Samsung Galaxy A27 5G दमदार Snapdragon 6 Gen 3 प्रोसेसर, 120Hz एमोलेड डिस्प्ले आणि AI फीचर्स सह लॉन्च.

Samsung Galaxy A27 5G लॉन्च झाला! Snapdragon 6 Gen 3 प्रोसेसर, 120Hz AMOLED डिस्प्ले आणि दमदार AI फीचर्स सह येणाऱ्या या स्मार्टफोनची संपूर्ण माहिती Samsung Galaxy A27 5g Marathi मध्ये जाणून घ्या, किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स आत्ताच वाचा.

Samsung Galaxy A27 5g Marathi

Samsung ने त्यांच्या सर्वात लोकप्रिय मिड-रेंज A सिरीज मध्ये आणखी एक नवीन स्मार्टफोन Galaxy A27 लॉन्च केला. नावावरूनच तुमच्या लक्षात आले असेल की हा स्मार्टफोन Galaxy A26 चा सक्सेसर म्हणून लॉन्च करण्यात आला आहे.

या नवीन मॉडेल मध्ये Samsung ने डिझाइन, परफॉर्मन्स, बॅटरी आणि AI फीचर्स मध्ये भरपूर अपग्रेड्स केले आहेत, जे आपल्याला Galaxy A26 मध्ये पाहायला मिळाले नव्हते.

Samsung Galaxy A27 5G डिस्प्ले

Galaxy A27 मध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले, Full HD+ रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि डिस्प्ले प्रोटेक्शन साठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ मिळणार आहे. Galaxy A लाइनअप मधील हा पहिलाच स्मार्टफोन आहे ज्यामध्ये फ्रंट-फेसिंग इन्फिनिटी-O डिस्प्ले देण्यात आला आहे. यापूर्वीच्या Galaxy A26 मध्ये इन्फिनिटी-U (U-shaped) डिस्प्ले देण्यात आला होता.

Samsung ने आता वॉटर-ड्रॉप स्टाइल नॉच च्या जागी इन्फिनिटी-O पंच-होल कॅमेरा दिला आहे. त्यामुळे व्हिज्युअल डिस्ट्रॅक्शन्स कमी होतात आणि स्मार्टफोन चे डिझाइन अधिक मॉडर्न दिसते. ब्रँड च्या म्हणण्यानुसार Galaxy A27 मध्ये मागील मॉडेल्स च्या तुलनेत बारीक बेझल्स देण्यात आले आहेत.

Samsung Galaxy A27 5G प्रोसेसर

प्रोसेसर बद्दल बोलायचं झालं तर Samsung ने Galaxy A27 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 एलिट जेन 3 हा 4nm प्रोसेस वर आधारित प्रोसेसर दिला आहे.

यावेळी Samsung ने प्रोसेसर मध्ये बदल केल्याचे दिसून येत आहे. Galaxy A26 मध्ये Samsung एक्सिनॉस 1380 प्रोसेसर देण्यात आला होता,तर आता Galaxy A27 मध्ये तो बदलून क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 एलिट जेन 3 चिपसेट देण्यात आला आहे.

हा प्रोसेसर 8GB RAM + 256GB स्टोरेज सोबत उपलब्ध असणार आहे जो युजर्स ना अधिक स्टोरेज चा चांगला पर्याय देतो. त्यामुळे युजर्स अॅप्स, गेम्स, फोटोस, व्हिडिओज आणि इतर फाइल्स सहजपणे स्टोर करू शकतात. MicroSD कार्ड चा वापर केल्यास या स्मार्टफोन ची स्टोरेज 256GB वरून 2TB पर्यंत वाढवता येऊ शकते.

Brand कडून असे सांगण्यात आले आहे की या प्रोसेसर मुळे रोजच्या वापरातील परफॉर्मन्स अधिक वेगवान होईल. तसेच मल्टी-टास्किंग मध्ये सुधारणा दिसून येईल आणि गेमिंग तसेच स्ट्रीमिंग करताना अधिक स्मूथ अनुभव मिळेल.

कंपनी चा दावा आहे की, Galaxy A27 मधील क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 एलिट जेन 3 हा प्रोसेसर हा Galaxy A26 मधील एक्सिनॉस 1380 प्रोसेसर च्या तुलनेत 7% अधिक CPU परफॉर्मन्स आणि 8% अधिक वेगवान GPU परफॉर्मन्स देतो.

Samsung Galaxy A27 5G कॅमेरा

Photography साठी Galaxy A27 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर, 5 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो सेन्सर चा समावेश आहे.

कॅमेरा च्या बाबतीत Samsung ने प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आहे. मग ते शार्पर शॉट्स घेण्यासाठी असो, वायडर फोटोस क्लिक करण्यासाठी असो किंवा क्लोज-अप फोटोस असो, या सर्व गरजा लक्षात घेऊन ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

प्रायमरी कॅमेरा आणि मॅक्रो लेन्स मध्ये Galaxy A26 च्या तुलनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र Galaxy A26 मध्ये 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड लेन्स देण्यात आला होता तर samsung galaxy A27 5g marathi मध्ये तो कमी करून 5 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड लेन्स देण्यात आला आहे. ब्रँड चे म्हणणे आहे की Galaxy A27 हा त्याच्या सेगमेंट मधील सर्वोत्कृष्ट कॅमेरा एक्स्पिरियन्स देणारा स्मार्टफोन ठरणार आहे.

Selfie साठी Galaxy A27 मध्ये 12 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबत HDR सपोर्ट देखील मिळतो ज्यामुळे वेगवेगळ्या लाइट कंडिशन्स मध्ये अधिक नॅचरल आणि चांगल्या क्वालिटी चे फोटो कॅप्चर करता येतात. व्हिडिओ रेकॉर्डिंग साठी या स्मार्टफोन मधून 4K@30FPS वर व्हिडिओ शूट करता येतात.

Samsung Galaxy A27 5G बॅटरी

बॅटरीच्या बाबतीत Samsung ने कोणताही बदल केलेला नाही. Galaxy A27 मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे जी Galaxy A26 मध्येही देण्यात आली होती. यासोबत 25W fast charging चा सपोर्ट देखील मिळणार आहे.

Samsung Galaxy A27 5G AI वैशिष्ट्ये

Samsung ने Galaxy A27 मध्ये अनेक AI फीचर्स दिले आहेत जे तुम्ही रोजच्या वापरात सहजपणे वापरू शकता. या स्मार्टफोन मध्ये सर्कल इट, सर्च इट हे सर्कल टू सर्च AI फीचर चे अपग्रेडेड व्हर्जन देण्यात आले आहे. या फीचर च्या मदतीने तुम्हाला एखाद्या फोटो मधील वस्तू, कपडे किंवा इतर कोणतीही गोष्ट आवडली आणि ती विकत घ्यायची असेल तर फक्त त्या वस्तूभोवती सर्कल केल्यावर त्यासंबंधित माहिती आणि सर्च रिझल्ट्स पाहता येतात.

याशिवाय ऑब्जेक्ट इरेझर हे AI फीचर देखील देण्यात आले आहे. याच्या मदतीने फोटो मधील नको असलेली कोणतीही वस्तू सहजपणे रिमूव्ह करता येते. तसेच, व्हॉइस ट्रान्सक्रिप्शन AI फीचर मुळे व्हॉइस चे टेक्स्ट मध्ये रूपांतर करता येते आणि त्याचे इतर भाषां मध्ये ट्रान्सलेशन देखील करता येते. Galaxy A27 मध्ये मल्टिपल AI असिस्टंट्स चा सपोर्ट देखील मिळतो. यामध्ये परप्लेक्सिटी आणि गूगल जेमिनी यांचा समावेश असणार आहे.

Samsung Galaxy A27 Specifications Marathi

samsung galaxy a27 5g marathi
लाइट पिंक
samsung galaxy a27 5g marathi
ब्लॅक
ऑपरेटिंग सिस्टमअँड्रॉइड 16 (One UI 8.5)
6 वर्षे सुरक्षा अपडेट्स
प्रोसेसरस्नॅपड्रॅगन 6 एलिट जेन 3
इंटरनल स्टोरेज128 GB
रॅम8 GB
सुरक्षाफिंगरप्रिंट सेन्सर
बॅटरीची क्षमता5000 mAh
अ‍ॅडॉप्टर60W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार16.91 cm (सुपर एमोलेड डिस्प्ले)
रिझोल्यूशन1080 x 2340 पिक्सेल
पाणी संरक्षणIP64 जल-प्रतिरोधक डिझाइन
डिस्प्ले तंत्रज्ञान1)120Hz रिफ्रेश रेट
2)पीक ब्राइटनेस:- 2600 निट्स
3)कलर डेप्थ: 16M
4)QHD+
सेंसर1)ऍक्सेलरोमीटर
2)प्रॉक्सिमिटी
3)ऍक्सेलरोमीटर
4)जायरो सेन्सर
5)लाइट सेन्सर
6)जिओमॅग्नेटिक सेन्सर
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 12 मेगापिक्सेल
2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा + 5 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड कॅमेरा +2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स कॅमेरा
3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- UHD 4K
ऑडिओ
रंग1) लाइट ग्रीन
2) ब्लॅक
3) लाइट पिंक
कनेक्टिविटी5G, 4G, 3G, 2G
ब्लूटूथ v6.0, Wi-Fi
किंमत

Leave a Comment