Motorola Edge 70 Max Review, Features In Marathi
Motorola Edge 70 Max प्रीमियम सेगमेंटमध्ये दमदार एन्ट्री करत आहे! Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर आणि 7000mAh बॅटरीसह येणाऱ्या या फ्लॅगशिप स्मार्टफोनची संपूर्ण माहिती Motorola Edge 70 Max Review Features In Marathi मध्ये जाणून घ्या, किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आत्ताच वाचा.
प्रीमियम सेगमेंट मधील आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी Moto लवकरच त्यांचा आणखी एक प्रीमियम स्मार्टफोन Motorola Edge 70 Max लॉन्च करणार आहे.
Motorola ने जाहीर केले आहे की भारतात त्यांचा लेटेस्ट प्रीमियम स्मार्टफोन Motorola Edge 70 Max हा 15 जुलै रोजी लॉन्च झाला. हा स्मार्टफोन Moto च्या Edge 70 लाइनअप मधील पाचवा मॉडेल असणार आहे.
या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला Edge 70 सिरीज मधील मॉडेल्स प्रमाणे प्रीमियम फ्लॅट फ्रेम डिझाइन आणि कर्व्ड डिस्प्ले पाहायला मिळणार आहे. Motorola Edge 70 Max हा स्मार्टफोन विशेषतः अशा युजर्स साठी तयार करण्यात आला आहे ज्यांना हेवी गेमिंग आणि हेवी टास्क्स करायचे असतात. या स्मार्टफोन मध्ये पॉवरफुल प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि भरपूर AI फीचर्स देण्यात येणार आहेत.
तुम्ही जर नवीन प्रीमियम स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर या स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स एकदा नक्की पाहा.
7000 निट्स पीक ब्राइटनेस आणि 144Hz डिस्प्ले, Motorola Edge 70 Max चा स्क्रीन अनुभव कसा आहे?
डिझाइन कडे पाहिले तर Moto ने यावेळी Motorola Edge 70 Max च्या डिझाइन मध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. Edge 70 सिरीज मधील आधीच्या मॉडेलस मध्ये कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला होता पण या नवीन मॉडेल मध्ये कंपनीने फ्लॅट OLED डिस्प्ले, थिन बेझल्स आणि LTPO (लो-टेंपरेचर पॉलीक्रिस्टलाइन ऑक्साइड) टेक्नॉलॉजी चा वापर केला आहे.
फ्लॅट डिस्प्ले असल्यामुळे गेमिंग करताना, व्हिडिओस पाहताना किंवा दैनंदिन वापरात स्मार्टफोन अधिक आरामदायक वाटतो. LTPO डिस्प्ले चा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो स्मूथ परफॉर्मन्स देण्यासोबतच रिफ्रेश रेट गरजेनुसार बदलतो.
Motorola Edge 70 Max मध्ये 6.82″ LTPO OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. विशेषतः कंटेंट क्रिएटर्स आणि गेमर्स यांना लक्षात घेऊन या स्मार्टफोन मध्ये 144Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. ज्यामुळे गेमिंग, सोशल मीडिया स्क्रोलिंग आणि अॅनिमेशन्स दरम्यान अतिशय स्मूथ आणि रिस्पॉन्सिव्ह अनुभव मिळणार आहे.
या स्मार्टफोन मध्ये 7000 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही कडक उन्हातही स्क्रीन वरील टेक्स्ट, फोटोज आणि इतर कंटेंट अगदी सहज आणि स्पष्टपणे पाहू शकता.
Snapdragon 8 Gen 5 मुळे Motorola Edge 70 Max मध्ये मिळतो सुपरफास्ट परफॉर्मन्स
परफॉर्मन्स साठी Moto ने या स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 हा शक्तिशाली प्रोसेसर दिला आहे. यासोबत LPDDR5X RAM देण्यात आली आहे ज्यामुळे मल्टिटास्किंग अधिक फास्ट आणि स्मूथ होते. हा ऑक्टा-कोर प्रोसेसर 3.32GHz ते 3.8GHz या हाय क्लॉक स्पीड वर कार्य करतो.
स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 सारखा शक्तिशाली प्रोसेसर असल्यामुळे तुम्ही PUBG, Call of Duty (COD) तसेच इतर लेटेस्ट हाय-ग्राफिक्स गेम्स देखील सहज खेळू शकता. Moto ने या स्मार्टफोन मध्ये इतका पॉवरफुल प्रोसेसर दिल्यामुळे परफॉर्मन्स च्या बाबतीत हा या स्मार्टफोन चा सर्वात मोठा प्लस पॉइंट ठरू शकतो.
200 रुपयांमध्ये Jio देत आहे Amazon Prime सोबत 13 OTT प्लॅटफॉर्म्स मोफत!
जर तुम्ही बराच वेळ गेमिंग करत असाल तर स्मार्टफोन गरम होण्याची शक्यता वाढते. तर ह्या साठी उपाय म्हणून Motorola ने या स्मार्टफोन मध्ये आर्क्टिकमेश कूलिंग सिस्टमदिली आहे.
Motorola च्या म्हणण्यानुसार आर्क्टिकमेश कूलिंग सिस्टम मुळे निर्माण होणारी हीट संपूर्ण चेसिस मध्ये समानपणे पसरवली जाते. त्यामुळे प्रोसेसर चे तापमान नियंत्रणात राहते आणि हेवी गेमिंग किंवा इतर हेवी टास्क्स करतानाही स्मार्टफोन स्थिर परफॉर्मन्स देण्यास मदत होते.
Motorola Edge 70 Max चा कॅमेरा किती दमदार? Sony LYT-710 सेन्सरसह फोटो आणि व्हिडिओ क्वालिटी जाणून घ्या
फोटोग्राफी साठी या स्मार्टफोन मध्ये 50 मेगापिक्सेल मेन कॅमेरा, OIS (ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन) आणि Sony LYTIA 710 सेन्सर देण्यात आला आहे. यासोबत दुसरा कॅमेरा हा 8 मेगापिक्सेल चा अल्ट्रा वाइड कॅमेरा असणार आहे. याशिवाय, वेगवेगळ्या लाइटिंग कंडिशन्स मध्ये फोटोस अधिक नैसर्गिक आणि संतुलित दिसावेत यासाठी 2-in-1 डेडिकेटेड लाईट सेन्सर देखील देण्यात आला आहे.
याशिवाय कॅमेरा मध्ये तुम्हाला 1x, 2x, 10x आणि 20x पर्यंत झूम करण्याचा पर्याय मिळणार आहे. 10x झूम मध्ये फोटोस चांगल्या गुणवत्तेचे येतात. मात्र 20x झूम वर फोटोस थोडे अस्पष्ट दिसू शकतात. सेल्फी कॅमेरा हा 32 मेगापिक्सेल चा देण्यात आला आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही 4K/60FPS मध्ये करू शकता. त्यामुळे व्हिडिओस ची क्वालिटी देखील अतिशय चांगली पाहायला मिळते.
फोटोस कडे पाहिले तर त्या क्लिअर, बॅलन्स्ड, व्हायब्रंट कलर्स असलेल्या आणि नैसर्गिक स्किन टोन्स सह पाहायला मिळतात. पोर्ट्रेट आणि झूम मध्ये देखील चांगले फोटोस कॅप्चर होतात. प्रत्येक फोटो मध्ये डिटेल्स उत्तम प्रकारे दिसून येतात. मी जेव्हा फोटोस पाहिले तेव्हा Moto ने यावेळी कलर प्रोसेसिंग मध्ये चांगली सुधारणा केल्याचे जाणवले.
पण एक गोष्ट मला वाटते की Moto ने या स्मार्टफोन मध्ये द्यायला हवी होती ती म्हणजे टेलिफोटो लेन्स. अल्ट्रा वाइड लेन्स देण्यात आली असली तरी Motorola Edge 70 Max मध्ये टेलिफोटो लेन्स देण्यात आलेली नाही.
एकदा चार्ज करा आणि दोन दिवस वापरा? Edge 70 Max ची बॅटरी किती प्रभावी आहे?
Moto चा या सेगमेंट मधील सर्वात मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन म्हणून Motorola Edge 70 Max समोर येत आहे. या स्मार्टफोन मध्ये 7100mAh बॅटरी देण्यात आली आहे. यासोबत 90W फास्ट चार्जिंग चा सपोर्ट मिळतो. तसेच 25W वायरलेस चार्जिंग आणि 5W रिव्हर्स चार्जिंग चा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
बाकीच्या ब्रॅण्ड्स च्या या सेगमेंट मधील स्मार्टफोन्स कडे पाहिले तर इतकी मोठी बॅटरी सहसा पाहायला मिळत नाही. मोटोरोला च्या Edge 70 लाइनअप मधील कोणत्याही मॉडेल मध्ये आजपर्यंत इतकी मोठी बॅटरी देण्यात आलेली नाही.अगदी Motorola Edge 70 Pro Plus या टॉप व्हेरिएंट मध्ये देखील 6500mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Motorola Edge 70 Max ची संपूर्ण फीचर लिस्ट. खरेदीपूर्वी हे तपशील नक्की पाहा.



| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 16 3 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 5 वर्षे सुरक्षा अपडेट्स |
| प्रोसेसर | स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 |
| इंटरनल स्टोरेज | 256 GB |
| रॅम | 12GB |
| सुरक्षा | 1) ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट रीडर 2) फेस अनलॉक 3) थिंकशील्ड |
| बॅटरीची क्षमता | 7100 mAh |
| अॅडॉप्टर | वायर्ड चार्जिंग – 90W वायरलेस चार्जिंग – 25W रिव्हर्स चार्जिंग – 5W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.8″ (एमोलेड डिस्प्ले) |
| रिझोल्यूशन | 1440 × 3168 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IP68, IP68 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)पीक ब्राइटनेस:- 7000 निट्स 2)144Hz पर्यंत रिफ्रेश रेट 3)टच सॅम्पलिंग रेट :- 360Hz 4)HDR10+ |
| सेंसर | 1)प्रॉक्सिमिटी सेन्सर 2)जायरोस्कोप 3)मॅग्नेटोमीटर 4)सार सेन्सर 5)सेन्सर हब 6)ॲक्सेलरोमीटर 7)अॅम्बियंट लाईट सेन्सर |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 32 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल Sony LYTIA 710 मेन कॅमेरा + 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा 3)HDR10+ 4)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K HDR10+ |
| ऑडिओ | 1)ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स 2)डॉल्बी अॅटमॉस® सह 3)हाय-रेझ ऑडिओ 4)हाय-रेझ ऑडिओ वायरलेस |
| रंग | 1)पॅनटोन अक्वा ग्रे (हिरवा) 2)पॅनटोन डार्क शॅडो (काळा) 3)पॅनटोन आइस मेल्ट (फिकट निळा) |
| कनेक्टिविटी | 5G, 4G, 3G, 2G ब्लूटूथ v6.0, Wi-Fi 7 |
| किंमत | ₹54,999 |
Motorola Edge 70 Max ची किंमत आणि ऑफर्स. कोणत्या व्हेरिएंटवर किती बचत?
Moto Edge 70 Max हा स्मार्टफोन 2 व्हेरिएंट मध्ये उपलब्ध होणार आहे. यामधील 8GB + 256GB हा बेस व्हेरिएंट असून त्याची किंमत ₹54,999 आहे. तर 12GB + 256GB हा स्टँडर्ड व्हेरिएंट असून त्याची किंमत ₹59,999 असणार आहे. Moto ने या स्मार्टफोन साठी अक्वा ग्रे, आइस मेल्ट आणि डार्क शॅडो असे 3 रंगान मध्ये पर्याय दिले आहेत.
बँक ऑफर्स किंवा एक्सचेंज ऑफर चा लाभ घेतल्यास तुम्हाला आणखी ₹3,000 ते ₹4,000 पर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो. त्यामुळे Motorola Edge 70 Max चा बेस व्हेरिएंट तुम्हाला ₹50,000 च्या आत मिळू शकतो.
Motorola Edge 70 Max कोणासाठी योग्य ठरेल? खरेदी करण्यापूर्वी हा अंतिम निष्कर्ष नक्की वाचा.
ज्या युजर्स साठी बॅटरी आणि पॉवरफुल प्रोसेसर हे सर्वात महत्त्वाचे असतात त्यांच्यासाठी Motorola Edge 70 Max हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. कारण Motorola ने अशा युजर्स ना लक्षात घेऊन या स्मार्टफोन मध्ये 7100 mAh बॅटरी दिली आहे जी सामान्य वापरात सुमारे 2 दिवस आरामात टिकू शकते.
सोबत स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 सारखा शक्तिशाली प्रोसेसर देण्यात आला आहे जो गेमिंग, मल्टिटास्किंग आणि इतर हेवी टास्क्स देखील सहजपणे हाताळू शकतो.
प्रोफेशनल फोटोग्राफर्स किंवा ज्यांना फोटोग्राफी ची आवड आहे अशा युजर्स ना या स्मार्टफोन च्या कॅमेरा मध्ये एका गोष्टीची कमतरता जाणवू शकते. ती नेमकी काय आहे हे तुम्ही कॅमेरा सेकशन मध्ये आधीच वाचले असेल.
जर तुम्ही वारंवार फोटोस क्लिक करत नसाल आणि फक्त अधूनमधून फोटोग्राफी करत असाल तर Motorola Edge 70 Max हा स्मार्टफोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
बॅटरी :- 7100 mah
प्रोसेसर :- स्नॅपड्रॅगन 8 जेन 5
Motorola Edge 70 Max vs iQOO 15R vs OnePlus 15R: तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन सर्वात योग्य?
| motorola edge 70 max review features in marathi | Motorola Edge 70 Max | iQOO 15R | Oneplus 15R |
| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 16 3 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 5 वर्षे सुरक्षा अपडेट्स | अँड्रॉइड 16 4 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 6 वर्षे सुरक्षा अपडेट्स | अँड्रॉइड 16 4 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 6 वर्षे सुरक्षा अपडेट्स |
| प्रोसेसर | स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 | स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 | स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 |
| इंटरनल स्टोरेज | 256 GB | 256GB | 256GB |
| रॅम | 12GB | 12GB | 12GB |
| सुरक्षा | 1) ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट रीडर 2) फेस अनलॉक 3) थिंकशील्ड | 3D अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेन्सर | अंडर-डिस्प्ले अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेन्सर |
| बॅटरीची क्षमता | 7000 mAh | 7600 mAh | 7400 mAh |
| अॅडॉप्टर | वायर्ड चार्जिंग – 90W वायरलेस चार्जिंग – 25W रिव्हर्स चार्जिंग – 5W | वायर्ड चार्जिंग – 100W | वायर्ड चार्जिंग – 80W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट | टाइप -C पोर्ट | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.8″ (एमोलेड डिस्प्ले) | 6.59″ (एमोलेड डिस्प्ले) | 6.83″ |
| रिझोल्यूशन | 1440 × 3168 पिक्सेल | 2750 × 1260 पिक्सेल | 2800 × 1272 |
| पाणी संरक्षण | IP68, IP68 जल-प्रतिरोधक डिझाइन | IP68, IP68 जल-प्रतिरोधक डिझाइन | IP68, IP68 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1) पीक ब्राइटनेस:- 7000 निट्स 2) 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट 3) टच सॅम्पलिंग रेट :- 360Hz 4) HDR10+ | 1) पीक ब्राइटनेस:- 5000 निट्स 2) 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट 3) टच सॅम्पलिंग रेट :- 360Hz | 1) ब्राइटनेस:- 1800 निट्स 2) रिफ्रेश रेट:- 60/90/120/165Hz |
| सेंसर | 1) प्रॉक्सिमिटी सेन्सर 2) जायरोस्कोप 3) मॅग्नेटोमीटर 4) सार सेन्सर 5) सेन्सर हब 6) ॲक्सेलरोमीटर 7) अॅम्बियंट लाईट सेन्सर | 1) ॲक्सेलरोमीटर 2) प्रॉक्सिमिटी सेन्सर 3) अॅम्बियंट लाईट सेन्सर 4) जायरोस्कोप 5) E-कंपास | 1) जायरोस्कोप 2) अॅम्बियंट लाईट सेन्सर 3) ॲक्सेलरोमीटर 4) कलर टेंपरेचर सेन्सर 5) इन्फ्रारेड कंट्रोल 6) E-कंपास 7) प्रॉक्सिमिटी सेन्सर |
| कॅमेरा | 1) सेल्फी कॅमेरा:- 32 मेगापिक्सेल 2) पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल Sony LYTIA 710 मेन कॅमेरा + 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा 3) HDR10+ 4) व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K HDR10+ | 1) सेल्फी कॅमेरा:- 32 मेगापिक्सेल 2) पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल Sony LYTIA 700 OIS मेन कॅमेरा + 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा 3) व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K 60FPS | 1) सेल्फी कॅमेरा:- 32 मेगापिक्सेल 2) पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल Sony IMX 906 मेन कॅमेरा + 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा 3) व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K 120 FPS |
| ऑडिओ | 1) ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स 2) डॉल्बी अॅटमॉस® सह 3) हाय-रेझ ऑडिओ 4) हाय-रेझ ऑडिओ वायरलेस | 1) ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स | 1) Oरिअॅलिटी ऑडिओ |
| रंग | 1) पॅनटोन अक्वा ग्रे (हिरवा) 2) पॅनटोन डार्क शॅडो (काळा) 3) पॅनटोन आइस मेल्ट (फिकट निळा) | 1) ट्रायम्फ सिल्व्हर 2) डार्क नाईट | 1) मिंट ब्रीझ 2) चारकोल ब्लॅक 3) इलेक्ट्रिक व्हायोलेट |
| कनेक्टिविटी | 5G, 4G, 3G, 2G ब्लूटूथ v6.0, Wi-Fi 7 | 5G, 4G, 3G, 2G ब्लूटूथ v6.0, Wi-Fi 7 | 5G ब्लूटूथ v6.0, Wi-Fi 7, Wi-Fi 6, Wi-Fi 5 |
| किंमत | ₹54,999 | ₹51,999 | ₹59,999 |
