उन्हाळ्या मध्ये AC ची कूलिंग वाढवण्यासाठी वापरा या 7 टिप्स, ज्यामुळे अजून गारवा तर मिळेलच पण त्यासोबत वीज बिलही कमी येईल.

भारतात आता AC (Air Conditioner) ही फक्त एक लक्झरी वस्तू राहिलेली नाही तर ती आता एक गरज बनली आहे. खास करून ज्या शहरां मध्ये खूप उष्णता वाढत आहे त्या ठिकाणी लोकांना गरमीपासून वाचण्यासाठी घरात AC असणं आवश्यक झालं आहे.

तुम्हालाही जर तुमच्या घरी असलेला AC दीर्घकाळ चालावा आणि कोणताही प्रॉब्लेम न देता सुपर कूलिंग द्यावा असं वाटत असेल तर या टिप्सचा वापर नक्की करा.

How To Increase AC Cooling Marathi

1. सिलिंग पंख्याचा वापर करून कूलिंग वाढवा

AC सोबत सिलिंग फॅन वापरणं हा एक चांगला उपाय आहे. सिलिंग फॅन मुळे पूर्ण रूम मध्ये कूलिंग पटकन पसरते. यामुळे AC ला सतत जास्त पॉवर वर चालवण्याची गरज पडत नाही आणि इलेक्ट्रिसिटी चा वापरही कमी होतो.

2. वेळेवर प्रोफेशनल सर्व्हिसिंग करून घ्या

AC ची सर्व्हिसिंग केल्यामुळे त्याची लाइफ स्पॅन वाढते. वर्षातून कमीत कमी 2 वेळा AC ची प्रोफेशनल सर्व्हिसिंग करून घ्यायलाच पाहिजे, ज्यामुळे कूलिंग कॉइल्स, कंप्रेसर आणि गॅस लेव्हल यावर योग्य लक्ष ठेवता येतं.

Airtel ने लॉन्च केले आता 30 दिवसांचा मंथली प्रीपेड प्लॅन्स! जाणून घ्या किती डेटा आणि कोणते OTT सबस्क्रिप्शन यासोबत मिळणार आहेत.

3. रूमला पूर्णपणे बंद ठेवा

AC चालू केल्यानंतर घरातील सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही खिडकी किंवा दरवाजा उघडा ठेवला तर AC मधील थंड हवा बाहेर निघून जाते. त्यामुळे AC ला अजून जास्त काम करावं लागतं आणि यामुळे कंप्रेसर वर ताण वाढतो.

4. AC मधील फिल्टर स्वच्छ करा

AC फिल्टर स्वच्छ करणं ही एक खूप सोपी आणि उपयुक्त मेंटेनन्स टिप आहे. खास करून शहरां मध्ये प्रदूषण आणि धूळ खूप जास्त असते त्यामुळे फिल्टर लवकर अस्वच्छ होतो. अस्वच्छ फिल्टर मुळे एअरफ्लो कमी होतो ज्याचा थेट परिणाम कूलिंग वर होतो आणि इलेक्ट्रिसिटी बिल सुद्धा वाढू शकतं.

5. थर्मोस्टॅट ला योग्य ठिकाणी लावा

थर्मोस्टॅट ला अशा ठिकाणी लावा जिथे डायरेक्ट ऊन किंवा फ्रिज, किचन मधील गरम वस्तूंचा परिणाम होणार नाही. जर थर्मोस्टॅट वर गरम हवा किंवा उष्णतेचा प्रभाव पडला तर AC ला रूम अजून गरम असल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे AC जास्त वेळ चालू राहतो.

थंड कूलिंग मिळण्यासाठी थर्मोस्टॅट चे तापमान 23°C ते 25°C दरम्यान ठेवावं असं एक्सपर्ट्स सांगतात.

6. आउटडोअर युनिटला सावलीत किंवा मोकळ्या जाग्या मध्ये ठेवा

AC च्या आउटडोअर युनिट ला अशा ठिकाणी लावा जिथे थोडी सावली आणि आजूबाजूला मोकळी जागा असेल. जर आउटडोअर युनिट खूप गरम वातावरणात काम करत असेल तर AC ची कूलिंग क्षमता कमी होत जाते आणि त्याला जास्त मेहनत घ्यावी लागते.

सोबतच तुम्ही आउटडोअर युनिट मोकळ्या जागेवर लावलं तर त्याचं मेंटेनन्स आणि स्वच्छ करणं सोपं राहतं. जर आउटडोअर युनिटमोकळ्या जागेत बसवलं नाही तर सर्व्हिसिंग आणि स्वच्छतेच्या वेळी अडचणी येऊ शकतात आणि त्याचा परिणाम परफॉर्मन्स वरही होऊ शकतो.

हे सर्व टिप्स तुम्ही वापरले तर तुमच्या AC ची कूलिंग अजून चांगली वाढेल आणि त्यासोबत इलेक्ट्रिसिटी बिल सुद्धा कमी येण्यास मदत होईल. तुम्हाला ही (How to Increase AC Cooling Marathi) माहिती उपयुक्त वाटली का हे कंमेंट करून नक्की सांगा

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment