Nothing Phone 4b लवकरच होणार लॉन्च! Nothing ची नवीन सिरीज बाजारात येण्यास सज्ज.

Nothing Phone 4b Marathi

Nothing आता भारतामध्ये त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Phone 4a सिरीज मधल्या nothing phone 4a आणि nothing phone 4a pro या स्मार्टफोन ला चांगला प्रतिसाद आणि यश मिळाल्यानंतर आता कंपनी त्यांची पुढील Nothing Phone 4b सिरीज सादर करण्याच्या तयारीत आहे. या नवीन सिरीज मध्ये B सिरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन्स पाहायला मिळू शकतात.

कंपनी ने जाहीर केले आहे की Nothing Phone 4b सिरीज भारता मध्ये 7 जुलै रोजी दुपारी 3:30 वाजता होणाऱ्या एका इव्हेंट मध्ये लॉन्च होणार आहे. लॉन्च झाल्यानंतर हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट वर उपलब्ध होणार आहे.

Nothing ने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पोस्ट करून ही माहिती जाहीर केली आहे. त्या पोस्ट मध्ये आपल्याला Nothing Phone 4b या स्मार्टफोन चे चित्र देखील दाखवण्यात आले आहे.

Nothing चे सह-संस्थापक (co-founder) अकिस इव्हॅन्जेलिडिस यांनी खात्री केली आहे की कंपनी यावर्षी CMF स्मार्टफोन लॉन्च करणार नाही. त्यामागील मुख्य कारण म्हणजे मेमरी च्या वाढलेल्या किंमती असल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे यावर्षी CMF स्मार्टफोन च्या जागी Nothing कडून Nothing Phone 4b सिरीज लॉन्च करण्यात येणार आहे.

अकिस इव्हॅन्जेलिडिस यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर युजर्स ना Nothing Phone 4b सिरीज मधील “b” या अक्षराचा अर्थ स्पष्ट केला आहे. त्यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये असे लिहिले आहे की, “4” हा अंक स्मार्टफोन ची जनरेशन दर्शवतो तर “b” हे अक्षर त्या स्मार्टफोन चा प्रॉडक्ट सेगमेंट दर्शवते. त्यामुळे Nothing Phone 4b marathi हे नाव कंपनीच्या नवीन जनरेशन आणि त्याच्या सेगमेंट ची ओळख करून देते.

Nothing Phone 4b डिझाइन

हा ब्रँड जर कोणत्या गोष्टीसाठी देशात प्रसिद्ध असेल तर ती गोष्ट म्हणजे त्याचे डिझाइन. Nothing चे आजपर्यंत जितके स्मार्टफोन्स लॉन्च झाले आहेत, त्या प्रत्येक स्मार्टफोन चे डिझाइन हे एकमेव आणि क्लीन राहिले आहे आणि हेच आपल्याला Nothing Phone 4b मध्येही पाहायला मिळू शकते.

nothing phone 4b marathi

डाव्या बाजूला व्हॉल्यूम बटन्स आणि उजव्या बाजूला पॉवर बटण देण्यात आल्याचे दिसून येते.

Nothing Phone 4b कॅमेरा

टीझर मध्ये दाखवण्यात आलेल्या डिझाइन नुसार या स्मार्टफोन मध्ये सिंगल रिअर कॅमेरा दिला जाऊ शकतो असे दिसत आहे. सिंगल कॅमेरा सेटअप असल्यामुळ माझ्या अंदाजानुसार Nothing मुख्य कॅमेरा सोबत अल्ट्रा-वाइड सेन्सर देखील देऊ शकते.

कंपनी ने अद्याप कॅमेरा संबंधित कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. समोर आलेल्या डिझाइन आणि चित्र कडे पाहता कॅमेरा सेटअप बद्दल काही प्रमाणात अंदाज बांधता येत आहे.

Nothing Phone 4b प्रोसेसर

Nothing हा ब्रँड फक्त डिझाइन साठीच नाही तर परफॉर्मन्स साठी देखील प्रसिद्ध आहे. Phone 4b च्या गीकबेंच रिझल्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार या स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जन 4 चिपसेट दिला जाऊ शकतो जो 4nm प्रोसेसर वर आधारित असणार आहे.

यासोबतच या स्मार्टफोन मध्ये 8GB RAM, अॅड्रेनो 810 GPU आणि अँड्रॉइड 16 ऑपरेटिंग सिस्टम चा समर्थन मिळू शकतो. परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर गीकबेंच चाचणी मध्ये Nothing Phone 4b ने सिंगल-कोर स्कोअर मध्ये 1088 गुण तर मल्टी-कोर स्कोअर मध्ये 3155 गुण मिळवले आहेत.

Nothing Phone 4b किंमत

ब्रँड ने अजून किंमती बाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. मात्र Nothing Phone 4b हा Nothing Phone 4a पेक्षा स्वस्त असू शकतो अशी चर्चा सुरू आहे.

सध्या भारता मध्ये Nothing Phone 4a ची किंमत सुमारे ₹31,999 आहे. काही लीक्स मधून समोर आलेल्या माहितीनुसार Nothing Phone 4b ची किंमत Nothing Phone 4a पेक्षा सुमारे ₹3,000 ते ₹4,000 ने कमी असू शकते.

Leave a Comment