Xiaomi 17t Review Marathi
Xiaomi ने जागतिक बाजारात त्यांच्या T सिरीज मध्ये आणखी दोन नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत, जे Xiaomi 17T आणि Xiaomi 17T प्रो आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स Xiaomi 15T लाइनअप (Lineup) चे सक्सेसर आहेत.
शाओमी ने यावेळी या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये कॅमेरा, डिस्प्ले, परफॉर्मन्स आणि बॅटरी या विभागांमध्ये मोठे सुधारणा आणि बदल केले आहेत. Xiaomi च्या होम मार्केट चीन मध्ये हे दोन्ही स्मार्टफोन्स आधीच लॉन्च झाले आहेत आणि आता Xiaomi ने भारतात 4 जून 2026 Xiaomi 17T हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
चला पाहूया Xiaomi ने त्यांच्या नवीन 17T सिरीज मध्ये कोणते नवीन फीचर्स दिले आहेत जे युजर्स ना आवडू शकतात.
Xiaomi 17T & Xiaomi 17T Pro डिस्प्ले
Xiaomi 17T च्या डिस्प्ले कडे पाहिलं तर हा 6.59 इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले असणार आहे ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 3500 निट्स ची मॅक्सिमम ब्राइटनेस मिळणार आहे.
प्रो मॉडेल Xiaomi 17T Pro मध्ये तुम्हाला थोडा मोठा डिस्प्ले मिळतो, जो 6.83 इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले चा असणार आहे. यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल्स मध्ये मॅक्सिमम ब्राइटनेस 3500 निट्स इतकीच असणार आहे.
प्रो मॉडेल Xiaomi 17T Pro मध्ये कमी ब्राइटनेस मध्ये स्क्रीन अधिक आरामदायकपणे पाहता यावी यासाठी Xiaomi ने हार्डवेअर-लेव्हल 1-निट ब्राइटनेस फीचर दिले आहे. डिस्प्लेची तुलना केली तर Xiaomi 17T प्रो मध्ये तुम्हाला मोठा डिस्प्ले मिळतो तर Xiaomi 17T मध्ये कॉम्पॅक्ट डिस्प्ले देण्यात आला आहे.
डिस्प्ले प्रोटेक्शन साठी दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i देण्यात आले आहे. यासोबतच अॅल्युमिनियम फ्रेम चा वापर करण्यात आला असून मागील बाजूस फायबरग्लास फिनिश मिळणार आहे. Xiaomi ने डिस्प्ले मध्ये फ्लिकर-फ्री टेक्नॉलॉजी, TÜV र्हाईनलँड लो ब्लू लाईट सर्टिफिकेशन, सर्केडियन फ्रेंडली आणि इंटेलिजंट आय केअर सारखे फीचर्स देखील दिले आहेत.
Xiaomi 17T परफॉर्मन्स
परफॉर्मन्स कडे पाहिलं तर Xiaomi ने दोन्ही मॉडेल्स मध्ये वेगवेगळे चिपसेट्स दिले आहेत. Xiaomi 17T मध्ये तुम्हाला 4nm मीडियाटेक डिमेन्सिटी 8500 प्रोसेसर मिळणार आहे तर Xiaomi 17T प्रो मध्ये 3nm मीडियाटेक डिमेन्सिटी 9500 प्रोसेसर देण्यात आला आहे.
हे पण वाचा :- Airtel ने लॉन्च केले आता 30 दिवसांचा मंथली प्रीपेड प्लॅन्स! जाणून घ्या किती डेटा आणि कोणते OTT सबस्क्रिप्शन यासोबत मिळणार आहेत.
दोन्ही मॉडेल्स मध्ये LPDDR5X RAM आणि UFS 4.1 स्टोरेज देण्यात आले आहे. Xiaomi चा दावा आहे की नवीन प्रोसेसर सोबत अपग्रेडेड CPU आणि GPU मुळे युजर्स ला अधिक चांगला परफॉर्मन्स अनुभवायला मिळेल. शक्तिशाली प्रोसेसर असल्यामुळे फोन गरम होण्याची शक्यता वाढते. याच हीटिंग ला नियंत्रणात ठेवण्यासाठी Xiaomi ने या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये 3D आइसलूप कूलिंग सिस्टम दिली आहे.
या कूलिंग सिस्टम मुळे फोनचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते ज्यामुळे स्मार्टफोन अधिक स्मूथ आणि स्टेबल परफॉर्मन्स देऊ शकतो.
Xiaomi 17T कॅमेरा
कॅमेरा साठी Xiaomi ने या मॉडेल्स साठी (लायका)Leica सोबत पार्टनरशिप केली आहे. Xiaomi 17T आणि Xiaomi 17T Pro या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये 50 मेगापिक्सेलचा 5x पेरिस्कोप कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल्स मध्ये मेन कॅमेरा हा 50 मेगापिक्सेलचाच असला तरी त्यामध्ये वापरण्यात आलेले सेन्सर वेगवेगळे असणार आहेत.
जसं की Xiaomi 17T मध्ये 1/1.31 इंचाचा लाइट फ्यूजन 950 सेन्सर देण्यात आला आहे तर Pro मॉडेल Xiaomi 17T Pro मध्ये 1/1.5 इंचाचा लाइट फ्यूजन 800 सेन्सर वापरण्यात आला आहे. याशिवाय दोन्ही मॉडेल्स मध्ये 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी साठी दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे.
व्हिडिओ रेकॉर्डिंग बद्दल बोलायचं झालं तर Xiaomi 17T Pro मध्ये तुम्ही 8K 30FPS मध्ये व्हिडिओ शूट करू शकता. याशिवाय 4K 120FPS, 4K HDR10 मध्ये 30FPS आणि 60FPS, 1080p HDR10+ मध्ये 30FPS आणि 60FPS तसेच 720p मध्ये 30FPS वर व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येणार आहे.

फ्रंट कॅमेरा म्हणजेच सेल्फी कॅमेरा मधून तुम्ही 4K HDR10+ मध्ये 30FPS, 1080p HDR10+ मध्ये 30FPS आणि 60FPS तसेच 720p मध्ये 30FPS वर व्हिडिओ शूटिंग करू शकता.
Xiaomi 17T मध्ये तुम्ही 4K HDR10+ मध्ये 30FPS आणि 60FPS, 1080p मध्ये 30FPS आणि 60FPS तसेच 720p मध्ये 30FPS वर व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. सेल्फी कॅमेरा मधून व्हिडिओ रेकॉर्डिंग चे रेशो(Ratio) आणि फ्रेम हे दोन्ही मॉडेल्स मध्ये सारखेच देण्यात आले आहेत.
Xiaomi 17T आणि Xiaomi 17T Pro या दोन्ही मॉडेल्स मध्ये कॅमेरा सोबत AI फीचर्स चा देखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये लाइव्ह मूव्हमेंट, ऑटो सीन डिटेक्शन, लाइव्ह सिनेमॅटोग्राफी, फास्टशॉट, व्हिडिओ टेलिप्रॉम्प्टर आणि लायका फिल्टर्स सारखे एआय-पॉवर्ड फीचर्स देण्यात आले आहेत.
हे सर्व नवीन कॅमेरा फीचर्स असल्यामुळे फोटोग्राफर्स, ट्रॅव्हलर्स आणि कॉन्टेंट क्रिएटर्स यांना फोटो काढण्यापासून ते उच्च दर्जाची क्वालिटी मिळवण्यापर्यंत Xiaomi 17T Pro खूप उपयोगी ठरणार आहे.
Xiaomi 17T बॅटरी
Xiaomi 17T मध्ये तुम्हाला 6500mAh ची बॅटरी आणि 67W वायर्ड चार्जिंग चा सपोर्ट मिळतो. तर Xiaomi 17T Pro मध्ये 7000mAh सारखी मोठी बॅटरी, 100W हायपरचार्ज आणि 50W वायरलेस चार्जिंग चा सपोर्ट देण्यात आला आहे. एवढंच नाही तर दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये रिव्हर्स चार्जिंग चा देखील सपोर्ट मिळणार आहे.
तसेच या मॉडेल्स सोबत जास्त वॅट चे अॅडॅप्टर दिल्यामुळे बॅटरी कमी वेळेत चार्ज होते आणि साधारणपणे 1 तासाच्या आत 100% पर्यंत चार्ज होऊ शकते. दोन्ही मॉडेल्स मध्ये Xiaomi ने मोठी ब्लॅक दिल्यामुळे युजर्स ने एकदा फोन चार्ज केला तर हा फोन दिवसभर सहज चालू शकतो यात शंका नाही.
Xiaomi 17T AI Features
सध्या AI च्या दुनियेत AI features खूप महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे Xiaomi ने या models मध्ये एआय इंटरप्रिटर, एआय डायनॅमिक वॉलपेपर, एआय सर्च, एआय रायटिंग, गुगलसह सर्कल टू सर्च, गूगल जेमिनी आणि एआय स्पीच रिकग्निशन सारखे अनेक AI features दिले आहेत.
Xiaomi 17T Specs



| Xiaomi 17t review marathi | Xiaomi 17T | Xiaomi 17T Pro |
| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 16(Xiaomi HyperOS 3) 5 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 6 वर्षे सुरक्षा अपडेट्स | अँड्रॉइड 16(Xiaomi HyperOS 3) 5 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 6 वर्षे सुरक्षा अपडेट्स |
| प्रोसेसर | मीडियाटेक डिमेन्सिटी 8500 Ultra | मीडियाटेक डायमेन्सिटी 9500 |
| इंटरनल स्टोरेज | 256 GB, 512 GB | 256 GB, 512 GB, 1TB |
| रॅम | 12GB | 12GB |
| सुरक्षा | 1) इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर 2) एआय फेस अनलॉक | 1) इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर 2) एआय फेस अनलॉक |
| बॅटरीची क्षमता | 6500 mAh | 7000 mAh |
| अॅडॉप्टर | 67W | 100W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.59 इंच (कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i) | 6.83 इंच (कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i) |
| रिझोल्यूशन | 2756 × 1268 पिक्सेल | 2772 × 1280 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IP68 जल-प्रतिरोधक डिझाइन | IP68 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)पीक ब्राइटनेस:- 3500 निट्स 2)120 हर्ट्झ रिफ्रेश रेट 3)कलर डेप्थ:- 68 अब्ज रंग 4)टच सॅम्पलिंग रेट:- 480Hz, 3200Hz(Activated in Game Turbo mode) 5)HDR10+ | 1)पीक ब्राइटनेस:- 3500 निट्स 2)144 हर्ट्झ रिफ्रेश रेट 3)कलर डेप्थ:- 68 अब्ज रंग 4)टच सॅम्पलिंग रेट:- 480Hz, 3500Hz(Activated in Game Turbo mode) 5)HDR10+ |
| सेंसर | 1)ॲक्सेलरोमीटर 2)प्रॉक्सिमिटी सेन्सर 3)अॅम्बियंट लाइट सेन्सर 4)जायरोस्कोप 5)ई-कंपास 6)इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल 7)एक्स-अॅक्सिस लीनिअर व्हायब्रेशन मोटर 8)फ्लिकर सेन्सर 9)कलर टेम्परेचर सेन्सर | 1)ॲक्सेलरोमीटर 2)प्रॉक्सिमिटी सेन्सर 3)अॅम्बियंट लाइट सेन्सर 4)जायरोस्कोप 5)ई-कंपास 6)इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल 7)फ्लिकर सेन्सर 8)कलर टेम्परेचर सेन्सर 9)एक्स-अॅक्सिस लीनिअर व्हायब्रेशन मोटर |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 32 मेगापिक्सेल कॅमेरा 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल लायका मेन कॅमेरा + 12 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड कॅमेरा + 50 मेगापिक्सेल लायका 115mm पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K,1080P, 720P | 1)सेल्फी कॅमेरा:- 32 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल मेन कॅमेरा + 12 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड कॅमेरा + 50 मेगापिक्सेल लायका 115mm पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 8K, 4K,1080P, 720P |
| ऑडिओ | ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स | ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स |
| रंग | 1)ब्लू 2)ब्लॅक 3)व्हायोलेट | 1)डीप व्हायोलेट 2)ब्लॅक 3)डीप ब्लू |
| कनेक्टिविटी | 5G, 4G LTE, 3G, 2G ब्लूटूथ v6.0 Wi-Fi 6E | 5G, 4G LTE, 3G, 2G ब्लूटूथ v 6.0 Wi-Fi 7 |
| किंमत | ₹59,000 | ₹92,000 |
Xiaomi 17T किंमत
भारतात (Xiaomi 17T review marathi) हा स्मार्टफोन 2 व्हेरिएंट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये 12GB + 256GB या व्हेरिएंट ची किंमत 59,000 रुपये आहे तर 12GB + 512GB या व्हेरिएंट ची किंमत 64,999 रुपये ठेवण्यात आली आहे. सोबतच Xiaomi ने हा मॉडेल ब्लू, व्हायोलेट, आणि ब्लॅक या तीन आकर्षक रंगां मध्ये लॉन्च केला आहे.
