शाओमी 17 प्रो मॅक्स — जगातील पहिला फोन ज्याच्या मागे स्क्रीन आहे जी फोटो पासून मेसेजपर्यंत खूप काही करू शकते.

Xiaomi 17 Pro Max Marathi

शाओमी ने लाँच केला आजपर्यंतचा सर्वात अॅडव्हान्स्ड आणि पॉवरफुल स्मार्टफोन — Xiaomi 17 Pro Max. हा Xiaomi 17 सीरिजमधील टॉप व्हेरिएंट आहे आणि शाओमी १७ हा बेस. तुम्हाला जर Xiaomi 17 बद्दल माहिती हवी असेल, तर त्यावर मी आधीच लिहिले आहे.

थोड्याच दिवसांपूर्वी चीनमध्ये ही सिरीज लाँच झाली होती. सध्या भारतात हा फोन अजून लाँच करण्यात आलेला नाही. माझ्या माहितीनुसार Xiaomi 17 सीरिजमधील Xiaomi 17 हा भारतात लाँच होणार आहे, पण 17 Pro आणि 17 Pro Max बद्दल अजून काही निश्चित माहिती नाही.

मार्केटमध्ये सध्या Xiaomi 17 Pro Max ची खूप चर्चा सुरू आहे कारण हा एक असा फोन आहे ज्यात मागच्या बाजूलादेखील स्क्रीन दिली आहे, आणि आजपर्यंत कुठल्याच ब्रँडने असा स्मार्टफोन तयार केलेला नाही. आपण जर पाहिलं तर Xiaomi ने 16 सीरीजचं नाव न देता थेट 17 सीरीज नाव दिलं आहे.

याचं कारण म्हणजे असंही असू शकतं की 9 सप्टेंबर 2025 ला Apple ने त्यांची iPhone 17 सीरीज लॉन्च केली होती, त्यामुळे Xiaomi नेही ठरवलं असावं की आता Apple सोबतच टक्कर घ्यायची. तुम्ही पण लक्ष दिलं असेल की दोन्ही फोनची नावं एकसारखीच आहेत, फक्त ब्रँडचं नाव वेगळं आहे.

सध्या खूप लोक हे दोन फोन iPhone 17 Pro Max आणि Xiaomi 17 Pro Max यांची तुलना करत आहेत, कारण दोन्ही फोनचं डिझाइन अगदी सारखं आहे. पण Xiaomi 17 Pro Max च्या मागच्या बाजूला स्क्रीन दिल्यामुळे हा फोन अजून प्रीमियम आणि वेगळा दिसतो.

आज आपण Xiaomi 17 Pro Max बद्दल बोलणार आहोत की असा काय आहे या फोनमध्ये, जे खूप लोकांना आवडलं आहे आणि हा फोन का सगळ्यांपेक्षा वेगळा आहे ते जाणून घेऊया.

Xiaomi 17 Pro Max डिस्प्ले

सर्वात आधी बोलू या डिस्प्ले बद्दल ज्यात दोन स्क्रीन दिल्या आहेत, आणि ह्याच कारणामुळे Xiaomi 17 Pro Max चर्चेत आहे. Xiaomi ने या फोनमध्ये दोन डिस्प्ले दिले आहेत एक मागे आणि एक पुढे. मागच्या बाजूचा डिस्प्ले हा 2.9 इंच LTPO एमोलेड डिस्प्ले असून त्यात 3500 nits इतकी पीक ब्राइटनेस क्षमता आहे, पुढचा डिस्प्ले मात्र मोठा असून 6.9 इंच 1.5K LTPO एमोलेड डिस्प्ले आहे.

मोठा आणि अत्याधुनिक डिस्प्ले असल्यामुळे तुम्ही चित्रपट किंवा स्वतः शूट केलेले व्हिडिओ पाहताना तेजस्वी, नैसर्गिक आणि रंगीत अनुभव घेऊ शकता यात काहीच शंका नाही. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी Xiaomi ने यात स्वतःचं ड्रॅगन क्रिस्टल ग्लास 3 स्क्रीन प्रोटेक्शन दिलं आहे, ज्यामुळे फोन खाली पडला तरी काहीही नुकसान होणार नाही.

आता तुम्हाला मागच्या डिस्प्लेबद्दल काही अशा गोष्टी सांगतो ज्यात तुम्ही खूप काही करू शकता आणि कदाचित तुम्ही असा विचारही केला नसेल! असं नाही की मागचा डिस्प्ले फक्त शोसाठी दिला आहे, म्हणजे फोन अजून आकर्षक दिसावा म्हणून तर त्याच्यामध्ये अनेक उपयोगी फिचर्स दिलेले आहेत.

redmi 17 pro max marathi

तुम्ही या डिस्प्लेच्या मदतीने फोटो आणि व्हिडिओ दोन्ही शूट करू शकता, फक्त उजव्या बाजूला स्वाइप केलं की लगेच कॅमेरा ओपन होतो. या दुहेरी डिस्प्ले मुळे आता तुम्ही मेन कॅमेऱ्यानेच सेल्फी घेऊ शकता. कॅमेऱ्यामध्ये अशी एक गोष्ट आहे जी ऐकून मलाही थोडं आश्चर्य वाटलं ती म्हणजे तुम्ही या डिस्प्लेद्वारे 8K 30FPS ने व्हिडिओ शूट करू शकता. तसेच, तुम्ही घेतलेले फोटो थेट मागच्या डिस्प्लेवरच पाहू शकता, म्हणजे गॅलरीत जाऊन पाहायची गरज नाही.

एवढंच नाही तर तुम्हाला जे काही मेसेजेस, नोटिफिकेशन्स येतील, कॉल उचलण्या साठी किंवा चार्जिंग किती झाली आहे हे सगळं तुम्ही या मागच्या डिस्प्लेवरच पाहू शकता. तुम्हाला वाटलं की या डिस्प्लेवर काही वॉलपेपर ठेवायचा आहे, तर तेही करू शकता फक्त सेटिंग्जमध्ये जाऊन कस्टम वॉलपेपर सिलेक्ट करा आणि तुम्हाला आवडेल तो वॉलपेपर लावा.

खरंच, Xiaomi ने मार्केटमध्ये फक्त प्रीमियम नाही तर सुपर प्रीमियम स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हे सगळे फंक्शन्स पाहून ते तेही फक्त एका डिस्प्ले मध्ये.

Xiaomi 17 Pro Max परफॉर्मन्स

परफॉर्मन्स साठी Xiaomi ने खूप ताकदवान प्रोसेसर दिला आहे Xiaomi 17 Pro Max मध्ये. जगातील हा पहिला स्मार्टफोन आहे ज्यात सर्वात पॉवरफुल आणि फास्टेस्ट प्रोसेसर देण्यात आला आहे. होय, Xiaomi ने यात स्नॅपड्रॅगन 8 एलिट जन 5 हा प्रोसेसर दिला आहे,
आणि हा प्रोसेसर अजून कुठल्याच स्मार्टफोनमध्ये उपलब्ध नाही.

Xiaomi 17 Pro Max मध्ये हा प्रोसेसर असल्यामुळे लॅगचा प्रश्नच येत नाही. मल्टीटास्किंग, गेमिंग किंवा इतर कोणतेही काम करत असाल तरी हा स्मार्टफोन पूर्णपणे स्मूथ आणि फास्ट चालणार आहे. गेम खेळणाऱ्यांसाठी तर हा फोन सर्वात आवडणारा स्मार्टफोन ठरणार आहे, कारण गेमिंगसाठी लागणारा पॉवरफुल प्रोसेसर Xiaomi ने यात दिला आहे, ज्यामुळे गेम अगदी स्मूथ आणि लेग-फ्री चालतो.

Xiaomi 17 Pro Max कॅमेरा

आता येऊ या कॅमेऱ्याकडे Xiaomi ने कॅमेऱ्यामध्येही काहीच कमी ठेवलेले नाही. या फोनमध्ये तुम्हाला ५० मेगापिक्सेलचे चार कॅमेरे मिळतात. फ्रंट कॅमेऱ्यामध्ये तीन ५० मेगापिक्सेल कॅमेरे दिले आहेत आणि सेल्फीसाठी देखील ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. फोटो पाहिले तर ते अगदी DSLR सारखे दिसतात पूर्णपणे क्लिअर, नैसर्गिक रंगांसह आणि सुंदर डिटेल्स मध्ये.

redmi 17 pro max marathi

टेलिफोटो कॅमेऱ्यात तुम्हाला 5x पर्यंत झूम मिळणार आहे, तर iPhone 17 Pro Max मध्ये फक्त 4x टेलिफोटो कॅमेरा दिला आहे. Xiaomi 17 Pro Max मध्ये Apple च्या iPhone 17 Pro Max पेक्षा जास्त मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. iPhone 17 Pro Max मध्ये तुम्हाला ४८ मेगापिक्सेलचे तीन कॅमेरे मिळतात, तर Xiaomi 17 Pro Max मध्ये ५० मेगापिक्सेलचे चार कॅमेरे देण्यात आले आहेत.

व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही 8K 30fps मध्ये शूट करू शकता, तर सेल्फी व्हिडिओसाठी 4K 60fps सपोर्ट मिळतो. यावरूनच कळून येतं की या फोनची व्हिडिओ क्वालिटी जबरदस्त असणार आहे.

Xiaomi 17 Pro Max बॅटरी

Xiaomi 17 Pro Max मध्ये तब्बल 7500 mAh ची शक्तिशाली बॅटरी दिली आहे, सोबत 100W चा अ‍ॅडॅप्टर आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळतो. आपण जर इतर मोठ्या ब्रँडच्या स्मार्टफोन्सशी तुलना केली तर Samsung S25 Ultra मध्ये 5000mAh ची बॅटरी,
OnePlus 13 मध्ये 6000mAh ची बॅटरी आणि iPhone 17 Pro Max मध्ये 5088 mAh ची बॅटरी मिळते. या सर्वांपेक्षा सर्वात मोठी बॅटरी तुम्हाला Xiaomi 17 Pro Max मध्ये मिळते.

Xiaomi 17 Pro Max Marathi स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत(xiaomi 17 pro max specifications)

redmi 17 pro max marathi
ब्लॅक
redmi 17 pro max marathi
व्हाईट
redmi 17 pro max marathi
पर्पल
redmi 17 pro max marathi
ग्रीन
ऑपरेटिंग सिस्टमअँड्रॉइड 15(HyperOS 16.0)
प्रोसेसरस्नॅपड्रॅगन 8 एलिट जन 5
इंटरनल स्टोरेज512 GB
रॅम12 GB
सुरक्षाइन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर
बॅटरीची क्षमता7500 mAh
अ‍ॅडॉप्टर100W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार6.9 इंच (M10 डिस्प्ले पॅनल)
रिझोल्यूशन1200 x 2608 पिक्सेल
पाणी संरक्षणIP68 जल-प्रतिरोधक डिझाइन
डिस्प्ले तंत्रज्ञान1)पीक ब्राइटनेस :- 3500 निट्स
2)120Hz रिफ्रेश रेट
3)FHD+
सेंसर1)प्रॉक्सिमिटी सेन्सर
2)ई-कंपास
3)लाईट सेन्सर
4)ॲक्सेलरोमीटर
5)जायरोस्कोप
6)बारोमीटर
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल
2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल मेन कॅमेरा + 50 मेगापिक्सेल ५x पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स सेन्सर + 50 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड
3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 8K,4K,1080P, 720P
ऑडिओस्टीरिओ स्पीकर्स
रंग1)व्हाईट
2)ब्लॅक
3)ग्रीन
4)पर्पल
कनेक्टिविटी5G, 4G
ब्लूटूथ v5.4, Wi-Fi 7
(xiaomi 17 pro max marathi price)किंमत₹90,000 च्या वर असू शकते अजून जाहीर केला नाही.

हा फोन सध्या चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि भारतात हा स्मार्टफोन कधी लॉन्च होईल, हे अजून सांगण्यात आलेले नाही.
चीनमध्ये याची किंमत RMB 5999 युआन आहे, म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये रूपांतर केल्यास सुमारे ₹74,856 एवढी किंमत होते. चीनमध्ये याची किंमत कमी आहे, पण भारतात लॉन्च होईपर्यंत ही किंमत वाढण्याची शक्यता आहे, आणि हा स्मार्टफोन सुमारे ₹90,000 च्या वर जाऊ शकतो.

तर हा होता आपला दोन स्क्रीन असलेला अनोखा स्मार्टफोन, आणि खरंच सांगायचं झालं तर Xiaomi या ब्रँडने असं काम केलं आहे जे आजवर स्मार्टफोन इंडस्ट्री मध्ये कोणीही केलं नव्हतं. Xiaomi ने हा फोन खास Android यूजर्सना iPhone सारखा किंबहुना त्याहूनही चांगला अनुभव देण्यासाठी लॉन्च केला आहे.

तुम्हाला या फोनबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा आणि Xiaomi 17 Pro Max Marathi ची भारतात किंमत किती असू शकते तेही सांगा.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment