व्हॉट्सअ‍ॅप ची ही सेटिंग आता ऑन करा! म्हणजे हॅकर्सपासून सावध राहाल

बऱ्याचदा आपल्याला माहिती नसते, पण काही जण आपलं व्हॉट्सअ‍ॅप हॅक करून वापरत असतात. त्यामुळे आपले चॅट्स, डॉक्युमेंट्स, फोटोज आणि बरंच काही ते पाहू शकतात आणि वापरू शकतात. तर व्हॉट्सअ‍ॅपचे(whatsapp security settings marathi) हे सेटिंग ऑन केल्याने तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल, जर कुणी तुमचं व्हॉट्सअ‍ॅप लॉगिन केलं असेल तर.

आता हे कसं करायचं? चला तर मग बघूया! आधी मी तुम्हाला Android मध्ये ही सेटिंग कशी करायची ते सांगतो, मग iPhone मध्ये ही सेटिंग कशी करायची ते देखील सांगतो.

Android Whatsapp सेटिंग

स्टेप 1:- व्हॉट्सअ‍ॅपमध्ये जाऊन सेटिंग उघडा (3 डॉट्सवर क्लिक करा आणि मग “Settings” या ऑप्शनवर क्लिक करा).

स्टेप 2:- सेटिंगमध्ये गेल्यानंतर “Account(अकाउंट)” या ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 3:- अकाउंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला “Security notifications“(सिक्युरिटी नोटिफिकेशन्स) हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

स्टेप 4:- “Security notifications” वर क्लिक केल्यावर तुम्हाला “Show security notifications on this phone” हे ऑप्शन दिसेल, ते ऑन करा.

Iphone Whatsapp सेटिंग

स्टेप 1:- व्हॉट्सअ‍ॅप उघडल्यानंतर सेटिंग्स पर्यायात जा.

स्टेप 2:- सेटिंग्जमध्ये गेल्यावर अ‍ॅकाउंट (Account) या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 3:- क्लिक केल्यावर सिक्युरिटी नोटिफिकेशन्स (Security notifications) हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

स्टेप 4:- सिक्युरिटी नोटिफिकेशन्समध्ये “Security notifications on this phone” हा पर्याय ऑफ असेल तर तो ऑन करा.

ही स्टेप्स नीट फॉलो करा आणि तुमचं व्हॉट्सअ‍ॅप सुरक्षित ठेवा. आता कुणीही व्हॉट्सअ‍ॅप लॉगिन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. तुम्हाला कशी वाटली ही(whatsapp security settings marathi) माहिती ते कमेंट करून नक्की सांगा.

अशाच नवीन माहितीसाठी पेजला सबस्क्राइब करा आणि LT फॅमिली चे सदस्य बना. पुन्हा भेटूया नवीन टीप सोबत.

हे पण वाचा:- Instagramचं हे नवीन फीचर मित्र किंवा मैत्रिणीसोबत नक्की ट्राय करा!

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment