Google Pixel 11 Series Specs In Marathi
गुगल ही देशातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध टेक कंपनी आहे. दरवर्षी Google त्यांच्या Pixel सिरीज मध्ये एक नवीन सिरीज add करत जाते ज्यामध्ये नवीन डिझाइन आणि AI फीचर्स पाहायला मिळतात. Google ने यावेळी प्रामुख्याने AI वर जास्त भर दिला आहे. यामध्ये Google जेमिनी चा समावेश आहे ज्याचा वापर आता युसर्स त्यांच्या दैनंदिन कामांसाठी करू शकतात आणि त्यामुळे त्यांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.
बुधवारी Google ने त्यांच्या “Made by Google 2026” इव्हेंट मध्ये Pixel 11 सिरीज लाँच केली आहे. यावेळी Pixel 11 सिरीज मध्ये Pixel 11, Pixel 11 Pro, Pixel 11 Pro XL आणि Pixel 11 Pro Fold हे मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर Google ने यासोबत Pixel Watch 5, Tensor G6 चिपसेट आणि अॅडव्हान्स्ड गूगल हेल्थ प्लॅटफॉर्म देखील लाँच केले आहे.
Made by Google 2026” या इव्हेंट मुळे स्मार्टफोन मार्केट मध्ये धुमाकूळ घातला आहे कारण Google ने फक्त हार्डवेअर वरच नाही तर यावेळी सॉफ्टवेअर वरही जास्त लक्ष दिले आहे.
चला तर पाहुयात, Google ने या नवीन सिरीज मध्ये असे कोणते नवीन फीचर्स दिले आहेत ज्यांची सध्या मार्केट मध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
Google Pixel 11 सिरीज चा कॅमेरा किती दमदार? AI आणि अपग्रेडेड सेन्सरसह फोटोग्राफीमध्ये काय बदलले.
Pixel सिरीज ही कॅमेरा साठी ओळखली जाते आणि त्यासोबतच कॅमेरा बार साठीसुद्धा प्रसिद्ध आहे. Google च्या प्रत्येक स्मार्टफोन मध्ये आपल्याला कॅमेरा बार मध्ये काही ना काही वेगळे पाहायला मिळते. Google Pixel 11 सिरीज मध्ये ही काही बदल करण्यात आले आहेत.
Pixel 11 मध्ये कॅमेरा बार आणखी पातळ करण्यात आला आहे. प्रो मॉडेल मध्ये कॅमेरा बार ला मेटल मध्ये wrap करण्यात आले आहे जेणेकरून मेन कॅमेरा अधिक सुरक्षित राहील.
कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर Pixel 11 मध्ये तुम्हाला 48 मेगापिक्सेल वाईड कॅमेरा, 13 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड लेन्स आणि 10.8 मेगापिक्सेल टेलीफोटो सेंसर मिळणार आहे जो 30x पर्यंत झूम करू शकतो.

Pro मॉडेल कडे पाहिलं तर दोन्ही स्मार्टफोनस मध्ये कॅमेरा सेटअप सारखाच देण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सेल वाईड लेन्स, 48 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 48 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. टेलीफोटो लेन्स च्या मदतीने तुम्ही 5x ऑप्टिकल झूम पासून 120x झूम पर्यंत झूम करू शकता. फ्रंट कॅमेरा म्हणून दोन्ही Pro मॉडेल्स मध्ये 42 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
यावेळी आपल्याला कॅमेरा झूम मध्ये अपडेट पाहायला मिळाला आहे. याआधी Pro मॉडेल्स मध्ये 100x पर्यंत झूम मिळत होता पण आता Pixel 11 प्रो मॉडेल मध्ये 120x पर्यंतचा झूम मिळणार आहे. सोबतच Pixel च्या बेस व्हेरिएंट मध्ये याआधी 10x पर्यंतचा झूम मिळत होता पण आता Pixel 11 बेस व्हेरिएंट मध्ये तो अपडेट करून 20x करण्यात आला आहे.
कॅमेरा फीचर्स कडे पाहिलं तर तिन्ही मॉडेल्स मध्ये सारखेच फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये बेस्ट टेक, नाईट साइट, अॅस्ट्रोफोटोग्राफी आणि मॅजिक इरेझर सारखे फीचर्स मिळतात. जेव्हा तुम्ही एकाच वेळी जास्त फोटोस काढता तेव्हा बेस्ट टेक मधून तुम्हाला त्यामधील बेस्ट फ्रेम निवडता येतो.
Google ने त्यांच्या Pixel 11 सिरीज मध्ये एक नवीन फीचर दिले आहे जे आजपर्यंतच्या कोणत्याही Pixel सिरीज मध्ये देण्यात आलेले नाही आणि ते फक्त Google Pixel 11 Pro आणि Google Pixel 11 Pro XL मध्ये देण्यात आलेले आहे. ब्रँड ने या फीचर चे नाव हायलाइट असे ठेवले आहे.
हे फीचर तुम्हाला रिअर कॅमेरा मोडूल मध्ये पाहायला मिळणार आहे. जेव्हा तुम्ही Gemini सोबत बोलत असाल किंवा एखाद्या व्यक्तीचा कॉल आला तेव्हा ही लाईट ग्लो होणार. तसेच सेटिंग्स मध्ये जाऊन तुम्ही हे कस्टमाइज करू शकता की कोणत्या वेळी आणि कोणत्या रंगाची लाईट ग्लो झाली पाहिजे.
माझ्या मते, Google ने या फीचर्स मध्ये अजून काही पर्याय द्यायला हवे होते. फक्त Gemini सोबत बोलताना आणि कॉल आल्यावरच ही लाईट चमकणार असेल तर त्यासाठी Google ने हायलाइट हे फीचर का दिले आहे हे थोडे पटत नाही.
बाकीच्या ब्रँड्स जसे की Nothing किंवा Tecno यांच्या स्मार्टफोन्स कडे पाहिलं तर त्यांच्या स्मार्टफोनस मध्ये अशा प्रकारचे अनेक पर्याय देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, मेसेज आला तर लाईट किंवा ग्लिफ ग्लो होणे, कॉल आल्यावर लाईट ग्लो होणे, नोटिफिकेशन आल्यावर लाईट ग्लो होणे किंवा बॅटरी परसेंटेज दाखवणे अशा अनेक सुविधा त्यांच्या स्मार्टफोनस मध्ये पाहायला मिळतात.
Google Pixel 11 सिरीज चा डिस्प्ले आणि डिझाइन किती प्रीमियम? लूकपासून स्क्रीन अनुभवापर्यंत जाणून घ्या.
Pixel 11 सिरीज च्या डिझाइन कडे पाहिलं तर Google Pixel च्या याआधीच्या सिरीज/मॉडेल्स प्रमाणेच डिझाइन पाहायला मिळणार आहे. मात्र Pro मॉडेल मध्ये तुम्हाला अधिक ब्राइटनेस आणि अधिक तीक्ष्ण स्क्रीन पाहायला मिळणार आहे.
Pixel 11 मध्ये तुम्हाला 6.3 इंचाचा अॅक्चुआ डिस्प्ले, 60Hz–120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 निट्स पीक ब्राइटनेस मिळणार आहे. Google Pixel 11 Pro मध्ये देखील 6.3 इंचाचा सुपर अॅक्चुआ डिस्प्ले, 1Hz–120Hz रिफ्रेश रेट आणि 3600 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे.
तर Pixel 11 Pro XL मध्ये बाकीच्या दोन मॉडेल्स पेक्षा थोडा मोठा डिस्प्ले मिळणार आहे. Pro XL मध्ये 6.8 इंचाचा सुपर अॅक्चुआ डिस्प्ले, 1Hz–120Hz रिफ्रेश रेट आणि 3600 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे.
Google ने Pixel 11 Pro आणि Pixel 11 Pro XL या मॉडेल्स मध्ये 3600 निट्स पीक ब्राइटनेस दिली आहे जी आतापर्यंतच्या Pixel सिरीज मधील मोठ्या अपडेट्स पैकी एक असणार आहे.
यासोबतच तिन्ही मॉडेल्स मध्ये स्क्रीन प्रोटेक्शन साठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 देण्यात आले आहे. तसेच प्रो मॉडेल्स मध्ये खास करून अँटी-स्क्रॅच शील्ड देखील देण्यात आली आहे.
Pixel 11 सिरीज मध्ये Google Tensor G6 ची ताकद; मागील पिढीपेक्षा किती वेगवान?
परफॉर्मन्स कडे पाहिलं तर Pixel 11 सिरीज मध्ये प्रोसेसर मध्ये मोठा अपडेट पाहायला मिळणार आहे. Google ने त्यांच्या नवीन Google टेन्सर G6 प्रोसेसर सोबत टेन्सर M3 सिक्युरिटी को-प्रोसेसर देखील दिला आहे.
Pixel 10 सिरीज मध्ये आपल्याला Google टेन्सर G5 प्रोसेसर देण्यात आला होता पण आता नवीन Pixel 11 सिरीज साठी Google ने टेन्सर G6 हा नवीन प्रोसेसर सादर केला आहे.
ब्रँड् चा असा दावा आहे की टेन्सर G6 प्रोसेसर हा टेन्सर G5 प्रोसेसर पेक्षा 20% अधिक सामर्थ्य देतो. तसेच अँप लोडिंग स्पीडमध्ये 15% आणि ब्राउझिंग स्पीड मध्ये 25% पर्यंत वाढ करण्यात आली आहे. Google टेन्सर G6 सारखा पॉवरफुल प्रोसेसर असल्यामुळे तुम्हाला स्क्रोलिंग, ब्राउझिंग, एडिटिंग किंवा गेमिंग करताना स्मूथ अनुभव पाहायला मिळेल.
Google Pixel 11 सिरीज ची बॅटरी किती दमदार? 30+ तासांचा बॅकअप आणि फास्ट चार्जिंगमध्ये काय खास
बॅटरी साठी Google ने बेस मॉडेल मध्ये फारसा मोठा बदल केलेला नाही. Google Pixel 11 मध्ये 4985 mAh बॅटरी देण्यात आली आहे. मागील मॉडेल सोबत तुलना केली तर Google Pixel 10 मध्ये 4970 mAh बॅटरी देण्यात आली होती. म्हणजेच Pixel 11 मध्ये 15 mAh बॅटरी वाढवून अपग्रेड करण्यात आले आहे.
यासोबत 30W अॅडॅप्टर आणि 25W वायरलेस चार्जिंग चा सपोर्ट देखील मिळणार आहे. मात्र Google च्या म्हणण्यानुसार बॅटरी कार्यक्षमता मध्ये 25% पर्यंत सुधारणा करण्यात आली आहे. आधीची बॅटरी लाइफ 24 तासांपर्यंत होती तर आता ती वाढवून 30 तासांपर्यंत करण्यात आली आहे.
तिन्ही मॉडेल्स मध्ये Google च्या पिक्सेलस्नॅप मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग सिस्टम चा सपोर्ट मिळणार आहे ज्यामध्ये 25W चार्जिंग स्पीड देण्यात आली आहे.
Google Pixel 11 सिरीज मधील AI Features, Gemini पासून Camera AI पर्यंत किती स्मार्ट?
AI फीचर्स मध्ये आघाडीवर असलेला ब्रँड म्हणजे Google. Google त्यांच्या प्रत्येक Pixel सिरीज मध्ये काही ना काही नवीन AI फीचर्स चे अपडेट देत असतो. यावर्षीही Google ने Pixel 11 सिरीज मध्ये भन्नाट AI फीचर्स दिले आहेत जे तुमच्या रोजच्या कामांमध्ये मदत करून तुमचा वेळ वाचवणार आहेत.
तर पहिला AI फीचर, जो Google चा सर्वात प्रसिद्ध आणि सर्वांच्या आवडीचा आहे तो म्हणजे Google जेमिनी AI. Google ने आता Google जेमिनी सोबत अनेक AI फीचर्स मध्ये अपडेट्स आणि अपग्रेड केले आहेत. Pixel 11 सिरीज हे पहिले मॉडेल्स असणार आहेत ज्यामध्ये Google जेमिनी च्या मदतीने अँप कंट्रोल करता येणार आहेत.
Gemini AI अँप कंट्रोल मुळे तुम्ही कोणतेही काम, जसे की ऑर्डर करणे किंवा तिकीट बुक करणे, अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. उदाहरणार्थ:- जर तुम्ही तुमच्या मित्रांशी किंवा मैत्रिणींसोबत मेसेज करून एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जेवणाचा प्लॅन बनवत असाल तर जेमिनी ला त्या रेस्टॉरंट मध्ये टेबल बुक करायला सांगितल्यावर जेमिनी असिस्टंट लगेच बुकिंग अँप ओपन करून अव्हेलेबल स्लॉट्स मधून तुमच्यासाठी एक टेबल बुक करून देईल.
लाइव्ह ट्रान्सलेशन Pixel 11 स्मार्टफोनस सोबत मिळणारा एक खास AI फीचर आहे. या फीचर च्या मदतीने तुम्ही कोणताही यूट्यूब व्हिडिओ किंवा पॉडकास्ट पाहताना स्क्रीनवर डबिंग ऑडिओ चा पर्याय वापरू शकता. यामध्ये तुम्ही तुमची आवडती भाषा निवडू शकता आणि त्यानंतर तो व्हिडीओ किंवा पॉडकास्ट तुम्हाला निवडलेल्या भाषेत ऐकता येणार आहे.
क्रिएटर सूट हे फीचर कंटेंट क्रिएटर्स साठी खूप कामाचे ठरणार आहे. व्हिडीओ बनवताना तुम्हाला स्क्रिप्ट वाचून व्हिडीओ बनवायचा असेल, तर क्रिएटर सूट या AI फीचरच्या मदतीने ती स्क्रिप्ट ऑन-स्क्रीन टेलिप्रॉम्प्टर सारखी स्क्रीनवर दिसणार आहे. तुम्ही स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केल्यानंतर ती स्क्रिप्ट आपोआप खाली स्क्रोल होत जाणार आहे.
सर्कल टू सर्च – स्क्रीनवर दिसणाऱ्या कोणत्याही शब्दाचा अर्थ किंवा फोटोमध्ये असलेल्या एखाद्या गोष्टीचे नाव माहिती नसेल तर त्या गोष्टीभोवती सर्कल केल्यानंतर त्याबद्दलची माहिती किंवा अर्थ तुम्हाला स्क्रीनवर दाखवला जाईल.
Google Pixel 11 सिरीज Specifications: डिस्प्ले, कॅमेरा, प्रोसेसर आणि बॅटरी संपूर्ण माहिती


| Google pixel 11 series specs in marathi | Google Pixel 11 | Google Pixel 11 Pro | Google Pixel 11 Pro XL |
| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 17 (7 वर्षे OS & Pixel ड्रॉप अपडेट्स) | अँड्रॉइड 17 (7 वर्षे OS & Pixel ड्रॉप अपडेट्स) | अँड्रॉइड 17 (7 OS वर्षे & Pixel ड्रॉप अपडेट्स) |
| प्रोसेसर | Google टेन्सर G6 | Google टेन्सर G6, Titan M3 सिक्युरिटी Coprocessor | Google टेन्सर G6, Titan M3 सिक्युरिटी Coprocessor |
| इंटरनल स्टोरेज | 256 GB, 512 GB | 256 GB, 512 GB | 256 GB, 512 GB |
| रॅम | 12GB | 12GB, 16GB | 12GB, 16GB |
| सुरक्षा | फिंगरप्रिंट | फिंगरप्रिंट | फिंगरप्रिंट |
| बॅटरीची क्षमता | 4985 mAh | 4850 mAh | 5115 mAh |
| अॅडॉप्टर | 25W | 30W | 45W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट | टाइप -C पोर्ट | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.3 इंच ( अॅक्चुआ डिस्प्ले) | 6.3 इंच (सुपर अॅक्चुआ डिस्प्ले) | 6.8 इंच (सुपर अॅक्चुआ डिस्प्ले) |
| रिझोल्यूशन | 1080 × 2424 पिक्सेल | 1280 × 2856 पिक्सेल | 1344 × 2992 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IP68 जल-प्रतिरोधक डिझाइन | IP68 जल-प्रतिरोधक डिझाइन | IP68 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1) पीक ब्राइटनेस:- 3000 निट्स 2) हाय ब्राइटनेस मोड(HBM):- 2000 निट्स 3)120 हर्ट्झ रिफ्रेश रेट 4) कलर डेप्थ:- 16 दक्षलक्ष रंग 5) HDR+ | 1) पीक ब्राइटनेस:- 3600 निट्स 2) हाय ब्राइटनेस मोड(HBM):- 2400 निट्स 3)1-120 हर्ट्झ रिफ्रेश रेट 4)कलर डेप्थ:- 16 दक्षलक्ष रंग 5) HDR+ | 1) पीक ब्राइटनेस:- 3600 निट्स 2) हाय ब्राइटनेस मोड(HBM):- 2400 निट्स 3)1-120 हर्ट्झ रिफ्रेश रेट 4)कलर डेप्थ:- 16 दक्षलक्ष रंग 5)HDR+ |
| सेंसर | 1) जायरोमीटर 2) ॲक्सेलरोमीटर 3) प्रॉक्सिमिटी सेन्सर 4) बारोमीटर 5)अॅम्बियंट लाइट सेन्सर | 1) जायरोमीटर 2) ॲक्सेलरोमीटर 3) प्रॉक्सिमिटी सेन्सर 4) बारोमीटर 5)अॅम्बियंट लाइट सेन्सर 6) मॅग्नेटोमीटर | 1)ॲक्सेलरोमीटर 2)प्रॉक्सिमिटी सेन्सर 3)अॅम्बियंट लाइट सेन्सर 4)जायरोस्कोप 5)ई-कंपास 6)इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 10.5 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 10.5 मेगापिक्सेल वाईड अँगल + 13 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड कॅमेरा + 10.8 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K 24/30/60 FPS 1080P 24/30/60 FPS 4) फ्रंट कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग :- 4K 30/60 FPS | 1)सेल्फी कॅमेरा:- 42 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल वाईड अँगल + 48 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड कॅमेरा मॅक्रो फोकस सोबत + 48 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 8K 24/30 FPS 4K 24/30/60 FPS 1080P 24/30/60 FPS 4) फ्रंट कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग :- 4K 30/60 FPS | 1)सेल्फी कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल कॅमेरा + 48 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड कॅमेरा मॅक्रो फोकस सोबत+ 48 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 8K 24/30 FPS 4K 24/30/60 FPS 1080P 24/30/60 FPS 4) फ्रंट कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग :- 4K 30/60 FPS |
| ऑडिओ | स्टीरिओ स्पीकर्स | स्टीरिओ स्पीकर्स | स्टीरिओ स्पीकर्स |
| रंग | 1) पिस्ताशियो 2) ऑब्सिडियन 3) फ्रॉस्ट 4) हिबिस्कस | 1) कॅन्यन 2) ऑब्सिडियन (matte) 3) ऑलिव्ह 4) फॉग | 1) कॅन्यन 2) ऑब्सिडियन (matte) 3) ऑलिव्ह 4) फॉग |
| कनेक्टिविटी | 5G ब्लूटूथ v6, Wi-Fi 6E | 5G ब्लूटूथ v6, Wi-Fi 7 | 5G, ब्लूटूथ v6, Wi-Fi 7 |
| किंमत | ₹89,999 | ₹1,19,999 | ₹1,34,999 |
Pixel 11 Series Price in India: कोणत्या मॉडेलसाठी किती पैसे मोजावे लागतील?
Pixel 11 सिरीज मधील सर्वात परवडणारा स्मार्टफोन, Google Pixel 11 हा 12GB + 256GB स्टोरेज बेस व्हेरिएंट मध्ये उपलब्ध असून त्याची किंमत ₹89,999 असणार आहे. जर तुम्ही 12GB + 512GB स्टोरेज व्हेरिएंट घेतला, तर त्याची किंमत ₹1,04,999 असणार आहे. या मॉडेल मध्ये तुम्हाला 4 रंग मिळणार आहेत पिस्ताशियो, ऑब्सिडियन, फ्रॉस्ट आणि हिबिस्कस.
पुढचा मॉडेल Google Pixel 11 Pro आहे ज्याची किंमत ₹1,19,999 असणार आहे. हा 12GB + 256GB स्टोरेज सोबत येणार आहे, तर 12GB + 512GB स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत ₹1,34,999 असणार आहे. Google Pixel 11 Pro XL हा या सिरीज मधील टॉप व्हेरिएंट असणार आहे. याची 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत ₹1,34,999 आहे तर 12GB + 512GB स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत ₹1,49,999 असणार आहे.
Google Pixel 11 Pro आणि Google Pixel 11 Pro XL या दोन्ही मॉडेल्स मध्ये तुम्हाला 4 रंग देण्यात आले आहेत कॅन्यन, ऑब्सिडियन, ऑलिव्ह आणि फॉग.
Google Pixel 11 vs iPhone 17: कोणता फोन खरेदी करावा? फीचर्स, कॅमेरा आणि परफॉर्मन्सची तुलना
| Google pixel 11 series specs in marathi | Google Pixel 11 | iPhone 17 |
| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 17 (7 वर्षे OS & Pixel ड्रॉप अपडेट्स) | iOS 26 |
| प्रोसेसर | Google टेन्सर G6 | A19 |
| इंटरनल स्टोरेज | 256 GB, 512 GB | 256 GB, 512 GB |
| रॅम | 12GB | 12GB, 16GB |
| सुरक्षा | फिंगरप्रिंट | फेस आयडी |
| बॅटरीची क्षमता | 4985 mAh | व्हिडिओ प्लेबॅक — ३० तासांपर्यंत |
| अॅडॉप्टर | 25W | 30W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.3 इंच ( अॅक्चुआ डिस्प्ले) | 6.3 इंच (सुपर रेटिना XDR डिस्प्ले) |
| रिझोल्यूशन | 1080 × 2424 पिक्सेल | 2622 x 1206 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IP68 जल-प्रतिरोधक डिझाइन | IP68 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1) पीक ब्राइटनेस:- 3000 निट्स 2) हाय ब्राइटनेस मोड(HBM):- 2000 निट्स 3)120 हर्ट्झ रिफ्रेश रेट 4) कलर डेप्थ:- 16 दक्षलक्ष रंग 5) HDR+ | 1)120Hz रिफ्रेश रेट 2)पीक ब्राइटनेस:- 3000 निट्स 3)जास्तीत जास्त ब्राइटनेस:- 1000 निट्स |
| सेंसर | 1) जायरोमीटर 2) ॲक्सेलरोमीटर 3) प्रॉक्सिमिटी सेन्सर 4) बारोमीटर 5)अॅम्बियंट लाइट सेन्सर | 1)हाय डायनॅमिक रेंज जायरो 2)बारोमीटर 3)हाय-जी ॲक्सेलरोमीटर 4)प्रॉक्सिमिटी सेन्सर 5)ड्युअल अॅम्बियंट लाईट सेन्सर्स |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 10.5 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 10.5 मेगापिक्सेल वाईड अँगल + 13 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड कॅमेरा + 10.8 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K 24/30/60 FPS 1080P 24/30/60 FPS 4) फ्रंट कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग :- 4K 30/60 FPS | 1)सेल्फी कॅमेरा:- 18 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 48 मेगापिक्सेल + 48 मेगापिक्सेल + 12 मेगापिक्सेल (ऑप्टिकल-क्वालिटी 2x टेलिफोटो) 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K, 1080p, 720p |
| ऑडिओ | स्टीरिओ स्पीकर्स | डॉल्बी ऑडिओ |
| रंग | 1) पिस्ताशियो 2) ऑब्सिडियन 3) फ्रॉस्ट 4) हिबिस्कस | 1)व्हाईट 2)मिस्ट ब्लू 3)सेज 4)लॅव्हेंडर 5)ब्लॅक |
| कनेक्टिविटी | 5G ब्लूटूथ v6, Wi-Fi 6E | 5G ब्लूटूथ 6, Wi-Fi-7 |
| किंमत | ₹89,999 | ₹82,900 |