Samsung ने लॉन्च केला जगातील पहिला प्रायव्हसी डिस्प्ले असलेला स्मार्टफोन! सोबत 200 मेगापिक्सेल कॅमेरा आणि Snapdragon 8 Gen Elite 5 प्रोसेसरसह येणारा Samsung Galaxy s26 Ultra

Samsung Galaxy s26 Ultra Marathi Review

भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड Samsung ने बाजारात S26 Series लॉन्च केली आहे. या सीरीजमध्ये तीन मॉडेल लॉन्च करण्यात आले आहेत जे आता थेट Apple आणि Pixel सारख्या ब्रँड्ससोबत स्पर्धा करणार आहेत. Samsung ने सध्या या सीरीज मध्ये फार काही नवीन गोष्टी दिलेल्या नाहीत पण सर्वात जास्त लक्ष स्मार्टफोनला अधिक कार्यशील बनवण्यावर दिले आहे ज्यामुळे यूज़र जास्तीत जास्त कामांसाठी स्मार्टफोनवर अवलंबून राहू शकतील.

Samsung ने फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या इव्हेंटमध्ये काही नवीन प्रॉडक्ट लॉन्च केले. या इव्हेंट मध्ये ऑडिओ लाइनअपमध्ये दोन नवीन प्रॉडक्ट लॉन्च करण्यात आले जे म्हणजे Galaxy Buds 4 आणि Galaxy Buds 4 Pro. यासोबतच कंपनीने दोन प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन्सही लॉन्च केले आहेत ज्यामध्ये Samsung Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra चा समावेश आहे.

आज आपण (Samsung galaxy S26 Ultra marathi review) या टॉप व्हेरिएंटकडे पाहणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की S26 Ultra मध्ये असे कोणते नवीन फीचर्स दिले आहेत ज्यांची जगभर चर्चा सुरू आहे. चला तर मग पाहूया Samsung Galaxy S26 Ultra Marathi Review मध्ये काय खास आहे.

Samsung Galaxy S26 Ultra डिस्प्ले (Display)

डिस्प्ले कडे पाहिलं तर Samsung ने काही मोठा बदल केलेला नाही. मागील मॉडेल म्हणजे Samsung Galaxy S25 Ultra मध्ये जो 6.9-इंच QHD+ डायनॅमिक एमोलेड 2X डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळत होता तोच या मॉडेल मध्ये ही मिळणार आहे. Samsung ब्रँड असल्यामुळे डिस्प्ले किंवा व्हिडिओ क्वालिटीबद्दल काहीही शंका नाही.

तुम्ही या स्मार्टफोनवर मूव्ही किंवा व्हिडिओ जास्त वेळ पाहत असाल, तर तुम्हाला प्रीमियम व्हिडिओ क्वालिटीमध्ये अनुभव मिळणार आहे. एवढंच नाही तर Samsung ने यामध्ये व्हिजन बूस्टर नावाचं फीचर दिलं आहे जे डिस्प्लेतील कलर्स अजून एनहॅन्स करतं. आता येऊया त्या फीचरकडे ज्याची संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे.

हा जगातील असा पहिला फीचर आहे जो अजून कोणत्याही स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेला नव्हता. Samsung ने नवीन कल्पना करून हा फीचर लॉन्च केला आहे तो म्हणजे प्रायव्हसी डिस्प्ले. हे एक असं फीचर आहे जे Samsung Galaxy S26 Ultra ला S25 Ultra पासून वेगळं करतं आणि असंही म्हणता येईल की या सेगमेंट मधील हा सर्वात मोठा अपग्रेड आहे.

samsung galaxy s26 ultra marathi review

तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की सेगमेंट फीचर म्हणजे काय? प्रायव्हसी डिस्प्ले हा असा फीचर आहे की तुम्ही तो ऑन केला तर जो फोन वापरत आहे किंवा फ्रंट व्ह्यू ने फोन पाहत आहे त्यालाच स्क्रीन दिसणार आणि जे लोक साइड व्ह्यू ने म्हणजे सुमारे 30 डिग्रीच्या अँगल ने फोन पाहतील त्यांना स्क्रीन काळी दिसेल.

Samsung च्या या फीचरमुळे लोकांची प्रायव्हसी अजून सुरक्षित राहील. समजा तुम्ही एखाद्या गर्दीच्या ठिकाणी आहात आणि तुम्हाला खाजगी माहिती पाठवायची असेल, प्रायव्हेट मेसेजेस किंवा काही बँक डिटेल्स पाठवायचे असतील आणि आजूबाजूच्या लोकांना ते कळू द्यायचं नसेल तर हे फीचर अशा कामांसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रायव्हसी डिस्प्ले चं काम फक्त मेन स्क्रीन वरच नाही तर इतर अँप्स वरही तुम्ही हे फीचर ऑन करू शकता. जसं की तुम्हाला फक्त बँकिंग अँप्स कडून येणाऱ्या नोटिफिकेशन्स किंवा मेसेजेस साठी प्रायव्हसी डिस्प्ले ऑन करायचं असेल तर सेटिंग्स मध्ये जाऊन तुम्हाला ज्या अँप्स साठी हे फीचर चालू करायचं आहे त्या अँप्स साठी ते ऑन करा.

मग ते फेसबुक अँप असो, इंस्टाग्राम अँप असो, Gmail असो किंवा पेमेंट अँप्स असो तुम्ही प्रत्येक अँप साठी वेगवेगळं प्रायव्हसी डिस्प्ले ऑन करू शकता.

Samsung Galaxy S26 Ultra कॅमेरा (Camera)

प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे तर कॅमेरा सुद्धा प्रीमियमच असणार. Samsung Galaxy S26 Ultra मध्ये तुम्हाला 200 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 50 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड कॅमेरा, 10 मेगापिक्सेल ऑप्टिकल झूम आणि 50 मेगापिक्सेल 5x टेलिफोटो लेन्स मिळणार आहे तसेच सेल्फी कॅमेरा हा 12 मेगापिक्सेलचा असणार आहे.

Samsung ने कॅमेरा मॉड्यूल मध्ये काही बदल केले नाहीत. जे Samsung Galaxy S25 Ultra मध्ये मॉड्यूल आहे तोच S26 Ultra मध्ये देण्यात आला आहे. पण आता नवीन Samsung Galaxy S26 Ultra मध्ये वाइडर कॅमेरा अपर्चर्स देण्यात आले आहेत ज्यामुळे फोटो मध्ये जास्त लाइट मिळतो आणि फोटो अधिक क्लिअर येण्यास मदत होते.

samsung galaxy s26 ultra marathi review

व्हिडिओग्राफी मध्ये सुद्धा Samsung ने काही दमदार फीचर दिले आहेत जसं की एनहॅन्स्ड नाइटोग्राफी ज्यामुळे कमी प्रकाशा मध्ये सुद्धा तुम्ही चांगले व्हिडिओ शूट करू शकता. व्हिडिओ शूटिंग तुम्ही 8K 30FPS मध्ये करू शकता आणि सेल्फी कॅमेरा मधून 4K 60FPS मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.

व्हिडिओ शूटिंग मध्ये Samsung ने एक नवीन फीचर दिलं आहे जे कॉन्टेंट क्रिएटर्स आणि व्हिडिओग्राफर्स साठी खूप उपयोगी ठरणार आहे ज्याला होरायझन लॉक (Horizon Lock) असं म्हणतात. तुम्ही व्हिडिओ शूट करताना हे फीचर ऑन केलं तर व्हिडिओ मधली फ्रेम लॉक होते. त्यामुळे तुम्ही विडिओ कोणत्याही अँगल ने काढला किंवा फोन टिल्ट केला तरीही व्हिडिओ नेहमी स्टेबल आणि योग्य व्हर्टिकल फॉरमॅट मध्येच दिसतो.

Samsung ने फक्त फोटोग्राफी नाही तर व्हिडिओग्राफी मध्येही सुधारणा केली आहे आणि ती लोकांना नक्कीच आवडणार. फोटो आणि व्हिडिओ S26 Ultra मध्ये तुम्हाला प्रीमियम क्वालिटी, वायब्रंट, नॅचरल आणि ब्राइट अशा उत्कृष्ट दर्जा मध्ये पाहायला मिळणार आहेत.

Samsung Galaxy S26 Ultra प्रोसेसर(Processor)

या प्रीमियम फ्लॅगशिप लेवल स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक दमदार प्रोसेसर मिळणार आहे. हो, Samsung S26 Ultra मध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 सारखा पॉवरफुल प्रोसेसर मिळणार आहे जो फोनला आणखी वेगवान बनवतो. असा जबरदस्त प्रोसेसर असल्यामुळे तुमच्या रोजच्या वापरात हा फोन तुम्हाला स्मूथ एक्सपीरियन्स देणार आहे.

परफॉर्मन्स कडे पाहिलं तर Samsung Galaxy S26 Ultra मध्ये तुम्हाला लॅगिंग चा प्रश्न अजिबात येणार नाही. तुम्ही गेमिंग करा, हेवी टास्क्स करा, सतत अँप्स बंद चालू करा, मल्टि-टास्किंग करा किंवा व्हिडिओ आणि फोटो एडिट करा तुम्हाला लॅगिंग चा अनुभव येणार नाही. अनुभव येणार तो फक्त स्मूथ आणि फास्ट परफॉर्मन्स चाच.

आता इतका पॉवरफुल प्रोसेसर दिला आहे तर तुम्ही विचार करत असणार की फोन गरम होणारच. पण याचा सुद्धा Samsung ने विचार करून यात थर्मल मॅनेजमेंट म्हणजेच वेपर चेंबर दिला आहे. तुम्ही जर जास्त वेळ काम किंवा गेमिंग करत असाल तर वेपर चेंबर मुळे डिव्हाइसच हीटिंग कमी होण्यास मदत होते आणि परफॉर्मन्स अजून जबरदस्त मिळतो.

आपण जर Samsung S26 Ultra ला Galaxy S25 Ultra सोबत प्रोसेसर मध्ये तुलना केली तर S26 Ultra चा प्रोसेसर (CPU) 19% अधिक वेगवान करण्यात आला आहे. Samsung ने CPU अधिक वेगवान केल्यामुळे तुम्हाला परफॉर्मन्स मध्ये बदल पाहायला मिळणार आहे.

Samsung Galaxy S26 Ultra बॅटरी (Battery)

बॅटरी मध्ये Samsung ने काही बदल केले नाहीत. Samsung Galaxy S25 Ultra मध्ये जी 5000mAh बॅटरी दिली होती तीच Samsung Galaxy S26 Ultra मध्येही देण्यात आली आहे.

पण चार्जिंग मध्ये अपग्रेड करण्यात आला आहे. S25 Ultra मध्ये 45W चा अडॅप्टर मिळत होता तर आता S26 Ultra मध्ये 65W चा अडॅप्टर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S26 Ultra AI फीचर

Samsung आता त्यांच्या प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन ला AI smartphones असं म्हणू लागले आहेत आणि AI टेकनॉलॉजि अजून advanced करण्यासाठी कोरियन टेक सोबत हातमिळवणी करून या स्मार्टफोनमध्ये एआय इंटिग्रेशन दिलं आहे ज्यामुळे हा फोन एक AI स्मार्टफोन बनतो.

Galaxy S26 Ultra मध्ये आधीच Perplexity, Gemini आणि Samsung ची AI असिस्टंट Bixby हे सगळं फोनमध्ये आधीच इन्स्टॉल करून दिले आहेत. Gemini चा वापर करण्यासाठी तुम्हाला बाजूला दिलेलं बटण काही वेळ दाबून ठेवावं लागेल त्यानंतर Gemini AI सुरू होईल.

तुम्ही Gemini ला थेट प्रश्न विचारू शकता मग ते बोलून विचारा किंवा तुमच्या फोनची स्क्रीन Gemini सोबत शेअर करूनही विचारू शकता. तुम्ही एखादा लेख वाचत असाल किंवा व्हिडिओ पाहत असाल आणि त्यामधील एखादं वाक्य किंवा कोणत्या शब्दाचा अर्थ समजला नसेल तर तुम्ही सर्कल टू सर्च या नवीन फीचरचा वापर करून त्याचा अर्थ जाणून घेऊ शकता.

AI फीचर फक्त स्मार्टफोनपुरते मर्यादित नाहीत तर फोटो मध्येही देण्यात आले आहेत. तुम्ही आता फोटोमध्ये नवीन वस्तू ऍड करू शकता आणि ज्या वस्तू तुम्हाला फोटोमध्ये नको आहेत त्या S पेन च्या मदतीने सर्कल करून काढू शकता.

हे ही वाचा :- तुम्ही MS Excel रोज वापरता का? मग या शॉर्टकट कीज तुम्हाला नक्कीच माहित असायला हव्यात, ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल

Samsung Galaxy S26 Ultra Specifications (वैशिष्ट्ये)

samsung galaxy s26 ultra marathi review
samsung galaxy s26 ultra marathi review
samsung galaxy s26 ultra marathi review
samsung galaxy s26 ultra marathi review
samsung galaxy s26 ultra marathi review
samsung galaxy s26 ultra marathi review
ऑपरेटिंग सिस्टमअँड्रॉइड 16
7 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 7 वर्षे सुरक्षा अपडेट्स
प्रोसेसरस्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5
इंटरनल स्टोरेज256 GB
रॅम12 GB
सुरक्षासाइड माउंटेड फिंगरप्रिंट
बॅटरीची क्षमता5000 mAh
अ‍ॅडॉप्टर60W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार17.49 cm (डायनॅमिक एमोलेड डिस्प्ले)
रिझोल्यूशन3120 x 1440 पिक्सेल
पाणी संरक्षणIP48 जल-प्रतिरोधक डिझाइन
डिस्प्ले तंत्रज्ञान1)120Hz रिफ्रेश रेट
2)पीक ब्राइटनेस:- 2600 निट्स
3)कलर डेप्थ: 16M
4)QHD+
सेंसर1)इलेक्ट्रॉनिक कंपास
2)प्रॉक्सिमिटी सेन्सर
3)ऍक्सेलरोमीटर
4)बॅरोमीटर
5)जायरो सेन्सर
6)हॉल सेन्सर
7)जिओमॅग्नेटिक सेन्सर
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 12 मेगापिक्सेल
2)पाठीचा कॅमेरा:- 200 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा + 50 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड कॅमेरा +50 मेगापिक्सेल 5x टेलिफोटो लेन्स + 10 मेगापिक्सेल 3x ऑप्टिकल झूम
3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- UHD 8K, 4K
ऑडिओस्टीरिओ स्पीकर्स
रंग1)स्काय ब्लू
2)व्हाइट
3)कोबाल्ट व्हायोलेट
4)ब्लॅक
5)पिंक गोल्ड
6)सिल्वर शॅडो
कनेक्टिविटी5G, 4G, 3G, 2G
ब्लूटूथ v6.0, Wi-Fi
किंमत₹1,39,999

Samsung Galaxy S26 Ultra Marathi Price

Galaxy S26 Ultra मध्ये Samsung ने 3 व्हेरिएंट उपलब्ध करून दिले आहेत. यात पहिला व्हेरिएंट 256GB + 12GB RAM असून त्याची किंमत 1,39,999 रुपये आहे. दुसरा व्हेरिएंट 512GB + 12GB RAM असून त्याची किंमत 1,59,999 रुपये आहे आणि तिसरा व्हेरिएंट 1TB + 16GB RAM असून त्याची किंमत 1,89,999 रुपये आहे.

Colors मध्ये Samsung ने users साठी अनेक पर्याय दिले आहेत, जसे की स्काय ब्लू, व्हाइट, कोबाल्ट व्हायोलेट, ब्लॅक. तसेच पिंक गोल्ड आणि सिल्वर शॅडो हे दोन रंग तुम्हाला फक्त Samsung च्या अधिकृत वेबसाइटवरच खरेदी करता येतील.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment