फ्रेम ने कव्हर करण्यात आलं आहे. प्रोटेक्शन च्या बाबतीत तुम्हाला iPhone 17 सिरीज मध्ये जे देण्यात आलं होतं, तेच iPhone 18 सिरीज मध्येही देण्यात आलं आहे. यामध्ये मागच्या आणि पुढच्या बाजूला ड्युरॅबिलिटी साठी सिरॅमिक शील्ड देण्यात आला आहे.

आता डिस्प्ले बद्दल बोलायचं झालं तर, डिस्प्ले मध्ये फार मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. iPhone 18 Pro मध्ये तुम्हाला 6.3-इंच डिस्प्ले, तर iPhone 18 Pro Max मध्ये 6.9-इंच डिस्प्ले पाहायला मिळणार आहे. iPhone 18 Pro हा 5.91-इंच लांब, तर iPhone 18 Pro Max हा 6.43-इंच लांब असणार आहे.

दोन्ही डिव्हाइसेस मध्ये बॅटरी मध्ये अपडेट पाहायला मिळाला आहे आणि त्यामुळे iPhone चे वजनही वाढले आहे. iPhone 18 Pro चे वजन 211 ग्रॅम असणार आहे तर iPhone 18 Pro Max चे वजन 249 ग्रॅम असणार आहे. मागील मॉडेल्स सोबत तुलना केली तर iPhone 17 Pro चे वजन 206 ग्रॅम आहे तर iPhone 17 Pro Max चे वजन 233 ग्रॅम आहे.

Apple ने जसा iPhone 17 Pro आणि Pro Max मध्ये अॅक्शन बटन दिला होता, तसाच तो आता iPhone 18 Pro मॉडेल्स मध्येही देण्यात आला आहे. अॅक्शन बटन मध्ये तुम्हाला अनेक कस्टमायझेशन चे पर्याय देण्यात आले आहेत. हे बटन प्रेस केल्यानंतर काय झालं पाहिजे, यासाठी तुम्ही खाली दिलेल्या पर्याय पैकी एक पर्याय निवडू शकता.

1) कॅमेरा:– सेल्फी, पोर्ट्रेट किंवा व्हिडीओ काढण्यासाठी.

2) ट्रान्सलेट:– ट्रान्सलेट अॅप ओपन करण्यासाठी आणि त्यानंतर तुमचे टेक्स्ट ट्रान्सलेट होण्यास सुरुवात होईल.

3) फ्लॅशलाइट:– फ्लॅशलाइट चालू/बंद करण्यासाठी.

4) व्हॉइस मेमो:– रेकॉर्डिंग स्टार्ट किंवा स्टॉप करण्यासाठी.

5) सायलेंट मोड:– फोन सायलेंट करण्यासाठी, ज्यामुळे कॉल्स किंवा नोटिफिकेशन्स सायलेंट करता येतात.

6) फोकस मोड:– फोकस मोड अॅक्टिव्हेट किंवा डीअॅक्टिव्हेट करण्यासाठी.

7) शॉर्टकट्स:- तुमचं फेव्हरेट अँप ओपन करण्यासाठी, एखादी म्युझिक प्लेलिस्ट सुरू करण्यासाठी किंवा मेसेज सेंड करण्यासाठी.

iPhone 18 Pro आणि Pro Max चा कॅमेरा किती दमदार? 48MP व्हेरिएबल अपर्चर मुळे फोटोग्राफीमध्ये काय बदलले?

Apple ने यावर्षी जर सर्वात जास्त मेहनत कोणत्या गोष्टीसाठी घेतली असेल, तर ती कॅमेरा साठी घेतली आहे. कॅमेरा मध्ये असा एक मोठा बदल करण्यात आला आहे, जो iPhone 18 सिरीज ला इतर iPhones पेक्षा वेगळं बनवतो. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी या सिरीज मध्ये iPhone 18 Pro Max ने बाजी मारली आहे.

iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max मध्ये तुम्हाला 48 मेगापिक्सेल फ्यूजन मेन कॅमेरा (ƒ/1.48, ƒ/1.8, ƒ/2.8, ƒ/4.0) मिळणार आहे, जो Apple चा आतापर्यंतचा सर्वात अॅडव्हान्स्ड कॅमेरा असणार आहे. यासोबत 48 मेगापिक्सेल फ्यूजन अल्ट्रा Wide कॅमेरा आणि 48 मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलिफोटो, 3D सेन्सर OIS सोबत 4x ऑप्टिकल झूम मिळणार आहे. हा कॅमेरा इतका अॅडव्हान्स्ड असण्याचं मुख्य कारण म्हणजे Apple ने यामध्ये व्हेरिएबल अपर्चर दिलं आहे.

आतापर्यंत प्रत्येक iPhone कॅमेरा मध्ये आपल्याला फिक्स्ड अपर्चर मिळत होता. मात्र, आता iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max मध्ये मेन लेन्स वर अपर्चर देण्यात आला आहे.

व्हेरिएबल अपर्चर हे 6 इंडिव्हिज्युअल ब्लेड्स च्या मदतीने बनवण्यात आलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 सेटिंग्स मिळणार आहेत (ƒ/1.48, ƒ/1.8, ƒ/2.8, ƒ/4.0). यामध्ये तुम्ही हे ब्लेड्स अॅडजस्ट करून फोटो मध्ये किती प्रकाश पाहिजे हे ठरवू शकता.

तुम्ही व्हेरिएबल अपर्चर ला एका खिडकीसारखं समजा. जेव्हा खिडकी जास्त उघडी असेल, तेव्हा रूम मध्ये जास्त प्रकाश पडणार आणि खिडकी थोडीच उघडी ठेवली तर रूम मध्ये कमी प्रकाश पडणार. व्हेरिएबल अपर्चर हे फीचर तुम्हाला पूर्णपणे कंट्रोल देतं की कोणत्या फोटो मध्ये किती प्रकाश हवी.

आता ज्या यूजर्स ला फोटोग्राफी करताना कॅमेरा मॅन्युअली कंट्रोल करायचा असेल, त्या यूजर्स साठी Apple ने कॅमेरा अँप मध्ये काही पर्याय दिले आहेत. यामध्ये तुम्ही शटर स्पीड, अपर्चर आणि व्हाइट बॅलन्स सारख्या सेटिंग्स मॅन्युअली सेट करू शकता.

तुम्हाला जर हे कंट्रोलस वापरायचे असतील, तर त्यासाठी ब्लॅकमॅजिक कॅमेरा आणि हॅलाइड सारखे थर्ड-पार्टी अॅप्स इन्स्टॉल करावे लागतील. त्यानंतरच तुम्ही कॅमेरा मॅन्युअली कंट्रोल करू शकता.

Apple ने कॅमेरा मध्ये काही नवीन फीचर्स दिले आहेत. त्यातील पहिलं फीचर म्हणजे ऑटो फोकस ट्रॅकिंग. ऑटो फोकस ट्रॅकिंग हे फीचर कोणत्याही लेन्स साठी अॅक्टिव्हेट करू शकता पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे फक्त मेन कॅमेरा आणि टेलिफोटो कॅमेरा मध्येच वापरता येतं.

जेव्हा तुम्ही एखादा सीन किंवा व्हिडीओ शूट करता, तेव्हा iPhone व्हिडीओ मधील सब्जेक्ट किंवा वस्तू शोधतो आणि ती सापडल्यानंतर त्या वस्तूभोवती एक पिवळा चौकोन दिसतो. तसेच, तुम्हाला एखाद्या विशिष्ट सब्जेक्ट ला ट्रॅक करायचं असेल, तर त्या सब्जेक्ट वर डबल टॅप केल्यानंतर iPhone त्या सब्जेक्ट ला ट्रॅक करेल.

व्हिडीओ रेकॉर्डिंग

व्हिडीओ रेकॉर्डिंग साठी Apple ने मागील काही वर्षांपासून iPhone Pro मॉडेल्स मधील रेकॉर्डिंग ला नेक्स्ट लेव्हल वर नेलं आहे. यावर्षीही Apple ने iPhone 18 Pro मॉडेल्स मध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग साठी काही अपग्रेडस केले आहेत.

iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max मध्ये तुम्ही 24, 25, 30, 60, 100 आणि 120 fps वर 4K डॉल्बी व्हिजन व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. यासोबत सिनेमॅटिक मोड, प्रोरेस मोड, HDR रेकॉर्डिंग, स्लो-मोशन व्हिडिओ, अॅक्शन मोड आणि टाइम-लॅप्स यांसारखे फीचर्स देखील मिळणार आहेत.

फ्रंट कॅमेरा मधूनही तुम्हाला 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग, नाईट मोड, क्विकटेक व्हिडिओ, डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंग आणि स्मार्ट HDR 5 इंटिग्रेशन यांसारखे फीचर्स मिळणार आहेत. यासोबत फोटॉनिक इंजिन देण्यात आला आहे, ज्यामुळे कमी प्रकाशातही कॅमेरा ची परफॉर्मन्स सुधारते. तसेच, फोटोग्राफिक स्टाइल्स आणि डीप फ्यूजन यांसारखे फीचर्स देखील मिळणार आहेत, ज्यामुळे प्रत्येक वस्तू अधिक डिटेल मध्ये कॅप्चर करता येईल.

Apple ने यावर्षी iPhone 18 मॉडेल्स च्या कॅमेरा मध्ये यूजर्स ना पूर्णपणे कॅमेरा कंट्रोलस त्यांच्या हातात दिले आहेत, ज्यामुळे प्रत्येक फोटो यूजर्स ना हवा तसा कॅप्चर करता येईल.

iPhone 18 Pro आणि Pro Max मध्ये A20 Pro चिप किती पॉवरफुल? गेमिंग, AI आणि रोजच्या परफॉर्मन्स मध्ये काय बदलले?

दोन्ही मॉडेल्स मध्ये यावर्षी नवीन प्रोसेसर देण्यात आला आहे, जो iPhone सिरीज मधील सर्वात पॉवरफुल प्रोसेसर मानला जाणार आहे. हो, iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max मध्ये नवीनतम A20 Pro चिपसेट देण्यात आला आहे, जो 2-नॅनोमीटर प्रोसेसर वर बिल्ट करण्यात आला आहे. यासोबत 6-कोर CPU, 7-कोर GPU आणि 16-कोअर न्यूरल इंजिन देण्यात आला आहे ज्यामुळे AI परफॉर्मन्स आणखी वेगवान होणार आहे.

आता जे यूजर्स जास्त वेळ iPhone वापरतात किंवा गेमिंग करतात, त्यांना iPhone गरम झाल्यावर जास्त काळजी करण्याची गरज नाही. कारण त्यासाठी Apple ने iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max मध्ये विशेष काळजी घेतली आहे.

Apple ने असं सांगितलं आहे की A20 प्रोसेसर हा A19 प्रोसेसर पेक्षा 40% वेगवान असणार आहे. आता इतक्या पॉवरफुल प्रोसेसर ला थंड ठेवण्यासाठी Apple ने यामध्ये व्हेपर चेंबर दिला आहे, जो iPhone 17 Pro मधील व्हेपर चेंबर पेक्षा 3 पट मोठ्या सरफेस एरिया चा असणार आहे.

iPhone 18 Pro आणि Pro Max ची बॅटरी किती दमदार? 30 तासांपर्यंत वापर आणि फास्ट चार्जिंग ची माहिती.

बॅटरी कडे पाहिलं तर, यावर्षी बॅटरी मध्येही चांगले बदल करण्यात आले आहेत. iPhone 18 Pro एकदा चार्ज केल्यानंतर 24 तासांपर्यंत चालू शकतो आणि सोबत 36 तासांचा चा व्हिडीओ प्लेबॅक मिळणार आहे. तर iPhone 18 Pro Max एकदा चार्ज केल्यानंतर 30 तासांपर्यंत वापरता येणार आहे सोबत 45 तासांचा चा व्हिडीओ प्लेबॅक मिळणार आहे.

जर तुम्ही eSIM मॉडेल्स घेतले, तर त्यामध्ये तुम्हाला जास्त मोठी बॅटरी मिळणार आहे. तर फिजिकल SIM असलेला मॉडेल घेतला, तर त्यामध्ये तुलनेने छोटी बॅटरी असणार आहे. eSIM असलेले iPhone 18 Pro मॉडेल्स सध्या युनायटेड स्टेट्स, कॅनडा, जपान, मेक्सिको आणि इतर काही देशांमध्ये विकले जात आहेत.

iPhone 18 Pro मॉडेल्स मध्ये बॅटरी तर मोठी मिळत आहेच पण यासोबत चार्जिंग स्पीड सुद्धा वाढवण्यात आली आहे. हे मॉडेल्स आता 60W च्या पॉवर अॅडॅप्टर मुळे फक्त 15 मिनिटांत 50% चार्ज होणार आहेत. तसेच iPhone 18 Pro Max मध्ये 5 मिनिटांच्या वायर्ड चार्जिंग मध्ये तुम्हाला 7 तासांपर्यंतचा व्हिडीओ प्लेबॅक मिळणार आहे. यासोबत 25W मॅगसेफ आणि Qi2 वायरलेस चार्जिंग चा पर्याय सुद्धा असणार आहे.

iPhone 18 Pro आणि Pro Max चे स्पेसिफिकेशन्स एका नजरेत जाणून घ्या सर्व फीचर्स.

ब्लॅक
ग्लेशियर
बरगंडी
सिल्वर
iphone 18 series launch features in marathiiPhone 18 ProiPhone 18 Pro Max
ऑपरेटिंग सिस्टमiOS 27iOS 27
प्रोसेसरA20 Pro ChipA20 Pro Chip
इंटरनल स्टोरेज256GB, 512GB, 1TB, 2TB256GB, 512GB, 1TB, 2TB
रॅम––
सुरक्षाफेस आयडीफेस आयडी
बॅटरीची क्षमताव्हिडिओ प्लेबॅक — 34 तासांपर्यंतव्हिडिओ प्लेबॅक — 43 तासांपर्यंत
अ‍ॅडॉप्टर60W60W
पोर्ट्सटाइप -C पोर्टटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार6.3 इंच (सुपर रेटिना XDR डिस्प्ले)6.9 इंच (सुपर रेटिना XDR डिस्प्ले)
रिझोल्यूशन2622 x 1206 पिक्सेल2622 x 1320 पिक्सेल
पाणी संरक्षणIP68 जल-प्रतिरोधक डिझाइनIP68 जल-प्रतिरोधक डिझाइन
डिस्प्ले तंत्रज्ञान1)120Hz रिफ्रेश रेट
2)पीक ब्राइटनेस:- 3000 निट्स
3)जास्तीत जास्त ब्राइटनेस:- 1000 निट्स
4)HDR डिस्प्ले
1)120Hz रिफ्रेश रेट
2)पीक ब्राइटनेस:- 3000 निट्स
3)जास्तीत जास्त ब्राइटनेस:- 1000 निट्स
4)HDR डिस्प्ले
सेंसर1)LiDAR स्कॅनर
2)हाय डायनॅमिक रेंज जायरो
3)बारोमीटर
4)हाय-जी ॲक्सेलरोमीटर
5)प्रॉक्सिमिटी सेन्सर
6)ड्युअल अॅम्बियंट लाईट सेन्सर्स
1)LiDAR स्कॅनर
2)हाय डायनॅमिक रेंज जायरो
3)बारोमीटर
4)हाय-जी ॲक्सेलरोमीटर
5)प्रॉक्सिमिटी सेन्सर
6)ड्युअल अॅम्बियंट लाईट सेन्सर्स
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 18 मेगापिक्सेल

2)पाठीचा कॅमेरा:- 48 मेगापिक्सेल फ्युजन अल्ट्रा-वाइड कॅमेरा + 48 मेगापिक्सेल फ्युजन टेलीफोटो कॅमेरा + 48 मेगापिक्सेल फ्युजन मेन कॅमेरा व्हेरिएबल अपर्चर (ƒ/1.48, ƒ/1.8, ƒ/2.8, ƒ/4.0)

3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग :-
4K – 24 fps, 25 fps, 30 fps, 60 fps, 100 fps (फ्युजन मेन) or 120 fps

1080P – 25 fps, 30 fps, 60 fps or 120 fps

720P – 30fps

4)सेल्फी कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग :-
4K – 24 fps, 25 fps, 30 fps or 60 fps

1080p – 25 fps, 30 fps or 60 fps
1)सेल्फी कॅमेरा:- 18 मेगापिक्सेल

2)पाठीचा कॅमेरा:- 48 मेगापिक्सेल फ्युजन अल्ट्रा-वाइड कॅमेरा + 48 मेगापिक्सेल फ्युजन टेलीफोटो कॅमेरा + 48 मेगापिक्सेल फ्युजन मेन कॅमेरा व्हेरिएबल अपर्चर (ƒ/1.48, ƒ/1.8, ƒ/2.8, ƒ/4.0)

3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:-
4K – 24 fps, 25 fps, 30 fps, 60 fps, 100 fps (फ्युजन मेन) or 120 fps

1080P – 25 fps, 30 fps, 60 fps or 120 fps

720P – 30fps

4)सेल्फी कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग :-
4K – 24 fps, 25 fps, 30 fps or 60 fps

1080p – 25 fps, 30 fps or 60 fps
ऑडिओडॉल्बी ऑडिओडॉल्बी ऑडिओ
रंग
1)बरगंडी
2)सिल्वर
3)ग्लेशियर
4)ब्लॅक
1) बरगंडी
2)सिल्वर
3)ग्लेशियर
4)ब्लॅक
कनेक्टिविटी5G
ब्लूटूथ 6, Wi-Fi-7
5G
ब्लूटूथ 6, Wi-Fi-7
(iphone 18 pro price marathi 256GB)किंमत₹1,64,900₹1,79,900

iPhone 17 Pro आणि Pro Max ची किंमत किती? 2026 मधील नवीन किंमत आणि ऑफर्स जाणून घ्या

किंमत कडे पाहिलं तर, iPhone 18 Pro मॉडेल्स हे iPhone सिरीज मधील सर्वात महागडे iPhones असणार आहेत. हो, iPhone 18 Pro ची किंमत ₹1,64,900 पासून सुरू होणार आहे. प्रत्येक मॉडेल ची किंमत स्टोरेज नुसार वाढत जाणार आहे.

तर iPhone 18 Pro मध्ये 4 व्हेरिएंट्स लॉन्च करण्यात आले आहेत. पहिला व्हेरिएंट 256GB चा असून, त्याची किंमत ₹1,64,900 आहे. दुसरा व्हेरिएंट 512GB चा आहे, ज्याची किंमत ₹1,89,900 आहे. तिसरा व्हेरिएंट 1TB चा असून, त्याची किंमत ₹2,39,900 आहे. तर शेवटचा व्हेरिएंट देखील 2TB चा असून, त्याची किंमत ₹3,14,900 असणार आहे.

iPhone 18 Pro Max मध्ये सुद्धा 4 व्हेरिएंट्स लाँच करण्यात आले आहेत. दोन्ही मॉडेल्स मध्ये व्हेरिएंट्स सारखेच आहेत, फक्त किंमत वेगळी असणार आहे. 256GB व्हेरिएंट ची किंमत ₹1,79,900 आहे, 512GB व्हेरिएंट ची किंमत ₹2,04,900 आहे, 1TB व्हेरिएंट ₹2,54,900 ला मिळणार आहे, तर 2TB व्हेरिएंट ची किंमत ₹3,29,000 असणार आहे.

दोन्ही मॉडेल्स मध्ये रंग सुद्धा सारखेच असणार आहेत, ज्यामध्ये ब्लॅक, बरगंडी, सिल्वर आणि ग्लेशियर या रंगांचा समावेश असणार आहे.

तीन प्रीमियम फ्लॅगशिप्सची थेट टक्कर! iPhone 18 Pro Max vs Pixel 11 Pro XL vs Galaxy S26 Ultra

iPhone 18 Pro MaxGoogle Pixel 11 Pro XLSamsung Galaxy S26 Ultra
ऑपरेटिंग सिस्टमiOS 27अँड्रॉइड 17 (7 ऑपरेटिंग सिस्टम वर्षे & Pixel ड्रॉप अपडेट्स)अँड्रॉइड 17 (7 ऑपरेटिंग सिस्टम वर्षे)
प्रोसेसरA20 Pro ChipGoogle टेन्सर G6,
Titan M3 सिक्युरिटी Coprocessor
स्नॅपड्रॅगन 8 एलिट जन 5 फॉर गॅलेक्सी
इंटरनल स्टोरेज256GB, 512GB, 1TB, 2TB256 GB, 512 GB256GB, 512GB, 1TB
रॅम–12GB, 16GB12GB, 16GB
सुरक्षाफेस आयडीफिंगरप्रिंटफिंगरप्रिंट
बॅटरीची क्षमताव्हिडिओ प्लेबॅक — 34 तासांपर्यंत5115 mAh5000 mAh
अ‍ॅडॉप्टर60W45W60W
पोर्ट्सटाइप -C पोर्टटाइप -C पोर्टटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार6.3 इंच (सुपर रेटिना XDR डिस्प्ले)6.8 इंच (सुपर अॅक्चुआ डिस्प्ले)6.8 इंच
रिझोल्यूशन2622 x 1206 पिक्सेल1344 × 2992 पिक्सेल3120 x 1440 पिक्सेल
पाणी संरक्षणIP68 जल-प्रतिरोधक डिझाइनIP68 जल-प्रतिरोधक डिझाइनIP68 जल-प्रतिरोधक डिझाइन
डिस्प्ले तंत्रज्ञान1)120Hz रिफ्रेश रेट

2)पीक ब्राइटनेस:- 3000 निट्स

3)जास्तीत जास्त ब्राइटनेस:- 1000 निट्स

4)HDR डिस्प्ले
1) पीक ब्राइटनेस:- 3600 निट्स

2) हाय ब्राइटनेस मोड(HBM):- 2400 निट्स

3)1-120 हर्ट्झ रिफ्रेश रेट

4)कलर डेप्थ:- 16 दक्षलक्ष रंग

5)HDR+
1) पीक ब्राइटनेस:- 3600 निट्स

2) हाय ब्राइटनेस मोड(HBM):- 2400 निट्स

3)1-120 हर्ट्झ रिफ्रेश रेट

4)कलर डेप्थ:- 16 दक्षलक्ष रंग
सेंसर1)LiDAR स्कॅनर
2)हाय डायनॅमिक रेंज जायरो
3)बारोमीटर
4)हाय-जी ॲक्सेलरोमीटर
5)प्रॉक्सिमिटी सेन्सर
6)ड्युअल अॅम्बियंट लाईट सेन्सर्स
1)ॲक्सेलरोमीटर
2)प्रॉक्सिमिटी सेन्सर
3)अ‍ॅम्बियंट लाइट सेन्सर
4)जायरोस्कोप
5)ई-कंपास
6)इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल
1)ॲक्सेलरोमीटर
2)प्रॉक्सिमिटी सेन्सर
3)अ‍ॅम्बियंट लाइट सेन्सर
4)जायरो सेन्सर
5)बॅरोमीटर
6)जिओमॅग्नेटिक सेन्सर
7)हॉल सेन्सर
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 18 मेगापिक्सेल

2)पाठीचा कॅमेरा:- 48 मेगापिक्सेल फ्युजन अल्ट्रा-वाइड कॅमेरा + 48 मेगापिक्सेल फ्युजन टेलीफोटो कॅमेरा + 48 मेगापिक्सेल फ्युजन मेन कॅमेरा व्हेरिएबल अपर्चर (ƒ/1.48, ƒ/1.8, ƒ/2.8, ƒ/4.0)

3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग :-
4K – 24/25/30/60/100 (फ्युजन मेन)/120 fps
1080P – 25/30/60120 fps
720P – 30fps

4)फ्रंट कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग :-
4K – 24/25/30/60 fps
1080p – 25/30/60 fps
1)सेल्फी कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल

2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल कॅमेरा + 48 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड कॅमेरा मॅक्रो फोकस सोबत+ 48 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स

3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:-
8K 24/30 FPS
4K 24/30/60 FPS
1080P 24/30/60 FPS


4)फ्रंट कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग :-
4K 30/60 FPS
1)सेल्फी कॅमेरा:- 12 मेगापिक्सेल

2)पाठीचा कॅमेरा:- 200 मेगापिक्सेल कॅमेरा + 50 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड कॅमेरा + 50 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स + 10 मेगापिक्सेल

3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:-
UHD 8K 30 FPS


4)फ्रंट कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग :-
4K 30/60 FPS
ऑडिओडॉल्बी ऑडिओस्टीरिओ स्पीकर्सस्टीरिओ स्पीकर्स
रंग
1)बरगंडी
2)सिल्वर
3)ग्लेशियर
4)ब्लॅक
1) कॅन्यन
2) ऑब्सिडियन (matte)
3) ऑलिव्ह
4) फॉग
1)पिंक गोल्ड
2)व्हाइट
3)स्काय ब्लू
4)सिल्वर शॅडो
5)ब्लॅक
6)कोबाल्ट व्हायोलेट
कनेक्टिविटी5G
ब्लूटूथ 6, Wi-Fi-7
5G
ब्लूटूथ v6, Wi-Fi 7
2G, 3G, 4G, 5G
ब्लूटूथ v6, Wi-Fi
(iphone 17 pro marathi price)किंमत₹1,79,900₹1,34,999₹1,54,999

Leave a Comment