भारतात आता परवडणारे इअरबड्स च्या सेगमेंट मध्ये आणखी एका नवीन सदस्य चा समावेश होणार आहे तो म्हणजे OnePlus Nord Buds 4. हो OnePlus आता त्यांच्या Nord सिरीज मध्ये आणखी एक नवीन इअरबड्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे ते ही युजर्स च्या बजेट मध्ये.
OnePlus ने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर अधिकृतपणे जाहीर केले आहे की OnePlus Nord Buds 4 हे TWS इअरबड्स 25 जून 2026 रोजी लॉन्च होणार आहेत. हे TWS इअरबड्स बजेट सेगमेंट मध्ये सादर केले जाणार असून कमी किंमतीत प्रीमियम अनुभव आणि फीचर्स यावर OnePlus ने भर दिला आहे.
अनेक ब्रँड्स चे इअरबड्स सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत जसे की Realme, Redmi, boAt, Noise आणि Nothing या सर्वांना टक्कर देण्यासाठी OnePlus ने Nord Buds 4 बाजारात आणले आहेत ते ही इअरबड्स मध्ये मोठी बॅटरी लाइफ, गेमिंग फीचर्स, प्रीमियम डिझाइन, कंफर्ट आणि तगड्या परफॉर्मन्स सोबत.
Oneplus Nord Buds 4 Marathi
कंपनी च्या ऑफिशियल वेबसाइट वरील माहितीनुसार OnePlus Nord Buds 4 मध्ये 52dB ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) चा सपोर्ट मिळणार आहे. यासोबतच 5000Hz पर्यंतची नॉइज कॅन्सलेशन रेंज देखील देण्यात आली आहे.
हे इअरबड्स अशा प्रकारे डिझाइन करण्यात आले आहेत की ते आजूबाजूचा आवाज कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही call वर बोलत असाल किंवा गाणी ऐकत असाल, तेव्हा बाहेरील आवाजाचा त्रास कमी होऊन अधिक चांगला audio चा अनुभव मिळू शकतो.
हे ही वाचा :- 200 रुपयांमध्ये Jio देत आहे Amazon Prime सोबत 13 OTT प्लॅटफॉर्म्स मोफत!
ऑडिओ साठी या इअरबड्स मध्ये 12mm टायटॅनियम-कोटेड ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत ज्यामुळे तुम्हाला डीप बास आणि हाय-फ्रिक्वेन्सी ऑडिओ चा उत्कृष्ट अनुभव मिळू शकतो. यासोबतच, कॅल्लिंग साठी यामध्ये सहा मायक्रोफोन सिस्टम आणि AI क्लिअर कॉल टेक्नॉलॉजी हे फीचर देखील देण्यात आले आहे. हा सेटअप असल्यामुळे व्हॉइस क्लॅरिटी आणखी सुधारते आणि बॅकग्राऊंड नॉइज कमी करण्यास मदत होते
Oneplus Nord Buds बॅटरी
बॅटरी लाइफ बद्दल बोलायचं झालं तर हा OnePlus Nord Buds 4 मधील सर्वात मजबूत मुद्दा ठरू शकतो, जो या इअरबड्स ला इतर इअरबड्स पेक्षा वेगळं बनवतो. OnePlus च्या म्हणण्यानुसार एकदा पूर्ण चार्जे केल्यानंतर हे इअरबड्स चार्जिंग केस सोबत एकूण 54 तासांचा प्लेबॅक टाइमदेऊ शकतात.
यासोबतच कंपनीने असा दावा देखील केला आहे की फक्त 10 मिनिटे चार्जे केल्यानंतरही हे इअरबड्स 11 तासांपर्यंत वापरता येऊ शकतात. या इअरबड्स ला TÜV राइनलँड बॅटरी सर्टिफिकेशन देखील देण्यात आले आहे. हे सर्टिफिकेशन विशेषतः बॅटरी च्या दीर्घकालीन टिकाऊपणा वर लक्ष केंद्रित करते.
गेमिंग साठी देखील OnePlus ने या इअरबड्स मध्ये एक खास फीचर दिले आहे. Nord Buds 4 मध्ये तुम्हाला अल्ट्रा-लो लेटन्सी ऑडिओ आणि OnePlus गेम्स साउंड स्पेशियल ऑडिओ चा सपोर्ट मिळणार आहे. हे दोन्ही फीचर्स OxygenOS 12 किंवा त्यापुढील व्हर्जन असलेल्या OnePlus स्मार्टफोन्स वर वापरता येणार आहेत.
OnePlus ने युजर्स ला अधिक कंफर्ट मिळावा यावर विशेष लक्ष दिले आहे. एका इअरबड चे वजन फक्त 4.3 ग्रॅम आहे. त्यामुळे हे इअरबड्स तुम्ही दीर्घकाळ वापरू शकता मग ते गाणी ऐकण्यासाठी असो, मुव्हीज पाहण्यासाठी असो किंवा गेमिंग साठी असो, तुम्ही हे इअरबड्स बराच वेळ आरामात वापरू शकता.
ब्रँड् ने अजून OnePlus Nord Buds 4 ची किंमत अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. माझ्या मते या इअरबड्स ची किंमत लॉन्च इव्हेंटच्या दिवशीच जाहीर केली जाईल.
मात्र X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरील टीझर पोस्ट मुळे हे इअरबड्स कोणत्या रंगांमध्ये उपलब्ध असतील याची माहिती मिळाली आहे. OnePlus ने हे इअरबड्स दोन रंगांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत स्टेलर ब्लॅक आणि अॅस्ट्रल टील.
तुम्हाला जर (oneplus nord buds 4 marathi) हे इअरबड्स घ्यायचे असतील तर लॉन्च झाल्यानंतर ते Flipkart, Amazon, Myntra, OnePlus India Online तसेच तुमच्या जवळच्या OnePlus Store मध्ये उपलब्ध असतील.
