Tecno च्या या स्मार्टफोने ने मोबाइल इंडस्ट्री मध्ये चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. 11 जून रोजी Tecno ने त्यांच्या Pova सिरीज मध्ये आणखी एक शानदार डिझाइन असलेला स्मार्टफोने, Tecno Pova 8 लॉन्च केला. Tecno Pova 8 हा स्मार्टफोने मागील वर्षी लॉन्च झालेल्या Tecno Pova 7 चा सक्सेसर म्हणून सादर करण्यात आला आहे.
Brand ने 18 जून, म्हणजेच आजपासून Tecno Pova 8 ची सेल सुरू केली आहे. टेकनो ने या स्मार्टफोने ला इतके आकर्षक डिझाइन दिले आहे की पहिल्याच नजरेत अनेकांना हा फोन आवडू शकतो. तुम्हाला मोठी बॅटरी, लेटेस्ट डिझाइन आणि गेमिंग साठी योग्य असा स्मार्टफोने हवा असेल तर Tecno Pova 8 हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
Tecno Pova 8 मध्ये आकर्षक डिझाइन, युनिक डिस्प्ले, मोठी बॅटरी आणि अनेक उपयुक्त फीचर्स देण्यात आल्यामुळे तो या सेगमेंट मधील इतर brands च्या स्मार्टफोनेस पेक्षा वेगळा ठरतो. चला तर मग पाहूया, असे कोणते फीचर्स या स्मार्टफोने मध्ये देण्यात आले आहेत जे त्याला इतर स्मार्टफोनेस पेक्षा खास आणि वेगळे बनवतात.
Tecno Pova 8 5G डिझाइन & डिस्प्ले
फोन च्या डिझाइन बद्दल बोलायचं झालं तर Tecno ने यामध्ये फ्युचरिस्टिक, हटके आणि बोल्ड डिझाइन देण्याचा प्रयत्न केला आहे जो युजर्स ना पाहताच आवडू शकतो लागेल. फोनच्या मागील बाजूस Tecno ने आपली ब्रँडिंग दिली आहे आणि त्यासोबतच छोट्या अक्षरांमध्ये बॅटरी ची क्षमता देखील हायलाइट करण्यात आली आहे.
Tecno Pova 8 5G चे वजन 225 ग्रॅम असून त्याची जाडी 8.8mm आहे. या स्मार्टफोन मध्ये मोठी बॅटरी देण्यात आल्यामुळे त्याचे वजन थोडे अधिक आहे. एवढी मोठी बॅटरी असूनही फोन हातात घेतल्यावर तो प्रीमियम फील देतो हे नक्की.
डिस्प्ले बाबत बोलायचं झालं तर Tecno ने यामध्ये कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. Tecno Pova 8 मध्ये तुम्हाला एक नव्हे तर दोन डिस्प्ले मिळतात. यामधील पहिला डिस्प्ले हा मुख्य डिस्प्ले आहे तर दुसरा डिस्प्ले फोनच्या मागील बाजूस देण्यात आला आहे जो तुम्ही तुमच्या आवडीनुसार पर्सनलाइज करू शकता.
Tecno Pova 8 च्या मेन डिस्प्ले मध्ये 6.78 इंचाचा Full HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबत 140Hz रिफ्रेश रेट
950 निट्स पीक ब्राइटनेस आणि 1500Hz टच सॅम्पलिंग रेट मिळणार आहे. हा डिस्प्ले पंच-होल डिझाइन सोबत येतो.
आता बोलूया बॅक पॅनल वर असणाऱ्या डिस्प्ले बद्दल. Tecno ने या डिस्प्ले ला अलाइव्ह मॅट्रिक्स डिस्प्ले असे नाव दिले आहे. हा एक कस्टमायझेबल लाइट डिस्प्ले आहे, जो 49 प्री-लोडेड लाइटिंग इफेक्ट्स सोबत येतो. हे लाइटिंग इफेक्ट्स नेमके कशासाठी वापरले जातात? तर नोटिफिकेशन्स, इनकमिंग कॉल्स, म्युझिक प्लेबॅक, बॅटरी स्टेटस, टाइम, गेमिंग, कॉल्स आणि मेसेजेस या सारख्या विविध गोष्टींसाठी तुम्हाला वेगवेगळे ग्लिफ अॅनिमेशन्सs मिळतात.
अलाइव्ह मॅट्रिक्स डिस्प्ले मुळे Tecno Pova 8 5G ला अधिक प्रीमियम आणि फ्युचरिस्टिक लुक मिळतो. ह्या मुळे हा स्मार्टफोने इतर ब्रँड्स च्या स्मार्टफोनेस पेक्षा वेगळा ठरतो.
Tecno Pova 8 5G प्रोसेसर
परफॉर्मन्स साठी Tecno ने या स्मार्टफोने मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 प्रोसेसर दिला आहे. यासोबत LPDDR5X RAM आणि UFS 2.2 storage मिळणार आहे. या चिपसेट सोबत Tecno ने आणखी दोन विशेष चिप दिल्या आहेत. त्यामध्ये G1 सिग्नल एन्हान्समेंट चिप आणि SE1 वाय-फाय एन्हान्समेंट चिप यांचा समावेश आहे.
Tecno ने असा दावा केला आहे की हे चिपसेट्स कनेक्टिव्हिटी आणखी सुधारण्याचे काम करतात. उदाहरणार्थ, लिफ्ट मध्ये असताना मोबाइल सिग्नल कमकुवत होत असेल किंवा बसेमेन्ट मध्ये Wi-Fi कनेक्शन नीट मिळत नसेल तर हे चिपसेट्स अधिक मजबूत आणि स्थिर सिग्नल मिळवून देण्यास मदत करतात.
हे ही वाचा :- Airtel ने लॉन्च केले आता 30 दिवसांचा मंथली प्रीपेड प्लॅन्स! जाणून घ्या किती डेटा आणि कोणते OTT सबस्क्रिप्शन यासोबत मिळणार आहेत.
रोजच्या वापरासाठी हा प्रोसेसर तुम्हाला चांगल्या परफॉर्मन्स चा अनुभव देणार आहे. तुम्ही यामध्ये गेमिंग, मल्टि टास्किंग किंवा इतर कोणतेही काम करताना स्मूथ एक्स्पिरियन्स मिळवू शकता. तसेच दीर्घकाळ गेमिंग केल्यानंतरही हा फोन लवकर गरम होत नाही.
फोन गरम झाला तरी Tecno ने त्याची काळजी घेतली आहे. हो या स्मार्टफोन मध्ये थर्मल Z0 कूलिंग टेकनॉलॉजि देण्यात आली आहे, जी फोनमधील उष्णता लवकर कमी करण्यास मदत करते.
Tecno Pova 8 5G कॅमेरा
कॅमेरा च्या डिझाइन कडे पाहिलं तर त्याची रचना देखील हटके करण्यात आली आहे. या स्मार्टफोने मध्ये ट्रँगल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. वरच्या बाजूला असलेले दोन भाग हे कॅमेरा लेन्सेस आहेत, तर खाली दिलेला भाग पाहिल्यावर तोही कॅमेरा लेन्सेस सारखा वाटतो पण तो कॅमेरा लेन्सेस नसून ग्लिफ मॅट्रिक्स आहे, जिथे तुम्हाला विविध अॅनिमेशन्स पाहायला मिळतात जसे की मी आधी सांगितले होते.
फोनमध्ये 50 मेगापिक्सेल Sony LYT-600 मेन सेन्सर सोबत एक सेकंडरी लेन्स देखील देण्यात आली आहे. हा सेन्सर असल्यामुळे फोटोस मध्ये प्रकाश (light) अधिक चांगल्या प्रकारे कॅप्चर होतो. त्यामुळे फोटोस अधिक कलरफुल, शार्प आणि आकर्षक दिसतात. तसेच,फोटो मधील प्रत्येक बारकावा आणि डिटेल्स स्पष्टपणे पाहायला मिळतात.
सेल्फी साठी या स्मार्टफोने मध्ये 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामधून मिळणारे फोटोस तुम्हाला डिसेंट क्वालिटी मध्ये पाहायला मिळतील आणि हा कॅमेरा व्हिडिओ कॉल्स तसेच दैनंदिन वापरासाठी योग्य ठरू शकतो. हा फोन तुम्हाला प्रो-लेवल कॅमेरा चा अनुभव देणार नाही, मात्र तुम्ही जर कॅज्युअल फोटोग्राफी करत असाल
यामध्ये AI लाइटमास्टर 2.0 सारखे AI फीचर देखील देण्यात आले आहे जे इमेज क्वालिटी आणखी सुधारण्यास आणि फोटोस अधिक आकर्षक दिसण्यासाठी मदत करते. तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
Tecno Pova 8 5G बॅटरी
बॅटरी मध्ये तर Tecno ने त्यांच्या फॅन्स आणि इतर युजर्स ना आणखी खुश केलं आहे. कारण या स्मार्टफोने मध्ये तब्बल 8000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी या फोनला अधिक दमदार बनवते. या मोठ्या 8000mAh बॅटरी सोबत 45W चार्जर देखील मिळणार आहे. त्यामुळे एकदा फोन 100% चार्ज केल्यानंतर तो साधारणपणे दोन दिवसांपर्यंत सहज वापरता येऊ शकतो.
कंपनी ने असा दावा देखील केला आहे की फोन एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर तुम्ही 85 तासांपेक्षा जास्त वेळ गाणी ऐकू शकता. एवढंच नाही तर 29 तासांपेक्षा जास्त वेळ YouTube वर व्हिडिओ पाहू शकता.
Tecno Pova 8 5G Specifications


| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 16(HiOS) |
| प्रोसेसर | मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 प्रोसेसर |
| इंटरनल स्टोरेज | 128 GB |
| रॅम | 6GB, 8GB |
| सुरक्षा | साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर |
| बॅटरीची क्षमता | 8000 mAh |
| अॅडॉप्टर | 60W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.76 इंच |
| रिझोल्यूशन | 1080 × 2344 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IP68, IP69 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)144 हर्ट्झ रिफ्रेश रेट 2)पीक ब्राइटनेस :- 965 निट्स 3)1500Hz टच सॅम्पलिंग रेट 2)एचडी+ 3)डिस्प्ले कलर्स – 16.7 दशलक्ष रंग |
| सेंसर | 1)ॲक्सेलरोमीटर 2)जायरोस्कोप 3)प्रॉक्सिमिटी सेन्सर 4)कंपास |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 13 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल Sony LYTIA 600 प्रायमरी सेन्सर 3)फुल एचडी रेकॉर्डिंग |
| ऑडिओ | स्टीरिओ स्पीकर्स |
| रंग | 1)टर्मिनल ग्रीन 2)16 बिट व्हाईट |
| कनेक्टिविटी | 5G, 4G VOLTE, 4G, 3G, 2G ब्लूटूथ, Wi-Fi |
| किंमत | ₹29,999 |
Tecno Pova 8 5G किंमत
हा फोन Tecno ने दोन व्हेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. पहिला व्हेरिएंट 6GB + 128GB चा असून त्याची किंमत ₹29,999 आहे, तर दुसरा व्हेरिएंट 8GB + 128GB चा असून त्याची किंमत ₹31,999 ठेवण्यात आली आहे. रंगांच्या पर्यायांबाबत बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन टर्मिनल ग्रीन आणि 16 बिट व्हाईट या दोन कलर्स मध्ये उपलब्ध आहे.
आपण जर Tecno च्या या स्मार्टफोन कडे पाहिलं, तर माझ्या मते ज्या युजर्स ना लेटेस्ट आणि स्टायलिश लूक, मोठी बॅटरी, चांगला परफॉर्मन्स आणि डिसेंट कॅमेरा असलेला स्मार्टफोन हवा आहे, त्यांच्यासाठी Tecno Pova 8 5G हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
