OnePlus ची नवीन N6 Series झाली लॉन्च! 8000mAh बॅटरीसह मार्केटमध्ये आता “बॅटरी चा राजा” म्हणून होणार ओळख.

OnePlus ची नवीन N6 Series लॉन्च झाली! 8000mAh दमदार बॅटरीसह मार्केटमध्ये “Battery चा राजा” म्हणून ओळख मिळवणाऱ्या या स्मार्टफोनची संपूर्ण माहिती OnePlus N6 Marathi मध्ये जाणून घ्या, किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आत्ताच वाचा.

OnePlus ने आता भारतातील सर्वात स्पर्धात्मक मिड-रेंज स्मार्टफोन सेगमेंट मध्ये OnePlus N6 हा स्मार्टफोन लॉन्च करून दमदार एंट्री घेतली आहे. OnePlus N6 हा स्मार्टफोन तुम्हाला सुमारे ₹25,000 च्या मिड-रेंज किंमतीत उपलब्ध होणार आहे.

आपण पाहिलं तर, प्रत्येक ब्रँड त्यांच्या स्मार्टफोन्स मध्ये काही ना काही नवीन कॉम्पोनंट्स किंवा फीचर्स देत आहे. मग ते सॉफ्टवेअर मधील असो, हार्डवेअर मधील असो किंवा AI संबंधित असो. पण सध्याच्या मार्केट कडे पाहिलं तर स्मार्टफोन्स च्या किंमती सातत्याने वाढताना दिसत आहेत.

स्मार्टफोन्स च्या किंमती वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक कॉम्पोनंट ची किंमत वाढलेली आहे. हो मेमरी, प्रोसेसर, कॅमेरा लेन्स, चिप आणि अशा अनेक महत्त्वाच्या कॉम्पोनंट्स च्या किंमती सध्या बाजारात वाढल्या आहेत.

जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड Apple ने देखील त्यांच्या काही प्रॉडक्ट्स च्या किंमती वाढवल्या आहेत. उदाहरणार्थ Apple MacBook M5 ची किंमत पूर्वी ₹1,69,900 होती. मात्र कॉम्पोनंट्स च्या वाढलेल्या किंमतींमुळे आता त्याची किंमत ₹2,39,900 करण्यात आली आहे.

प्रत्येक ब्रँड आता युजर्स ना मिड-रेंज सेगमेंट मध्ये मोठी बॅटरी, प्रीमियम एक्सपिरियन्स आणि व्हॅल्यू फॉर मनी देणारे स्मार्टफोन्स बनवत आहे. हेच लक्षात घेऊन OnePlus ने युजर्स समोर OnePlus N6 हा स्मार्टफोन सादर केला आहे.

चला तर मग पाहूया OnePlus N6 Marathi खरोखरच असा स्मार्टफोन आहे का जो इतर मिड-रेंज ब्रँड्स च्या स्मार्टफोन्स पेक्षा वेगळा ठरतो आणि युजर्स ना यामध्ये नेमके कोणते फीचर्स मिळणार आहेत.

OnePlus N6 च्या डिझाइन मध्ये काय खास? प्रीमियम लूकसोबत मिळते मजबूत बिल्ड

OnePlus N6 च्या डिझाइन कडे पाहिलं तर ती बऱ्याच प्रमाणात परिचित वाटते. OnePlus ने N6 ची डिझाइन त्यांच्या फ्लॅगशिप OnePlus 15 सिरीज मधील स्मार्टफोन्स प्रमाणे ठेवली आहे. यामध्ये मेटॅलिक कॅमेरा मॉड्यूल असलेला रिअर पॅनेल, मेटॅलिक कॅमेरा मॉड्यूल आणि चैारस-आकाराचा कॅमेरा मॉड्यूल मध्ये दोन कॅमेरा सेन्सर्स देण्यात आले आहेत.

वनप्लस N6 कडे पाहिल्यानंतर अनेक युजर्स थोडे गोंधळात पडू शकतात कारण OnePlus च्या इतर काही स्मार्टफोन्स मध्येही याच प्रकारची डिझाइन पाहायला मिळते.

फोनच्या जाडी बद्दल बोलायचं झालं तर मोठी बॅटरी दिल्यामुळे OnePlus N6 ची जाडी 8.8mm असून त्याचे वजन 224 ग्रॅम आहे. मात्र दूरून पाहिल्यास हा स्मार्टफोन फार जाड वाटत नाही. तसेच त्याची डिझाइन देखील आकर्षक असून ती वेगळी किंवा अवघड वाटत नाही.

फोनच्या उजव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम बटण्स देण्यात आले आहेत तर खालच्या बाजूला USB Type-C पोर्ट, प्रायमरी स्पीकर ग्रिल आणि SIM ट्रे देण्यात आली आहे.

OnePlus N6 हातात घेतल्यानंतर तो प्रीमियम अनुभव देतो विशेषतः याच सेगमेंट मधील इतर स्मार्टफोन्स सोबत तुलना केली तर.

OnePlus N6 चा 6.75-इंच 120Hz डिस्प्ले रोजच्या वापरात किती दमदार ठरतो?

डिस्प्ले बद्दल बोलायचं झालं तर OnePlus N6 मध्ये 6.75-inch HD+ LCD डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. डिस्प्ले वर नॅचरल कलर्स, व्हायब्रंट व्हिज्युअल्स आणि डिसेंट कॉन्ट्रास्ट लेव्हल्स पाहायला मिळतात.

याशिवाय OnePlus ने या स्मार्टफोन मध्ये 1200 निट्स पीक ब्राइटनेस दिल्यामुळे बाहेर उन्हातही डिस्प्ले सहजपणे पाहता येतो आणि स्क्रीन वापरताना कोणतीही अडचण येत नाही.

सोशल मीडिया वापरताना, मुव्हीज पाहताना किंवा गेमिंग करताना हा डिस्प्ले तुम्हाला आरामदायी आणि प्रीमियम अनुभव देतो. ज्या युजर्स ना प्रामुख्याने मेसेजिंग,सोशल मीडिया वापरणे किंवा व्हिडिओ पाहणे एवढाच वापर असतो त्यांच्यासाठी HD+ रेझोल्यूशन पुरेसे ठरू शकते.

डिस्प्ले मधील सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे त्याचा 120Hz रिफ्रेश रेट होय. OnePlus N6 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे, ज्यामुळे सोशल मीडिया स्क्रोलिंग, अॅप्स स्विच करणे आणि गेमिंग करताना अधिक स्मूथ आणि रिस्पॉन्सिव्ह अनुभव मिळतो.

ब्रँड चा दावा आहे की OnePlus N6 ची विविध परिस्थितींमध्ये कठोर चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये उच्च तापमान, धूळ, पाऊस तसेच ड्रॉप टेस्ट यांसारख्या अनेक चाचण्यांचा समावेश होता.

OnePlus N6 चा प्रोसेसर कोणत्या प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी योग्य आहे?

प्रोसेसर बद्दल बोलायचं झालं तर OnePlus N6 मध्ये नवीन मीडियाटेक डायमेंसिटी 6360 एपेक्स प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 2× ARM Cortex-A76 आणि 6× ARM Cortex-A55 कोर्स चे जोडून मिळते.

हा प्रोसेसर दैनंदिन वापरासाठी चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. जर तुम्ही हेवी गेमिंग च्या दृष्टीने हा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर हा फोन तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार नाही.

तुमचा वापर नॉर्मल गेमिंग, सोशल मीडिया जास्त वेळ वापरणे किंवा मोबाइलवर मुव्हीज पाहणे इतकाच असेल तर OnePlus N6 हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही कधीकधी हेवी टास्क्स किंवा जास्त वेळ गेमिंग केली तरीही हा स्मार्टफोन तुलनेने स्मूथ अनुभव देऊ शकतो कारण OnePlus ने या ₹15,000–₹20,000 च्या सेगमेंट मध्ये सर्वात मोठा 5300mm² वेपर चेंबर दिला आहे, जो स्मार्टफोन चे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.

वेपर चेंबर असल्यामुळे निर्माण होणारी हीट एका ठिकाणी साचत नाही तर ती संपूर्ण चेसिस मध्ये समान पद्धतीने पसरवली जाते. त्यामुळे स्मार्टफोन चे हिटिंग कमी होण्यास मदत होते. जास्त वेळ गेमिंग केल्यानंतर फोन गरम होतो. त्यामुळे परफॉर्मन्स कमी होऊ शकतो आणि लॅगिंग सारख्या समस्या जाणवू शकतात.

50MP कॅमेरासह OnePlus N6 मध्ये मिळतो शानदार फोटोग्राफीचा अनुभव

फोटोग्राफी साठी OnePlus N6 मध्ये डिसेंट कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि f/1.8 अपर्चर मिळते.

दिवसा या प्रायमरी कॅमेरा मधून काढलेले फोटो पाहिले तर अपेक्षेपेक्षा चांगली इमेज क्वालिटी पाहायला मिळाली. डिसेंट कॅमेरा असूनही हा स्मार्टफोन उत्तम फोटो कॅप्चर करतो. फोटो मध्ये व्हायब्रंट कलर्स, नॅचरल टोन्स, क्लिअर डिटेल्स, बॅलन्स्ड एक्स्पोजर आणि चांगली शार्पनेस पाहायला मिळते.

सेल्फी कॅमेरा साठी OnePlus N6 मध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो कॅप्चर क्लिक करण्यासाठी आणि सोशल मीडिया साठी कन्टेन्ट तयार करण्यासाठी पुरेसा ठरतो. व्हिडिओ रेकॉर्डिंग या मधून 1080p @ 60FPS पर्यंत व्हिडिओ शूट करता येतात. याशिवाय सिनेमॅटिक व्हिडिओ मोड, 10x डिजिटल झूम आणि ड्युअल व्ह्यू व्हिडिओ यांसारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

कॅमेरा चा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी OnePlus ने या स्मार्टफोन मध्ये काही AI-पॉवर्ड फोटोग्राफी टूल्स देखील दिले आहेत. यामध्ये AI पोर्ट्रेट, AI परफेक्ट शॉट, AI रिफ्लेक्शन इरेझर, AI इरेझर आणि AI डिटेल बूस्ट यांसारख्या फीचर्स चा समावेश आहे. या AI फोटोग्राफी टूल्स मुळे फोटो ची क्वालिटी आणखी सुधारते.

या मॉडेल मध्ये टेलिफोटो लेन्स किंवा अल्ट्रा-वाइड लेन्स देण्यात आलेला नाही फक्त 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. जर OnePlus ने टेलिफोटो आणि अल्ट्रा-वाइड लेन्स दिले असते तर या स्मार्टफोन ची किंमत आणखी वाढली असती.

8000mAh बॅटरी सह OnePlus N6 ठरतो बॅटरीचा राजा? जाणून घ्या किती काळ टिकते बॅटरी

आता येऊया त्या गोष्टीकडे ज्यामुळे OnePlus N6 सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. फक्त चर्चेतच नाही तर हेच फीचर OnePlus N6 ला या सेगमेंट मधील इतर स्मार्टफोन्स पेक्षा वेगळे बनवते आणि हा स्मार्टफोन निवडण्यामागचे एक प्रमुख कारणही ठरते.

OnePlus N6 मध्ये 8000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी या सेगमेंट मधील सर्वात मोठ्या बॅटरीज पैकी एक मानली जात आहे. यासोबत 45W SUPERVOOC फास्ट चार्जिंग, बायपास चार्जिंग आणि 5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंग चा सपोर्ट देखील मिळतो.

oneplus n6 marathi

रिव्हर्स वायर्ड चार्जिंग मुळे स्मार्टवॉच, वायरलेस इयरबड्स किंवा इतर कम्पॅटिबल गॅझेट्स देखील OnePlus N6 च्या मदतीने चार्ज करता येतात.

OnePlus N6 एकदा 100% चार्ज केल्यानंतर सामान्य वापरात 2 ते 3 दिवसांपर्यंत वापरता येऊ शकतो. तुम्ही थोडे गेमिंग, सोशल मीडिया वापरणे किंवा इतर दैनंदिन कामे केली तरीही या स्मार्टफोन ची बॅटरी एका दिवसात संपणार नाही.

या सेगमेंट मधील इतर स्मार्टफोन्स कडे पाहिले तर Redmi Turbo 5 मध्ये 7540mAh बॅटरी देण्यात आली आहे तर Samsung Galaxy A27 मध्येही 5000mAh बॅटरी मिळते. इतकेच नाही तर ₹25,000 पेक्षा जास्त किंमत असलेल्या अनेक स्मार्टफोन्स मध्येही 8000mAh इतकी मोठी बॅटरी पाहायला मिळत नाही.

तसेच OnePlus Nord CE 6 Lite जो OnePlus N6 पेक्षा वरच्या लाइनअप मधील मॉडेल आहे त्यामध्येही 7000mAh बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे बॅटरी कॅपॅसिटी च्या बाबतीत OnePlus N6 या सेगमेंट मध्ये एक वेगळी ओळख निर्माण करतो.

OnePlus N6 Specifications – एका नजरेत पाहा सर्व फीचर्स आणि हार्डवेअर तपशील

oneplus n6 marathi
मिडनाईट ग्रीन
oneplus n6 marathi
फ्रेश मिंट
ऑपरेटिंग सिस्टमअँड्रॉइड 15(OxygenOS 16)
2 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 3 वर्षे सुरक्षा अपडेट्स
प्रोसेसरमीडियाटेक डायमेंसिटी 6360 एपेक्स
इंटरनल स्टोरेज128 GB
रॅम4 GB, 6GB
सुरक्षाइन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर
बॅटरीची क्षमता8000 mAh
अ‍ॅडॉप्टर45W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार6.8 इंच
रिझोल्यूशन1570 × 720 पिक्सेल
पाणी संरक्षणIP65
डिस्प्ले तंत्रज्ञान1)1-120Hz रिफ्रेश रेट
2)पीक ब्राइटनेस :- 1200 निट्स
3)नॉर्मल ब्राइटनेस :- 975 निट्स
3)HD+ LCD
सेंसर
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 8 मेगापिक्सेल
2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल
3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 1080P, 720P
ऑडिओ
रंग1)फ्रेश मिंट
2)मिडनाईट ग्रीन
कनेक्टिविटी5G, 4G Volte
ब्लूटूथ v5.4, Wi-Fi-6
किंमत₹22,999

OnePlus N6 ची किंमत किती? लॉन्च ऑफर्स आणि बँक डिस्काउंटसह किती रुपयांत मिळणार?

OnePlus N6 दोन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. यामधील पहिला 4GB + 128GB व्हेरिएंट असून त्याची किंमत ₹22,999 आहे. तर दुसरा 6GB + 128GB व्हेरिएंट ₹24,999 किंमतीत उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन फ्रेश मिंट आणि मिडनाईट ग्रीन अशा दोन रंगान मध्ये उपलब्ध होणार आहे.

याशिवाय तुम्ही बँक ऑफर्स चा लाभ घेतल्यास ₹2,000 पर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो. त्यामुळे OnePlus N6 चा बेस व्हेरिएंट तुम्हाला प्रभावीपणे ₹19,999 मध्ये खरेदी करता येईल.

OnePlus N6 तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या अंतिम मत

माझ्या मते OnePlus N6 हा रोजच्या वापरासाठी एक चांगला स्मार्टफोन आहे. यामध्ये डिझाइन, कॅमेरा, परफॉर्मन्स आणि बॅटरी यांसारख्या दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेल्या जवळपास सर्वच गोष्टींचा समतोल पाहायला मिळतो. OnePlus N6 हा या सेगमेंट मधील सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन मानला जाणार नाही.

परफॉर्मन्सच्या दृष्टीने पाहिल्यास OnePlus N6 मध्ये तुम्ही लाइट गेमिंग सहज करू शकता सोबत जर तुमचा कॅमेराचा वापर मर्यादित असेल आणि तुम्ही फार जास्त फोटोस क्लिक करत नसाल तर OnePlus N6 हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

जर तुम्ही असे युजर असाल ज्यांना मोठी बॅटरी असलेला आणि एकदा चार्जे केल्यानंतर 2 ते 3 दिवस सहज चालणारा स्मार्टफोन हवा असेल तर OnePlus N6 हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक ठरू शकतो.

Leave a Comment