WhatsApp ने नुकतंच लाँच केला Parent Managed Account! आता तुम्ही मुलांच्या WhatsApp अकाउंटवर लक्ष ठेवू शकता. हे कसं काम करतं? ते जाणून घ्या

Whatsapp Parental Control Android Marathi

WhatsApp ने एक नवीन फीचर लॉन्च केलं आहे ज्यामुळे आता पालक मुलांच्या WhatsApp अकाउंटवर सुरक्षितपणे लक्ष ठेवू शकतात. या फीचरला “पॅरेंट मॅनेज्ड अकाउंट” असं म्हटलं जातं.

मेटा च WhatsApp मधील हे नवीन फीचर खास करून प्री-टीनएजर्स म्हणजे 9 ते 12 वयोगटातील मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी तयार करण्यात आलं आहे. यामध्ये पालकांना मुलांच्या WhatsApp अकाउंट वर अधिक नियंत्रण ठेवता येतं जसं की त्यांची मुलं कोणासोबत चॅट करू शकतात. तसेच हे चॅट्स एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असणार आहेत.

WhatsApp ने त्यांच्या ब्लॉग मध्ये सांगितलं आहे की एक्सपर्ट्स आणि फॅमिलीज कडून मिळालेल्या अभिप्रायानंतर त्यांनी पॅरेंट मॅनेज्ड अकाउंट हे फीचर आणलं आहे. या फीचर मध्ये पॅरेंट किंवा गार्डियन्स त्यांच्या मुलांसाठी WhatsApp अकाउंट तयार करू शकतात आणि त्यांच्या हातात मेसेजेस पासून कॉलिंग पर्यंत सर्व नवीन नियंत्रण असतील.

पॅरेंट मॅनेज्ड अकाउंट मध्ये कोणते फीचर तुमच्या हातात असणार?

whatsapp parental control android marathi

मेसेजेस अँड ग्रुप्स :- ज्यांचे नंबर त्या फोनमध्ये सेव्ह असतील तेच लोक त्या WhatsApp अकाउंट वर मेसेज पाठवू शकतील. तसेच कोणत्या ग्रुपमध्ये जॉइन व्हायचं हे पालक ठरवतील. सोबतच जर कोणत्याही अनोळखी नंबरवरून मेसेज किंवा ग्रुप इन्वाइट आला तर तो रिक्वेस्ट फोल्डर मध्ये राहील जोपर्यंत पालक तो अप्रूव्ह करत नाहीत.

अ‍ॅक्टिव्हिटी अँड नोटिफिकेशन्स :- जेव्हा कोणतीही महत्त्वाची क्रिया होईल जसं की नवीन कॉन्टॅक्ट सेव्ह करणं किंवा नवीन मेसेज रिक्वेस्ट येणं तेव्हा पालकांना त्याबद्दल नोटिफिकेशन मिळेल.

प्रायव्हसी सेटिंग्स :- सेटिंग्स मध्ये अकाउंट मधील सर्व सेटिंग्स आधीच आपोआप सेट केलेल्या असतात ज्यामुळे फक्त सेव्ह्ड कॉन्टॅक्ट्स ना तुमची माहिती दिसते जसे की तुमचं प्रोफाइल पिक्चर आणि तुम्ही ऑनलाइन कधी होता.

तुम्ही MS Excel रोज वापरता का? मग या शॉर्टकट कीज तुम्हाला नक्कीच माहित असायला हव्यात, ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल.

आता तुम्ही “पॅरेंट मॅनेज्ड अकाउंट” हे फीचर ऑन केल्यावर तुमच्या मुलांना खालील फीचर वापरता येणार नाहीत :-

  1. चॅट लॉक
  2. अ‍ॅप लॉक
  3. स्टेटस
  4. चॅनेल्स
  5. लिंक्ड डिव्हाइसेस
  6. व्ह्यू वन्स मेसेजेस
  7. मेटा एआय
  8. लोकेशन शेअरिंग
  9. डिसअ‍ॅपिअरिंग मेसेजेस

पॅरेंट मॅनेज्ड अकाउंट ऑन कसं करतात? How To Activate Whatsapp Parental Control?

Step 1: Google Play Store किंवा App Store मध्ये जाऊन WhatsApp Messenger हे अ‍ॅप तुमच्या मुलाच्या फोन मध्ये डाउनलोड करा.

Step 2: डाउनलोड झाल्यानंतर अ‍ॅप ओपन करा. ओपन केल्यानंतर तुमची भाषा निवडा आणि अ‍ॅग्री अँड कंटिन्यू (Agree and Continue) वर टॅप करा.

Step 3: आता More Options (तीन डॉट्स) वर क्लिक करा आणि Create Parent Managed Account( क्रिएट पॅरेंट मॅनेज्ड अकाउंट) या पर्यायावर क्लिक करा.

Step 4: तुमच्या मुलाचा मोबाइल नंबर टाका तो रजिस्टर करा आणि व्हेरिफाय करा.

Step 5: त्यानंतर जन्म तारीक टाका आणि कन्फर्म करा.

Step 6: आता पॅरेंट अकाउंट ला लिंक करण्यासाठी Continue(कंटिन्यू) वर क्लिक करा.

Step 7: कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला QR कोड दिसेल. त्यानंतर पालकांच्या किंवा गार्डियन्सच्या फोन मधून तो स्कॅन करा आणि मग तिथे दिसणाऱ्या लिंकवर क्लिक करा.

Step 8: स्कॅन केल्यानंतर अ‍ॅग्री अँड कंटिन्यू (Agree and Continue) वर क्लिक करा.

Step 9: त्यानंतर व्हेरिफाय करा की तुम्ही अडल्ट आहात.

Step 10: व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला 6 अंकी PIN तयार/टाकायला सांगितलं जाईल. हा PIN तुम्हाला प्रायव्हसी सेटिंग्स चा अ‍ॅक्सेस देतो. तुम्हाला काही सेटिंग्स मध्ये बदल करायचा असेल तर सर्वात आधी हा PIN टाकावा लागेल. त्यामुळे हा PIN लक्षात ठेवा आणि तो तुमच्या मुलांना सांगू नका.

Step 11: PIN टाकल्यानंतर तो कन्फर्म करा.

Step 12: कन्फर्म झाल्यानंतर Done वर क्लिक करा.

Step 13: आता तुमच्या मुलाच्या WhatsApp अकाउंट मध्ये सेटअप पूर्ण करण्यासाठी WhatsApp मध्ये जाऊन पॅरेंट PIN टाका

Step 14: Continue(कंटिन्यू) वर क्लिक करा.

पॅरेंट मॅनेज्ड अकाउंट हे फीचर फक्त 13 वर्षांखालील किंवा 13 वर्षांचे (किंवा त्या देशातील WhatsApp वापरण्यासाठी आवश्यक वय असलेल्या) यूजर्स साठीच उपलब्ध असेल. तसेच हे फीचर फक्त पालक किंवा गार्डियन्स यांनीच ऑन/सेटअप केलं पाहिजे

हे सगळे स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुमच्या मुलाच्या फोन मध्ये पॅरेंट मॅनेज्ड अकाउंट हे फीचर ऑन होईल. आता मुलांना फक्त नाव आणि प्रोफाइल फोटो हे दोनच बदल करता येतील.

WhatsApp ने त्यांच्या ब्लॉग मध्ये सांगितलं आहे की येत्या महिन्यात हे फीचर सर्वांपर्यंत पोहोचेल. सध्या WhatsApp ने हे whatsapp parental control android marathi फीचर कोणत्या देशांमध्ये लॉन्च केलं आहे हे अजून जाहीर केलेलं नाही.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment