Tecno ने लॉन्च केला Tecno Pop X 5G बजेट स्मार्टफोन ज्यात असणार 6500mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि नेटवर्क नसतानाही कॉल करता येणारा असा जबरदस्त फीचर!

Tecno Pop X 5G Specs Marathi

Tecno ने भारतात त्यांच्या Pop series मधील बजेट मध्ये येणारा 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे ज्याला Tecno Pop X 5G असं नाव देण्यात आलं आहे. ज्या युजर्स ना एका बजेट स्मार्टफोन मध्ये मोठी बॅटरी, शानदार डिझाइन, मल्टिटास्किंग आणि वेगवान 5G कनेक्टिव्हिटी हवी असेल, त्यांच्यासाठी Tecno चा Tecno Pop X 5G हा उत्तम पर्याय ठरू शकतो. या स्मार्टफोन मध्ये Tecno ने खास करून डिझाइन, बॅटरी आणि AI फीचर्स यावर अधिक लक्ष दिलं आहे.

बजेट स्मार्टफोन च्या इंडस्ट्री मध्ये अनेक ब्रँड्स ने आपले स्मार्टफोनस लॉन्च केले आहेत जसे की Vivo, Samsung, Redmi, Motorola, Realme आणि Poco. या सर्व ब्रँड्स ने या सेगमेंट मध्ये आपली मजबूत जागा निर्माण केली आहे. आता याच बजेट स्मार्टफोन सेगमेंट मध्ये स्पर्धा वाढवण्यासाठी Tecno नेही उडी मारली आहे आणि त्यांनी त्यांचा Tecno Pop X 5G हा बजेट फोन लॉन्च केला आहे.

तुम्ही जर बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आधी या स्मार्टफोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स नक्की पाहून घ्या.

Tecno Pop X 5G डिस्प्ले आणि डिझाइन

डिझाइन कडे पाहिलं तर या फोनचं डिझाइन एकदम स्लिम आणि मॉडर्न ठेवण्यात आलं आहे जो फक्त 8.18mm जाडीचा आहे. मागच्या बाजूने पाहिलं तर Tecno ने Apple च्या iPhone Air सारखं डिझाइन दिलं आहे जे एअरोस्पेस-ग्रेड अ‍ॅल्युमिनियम पासून तयार करण्यात आलं आहे.

Tecno Pop X 5G मध्ये तुम्हाला 6.78 इंच HD+ डिस्प्ले, 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 560 निट्स ब्राईटनेस मिळणार आहे. 120Hz रिफ्रेश रेट असल्यामुळे रोजच्या स्क्रोलिंग आणि गेमिंग मध्ये तुम्हाला एकदम स्मूथ अनुभव मिळणार आहे.

डिस्प्ले आणि बॉडी अजून मजबूत करण्यासाठी Tecno Pop X 5G मध्ये MIL-STD-810H मिलिटरी-ग्रेड प्रोटेक्शन देण्यात आले आहे ज्यामुळे फोन चुकून खाली पडला तरी त्याला नुकसान होण्याची शक्यता कमी असते.

Tecno Pop X 5G परफॉर्मन्स

परफॉर्मन्स साठी Tecno ने या फोन मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 चिपसेट दिला आहे. यासोबत 6GB LPDDR4X RAM आणि 128GB UFS 2.2 स्टोरेज मिळते जे तुम्ही मायक्रो SD कार्ड च्या मदतीने 2TB पर्यंत वाढवू शकता. या फोन मध्ये तुम्ही सोशल मीडिया, लाइट गेमिंग आणि ब्राउझिंग सारखी कामं आरामात करू शकता.

हा प्रोसेसर 6nm फॅब्रिकेशन वर बनवलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे जो 2.2GHz च्या स्पीड ने रन होतो. यासोबत ग्राफिक्स साठी Tecno ने यात ARM Mali-G57 MC2 GPU दिला आहे.

Tecno Pop X 5G कॅमेरा

फोटोग्राफी साठी तुम्हाला या फोन मध्ये 50 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा LED फ्लॅश सोबत मिळणार आहे आणि सेल्फी कॅमेरा हा 8 मेगापिक्सेलचा असणार आहे. विडिओ रेकॉर्डिंग साठी तुम्ही या फोन मध्ये 2K रिसोल्युशन मध्ये विडिओ शूट करू शकता.

Airtel ने लॉन्च केले आता 30 दिवसांचा मंथली प्रीपेड प्लॅन्स! जाणून घ्या किती डेटा आणि कोणते OTT सबस्क्रिप्शन यासोबत मिळणार आहेत.

Tecno Pop X 5G बॅटरी

Tecno Pop X 5G या स्मार्टफोनचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये असलेली मोठी बॅटरी. हो Tecno ने यात तब्बल 6500mAh ची बॅटरी दिली आहे आणि सोबत फास्ट चार्जिंग साठी 45W चा अ‍ॅडॅप्टर देखील दिला आहे. फोन एकदा 100% चार्जे केल्यानंतर तुम्ही हा फोन आरामात दिवसभर वापरू शकता हे नक्की.

Tecno Pop X 5G कनेक्टिव्हिटी फीचर

कनेक्टिव्हिटी साठी Tecno ने या फोन मध्ये एक जबरदस्त फीचर दिलं आहे जे आतापर्यंत कुठल्याही स्मार्टफोन मध्ये सहजपणे पाहायला मिळत नाही ते म्हणजे “फ्री लिंक कम्युनिकेशन”. या फीचर च्या मदतीने तुम्ही नेटवर्क नसतानाही दुसऱ्या डिव्हाइस सोबत कनेक्ट होऊ शकता.

एवढंच नाही, तर तुम्ही मेसेजेस, कॉल्स आणि फाइल्स सुद्धा तुमच्या जवळ असलेल्या दुसऱ्या डिव्हाइस सोबत शेअर करू शकता. मात्र हे फीचर फक्त 1.5 km पर्यंतच्या अंतरावर असलेल्या डिव्हाइस सोबतच काम करेल.

Tecno Pop X 5G AI फीचर

Tecno Pop X 5G मध्ये Tecno ने बजेट सेगमेंट असूनही जबरदस्त AI फीचर्स दिले आहेत. जसे की एआय नॉईज कॅन्सलेशन जे कॉल्स दरम्यान आवाज क्लिअर ठेवत, एआय रायटिंग असिस्टंट टायपिंग आणि कन्टेन्ट लिहायला मदत करणार, एआय इरेजर 2.0 फोटो मधून नको असलेले वस्तू काढण्यासाठी आणि सर्कल टू सर्च जे स्क्रीनवरून थेट सर्च करणार.

Tecno Pop X 5G वैशिष्ट्ये (tecno pop x 5g specs marathi)

tecno pop x 5g specs marathi
रिपल ग्रीन
tecno pop x 5g specs marathi
मिडनाइट ब्लू
ऑपरेटिंग सिस्टमअँड्रॉइड 16(HiOS)
1 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 2 वर्षे सुरक्षा अपडेट्स
प्रोसेसरमीडियाटेक डायमेन्सिटी 6400
इंटरनल स्टोरेज128 GB
रॅम4GB आणि 6GB
सुरक्षासाइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर
बॅटरीची क्षमता6500 mAh
अ‍ॅडॉप्टर45W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार6.78 इंच
रिझोल्यूशन720 × 1576 पिक्सेल
डिस्प्ले तंत्रज्ञान1)560 निट्स ब्राईटनेस
2)120 हर्ट्झ रिफ्रेश रेट
3)एचडी+
सेंसर1)ॲक्सेलरोमीटर
2)लाईट सेन्सर
3)प्रॉक्सिमिटी सेन्सर
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 8 मेगापिक्सेल
2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल
3)फुल एचडी रेकॉर्डिंग
ऑडिओ स्टीरिओ ड्युअल स्पीकर्स डॉल्बी ॲटमॉससह
रंग1)रिपल ग्रीन
2)मिडनाइट ब्लू
कनेक्टिविटी5G, 4G VOLTE, 4G, 2G
ब्लूटूथ v5.4, Wi-Fi 6
किंमत₹15999

Tecno Pop X 5G Specs Marathi Price

हा स्मार्टफोन तुम्हाला 2 व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. पहिला व्हेरिएंट 4GB + 128GB असून त्याची किंमत 15,999 रुपये आहे आणि दुसरा व्हेरिएंट 6GB + 128GB असून त्याची किंमत 17,999 रुपये आहे. तुम्हाला जर Tecno Pop X 5G हा फोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन Amazon वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment