Airtel 30 Days Recharge Plan Marathi
आजच्या या डिजिटल युगात स्मार्टफोन हा फक्त एक साधन नाही तर जीवनाचा एक भाग बनला आहे आणि या स्मार्टफोन ला चालू ठेवण्यासाठी त्यात रिचार्ज करावंच लागतं. आजपर्यंत आपल्याला फक्त 28 दिवसांचा प्लॅन मिळत होता मग ती कोणतीही टेलिकॉम कंपनी असो, Airtel असो, Jio असो किंवा Vodafone.
मोबाइल रिचार्ज प्लॅन हा आता फक्त डेटा, SMS आणि कॉल्स पर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. प्रत्येक प्लॅनमध्ये टेलिकॉम कंपन्या युजर्स ला काही ना काही अतिरिक्त फायदे देतात जसे की सॉफ्टवेअर सर्व्हिसेस, एंटरटेनमेंट साठी OTT प्लॅटफॉर्म्स, गूगल वन, अॅडोबी एक्सप्रेस, एक्सस्ट्रीम प्ले किंवा क्लाऊड स्टोरेज सारखे फीचर्स.
या कारणामुळे Airtel ने प्लॅन मध्ये फक्त दिवसच वाढवले नाहीत, तर त्या प्लॅन्स मध्ये मनोरंजनासाठी JioHotstar, एक्सस्ट्रीम प्ले सारखे OTT प्लॅटफॉर्म्स देखील दिले आहेत. याच गोष्टीला लक्षात घेऊन Airtel ने 30 दिवसांची व्हॅलिडिटी/वैधता असलेला प्रीपेड प्लॅन बाजारात आणला आहे.
चला तर पाहूया (Airtel 30 days recharge plan marathi)Airtel ने 30 दिवसांचे किती मंथली प्रीपेड प्लॅन्स आणि कोणते OTT सबस्क्रिप्शन त्यांच्या युजर्स साठी दिले आहेत.
Airtel 30 Days Recharge Plans Marathi
| Monthly Plan (मंथली प्रीपेड प्लॅन) | Data (डेटा) | Benefits (फायदे) |
| ₹319 | 1.5GB रोजचा डेटा, 30 दिवस, अनलिमिटेड कॉल्स | अॅडोबी एक्सप्रेस, गूगल वन, एक्सस्ट्रीम प्ले |
| ₹355 | 25GB पूर्ण डेटा, 30 दिवस, अनलिमिटेड कॉल्स | 300 SMS, अॅडोबी एक्सप्रेस, हॅलो ट्यून |
| ₹379 | 2GB रोजचा डेटा, 30 दिवस, अनलिमिटेड कॉल्स | गूगल वन, अॅडोबी एक्सप्रेस, 100 SMS दिवसाला |
| ₹429 | 2.5GB रोजचा डेटा, 30-31 दिवस, अनलिमिटेड कॉल्स | एक्सस्ट्रीम प्ले, 100 SMS दिवसाला, 5G |
| ₹589 | 50GB पूर्ण महिन्यासाठी डेटा, 30 दिवस, अनलिमिटेड कॉल्स | अॅडोबी एक्सप्रेस, 300 SMS |
| ₹605 | 60GB पूर्ण महिन्यासाठी डेटा, 30 दिवस, अनलिमिटेड कॉल्स | 300 SMS, अॅडोबी एक्सप्रेस |
Airtel चा ₹319 रुपयांचा मंथली प्रीपेड प्लॅन
हा एक असा मंथली प्लॅन आहे जो खूप लोकांना परवडणारा आहे. या प्लॅन मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स , 100 SMS आणि दररोज 1.5GB डेटा मिळणार आहे. यासोबतच तुम्हाला अॅडोबी एक्सप्रेस, Airtel म्युसिक, Airtel एक्सस्ट्रीम प्ले आणि 30GB गूगल वन क्लाऊड स्टोरेज देखील मिळणार आहे. हा प्लॅन कमी बजेटमध्ये जास्त फायदे देणारा आहे.
Airtel चा ₹355 रुपयांचा मंथली प्रीपेड प्लॅन
एरटेल चा हा प्लॅन अशा युजर्स साठी आहे ज्यांना जास्त डेटा ची गरज नसते पण पूर्ण महिन्यासाठी कॅल्लिंग आणि थोड्या डेटा ची गरज असते. या 30 दिवसांच्या मंथली प्रीपेड प्लॅन मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स, 25GB मंथली डेटा, STD आणि रोमिंग कॉल्स तसेच 300 SMS मिळणार आहेत. यासोबतच या प्लॅनमध्ये अॅडोबी एक्सप्रेस प्रीमियम प्लॅन चे 12 महिन्यांचे सबस्क्रिप्शन देखील देण्यात आले आहे.
Airtel चा ₹379 रुपयांचा मंथली प्रीपेड प्लॅन
तुम्हाला जर मिड-रेंज मध्ये प्रीपेड प्लॅन हवा असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी योग्य आहे. या प्लॅन मध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा, दररोज 100 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळणार आहेत. यासोबतच तुम्हाला अॅडोबी एक्सप्रेस प्रीमियम, हॅलो ट्यून आणि 30GB गूगल वन क्लाऊड स्टोरेज असे अतिरिक्त फायदे देखील मिळणार आहेत.
Samsung ने लॉन्च केला जगातील पहिला प्रायव्हसी डिस्प्ले असलेला स्मार्टफोन! सोबत 200 मेगापिक्सेल कॅमेरा आणि Snapdragon 8 Gen Elite 5 प्रोसेसरसह येणारा Samsung Galaxy s26 Ultra.
Airtel चा ₹429 रुपयांचा मंथली प्रीपेड प्लॅन
ज्या युजर्स ना रोज जास्त डेटा ची गरज असते त्यांच्यासाठी हा प्लॅन खूप उपयोगी आहे. या 30 दिवसांच्या प्लॅन मध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळणार आहेत. यासोबतच तुम्हाला अॅडोबी एक्सप्रेस प्रीमियम, हॅलो ट्यून आणि Airtel एक्सस्ट्रीम प्ले चा अॅक्सेस मिळणार आहे ज्यामध्ये तुम्ही मूव्हीज, लाईव्ह टीव्ही चॅनेल्स आणि वेब सिरीज पाहू शकता.
Airtel चा ₹589 रुपयांचा मंथली प्रीपेड प्लॅन
हा प्लॅन अशा युजर्स साठी आहे ज्यांना रोजच्या डेटा ची मर्यादा नको असते. या 30 दिवसांच्या वैधता/व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅन मध्ये तुम्हाला एकूण 50GB डेटा मिळणार आहे, म्हणजे तुम्ही गरजेनुसार कधीही आणि कितीही डेटा वापरू शकता. यासोबतच तुम्हाला 300 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये अॅडोबी एक्सप्रेस प्रीमियम सबस्क्रिप्शन आणि हॅलो ट्यून चा अॅक्सेस देखील मिळतो.
Airtel चा ₹605 रुपयांचा मंथली प्रीपेड प्लॅन
तुम्हाला जर जास्त डेटा ची गरज असेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठीच आहे. या 30 दिवसांच्या प्लॅन मध्ये तुम्हाला एकूण 60GB डेटा, 300 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स ची सुविधा मिळणार आहे. जे युजर्स जास्त वेळ गेमिंग करतात, सोशल मीडिया चा जास्त वापर करतात किंवा वर्क फ्रॉम होम (घरून ऑफिस च काम) करतात त्यांच्यासाठी हा प्लॅन खूप उपयोगी ठरणार आहे. यासोबतच तुम्हाला अॅडोबी एक्सप्रेस प्रीमियम प्लॅन आणि हॅलो ट्यून चा अॅक्सेस देखील मिळणार आहे.
