Motorola Edge 70 Pro+ Review Marathi
Motorola ने त्यांच्या Edge 70 Series मध्ये आणखी एक प्रीमियम स्मार्टफोन लॉन्च केला आहे तो म्हणजे Motorola Edge 70 Pro+. याआधी Motorola ने Motorola Edge 70, Motorola Edge 70 Fusion आणि Motorola Edge 70 Pro हे तीन स्मार्टफोनस लॉन्च केले होते. आता ब्रँड ने या लाइनअप मध्ये आणखी एका स्मार्टफोन ची भर घातली आहे जो Motorola Edge 70 Pro+ आहे.
आतापर्यंत Edge 70 सिरीज च्या लाइनअप मध्ये Motorola Edge 70 Pro+ हा स्मार्टफोन सर्वात वरचा म्हणजेच टॉप-व्हेरिएंट मॉडेल ठरणार आहे. Motorola ची Edge सिरीज ही प्रीमियम डिझाइन, ट्रिपल कॅमेरा सेटअप, दमदार बॅटरी आणि पॉवरफुल प्रोसेसरसाठी ओळखली जाते. यासोबतच हे स्मार्टफोनस युजर्स ला चांगले व्हॅल्यू फॉर मनी देखील देतात.
मार्केटमध्ये अनेक ब्रँड्स ने त्यांचे प्रीमियम स्मार्टफोनस लॉन्च केले आहेत. जसे की Nothing चा Nothing 4a Pro, Oppo चा Reno 15, Samsung चा Galaxy S24 FE किंवा iQOO Neo 10. आता या ब्रँड्स ला टक्कर देण्यासाठी Motorola ने देखील या सेगमेंट मध्ये उडी मारली आहे.
Motorola Edge 70 Pro+ डिझाइन आणि डिस्प्ले
डिझाइन कडे पाहिलं तर Motorola ने या स्मार्टफोन च्या डिझाइन मध्ये कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. हातात घेतल्यानंतर हा स्मार्टफोन खूपच प्रीमियम फील देतो, जणू काही हा 60,000 ते 70,000 रुपयांच्या श्रेणीतील स्मार्टफोन आहे. Motorola Edge 70 Pro+ चा बॅक पॅनेल हा लक्झरी क्राफ्ट फिनिश सह येतो ज्यामुळे त्याचा प्रीमियम लूक आणखी एक पातळीने वाढतो.
हा स्मार्टफोन केवळ प्रीमियम दिसत नाही तर वापरण्यासही खूप हलका आणि सोयीस्कर आहे. वजनाच्या बाबतीत हा फक्त 190 ग्रॅमचा असून त्याची जाडी 7.1 मिमी आहे.
डिस्प्ले मध्ये तुम्हाला 6.8 इंच 1.5K क्वाड कर्व्ह्ड LTPO एमोलेड डिस्प्ले सोबत 144Hz रिफ्रेश रेट मिळणार आहे. 144Hz रिफ्रेश रेट असल्यामुळे स्क्रोलिंग, गेमिंग किंवा अॅनिमेशन्स दरम्यान तुम्हाला अधिक स्मूथ अनुभव मिळणार. बाहेर वापरण्यासाठी Motorola ने यामध्ये 5200 निट्स चा पीक ब्राइटनेस मोड दिला आहे, ज्यामुळे उन्हात फोन वापरत असतानाही स्क्रीनवरील मजकूर आणि कॉन्टेंट स्पष्टपणे दिसेल.
डिस्प्ले प्रोटेक्शन साठी यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i देण्यात आला आहे, ज्यामुळे फोन चुकून हातातून खाली पडला तरी त्याचे नुकसान होण्याची शक्यता कमी होते. HDR10+ स्क्रीन असल्यामुळे YouTube, Netflix किंवा इतर व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स वरील कॉन्टेंट पाहताना कलर्स अधिक वायब्रंट आणि आकर्षक दिसतील.
Motorola Edge 70 Pro+ कॅमेरा
कॅमेरा बाबतीत जर आपण Motorola Edge 70 Pro सोबत तुलना केली तर सध्याच्या Motorola Edge 70 Pro+ मधील कॅमेरा सेटअप मध्ये अपग्रेड पाहायला मिळतो.
Motorola Edge 70 Pro+ मध्ये 50 मेगापिक्सेल Sony LYTIA 710 मेन कॅमेरा, 50 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेल (3.5x) पेरिस्कोप टेलिफोटो देण्यात आला आहे. म्हणजेच हा प्रीमियम व्हेरिएंट आता 50 मेगापिक्सेलच्या ट्रिपल कॅमेरा सेटअप सोबत येणार आहे.

एवढंच नाही तर Motorola ने सेल्फी कॅमेरा देखील 50 मेगापिक्सेलचा दिला आहे ज्यामुळे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग चा अनुभव अधिक चांगला मिळू शकतो.
आपण असही बोलू शकतो की (Motorola Edge 70 Pro+ review marathi)मध्ये जर सर्वात मोठा अपग्रेड केला असेल तर तो कॅमेरा विभागात करण्यात आला आहे. Motorola Edge 70 Pro सोबत तुलना केली तर त्यामध्ये टेलिफोटो लेन्स देण्यात आला नव्हता आणि मला देखील असं वाटायचं की कॅमेरा मॉड्यूल मध्ये जर कोणती कमतरता असेल तर ती टेलिफोटो लेन्स ची होती.
मात्र आता Motorola ने (Motorola Edge 70 Pro+ review marathi) मध्ये पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा देऊन ही उणीव भरून काढली आहे. फोटोस बद्दल बोलायचं झालं तर दिवसा मध्ये काढलेले फोटोस शार्प आणि डिटेल्ड येतात. यासोबतच कलर्स देखील एकदम नॅचरल दिसतात.
व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये Motorola ने कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. कारण या स्मार्टफोन मध्ये मेन कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा म्हणजेच सर्व 4 लेन्स मधून तुम्ही 4K 60FPS वर व्हिडिओ शूट करू शकता. यामध्ये होरायझन लॉक नावाचे फीचर देखील देण्यात आले आहे. या फीचर च्या मदतीने तुम्ही 360 अंशांपर्यंत रोटेट होत व्हिडिओ शूट करू शकता आणि स्टॅबिलायझेशन मुळे व्हिडिओ अधिक स्थिर आणि स्मूथ दिसतो.
Motorola Edge 70 Pro+ प्रोसेसर
परफॉर्मन्स साठी तुम्हाला यामध्ये मीडियाटेक डिमेन्सिटी 8500 एक्स्ट्रीम (4nm) हा प्रोसेसर देण्यात आला आहे जो याआधी Motorola Edge 70 Pro मध्ये देखील देण्यात आला होता. दैनंदिन वापरातील कामांसाठी मल्टिटास्किंग, सोशल मीडिया, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि इतर रोजच्या टास्क्स साठी हा प्रोसेसर तुम्हाला चांगला अनुभव देणार आहे.
हे ही वाचा :- Airtel ने लॉन्च केले आता 30 दिवसांचा मंथली प्रीपेड प्लॅन्स! जाणून घ्या किती डेटा आणि कोणते OTT सबस्क्रिप्शन यासोबत मिळणार आहेत.
मग ते गेमिंग असो, एडिटिंग असो, मल्टिटास्किंग असो किंवा एकाच वेळी अनेक अँप्स ओपन केले असतील, तरी तुम्हाला लॅग न होता स्मूथ अनुभव मिळणार आहे. गेमिंग करताना हा फोन थोडासा हीट होऊ शकतो पण यासाठी Motorola ने आवश्यक ती काळजी घेतली आहे.
हो, हीटिंग नियंत्रणात ठेवण्यासाठी ब्रँड् ने यामध्ये 4600mm व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम दिली आहे ज्यामुळे गेमिंग करताना निर्माण होणारी उष्णता कमी करण्यास मदत होते.
Motorola Edge 70 Pro+ बॅटरी
बॅटरी मध्ये तुम्हाला 6500mAh ची बॅटरी आणि 90W टर्बोपॉवर चार्जिंग मिळणार आहे. Motorola Edge 70 Pro मध्ये जी बॅटरी देण्यात आली होती तीच बॅटरी या मॉडेल मध्ये देखील कायम ठेवण्यात आली आहे. 90W टर्बोपॉवर चार्जर असल्यामुळे फोनची बॅटरी 0% ते 100% पर्यंत साधारणपणे 30 ते 45 मिनिटांमध्ये चार्जे होऊ शकते.
यामध्ये आपल्याला एक छोटासा अपडेट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे आता या प्रीमियम मॉडेल मध्ये 15W वायरलेस चार्जिंग चा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या किमतीमध्ये वायरलेस चार्जिंग मिळणं हे Motorola युजर्स साठी एक अतिरिक्त बोनसच म्हणावं लागेल.
Motorola Edge 70 Pro+ AI फीचर
AI फीचर मध्ये तुम्हाला एआय सिग्नेचर स्टाइल, एआय अॅडॅप्टिव्ह स्टॅबिलायझेशन, एआय कॅप्चर, एआय फोटो एन्हान्समेंट, एआय फोटो ब्लर, एआय मॅजिक इरेजर, एआय मॅजिक एडिटर आणि मोटो एआय 2.0 सारखे अनेक AI फीचर Motorola Edge 70 Pro+ मध्ये पाहायला मिळणार आहेत.
Motorola Edge 70 Pro+ Specifications (वैशिष्ट्ये)



| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 16 3 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 5 वर्षे सुरक्षा अपडेट्स |
| प्रोसेसर | मीडियाटेक डिमेन्सिटी 8500 एक्स्ट्रीम |
| इंटरनल स्टोरेज | 256 GB |
| रॅम | 12GB |
| सुरक्षा | 1) ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट रीडर 2) फेस अनलॉक 3) थिंकशील्ड |
| बॅटरीची क्षमता | 6500 mAh |
| अॅडॉप्टर | वायर्ड चार्जिंग – 90W वायरलेस चार्जिंग – 15W रिव्हर्स चार्जिंग – 10W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.8 इंच (एमोलेड डिस्प्ले) |
| रिझोल्यूशन | 2772 × 1272 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IP68, IP68 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)पीक ब्राइटनेस:- 5200 निट्स 2)144Hz पर्यंत रिफ्रेश रेट 3)हाय ब्राइटनेस मोड:- 1800 निट्स 4)HDR10+ |
| सेंसर | 1)प्रॉक्सिमिटी सेन्सर 2)जायरोस्कोप 3)मॅग्नेटोमीटर 4)सार सेन्सर 5)सेन्सर हब 6)ॲक्सेलरोमीटर 7)अॅम्बियंट लाईट सेन्सर |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल Sony LYTIA 710 मेन कॅमेरा + 50 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा + (3.5x) पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा 3)HDR10+ 4)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K |
| ऑडिओ | 1)ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स 2)डॉल्बी अॅटमॉस® सह 3)हाय-रेझ ऑडिओ 4)हाय-रेझ ऑडिओ वायरलेस |
| रंग | 1)पॅनटोन चिकरी कॉफी 2)पॅनटोन झिनफँडेल 3)पॅनटोन स्टॉर्मी सी |
| कनेक्टिविटी | 5G, 4G, 3G, 2G ब्लूटूथ v5.4, Wi-Fi 6/6E, Wi-Fi 7 |
| किंमत | ₹47,999 |
Motorola Edge 70 Pro+ Price
Motorola ने हा मॉडेल एकाच व्हेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे जो 12GB + 256GB स्टोरेजसह येतो. या व्हेरिएंट ची किंमत 47,999 रुपये ठेवण्यात आली आहे. बँकिंग ऑफर्स चा वापर केल्यास 3,000 रुपयांपर्यंत कॅश-बॅक मिळू शकतो. तसेच ग्राहक एक्सचेंज ऑफर किंवा नो-कॉस्ट EMI चा देखील लाभ घेऊ शकतात.
