Whatsapp Security Update Marathi
WhatsApp ने आजपर्यंतचा सर्वात advanced Whatsapp Security Update Marathi लॉन्च केला आहे, ज्याला स्ट्रिक्ट अकाउंट सेटिंग्स असं म्हटलं जातं. हे सेटिंग ऑन केल्यावर WhatsApp वर सायबर हल्ल्यांचा धोका कमी होतो आणि तुमचे फोटो, फाइल्स किंवा इतर कोणतीही माहिती पूर्णपणे सुरक्षित राहते.
मेटा चं WhatsApp आता युनाइटेड स्टेट्स (US) मधील तिसरी अशी टेक कंपनी ठरली आहे जी आपल्या युजर्सना सर्वात अॅडव्हान्स्ड सिक्युरिटी प्रदान करते. Meta ही एकमेव कंपनी नाही जी अॅडव्हान्स्ड सिक्युरिटी अपडेट्स देते. याआधी 2022 मध्ये Apple ने iOS युजर्ससाठी लॉकडाउन मोड हे फीचर लॉन्च केलं होतं. त्यानंतर Alphabet कंपनीने ज्या अँड्रॉइड युजर्सना अधिक सुरक्षा आवश्यक असते त्यांच्यासाठी अॅडव्हान्स्ड प्रोटेक्शन मोड हे फीचर लॉन्च केलं.
WhatsApp ने आपल्या अधिकृत माहितीत असं सांगितलं आहे की काही युजर्स जसे की पत्रकार किंवा सार्वजनिक व्यक्ती जसे सेलिब्रिटीज आणि इन्फ्लुएन्सर्स यांच्यासाठी हे फीचर सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे.
काय आहे स्ट्रिक्ट अकाउंट सेटिंग्स (Strict Account Settings)?

WhatsApp ने असं सांगितलं आहे की स्ट्रिक्ट अकाउंट सेटिंग्स हे एक अत्यंत सुरक्षित अपडेट मानलं जाणार आहे. ज्यांना असं वाटतं की त्यांच्या WhatsApp वर सायबर हल्ल्याची शक्यता जास्त आहे त्यांनी हा पर्याय ऑन करू शकतात.
तुम्ही हे फीचर ऑन केल्यास अनोळखी नंबरवरून येणारे फोटो, डॉक्युमेंट्स किंवा लिंक्स ब्लॉक करू शकता. इतकंच नाही तर तुम्हाला कोण कॉल करू शकतो आणि कोण तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करू शकतो हेही WhatsApp ठरवू शकतं. या सेटिंगमुळे तुमचं WhatsApp अधिक सुरक्षित आणि सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहील.
तुम्ही MS Excel रोज वापरता का? मग या शॉर्टकट कीज तुम्हाला नक्कीच माहित असायला हव्यात, ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल.
Meta ने यासोबत असंही जाहीर केलं आहे की युजर चे फोटो, व्हिडिओ आणि मेसेजेस स्पायवेअर पासून सुरक्षित ठेवण्यासाठी रस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज चा वापर केला जात आहे. या प्रोग्रामिंग लँग्वेज मुळे तुम्ही निर्धास्तपणे चॅट, तसेच फोटो, व्हिडिओ किंवा डॉक्युमेंट्स इतरांसोबत शेअर करू शकता.
स्ट्रिक्ट अकाउंट सेटिंग्स(Strict Account Settings) ऑन कशी करायची?
Step 1: तुमच्या फोनमध्ये WhatsApp अॅप ओपन करा.
Step 2:- ओपन केल्यानंतर तीन डॉट्सवर क्लिक करा आणि Settings या पर्यायावर क्लिक करा.
Step 3:- Settings मध्ये गेल्यावर Privacy या पर्यायावर क्लिक करा.
Step 4:- Privacy पर्याय उघडल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि Advanced या पर्यायावर क्लिक करा.
Step 5:- Advanced मध्ये गेल्यावर Strict Account Settings वर क्लिक करा आणि सर्व अटींसाठी Agree बटणावर क्लिक करा.
Step 6:- त्यानंतर Strict Account Settings हा पर्याय ऑन करण्यापूर्वी तुम्हाला 6 अंकी PIN सेट करण्यास सांगितले जाईल.
एकदा तुम्ही 6 अंकी PIN सेट केला की स्ट्रिक्ट अकाउंट सेटिंग्स हे फीचर ऑन होईल आणि तुमचं WhatsApp सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहील. तुम्हाला जर हे स्ट्रिक्ट अकाउंट सेटिंग्स(Strict Account Settings) चं ऑप्शन दिसत असेल तर आत्ताच ते ऑन करा आणि सायबर हल्ल्यांपासून दूर रहा
तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन टिप्ससाठी आपल्या लेखकाची टिप्पणी WhatsApp चॅनलला फॉलो करा आणि सर्वात आधी नवीन टिप मिळवा.
