आपण सगळेच जण WhatsApp हे अॅप रोज वापरतो, पण खूप लोकांना कोणते नवीन अपडेट आले आहेत हे अजून माहितच नाही. ते फक्त अपडेट आले की अपडेट करतात आणि रोजच्या वापरासारखंच वापरायला लागतात. प्रत्येक अपडेटमध्ये काही ना काही नवीन फीचर्स जोडले जातात, आणि यात अशी काही फीचर्स असतात जी आपला वेळ आणि मेहनत वाचवतात.
तर आज आपण आत्ताच्या लेटेस्ट WhatsApp मध्ये कोणकोणते नवीन अपडेट्स आले आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. आत्ताच्या नवीन अपडेट मध्ये खूप साऱ्या नवीन फीचर्स देण्यात आल्या आहेत आणि अशीही काही फीचर्स आहेत ज्यासाठी आपल्याला आधी वेगळं अॅप वापरावं लागायचं पण ती आता थेट WhatsApp मध्येच उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
चला तर मग पाहूया कोणते नवीन अपडेट्स WhatsApp मध्ये आले आहेत जे तुम्ही रोजच्या वापरात उपयोगात आणू शकता आणि तुमचा वेळही वाचवू शकता.
Whatsapp Latest Updates Marathi
1) सर्वात पहिलं अपडेट म्हणजे आता WhatsApp ग्रुपमध्ये कोण-कोण ऑनलाइन आहे हे तुम्हाला दिसणार आहे. ग्रुप मध्ये गेल्यावर ग्रुपच्या नावाखाली तुम्हाला सध्या किती जण ऑनलाइन आहेत हे स्पष्ट दिसेल.
2) दुसरं अपडेट- तुम्ही अनुभवले असेल की ग्रुपमध्ये कोणीही मेसेज टाकला की लगेच फोनचा आवाज येतो आणि बहुतेक वेळा ते मेसेज आपल्यासाठी उपयोगाचे नसतात. हे नोटिफिकेशन आता आणखी चांगल्या पद्धतीने नियंत्रित करता येणार आहे. आता हे नोटिफिकेशन तुम्ही कस्टमाइज देखील करू शकता, फक्त तेव्हाच नोटिफिकेशन येईल जेव्हा कोणीतरी तुमचं नाव टॅग करून मेन्शन करेल किंवा तुमच्या फोनमध्ये सेव्ह असलेल्या कॉन्टॅक्ट्सपैकी कोणी मेसेज पाठवेल.
खूप वेळा ग्रुपमध्ये लोक सतत चॅट करत असतात आणि कोणतंही मेसेज आलं की लगेच आपल्या फोनवर नोटिफिकेशन येतं हे खूप त्रासदायकही होतं. मात्र हा नवीन अपडेट अनेक लोकांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे हे नक्की!
3) पुढचा अपडेट आहे इव्हेंट तयार करून ठेवण्याचा. समजा तुम्ही कोणासोबत चॅट करत आहात आणि तुम्ही दोघांनी मिळून मूव्ही बघायला जाण्याचा प्लॅन केला आहे. तर आता तुम्ही चॅटमध्येच जाऊन Create Event या पर्यायातून थेट इव्हेंट तयार करू शकता. तिथे तुम्हाला इव्हेंट किती वाजता सुरू होणार, किती वाजता संपणार, कॉल टाईप असे सर्व पर्याय पाहायला मिळतील.
4) WhatsApp मध्ये आता डॉक्यूमेंट स्कॅनिंग हे नवीन फीचर आले आहे. परंतु हे फीचर सध्या फक्त iPhone वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही अटॅचमेंट (Attachment) मध्ये जाऊन डॉक्युमेंट स्कॅनिंग (Document Scanning) या पर्यायावर क्लिक करा आणि WhatsApp मधूनच तुमचे डॉक्यूमेंट स्कॅन करून थेट पाठवू शकता.
5) या अपडेटमध्ये चॅट्ससाठी अॅडव्हान्स्ड चॅट प्रोटेक्शन(Advanced Chat Protection) हे फीचर दिले गेले आहे. तुम्ही कोणासोबत अशा गोष्टींबद्दल चॅट करत असाल ज्या संवेदनशील आहेत किंवा त्या चॅटला कुणी वाचू नये, एक्सपोर्ट करू नये किंवा त्यातील मीडिया फाइल्स आपोआप डाउनलोड होऊ नयेत तर हे फीचर तुम्हाला खूप उपयोगी पडते. हे फीचर प्रायव्हसीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त आहे.
हे ऑप्शन ऑन करण्यासाठी ज्याच्या चॅटमध्ये हे फीचर वापरायचे आहे त्या व्यक्तीच्या प्रोफाइल मध्ये जा. खाली तुम्हाला Advanced Chat Privacy हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा आणि ते बटण ऑन करा.
6) WhatsApp मध्ये तुम्ही आता अगदी Zoom या अॅप सारखे कॉल शेड्यूल करू शकता. तुम्हाला जर मित्रांसोबत किंवा कुटुंबा सोबत रात्री बोलायचे असेल तर तुम्ही तो कॉल शेड्यूल करून ठेवू शकता आणि त्याचा एक नोटिफिकेशन मेसेज त्यांना पाठवला जाईल.
7) तुम्हाला जर कोणीतरी इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषेत मेसेज पाठवला आणि ती भाषा तुम्हाला येत नसेल पण तरीसुद्धा तो मेसेज वाचायचा असेल तर यासाठी WhatsApp ने एक नवीन फीचर दिले आहे मेसेज ट्रान्सलेशन(Message Translation).
त्या मेसेजवर क्लिक करून धरून ठेवा आणि वर दिसणाऱ्या तीन डॉट्स वर क्लिक करा. तेव्हा तुम्हाला अनुवाद (Translate) हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्हाला कोणत्या भाषेत तो मेसेज वाचायचा आहे ती भाषा निवडा.
8) हा फीचर अजून WhatsApp मध्ये आलेला नाही पण लवकरच येणार आहे तो म्हणजे व्हॉट्सअॅप युजरनेम (WhatsApp Username). हो आता तुम्हाला इन्स्टाग्राम सारखा युजरनेम देखील तयार करता येणार आहे. ज्यांच्याकडे तुमचा मोबाईल नंबर नाही, आणि त्यांनी तुम्हाला मेसेज पाठवला तर तो मेसेज थेट तुमच्या रिक्वेस्ट्स फोल्डरमध्ये जाईल. तिथे जाऊन तुम्ही तो मेसेज सहज वाचू शकता.
तर हे होते Whatsapp Latest Updates Marathi चे सध्याचे नवीनतम फीचर्स जे या अपडेटमध्ये आले आहेत. या पैकी तुम्ही कोणते फीचर वापरणार आहात किंवा तुम्हाला कोणते फीचर सर्वात जास्त आवडले कमेन्ट करून नक्की सांगा.
