Xiaomi 17 Marathi
शाओमीने ने लॉन्च केली आजपर्यंतची सर्वात पॉवरफुल अँड्रॉइड स्मार्टफोन सीरिज, ती म्हणजे Xiaomi 17 Series. शाओमीने ही सीरिज 25 सप्टेंबर 2025 ला चीनमध्ये लॉन्च केली असून ती अतिशय जबरदस्त ठरणार आहे. Xiaomi 17 Series मध्ये शाओमीने 3 स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत – Xiaomi 17, Xiaomi 17 Pro आणि Xiaomi 17 Pro Max.
तुम्हाला हे नाव जरा सध्या खूप ऐकल्या सारखं वाटत असेल कारण मागच्या महिन्यात 3 सप्टेंबरला Apple ने त्यांची पुढची सीरिज iPhone 17 Series लॉन्च केली. शाओमीने आता थेट सर्वात मोठ्या ब्रँड म्हणजे Apple सोबत स्पर्धा करायची ठरवली आहे असं दिसतंय. नावही अगदी तसंच ठेवलंय, फक्त ब्रँडचं नाव बदललं आहे बाकी स्मार्टफोनची नावं तीच आहेत.
आपण आज पाहणार आहोत Xiaomi 17 आणि थोड्याच दिवसांत 17 Pro आणि 17 Pro Max बद्दलही तुम्हाला माहिती मिळून जाईल.
Xiaomi 17 डिस्प्ले
डिस्प्लेकडे पाहिलं तर खूप मोठा आहे — 6.3-इंचाचा M10 LTPO डिस्प्ले मिळणार आहे. या डिस्प्लेमुळे तुम्ही फोन बाहेर उन्हात वापरत असलात तरी तुम्हाला सगळं अगदी स्पष्ट दिसेल. काही स्मार्टफोन्समध्ये बाहेर प्रकाशात स्क्रीन नीट दिसत नाही म्हणून आपल्याला सावलीत जाऊन पाहावं लागतं, पण या फोनमध्ये तसं अजिबात करावं लागणार नाही.
Xiaomi 17 मध्ये 3500 nits ब्राइटनेस मिळणार आहे. याआधी Xiaomi 15 मध्ये 3200 nits ब्राइटनेस होता, पण आता 17 Series मध्ये थोडा वाढवून आणखी चांगला दिला आहे.
Xiaomi 17 प्रोसेसर, बॅटरी
आजपर्यंतचा सर्वात पॉवरफुल प्रोसेसर, जो अजूनपर्यंत कुठल्याही स्मार्टफोनमध्ये दिला गेलेला नाही, तो म्हणजे स्नॅपड्रॅगन चा नवीनतम प्रोसेसर – स्नॅपड्रॅगन 8 एलिट जन 5 हा Xiaomi 17 मध्ये देण्यात आला आहे. या प्रोसेसरमुळे तुमचा फोन खूपच स्मूथ आणि फास्ट चालणार. मग तुम्ही गेमिंग करा, मल्टी-टास्किंग करा किंवा कितीही वेळा अॅप्स ओपन- क्लोज करा, तरी हा फोन अजिबात हळू चालणार नाही.
एवढंच नाही तर गेम खेळताना फोन गरम झाला तरी टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण Xiaomi ने यात व्हेपर चेंबर देखील दिलं आहे. या व्हेपर चेंबर मुळे फोनमधील जेवढंही हीट आहे ते नियंत्रित करण्यासाठी मदत मिळते आणि तुमचा फोन थंड राहतो. यामुळे फोनची परफॉर्मन्स अजून वेगवान आणि स्मूथ राहते.
बॅटरी बद्दल बोलायचं झालं तर, Xiaomi 17 हा पहिला 6.3-इंच फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे ज्यात कॉम्पॅक्ट फोनमध्येच 7000 mAh ची मोठी बॅटरी मिळते. सोबतच यात 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगचं सपोर्ट देखील आहे, म्हणजेच बॅटरी पटकन चार्ज होईल आणि जास्त वेळ टिकेल, म्हणजे आता फक्त 30 ते 40 मिनिटांत तुमचा फोन पूर्णपणे चार्ज होणार.
Xiaomi 17 कॅमेरा
शाओमीने ने कॅमेरा मध्येही काहीच कमी ठेवलेले नाही. Xiaomi 17 च्या मागच्या बाजूला चार कॅमेरे दिले आहेत, त्यामुळे कॅमेरा तर जबरदस्तच असणार. यात 50 मेगापिक्सेलचे तीन कॅमेरे असून चौथा कॅमेरा Leica चा 60mm टेलिफोटो लेन्ससह दिला आहे. सेल्फी कॅमेरामध्येही शाओमीने ने मोठा बदल केला आहे; आधीचा 32 मेगापिक्सेल कॅमेरा काढून आता 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
एकूण Xiaomi 17 मध्ये 50 मेगापिक्सेलचे चार कॅमेरे आहेत. 50 मेगापिक्सेलचे कॅमेरे असल्यामुळे फोटोंची क्वालिटी एकदम क्लिअर, नैसर्गिक आणि प्रोफेशनल येते. यामध्ये मास्टर पोर्ट्रेट मोड आणि Leica पोर्ट्रेट मोड असे दोन खास मोड दिले असून त्यामध्ये घेतलेले फोटो अतिशय सुंदर दिसतात आणि स्किन टोन नैसर्गिक व ब्राइट राहतो.
व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठीही Xiaomi 17 अतिशय दमदार आहे; यात 8K 30fps वर व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते आणि सेल्फी कॅमेरातून 4K 60fps वर व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण HD क्वालिटीचे, स्पष्ट रंगांसह आणि प्रोफेशनल लुकमध्ये मिळतात.
Xiaomi 17 marathi स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत




| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 15(HyperOS 16.0) |
| प्रोसेसर | स्नॅपड्रॅगन 8 एलिट जन 5 |
| इंटरनल स्टोरेज | 256 GB |
| रॅम | 12 GB |
| सुरक्षा | इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर |
| बॅटरीची क्षमता | 7000 mAh |
| अॅडॉप्टर | 100W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.3 इंच (M10 डिस्प्ले पॅनल) |
| रिझोल्यूशन | 1220 x 2656 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IP68 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)पीक ब्राइटनेस :- 3500 निट्स 2)120Hz रिफ्रेश रेट 3)FHD+ |
| सेंसर | 1)प्रॉक्सिमिटी सेन्सर 2)ई-कंपास 3)लाईट सेन्सर 4)ॲक्सेलरोमीटर 5)जायरोस्कोप 6)बारोमीटर |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल वाईड + 50 मेगापिक्सेल टेलिफोटो सेन्सर + 50 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 8K,4K,1080P, 720P |
| ऑडिओ | स्टीरिओ स्पीकर्स |
| रंग | 1)व्हाईट 2)ब्लॅक 3)ब्लू 4)पिंक |
| कनेक्टिविटी | 5G, 4G, 3G, 2G ब्लूटूथ v5.4, Wi-Fi 7 |
| (xiaomi 17 marathi price)किंमत | ₹56,000 |
चीनमध्ये Xiaomi 17 चे तीन व्हेरियंट्स लॉन्च करण्यात आले आहेत — 12GB+256GB व्हेरियंटची किंमत ₹56,000, 12GB+512GB व्हेरियंटची किंमत ₹60,000 आणि 16GB+512GB व्हेरियंटची किंमत ₹62000 आहे. भारतात हा स्मार्टफोन कधी लॉन्च होणार आहे हे अजून अधिकृतपणे जाहीर झालेले नाही, पण माझ्या अंदाजानुसार डिसेंबर 2025 च्या शेवटी किंवा जानेवारी 2026 पर्यंत Xiaomi 17 भारतात लॉन्च होऊ शकतो.
शाओमीने ने 17 सिरीज लॉन्च करून खरंच एक जबरदस्त कामगिरी केली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Xiaomi 17 पेक्षा अजून भन्नाट स्मार्टफोन आपण पाहणार आहोत आणि ते म्हणजे ह्याच सिरीजमधील Xiaomi 17 Pro आणि 17 Pro Max. हे जगातील पहिले दोन स्मार्टफोन आहेत ज्यामध्ये ड्युअल स्क्रीन दिली आहे, म्हणजेच फोनच्या मागच्या बाजूला देखील Xiaomi ने स्क्रीन उपलब्ध करून दिली आहे.
17 Pro बद्दलची अधिक माहिती पुढील 1-2 दिवसांत तुम्हाला मिळेल. सर्वात आधी अपडेट्स वाचण्यासाठी आमच्या WhatsApp चॅनलला फॉलो करायला विसरू नका. लवकरच एका नव्या लॉन्चसह पुन्हा भेटूया!
