Vivo ने भारतात लॉन्च केली आपली पहिली स्मार्टवॉच Vivo Watch GT 2! मिळणार 25 दिवसांची Battery Life, GPS आणि अनेक खास Features.

Vivo ने भारतात लॉन्च केली आपली पहिली स्मार्टवॉच Vivo Watch GT 2! 25 दिवसांची दमदार Battery Life, GPS आणि अनेक खास फीचर्ससह येणाऱ्या या स्मार्टवॉचची संपूर्ण माहिती Vivo Watch GT 2 Features in Marathi मध्ये जाणून घ्या, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स आत्ताच वाचा.

Vivo Watch GT2 Features In Marathi

भारतात आता स्मार्टवॉच च्या स्पर्धेत आणखी एका ब्रँड ने उडी घेतली आहे, तो ब्रँड म्हणजे Vivo. Vivo हा ब्रँड त्याच्या स्मार्टफोन्स आणि कॅमेरा साठी ओळखला जातो. 26 November 2026 रोजी Vivo ने आपली Vivo Watch GT 2 ही स्मार्टवॉच लॉन्च केली आहे.

सध्या बाजारात अनेक ब्रँडच्या स्मार्टवॉचेस उपलब्ध आहेत. यामध्ये Google Pixel Watch, Samsung Galaxy Watch 4, Titan Celestor 2.0, boAt Lunar Pro LTE आणि Noise Pro 6 Max यांसारख्या स्मार्टवॉचचा समावेश आहे. या सर्व स्मार्टवॉचच्या मदतीने वेळ पाहण्यापासून ते आपल्या फिटनेस शी संबंधित अनेक गोष्टी ट्रॅक करता येतात.

मात्र, स्मार्टवॉच खरेदी करताना सर्वात महत्त्वाच्या ठरतात ती म्हणजे तिचे फीचर्स आणि तिची किंमत.

Vivo च्या या स्मार्टवॉच मध्ये कोणते नवीन फीचर्स मिळणार आहेत आणि तिची किंमत किती असणार आहे, ज्यामुळे Vivo Watch GT 2 इतर brands च्या स्मार्टवॉचेस पेक्षा वेगळी ठरते? चला तर पाहूयात, Vivo ने आपल्या पहिल्या स्मार्टवॉच मध्ये कोणते खास फीचर्स दिले आहेत.

Vivo Watch GT 2 चा Display किती शानदार? जाणून घ्या Brightness, Refresh Rate आणि Design.

vivo watch gt 2 features in marathi
स्टेलर व्हाइट
vivo watch gt 2 features in marathi
ऑब्सिडियन ब्लॅक

Vivo Watch GT 2 मध्ये तुम्हाला 2.07-inch अल्ट्रा व्हिजन AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. यामध्ये 2400 nits ची लोकल पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे ज्यामुळे कडक उन्हातही स्क्रीन सहज पाहता येणार आहे. यासोबत 60Hz चा रिफ्रेश रेट देखील मिळणार आहे.

या स्मार्टवॉच मध्ये ॲल्युमिनियम अलॉय फ्रेम सोबत सिलिकॉन स्ट्रॅप देण्यात आला आहे, ज्यामुळे रोजच्या वापरासाठी तिचं design हलकं आणि आरामदायक वाटणार आहे. यामध्ये युजर्स आपल्या आवडीनुसार वेगवेगळे वैयक्तिकृत वॉच फेसेस सेट करू शकतात.

यामध्ये आकर्षक, इंटरॲक्टिव्ह आणि डायनॅमिक वॉच फेसेस चा समावेश असणार आहे.

Vivo Watch GT 2 चे Health आणि Fitness Features किती खास? Heart Rate पासून Sleep Tracking पर्यंत सर्व माहिती

फिटनेस प्रेमी साठी Vivo ने या Smartwatch मध्ये 100 स्पोर्ट्स मोड्स दिले आहेत, ज्यामध्ये आउटडोअर, इनडोअर आणि कार्डिओ ॲक्टिव्हिटीज चा समावेश आहे. एवढंच नाही तर यामध्ये वजन कमी करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन करणारा Weight Loss Program देखील देण्यात आला आहे.

वर्कआउट आणि ॲक्टिव्हिटी ट्रॅक करण्यासाठी यामध्ये तुम्हाला काही खास फीचर्स देण्यात आले आहेत, जसे की

  1. स्ट्रेंथ ट्रेनिंग:– यामध्ये तुम्ही ट्रॅकिंग साठी वेळ सेट करू शकता आणि प्रत्येक सेट ट्रॅक करू शकता.

2. रनिंग:– यामध्ये परफॉर्मन्स इनसाइट्स, रनिंग कोर्सेस आणि रनिंग फॉर्म ॲनालिसिस सारखे फीचर्स दिले आहेत. यामध्ये तुमच्या रनिंग स्टाइल चे विश्लेषण केले जाते, ज्यामुळे दुखापत होण्याचा धोका कमी करण्यास मदत होते.

3. वर्कआउट डेटा शेअरिंग :- यामध्ये तुम्ही तुमचा आरोग्यविषयक डेटा थर्ड पार्टी ॲप्ससोबत सिंक करू शकता.

4. रॅकेट स्पोर्ट्स :– बॅडमिंटन, टेनिस, टेबल टेनिस यांसारख्या खेळांचे प्रगत विश्लेषण केले जाईल. तसेच, खेळाडूंचे स्विंग्स आणि शॉट्स यांसारख्या हालचालींचाही मागोवा घेतला जाईल.

5. दैनंदिन ॲक्टिव्हिटी :– यामध्ये तुम्ही दररोजची चार उद्दिष्टे सेट करू शकता. तसेच, मासिक सारांश आणि कामगिरीनुसार अचिव्हमेंट बॅजेसही मिळतील.

आरोग्य देखरेखीसाठी यामध्ये सतत हार्ट रेट, रक्तातील ऑक्सिजनची पातळी आणि तणावाचे निरीक्षण केले जाईल. याशिवाय, Vivo GT 2 स्मार्टवॉचमध्ये गाइडेड ब्रीदिंग एक्सरसाइजेस, मासिक पाळीचा अंदाज आणि महत्त्वाच्या तारखांसाठी रिमाइंडर्स मिळतील. स्लीप मॉनिटरिंगमध्ये झोपेदरम्यान श्वसनाचा दर, SpO2 आणि हार्ट रेट व्हेरिएबिलिटी (HRV) रेकॉर्ड केली जाईल.

Smartphone शिवायही मिळणार अनेक सुविधा? Vivo Watch GT 2 चे Smart Features जाणून घ्या.

Vivo Watch GT 2 स्मार्टवॉच BlueOS 3.0 वर चालणार आहे. यामध्ये OriginOS 7 शी संबंधित काही फीचर्सही देण्यात आले आहेत. महत्त्वाची माहिती तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील Origin Island द्वारे थेट स्मार्ट व्ह्यू इंटरफेस सोबत सिंक करू शकता. यामुळे तुम्हाला रिअल टाइम अपडेट्स आणि नोटिफिकेशन्स मिळतील.

हे ही वाचा :- WhatsApp वर ‘NO’ स्कॅम पासून सावध राहा! एका रिप्लायमुळे बँक खात्यातील पैसे धोक्यात येऊ शकतात.

या स्मार्टवॉचमध्ये स्मार्ट विंडो नावाचे एक फीचर आहे. यामध्ये तुम्हाला रिमाइंडर्ससोबतच फ्लाइट, ट्रेन, फूड डिलिव्हरी आणि इतर अनेक गोष्टींचे अपडेट्स थेट या वॉचवर पाहायला मिळतील.

हे इंटिग्रेशन युजर्सना खूप मदत करणार आहे, कारण आता तुम्हाला स्मार्टफोनला हात न लावता स्मार्टवॉचवर नोटिफिकेशन्स आणि काही महत्त्वाची माहिती पाहता येणार आहे. म्हणजेच, प्रत्येक वेळी नोटिफिकेशन आल्यावर सारखं सारखं स्मार्टफोन चेक करण्याची गरज नाही.

एकदा Charge करा आणि 25 दिवस वापरा! Vivo Watch GT 2 ची Battery आणि Connectivity जाणून घ्या.

स्मार्टवॉचमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची बॅटरी आणि Vivo Watch GT 2 ची बॅटरी हे एक खास वैशिष्ट्य असणार आहे. Vivo ने सांगितले आहे की, Vivo Watch GT 2 एकदा चार्ज केल्यानंतर २५ दिवस चालणार आहे.

पण Vivo च्या स्टँडर्ड वापराच्या अटींनुसार, या स्मार्टवॉचची बॅटरी १७ दिवस चालणार आहे. तसेच, तुम्ही ऑलवेज ऑन डिस्प्ले (AOD) सुरू ठेवल्यास बॅटरी १४ दिवस चालेल.

Watch GT2 स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगचा सपोर्ट असणार आहे, ज्यामुळे युजर्सना थेट स्मार्टवॉचवरून कॉल उचलता येणार आहेत. यासोबतच मेसेज सिंक्रोनायझेशन आणि क्विक रिप्लायची सुविधाही मिळणार आहे. तसेच, Google Maps नेव्हिगेशनचा सपोर्ट असल्यामुळे युजर्सना Vivo Watch GT 2 वरच दिशा पाहता येणार आहेत.

Vivo Watch GT 2 ची किंमत जाहीर! कोणत्या रंगात आणि कुठे खरेदी करता येणार?

भारतात Vivo GT 2 ची किंमत १४,९९९ रुपये असणार आहे. यामध्ये तुम्हाला स्टेलर व्हाइट आणि ऑब्सिडियन ब्लॅक असे दोन कलर ऑप्शन्स मिळणार आहेत.

स्मार्टवॉचची प्री-बुकिंग २६ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे आणि त्याची विक्री ३ डिसेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. Vivo Watch GT 2 स्मार्टवॉच तुम्ही Vivo च्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा Flipkart वरून खरेदी करू शकता.

Leave a Comment