iPhone 18 Pro Marathi
Apple कडून या वर्षी सर्वांना सर्वाधिक अपेक्षित असलेला लॉन्च म्हणजे त्यांची नवीनतम iPhone 18 Pro सिरीज. ही सिरीज Apple कडून सप्टेंबर 2026 मध्ये होणाऱ्या Apple लॉन्च इव्हेंट मध्ये सादर केली जाऊ शकते.
मार्केटमध्ये iPhone 18 Pro सिरीज बद्दल सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे आणि या चर्चांमधून असे समोर येत आहे की Apple च्या या नवीन सिरीज मध्ये अनेक महत्त्वाचे अपडेट्स पाहायला मिळू शकतात.मग ते परफॉर्मन्स, कॅमेरा, बॅटरी life, कनेक्टिव्हिटी किंवा AI फीचर्स असोत या सर्व विभागांमध्ये युजर्सना काही नवीन आणि सुधारित फीचर्स पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
पण डिझाइन मध्ये Apple ने फारसे बदल केलेले नाहीत, असे वाटते. iPhone 17 Pro मध्ये जसे डिझाइन असणार आहे त्याच डिझाइन ची झलक पुढे iPhone 18 Pro सिरीज मध्येही पाहायला मिळू शकते. किंमतीबाबत देखील अशी चर्चा सुरू आहे की iPhone 18 Pro सिरीज ची किंमत वाढू शकते. एवढेच नाही तर सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या iPhone च्या काही मॉडेल्सच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
तुम्ही देखील नवीन latest iPhone घेण्याचा विचार करत असाल, तर थोडे दिवस थांबून iPhone 18 Pro सिरीज चा विचार करू शकता. Apple ने अद्याप या सिरीज बद्दल कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. मात्र समोर आलेल्या लीक्स आणि रिपोर्ट्स नुसार iPhone 18 Pro सिरीज मध्ये कोणते स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पाहायला मिळू शकतात याची काही माहिती समोर येत आहे.
चला तर मग पाहूया iPhone 18 Pro मध्ये आपल्याला कोणते नवीन फीचर्स आणि अपग्रेड पाहायला मिळू शकतात.
Iphone 18 Pro डिझाइन & डिस्प्ले
डिझाइन च्या बाबतीत Apple ने iPhone 18 Pro मध्ये फारसे बदल केलेले नाहीत. iPhone 17 Pro मध्ये असलेल्या डिझाइन प्रमाणेच डिझाइन आपल्याला iPhone 18 Pro सिरीज मध्येही पाहायला मिळू शकते. तसेच कॅमेरा प्लेटू देखील तसाच कायम ठेवला जाण्याची शक्यता आहे.
डिस्प्ले बद्दल बोलायचं झालं तर लीक्स मधून समोर आलेल्या माहितीनुसार, iPhone 18 Pro Max हा Apple चा आजपर्यंतचा सर्वात मोठा डिस्प्ले असलेला स्मार्टफोन ठरू शकतो. iPhone 18 Pro Max मध्ये सुमारे 6.91 इंचाचा LTPO सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले मिळू शकतो तर iPhone 18 Pro मध्ये सुमारे 6.3 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
सर्वात महत्त्वाचा update जर आपल्याला पाहायला मिळणार असेल, तर तो रिफ्रेश रेट मध्ये असू शकतो. iPhone 18 Pro Max मध्ये सध्याच्या 120Hz रिफ्रेश रेटला अपग्रेड करून 144Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. यासोबतच पीक ब्राइटनेस, व्हिजिबिलिटी आणि आउटडोअर ब्राइटनेस मध्येही सुधारणा पाहायला मिळू शकते.
Iphone 18 Pro प्रोसेसर
Apple त्यांच्या नवीन iPhone 18 Pro सिरीज मध्ये A20 Pro हा नेक्स्ट-जनरेशन प्रोसेसर देऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. Reports नुसार, A20 Pro चिपसेट हे 2nm प्रोसेस टेकनॉलॉजि वर तयार केले जाऊ शकते. ही चिप असल्यामुळे परफॉर्मन्स मध्ये तुम्हाला सुमारे 15 टक्के अधिक वेगवान अनुभव मिळू शकतो जो iPhone 17 Pro मधील A19 प्रोसेसर पेक्षाही अधिक चांगला असू शकतो.
हे ही वाचा :- 200 रुपयांमध्ये Jio देत आहे Amazon Prime सोबत 13 OTT प्लॅटफॉर्म्स मोफत!
काही रिपोर्ट्स नुसार Apple TSMC वेफर-लेव्हल मल्टी-चिप मॉड्यूल तंत्रज्ञान देऊ शकते ज्यामध्ये मेमरी ही प्रोसेसर च्या अधिक जवळ असणार आहे. त्यामुळे प्रोसेसर चा वेग वाढण्यास मदत होऊ शकते. याचा फायदा इंटर्नल स्पेस मॅनेजमेंट, डेटा प्रोसेसिंग आणि AI-संबंधित टास्क्स मध्ये होऊ शकतो.
Iphone 18 Pro कॅमेरा
कॅमेरा मध्ये iPhone 18 Pro मध्ये आपल्याला हार्डवेअर स्तरावर काही महत्त्वाचे अपडेट्स पाहायला मिळू शकतात. Apple त्यांच्या 48 मेगापिक्सेल कॅमेरा मध्ये व्हेरिएबल अपर्चर टेकनॉलॉजि सादर करू शकते.
जर ही माहिती खरी ठरली तर युजर्स च्या हातात सेन्सर मध्ये किती प्रकाश पोहोचावा यावर अधिक नियंत्रण असू शकतो. त्यामुळे शार्पनेस आणि डेप्थ ऑफ फील्ड यांसारख्या गोष्टींवर अधिक नियंत्रण मिळू शकते.
फ्रंट-फेसिंग कॅमेरा मध्ये देखील आपल्याला काही मोठे चेंजेस पाहायला मिळू शकतात. iPhone 17 सिरीज मध्ये Apple ने 18 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा दिला आहे पण आता नवीन iPhone 18 सिरीज मध्ये तो 24 मेगापिक्सेल पर्यंत अपग्रेड केला जाऊ शकतो.
जास्त मेगापिक्सेल असल्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ कॉल्स आणि सेल्फी फोटोस यांच्या क्वालिटी मध्ये लक्षणीय फरक पाहायला मिळू शकतो.
Iphone 18 Pro बॅटरी
अजून एक मोठा अपग्रेड आपल्याला पाहायला मिळू शकतो तो म्हणजे बॅटरी मध्ये. अफवां नुसार iPhone 18 आणि iPhone 18 Pro या मॉडेल्समध्ये मागील वर्षीच्या मॉडेल्सपेक्षा मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.
Apple ने iPhone 17 Pro मध्ये 5088mAh ची बॅटरी दिली होती तर आता iPhone 18 Pro मध्ये ती वाढवून 5200mAh केली जाऊ शकते.
iPhone 18 Pro Specifications (अपेक्षित)
| ऑपरेटिंग सिस्टम | iOS 26 |
| प्रोसेसर | A20 Pro |
| इंटरनल स्टोरेज | 256 GB |
| रॅम | – |
| सुरक्षा | फेस आयडी |
| बॅटरीची क्षमता | 5200mah |
| अॅडॉप्टर | 40W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.3 इंच (सुपर रेटिना XDR डिस्प्ले) |
| रिझोल्यूशन | 2622 x 1206 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | – |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)144Hz रिफ्रेश रेट 2)पीक ब्राइटनेस:- 3000 निट्स 3)जास्तीत जास्त ब्राइटनेस:- 1000 निट्स 4)HDR डिस्प्ले |
| सेंसर | 1)हाय-जी ॲक्सेलरोमीटर 2)प्रॉक्सिमिटी सेन्सर |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 24 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 48 मेगापिक्सेल कॅमेरा + 48 मेगापिक्सेल कॅमेरा + 48 मेगापिक्सेल कॅमेरा 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K, 1080p, 720p |
| ऑडिओ | डॉल्बी ऑडिओ |
| रंग | 1)डार्क चेरी 2)डार्क ग्रे 3)लाइट ब्लू 4)सिल्व्हर |
| कनेक्टिविटी | 5G ब्लूटूथ v6.0, Wi-Fi, NFC |
| (iphone 18 pro marathi)किंमत | ₹1,21,900 |
