WhatsApp वर आता मोबाइल नंबर ऐवजी दिसणार Username! आताच तुमचे युजरनेम बुक करा.

WhatsApp Username Marathi

WhatsApp चा सर्वात महत्त्वाचा अपडेट आपल्याला आधीच्या अपडेट मध्ये प्रायव्हसी बाबतीत पाहायला मिळाला होता. मागील अपडेट मध्ये व्हॉट्सअँप ने युजर्स ना अॅडव्हान्स्ड कंट्रोल्स दिले आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही कोण तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो यावर अधिक नियंत्रण ठेवू शकता.

व्हॉट्सअँप आता असे फीचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, ज्याची तब्बल 3 अब्ज युजर्स आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रायव्हसी अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने व्हॉट्सअॅप युजरनेम फीचर घेऊन येत आहे.

WhatsApp चे हे फीचर लॉन्च करण्यामागचे काय कारण आहे?

कंपनी चे असे म्हणणे आहे की अनेक युजर्स ना नवीन लोकांच्या संपर्कात राहायचे असते परंतु त्यांच्यासोबत फोन नंबर शेअर करणे सुरक्षित वाटत नाही.

आपण मित्रांसोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत आपला मोबाइल नंबर सहज शेअर करू शकतो. पण एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत किंवा कोणत्याही कम्युनिटी किंवा ग्रुप मध्ये सहभागी होताना फोन नंबर शेअर करणे अनेकांना सुरक्षित वाटत नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजच्या डिजिटल युगात मोबाइल नंबर हा फक्त साधा 10 अंकी क्रमांक राहिलेला नाही. आपल्या सर्वांचे मोबाइल नंबर हे बँकेशी लिंक केलेले आहेत. फक्त बँकच नाही तर डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म्स जसे Paytm, Google Pay आणि इतर अनेक अँपस सोबतही आपला मोबाइल नंबर जोडलेला असतो.

एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत आपण आपला मोबाइल नंबर शेअर करत असतो तेव्हा आपण फक्त एक 10 अंकी क्रमांकच शेअर करत नाही तर त्यासोबत आपली काही वैयक्तिक माहिती देखील अप्रत्यक्षपणे शेअर होत असते.

तर ह्या साठी WhatsApp ने युजरनेम फीचर आणले आहे. या फीचर मुळे आता तुम्ही तुमचा मोबाइल नंबर शेअर न करता देखील अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधू शकता. या फीचर मुळे युजर्स ची प्रायव्हसी अधिक सुरक्षित राहण्यास मदत होणार.

WhatsApp Username म्हणजे काय?

युजरनेम फीचर हे युजर्स ची प्रायव्हसी लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. आतापर्यंत WhatsApp च्या अपडेतस मध्ये आपल्याला कोण आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो यावर नियंत्रण ठेवण्याची सुविधा मिळाली होती. आता युजरनेम फीचर मुळे तुमचा मोबाइल नंबर इतरांना दिसणार नाही.

आता कॉन्टॅक्ट करण्यासाठी मोबाइल नंबर ऐवजी तुमचे युजरनेम दिसेल. आता यापुढे जर तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीशी संपर्क ठेवायचा असेल तर त्यांच्यासोबत मोबाइल नंबर शेअर करण्याची गरज भासणार नाही. कॉन्टॅक्ट नंबर ऐवजी तुम्ही युजरनेम चा वापर करूनही संपर्क साधू शकता.

मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. जर तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीशी संपर्क साधायचा असेल तर त्या व्यक्तीला तुमचे योग्य युजरनेम द्यावे लागेल.

कारण WhatsApp वर युजरनेम साठी ऑटो-सजेशन्स मिळणार नाहीत. म्हणजेच तुम्ही युजरनेम टाइप केल्यानंतर इतर अँपस प्रमाणे नावांची यादी दिसणार नाही. म्हणून एखाद्या व्यक्तीसोबत तुमचे युजरनेम शेअर करायचे असेल तर ते अगदी अचूक असणे आवश्यक आहे.

WhatsApp Username फीचर कसे काम करते?

जर कोणी तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर मागितला किंवा तुम्हाला एखाद्याचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर आता नंबर देण्याची गरज पडणार नाही. नंबर ऐवजी तुम्ही आता युजरनेम शेअर करू शकता.

हे फीचर सुरू केल्यानंतर तुमच्या नवीन कॉन्टॅक्ट्स ना फक्त तुमचे युजरनेम दिसेल. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला तुमचा मोबाइल नंबर देखील दिसावा असे वाटत असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट सेटिंग मध्ये जाऊन त्या विशिष्ट युजर साठी तुमचा नंबर दिसेल अशी सेटिंग करू शकता.

म्हणजे आता कोणत्या युजर ला तुमचे युजरनेम दिसावे आणि कोणत्या युजर ला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिसावा याचे पूर्ण नियंत्रण तुमच्या हातात असणार आहे.

Username आल्यानंतर तुमचा WhatsApp वरील नंबर डिलीट होणार का?

युजरनेम फीचर आल्यानंतर तुमचा मोबाइल नंबर WhatsApp मधून डिलीट होणार नाही. व्हॉट्सअॅप अकाउंट वापरण्यासाठी मोबाइल नंबर हा पूर्वीप्रमाणेच आवश्यक असणार आहे. ज्यांच्याकडे तुमचा मोबाइल नंबर आधीपासून सेव्ह आहे आणि ज्या ग्रुप्स मध्ये तुम्ही आधीपासून सहभागी आहात त्या सर्व युजर्स ना तुमचा मोबाइल नंबर दिसत राहील.

नवीन कॉन्टॅक्ट्स साठी कॉन्टॅक्ट नंबर ऐवजी फक्त तुमचे युजरनेम दिसणार आहे.

Business आणि Content Creators ला मिळणारा फायदा

WhatsApp ने असे सांगितले आहे की बिझनेसेस, कॉन्टेंट क्रिएटर्स आणि ऑर्गनायझेशन्स यांना त्यांच्या Instagram, X किंवा Facebook वरील युजरनेम चाच वापर WhatsApp वरही करता येणार आहे. त्यामुळे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर त्यांचा बिझनेसेस एकाच युजरनेम ने ओळखला जाऊ शकणार आहे.

Telegram आणि Signal ची आता WhatsApp सोबत तुलना केली जाणार

तुम्हाला टेलिग्राम आणि सिग्नल अँप बद्दल माहिती नसेल तर टेलिग्राम हे देखील एक चॅटिंग अँप आहे जिथे मोबाइल नंबर ऐवजी युजरनेम चा वापर केला जातो. तिथे युजर्स ना कॉन्टॅक्ट नंबर दिसत नाही तर फक्त युजरनेम च्या माध्यमातूनच संपर्क साधला जातो. आता WhatsApp ने देखील हे फीचर त्यांच्या अँप मध्ये समाविष्ट केले आहे.

whatsapp username marathi

Telegram मध्ये जशी पब्लिक युजरनेम डायरेक्टरी उपलब्ध आहे जिथे एखाद्याचे नाव टाइप केल्यानंतर संबंधित युजरनेम दिसू लागतो तशी सुविधा तुम्हाला WhatsApp मध्ये पाहायला मिळणार नाही.

WhatsApp Username बुक कसे करायचे?

युजर्स ना हे फीचर वापरायचे असेल तर सर्वप्रथम प्ले स्टोअर (Playstore) मध्ये जाऊन WhatsApp अपडेत करा. अपडेत पूर्ण झाल्यानंतर WhatsApp उघडा आणि सेटिंग या पर्यायामध्ये जा.

सेटिंग्स मध्ये अकाउंट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला युजरनेम हे फीचर दिसेल. तिथे तुम्ही तुमच्या आवडीचे युजरनेम टाइप करू शकता. तसेच WhatsApp ने बिल्ट-इन युजरनेम जनरेटर चा पर्यायही दिला आहे. त्याच्या मदतीने तुम्ही नवीन युजरनेम जनरेट देखील करू शकता.

Leave a Comment