Airtel ने लॉन्च केले स्वस्त व्हॉइस-ओन्ली प्लॅन्स!मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 SMS.

Airtel ने लॉन्च केले स्वस्त व्हॉइस-ओन्ली प्लॅन्स! अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 SMS सह येणाऱ्या Airtel Voice Only Plans for 1 Month Marathi Unlimited मध्ये जाणून घ्या प्लॅनची किंमत, व्हॅलिडिटी आणि फायदे आणि तुमच्यासाठी कोणता प्लॅन योग्य आहे ते आत्ताच वाचा.

Airtel Voice Only Plans For 1 Month In Marathi Unlimited

TRAI च्या नवीन नियमांनुसार, त्यांनी प्रत्येक भारतीय टेलिकॉम कंपनीला सांगितलं होतं की, ज्या लोकांना मोबाइल मध्ये इंटरनेट नको आहे, त्यांच्यासाठी फक्त व्हॉइस कॉलिंग चे प्लॅन्स लॉन्च करा. आता या निर्णयाचं पालन करण्यासाठी Airtel ने 3 व्हॉइस-ओन्ली प्लॅन्स लॉन्च केले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 SMS मिळणार आहेत.

आता हे प्लॅन्स अशा लोकांसाठी आहेत, ज्यांना इंटरनेट ची गरज लागत नाही किंवा ज्यांच्याकडे कीपॅड फोन्स आहेत. त्यांच्यासाठी हे प्लॅन्स उत्तम ठरणार आहेत.

याआधी ज्यांच्याकडे कीपॅड फोन्स असायचे, जसे की वयस्कर माणसं जे अजूनही कीपॅड फोन्स वापरतात त्यांच्यासाठी आपल्याला असा रिचार्ज करावा लागायचा, ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS तर मिळायचेच पण सोबत इंटरनेट/डेटा सुद्धा मिळायचा. मग तो 1.5GB असो किंवा 2GB पण त्याचा त्यांना काहीच उपयोग होत नव्हता.

हे पण वाचा :- WhatsApp वर ‘NO’ स्कॅम पासून सावध राहा! एका रिप्लायमुळे बँक खात्यातील पैसे धोक्यात येऊ शकतात.

अशा लोकांसाठी Airtel ने फक्त व्हॉइस-ओन्ली प्लॅन्स लॉन्च केले आहेत, ज्यांची सुरुवात ₹185 पासून होणार आहे. हे प्लॅन्स रेग्युलर प्लॅन्स पेक्षा स्वस्त आहेत.

₹185, ₹203 आणि ₹206 चे Airtel रिचार्ज प्लॅन्स लॉन्च, कोणत्या प्लॅन मध्ये किती व्हॅलिडिटी?

airtel voice only plans for 1 month marathi unlimited
प्लॅनवैलिडिटीकॉलिंगSMSइंटरनेट डेटा
₹18528 दिवसअनलिमिटेड कॉल300 मेसेजेसनाही
₹20330 दिवसअनलिमिटेड कॉल300 मेसेजेसनाही
₹20630 दिवसअनलिमिटेड कॉल300 मेसेजेसनाही
Airtel चा ₹185 रिचार्ज प्लॅन

Airtel च्या या प्लॅन मध्ये तुम्हाला 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 SMS ची सुविधा असणार आहे. या प्लॅन मध्ये तुम्हाला एक अतिरिक्त बेनिफिट मिळणार आहे तो म्हणजे फ्री हेलोट्यून.

Airtel चा ₹203 रिचार्ज प्लॅन

Airtel च्या ₹203 च्या plan मध्ये तुम्हाला पूर्ण 1 महिना म्हणजेच 30 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. यामध्ये 300 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा असणार आहे. या प्लॅन मध्येही यूजर्स ना फ्री हेलोट्यून मिळणार आहे.

Airtel चा ₹206 रिचार्ज प्लॅन

Airtel च्या ₹206 च्या प्लॅन मध्येही तुम्हाला 30 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 SMS ची सुविधा असणार आहे. या प्लॅन मध्येही यूजर्स ना फ्री हेलोट्यून मिळणार आहे.

यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही या व्हॉइस कॉलिंग प्लॅन्स पैकी कोणताही रिचार्ज केला, तर तुम्हाला इंटरनेट/डेटा बेनिफिट मिळणार नाही. या पॅक मध्ये फक्त व्हॉइस कॉलिंग आणि SMS ची सुविधा असणार आहे. हे सगळे प्लॅन्स पाहिले, तर सर्व प्लॅन्स मध्ये काही सुविधा सारख्याच आहेत, फक्त व्हॅलिडिटी मध्ये फरक असणार आहे.

Leave a Comment