Nothing ने लॉन्च केला मिड-सेगमेंट स्मार्टफोन मध्ये एक शानदार डिझाइनसह येणारा Nothing 4a Pro!

Nothing 4a Pro Features Marathi

मिड-सेगमेंट स्मार्टफोनस मध्ये आता अजून एका ब्रँड ने उडी मारली आहे आणि युजर्स ला या सेगमेंट मध्ये आणखी एक पर्याय मिळाला आहे, तो म्हणजे Nothing 4a Pro. Nothing ने यापूर्वी मिड-सेगमेंट युजर्स साठी स्मार्टफोन तयार केला नव्हता पण आता ज्यांचा बजेट 20,000 ते 40,000 रुपयांपर्यंत आहे, त्यांच्यासाठी Nothing ने Nothing 4a Pro बाजारात आणला आहे.

चला तर पाहूया काय असे नवीन फीचर्स Nothing ने त्यांच्या मिड-सेगमेंट युजर्स साठी दिले आहेत आणि बाजारा मध्ये हा फोन(nothing 4a pro features marathi) बाकी मिड-सेगमेंट युजर्स स्मार्टफोनस पासून कसा वेगळा ठरतो.

Nothing 4a Pro डिझाइन आणि डिस्प्ले

स्मार्टफोन इंडस्ट्री मध्ये हा एकमेव असा ब्रँड आहे ज्यांच्या फोनचं डिझाइन इतर स्मार्टफोन्सपेक्षा खूप वेगळं असतं आणि हीच गोष्ट Nothing ला इतर ब्रँड्स जसे की Vivo, Oneplus, Realme, Redmi पासून वेगळं करते. तसेच जेव्हा Nothing चा कोणताही स्मार्टफोन लॉन्च होतो तेव्हा सर्वप्रथम त्या स्मार्टफोनच्या डिझाइनचीच चर्चा होते.

तसेच जेव्हा Nothing चा कोणताही स्मार्टफोन लॉन्च होतो, तेव्हा सर्वप्रथम त्या स्मार्टफोनच्या डिझाइनचीच चर्चा होते. डिझाइनकडे पाहिलं तर Nothing ने या मध्ये एक अपग्रेड केलं आहे. तो अपग्रेड म्हणजे मागच्या बाजूला पाहिलं तर Nothing 4a Pro मध्ये एअरक्राफ्ट-ग्रेड अ‍ॅल्युमिनियम युनिबॉडी देण्यात आली आहे जी आधीच्या मॉडेल मध्ये वापरली नव्हती.

nothing 4a pro features marathi

मागच्या बाजूला तुम्हाला ग्लिफ मॅट्रिक्स मिळणार आहे जे Nothing ब्रँड ची ओळख आहे. ग्लिफ मॅट्रिक्स तुम्हाला Nothing Phone 3 आणि त्याच्या पुढील मॉडेल्समध्ये मिळणार आहे. Nothing Phone 4a Pro मध्ये ग्लिफ मॅट्रिक्स ला आणखी अपग्रेड करण्यात आला आहे जसं की 137 मिनी LED’s आणि 3000 निट्स ब्राइटनेस सोबत देण्यात आली आहे.

एवढंच नाही तर ग्लिफ मॅट्रिक्स ला आता अधिक कार्यशील बनवण्यात आलं आहे. यामध्ये आता डिजिट क्लॉक, बॅटरी इंडिकेटर, वेळ आणि कॉन्टॅक्ट्स साठी कस्टम सिम्बॉल्स(चिन्ह) देण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोणाचा कॉल किंवा नोटिफिकेशन आल्यावर फोन मेन डिस्प्ले पाहण्यासाठी उलटा करण्याची गरज भासणार नाही. एआय इंटरफेस बटण जे आधी उजव्या बाजूला दिलं जायचं ते आता डाव्या बाजूला देण्यात आलं आहे ज्यामुळे पॉवर बटण आणि एआय इंटरफेस बटण मधील गोंधळ कमी होईल.

डिस्प्ले

Nothing 4a Pro च्या डिस्प्ले मध्येही तुम्हाला अपग्रेड पाहायला मिळणार आहे. तुम्हाला आता 6.83-इंच LTPS फ्लेक्सिबल एमोलेड डिस्प्ले, 5000 निट्स पीक ब्राइटनेस आणि HDR10+ समर्थन मिळणार आहे. 5000 निट्स सारखा जास्त ब्राइटनेस असल्यामुळे तुम्ही बाहेर म्हणजेच उन्हातसुद्धा सहज पणे अँप्स स्क्रोल करू शकता रील्स किंवा YouTube वर व्हिडिओस पाहू शकता.

पीक ब्राइटनेस आधी Nothing 3a Pro मध्ये 3000 निट्स होता आणि आता तो वाढवून Nothing 4a Pro मध्ये 5000 निट्स करण्यात आला आहे. त्यामुळे आता विडिओ क्वालिटी मध्ये तुम्हाला प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन लेव्हल चा अनुभव मिळणार आहे

Nothing 4a Pro कॅमेरा (Camera)

कॅमेरा मध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळणार आहे ज्यात 50 मेगापिक्सेल Sony LYT-700C सेन्सर सोबत मेन कॅमेरा, 50 मेगापिक्सेल Samsung JN1 3.5x ऑप्टिकल झूम कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड कॅमेरा (IMX 355 सेन्सर सोबत) देण्यात आला आहे.

अल्ट्रा वाइड लेन्स कॅमेरा हा तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. जेव्हा तुम्ही लँडस्केप्स किंवा ग्रुप फोटोस काढत असाल तेव्हा तुम्ही अल्ट्रा वाइड कॅमेरा चा वापर करू शकता. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की मेन कॅमेरा सारखी फोटो क्वालिटी यात मिळणार नाही.

सेल्फी कॅमेरा मध्ये आता तुम्हाला 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळणार आहे. ब्रँडने यामध्ये कमतरता केले आहे म्हणजे सेल्फी कॅमेरा मधील मेगापिक्सेल कमी केले आहेत. Nothing 3a Pro मध्ये 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा होता पण आता Nothing 4a Pro मध्ये तो कमी करून 32 मेगापिक्सेलचा करण्यात आला आहे.

फोटोच्या क्वालिटीकडे पाहिलं तर तुम्हाला मेन कॅमेरा मधून नॅचरल कलर्स, बॅलन्स्ड शॉट्स आणि क्लिअर फोटोस पाहायला मिळतील. लो लाइट फोटोस साठी Nothing ने चांगली सुधारणा केली आहे, ज्यामुळे कमी प्रकाशातही फोटो चांगले आणि रंगांनी भरलेले येतील. आता येऊया व्हिडिओजकडे. तुम्ही या फोनमधून 4K 30FPS मध्ये व्हिडिओ शूटिंग करू शकता आणि सेल्फी कॅमेरा मधून 1080p 60FPS मध्ये व्हिडिओ शूट करू शकता.

Nothing ने फक्त कॅमेरा मध्येच नाही तर व्हिडिओ शूटिंग मध्येही कमतरता केले आहे. आपण पाहिलं तर या बजेट मध्ये अनेक ब्रॅण्ड्स सेल्फी कॅमेरा मधून 4K व्हिडिओ शूटिंग चा पर्याय देतात पण Nothing ने त्यांच्या या मॉडेल मध्ये फक्त 1080p 60FPS दिलं आहे. त्यामुळे व्हिडिओ क्वालिटी मध्ये तुम्हाला हा फरक जाणवेल.

Nothing 4a Pro प्रोसेसर (Processor)

परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर Nothing Phone 4a Pro मध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर किंमतीनुसार योग्य आहे आणि स्नॅपड्रॅगन 7s जेन 3 पेक्षा अधिक चांगला आहे. Nothing Phone 3a Pro मध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 7s जेन 3 प्रोसेसर मिळत होता पण आता अपडेट करून Nothing Phone 4a Pro मध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 प्रोसेसर देण्यात आला आहे.

तुम्हाला जर गेमिंग करायला आवडत असेल तर त्यासाठी Nothing ने गेमिंग परफॉर्मन्स अधिक चांगला करण्यासाठी यामध्ये वेपर कूलिंग चेंबर दिला आहे. यामागचं कारण म्हणजे Nothing 4a Pro च्या मागच्या बाजूची बॉडी ही मेटल ची आहे. त्यामुळे तुम्ही जास्त वेळ गेमिंग केल्यास फोन गरम होण्याची शक्यता जास्त असते. हे लक्षात घेऊन Nothing ने या फोन मध्ये वेपर कूलिंग चेंबर दिला आहे ज्यामुळे हीटिंग कमी होऊन परफॉर्मन्स स्थिर राहतो.

गेमिंग च नाही तर या फोनमध्ये तुम्ही मल्टि टास्किंग, विडिओ एडिटिंग किंवा अँप्स कितीही वेळा बंद-चालू केलं तरी तुम्हाला बिना विलंब चा स्मूथ परफॉर्मन्स अनुभवायला मिळणार आहे. या फोनकडे पाहिलं तर हा साध्या युजर्स साठी आहे म्हणजे जे लोक जास्त गेमिंग करत नाहीत कधीमधीच गेम खेळतात त्यांच्यासाठी हा फोन बेस्ट आहे. रोजच्या वापरासाठी हा प्रोसेसर नक्कीच चांगला अनुभव देणार आहे.

Nothing 4a Pro बॅटरी (Battery)

बॅटरी बद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला 5400 mah आणि 7.5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंग चा सपोर्टही मिळणार आहे. जर तुम्ही कमी गेमिंग किंवा सोशल मीडियाचा वापर करत असाल तर 100% चार्ज केल्यावर हा फोन आरामात पूर्ण 1 दिवस चालू शकतो.

बॅटरी मध्येही Nothing ने अपग्रेड केला आहे. आधी Nothing 3a Pro मध्ये 5000mAh बॅटरी दिली होती पण आता Nothing 4a Pro मध्ये ती वाढवून 5400 mAh करण्यात आली आहे.

Nothing 4a Pro वैशिष्ट्ये (Specifications)

nothing 4a pro features marathi
पिंक
nothing 4a pro features marathi
ब्लॅक
nothing 4a pro features marathi
सिल्वर
ऑपरेटिंग सिस्टमअँड्रॉइड 16 (Nothing OS 4.1)
3 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 6 वर्षे सुरक्षा अपडेट्स
प्रोसेसरक्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 4
इंटरनल स्टोरेज256 GB
रॅम12 GB
सुरक्षाइन-स्क्रीन ऑप्टिकल स्कॅनर
बॅटरीची क्षमता5400 mAh
अ‍ॅडॉप्टर50W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार17.49 cm (डायनॅमिक एमोलेड डिस्प्ले)
रिझोल्यूशन1260 x 2800 पिक्सेल
पाणी संरक्षणIP65 जल-प्रतिरोधक डिझाइन
डिस्प्ले तंत्रज्ञान1)144Hz रिफ्रेश रेट
2)पीक ब्राइटनेस:- 5000 निट्स
3)आउटडोअर ब्राइटनेस :-1600 निट्स
4)टिपिकल ब्राइटनेस :- 800 निट्स
5)टच सॅम्पलिंग रेट :- Up to 2500 Hz
6)कलर डेप्थ :- 16M
7)कलरस :- 1.07 अब्ज
सेंसर1)इलेक्ट्रॉनिक कंपास
2)प्रॉक्सिमिटी सेन्सर
3)ऍक्सेलरोमीटर
4)फ्रंट अॅम्बियंट लाइट सेन्सर
5)जायरो सेन्सर
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 32 मेगापिक्सेल
2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल मेन कॅमेरा + 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड कॅमेरा +50 मेगापिक्सेल पेरिस्कोप कॅमेरा
3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K,1080p
ऑडिओड्युअल स्टीरिओ स्पीकर्स
रंग1)ब्लॅक
2)पिंक
3)सिल्वर
कनेक्टिविटी5G, 4G, 3G, 2G
ब्लूटूथ 5.4, Wi-Fi-6
किंमत₹39,999

Nothing 4a Pro किंमत (Price)

Nothing 4a Pro मध्ये Nothing ने 3 व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. पहिला व्हेरिएंट 128GB + 8GB RAM असून त्याची किंमत 39,000 रुपये आहे. दुसरा व्हेरिएंट 256GB + 12GB RAM असून त्याची किंमत 45,999 रुपये आहे आणि तिसरा व्हेरिएंट 256GB + 8GB RAM असून त्याची किंमत 42,999 रुपये आहे.

तुम्हाला जर Nothing 4a Pro Features Marathi घ्यायचा असेल, तर हा फोन Flipkart वर उपलब्ध आहे. तसेच बँक ऑफर्स अंतर्गत तुम्हाला या फोनवर 2,500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment