Vivo TWS 5 Pro मराठी
Vivo TWS 5 Pro बाजारात दमदार एंट्री करत आहे! 60dB ANC, Hi-Fi DAC आणि 50 तासांच्या टोटल प्लेबॅकसह येणाऱ्या या प्रीमियम ईअरबड्सची संपूर्ण माहिती Vivo TWS Pro 5 Marathi मध्ये जाणून घ्या, किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आत्ताच वाचा.
Vivo च्या लॉन्च इव्हेंट मध्ये नवीन फोल्डेबल डिव्हाइस सोबत अखेर Vivo TWS 5 Pro हे ट्रू वायरलेस इयरबड्स देखील लॉन्च करण्यात आले आहेत. यापूर्वी Vivo ने 2022 मध्ये Vivo TWS 3 Pro लॉन्च केले होते. आता तब्बल 3 वर्षांनंतर कंपनीने पुन्हा Pro सिरीज मध्ये Vivo TWS 5 Pro सादर केले आहे.
TWS 5 Pro हे एक प्रीमियम ट्रू वायरलेस इयरबड्स आहेत. यामध्ये Hi-Fi चिप, कस्टम ड्युअल ड्रायव्हर्स आणि इतर अनेक प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत जे boAt, realme, oneplus आणि इतर ब्रँड च्या प्रीमियम इयरबड्स ना थेट टक्कर देऊ शकतात.
Vivo TWS 5 Pro मधील सर्वात महत्त्वाचे फीचर म्हणजे Hi-Fi DAC चिप. अनेक वायरलेस इयरबड्स मध्ये डेडिकेटेड Hi-Fi DAC चिप दिली जात नाही. त्याऐवजी फक्त ब्लूटूथ चिप चा वापर केला जातो. मात्र Vivo ने सिरस लॉजिक सोबत पार्टनरशिप करून या इयरबड्स मध्ये Hi-Fi DAC चिप दिली आहे जी विशेषतःसाउंड कन्व्हर्जन साठी काम करते.
याशिवाय हे इयरबड्स 113dB डायनॅमिक रेंज ला सपोर्ट करतात. त्यामुळे ऑडिओ अधिक क्लिअ आणि डिजिटल नॉइज कमी असलेला ऐकण्याचा अनुभव मिळतो. इयरबड्स मध्ये ड्युअल-ड्रायव्हर अकॉस्टिक सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये कस्टम अल्ट्रा-मिनिएचर बॅलन्स्ड आर्मेचर ड्रायव्हर चा समावेश असून तो Vivo ने Knowles या ब्रँड सोबत मिळून विकसित केला आहे. हे इयरबड्स 16Hz ते 60kHz फ्रिक्वेन्सी रेंज ला सपोर्ट करतात.
Vivo TWS 5 Pro ऑडिओ
ऑडिओ फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर Vivo ने TWS 5 Pro मध्ये अनेक प्रगत फीचर्स दिले आहेत जे या इयरबड्स ला इतर इयरबड्स पेक्षा वेगळे बनवतात.
या इयरबड्स मध्ये कस्टमायझेबल 10-बँड इक्वलायझर, पर्सनलाइझ्ड इअर कस्टमाइज्ड साउंड प्रोफाइल्स, अॅडॅप्टिव्ह ऑडिओ जे रिअल-टाइम मध्ये साउंड आपोआप अॅडजस्ट करते, तसेच क्लिअर व्होकल्स साउंड मोड देण्यात आला आहे. हा मोड शांघाय कॉन्सर्व्हेटरी ऑफ म्युझिक यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे.
याशिवाय Vivo TWS 5 Pro मध्ये नेटईज क्लाउड म्युझिक प्रोफेशनल इक्विपमेंट सर्टिफिकेशन, हाय-रेस ऑडिओ वायरलेस सर्टिफिकेशन, Vivo गोल्डन इअर्स अकॉस्टिक्स लॅबोरेटरी सर्टिफिकेशन, 4.6Mbps पर्यंत Wi-Fi लॉसलेस ऑडिओ ट्रान्समिशन आणि QQ म्युझिक प्रीमियम साउंड क्वालिटी सर्टिफिकेशन यांसारख्या अनेक प्रीमियम ऑडिओ फीचर्स आणि सर्टिफिकेशन्स चा समावेश करण्यात आला आहे.
इयरबड्स मध्ये तुम्हाला फोर-माइक डीप सी स्मार्ट नॉइज कॅन्सलेशन 2.0 चा सपोर्ट, 60dB नॉइज कॅन्सलेशन डेप्थ, 5500Hz पर्यंतची नॉइज कॅन्सलेशन रेंज, अॅडॅप्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन आणि 99% पर्यंत लाइफस्टाइल नॉइज सप्रेशन मिळणार आहे.
Vivo TWS 5 Pro वैशिष्ट्य
Vivo TWS 5 Pro चे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे हे इयरबड्स आता एकाच वेळी 3 डिव्हाइसेस सोबत कनेक्ट करता येतात ते ही वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टिम्स वर चालणाऱ्या डिव्हाइसेस सोबतही सहजपणे कनेक्ट होतात.
नॉइज कंट्रोल फीचर्स मध्ये तुम्हाला अनेक मोडस मिळणार आहेत. यामध्ये स्लीप एड मोड, इमर्शन मोड आणि ANC प्रोफाइल्स यांचा समावेश आहे.
व्हॉइस कॉल्स साठी या इयरबड्स मध्ये फोर-मायक्रोफोन अॅरे आणि VPU बोन कंडक्शन मायक्रोफोन देण्यात आला आहे, जो 100dB पर्यंत एन्व्हायर्नमेंटल कॉल नॉइज रिडक्शन ला सपोर्ट करतो. याशिवाय हा सेटअप 99% पर्यंत वाऱ्याचा आवाज कमी करण्यास मदत करतो.
Vivo ने या TWS 5 Pro मध्ये काही स्मार्ट फीचर्स देखील दिले आहेत जे users ना त्यांच्या रोजच्या वापरात खूप उपयुक्त ठरणार आहेत. चला तर मग या इयरबड्स मध्ये कोणते स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत ते पाहूया.
- फाइंड माय इयरबड्स
- वेअर डिटेक्शन
- रिमोट कॅमेरा कंट्रोल
- एआय स्मार्ट ब्रॉडकास्ट नोटिफिकेशन्स
- स्मार्ट ट्रान्सलेशन
- डायलॉग ट्रान्सलेशन
- वायरलेस कराओके ऑडिओ रिटर्न
- व्हॉइस कमांड्स
- दीर्घकाळ वापराची आठवण करून देणारे रिमाइंडर्स
Vivo TWS 5 Pro Battery Marathi
बॅटरीच्या बाबतीत Vivo ने इतर brands ला तगडी स्पर्धा देईल अशी बॅटरी दिली आहे. एक इयरबड फक्त एकदाच पूर्ण चार्जे केल्यानंतर 11 तासांपर्यंत चालू शकतो. तर चार्जिंग केस सोबत मिळून हे इयरबड्स 50 तासांपर्यंतचा टोटल प्लेबॅक देऊ शकतात.
Vivo ने असे सांगितले आहे की फक्त 5 मिनिटे चार्जे केल्यानंतरही तुम्ही हे इयरबड्स 2 तासांपर्यंत वापरू शकता. याशिवाय, Wi-Fi ऑडिओ मोड मध्ये हे इयरबड्स 5 तासांपर्यंतचा प्लेबॅक देतात तर सामान्य वापरात एकदा पूर्ण चार्जे केल्यानंतर 11 तासांपर्यंतचा प्लेबॅक मिळतो. Vivo TWS 5 Pro मध्ये वायरलेस चार्जिंग आणि फास्ट चार्जिंग या दोन्हींचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
गेमिंग एक्स्पिरियन्स साठी या इयरबड्स मध्ये LE ऑडिओ टेकनॉलॉजि चा वापर करण्यात आला आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षण मिळावे म्हणून यामध्ये IP54 रेटिंग देखील देण्यात आली आहे.
टच कंट्रोल्स मध्ये तुम्हाला कॉल हँडलिंग, स्लाइड-बेस्ड व्हॉल्यूम अॅडजस्टमेंट, कस्टमायझेबल जेस्चर्स आणि नॉइज कॅन्सलेशन मोड स्विचिंग यांसारखे फीचर्स मिळणार आहेत.
