Vivo X300 Pro ज्यात 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे जो DSLR सारखा वापरू शकता.

Vivo X300 Pro आला ! 200MP कॅमेरा, Sony LYT–828 सेन्सर, 6510 mAh बॅटरी आणि DSLR लेव्हल कॅमेरासह! जाणून घ्या संपूर्ण Vivo x300 pro marathi मधुन.

Vivo X300 Pro Marathi

विवोने लाँच केला आहे असा एक फ्लॅगशिप लेव्हल कॅमेरा स्मार्टफोन जो आजपर्यंत पाहिलाच नसेल. Vivo X300 Pro ज्याला कॅमेर्‍यांचा राजा असे म्हटले जाते आणि विवोची ही X सीरिज ही उत्कृष्ट कॅमेरा क्वालिटीसाठी ओळखली जाते.

आपण जर पाहिले तर, विवो आपल्या X सीरिजमधील प्रत्येक नव्या स्मार्टफोनमध्ये कॅमेऱ्यात सतत सुधारणा करत आहे आणि त्यामुळे आज विवो हा ब्रँड विशेषतः कॅमेरासाठी ओळखला जातो. तुम्ही पाहिलेच असेल मागच्या वर्षी Vivo X200 लाँच झाला होता आणि त्याचा कॅमेरा देखील जबरदस्त होता.

विवोने त्यांच्या होमटाउन चीनमध्ये झालेल्या इव्हेंटमध्ये ऑक्टोबर 2025 मध्ये Vivo X300 आणि Vivo X300 Pro हे दोन व्हेरिएंट लाँच केले आहेत. भारतातही हे दोन्ही व्हेरिएंट लाँच होणार आहेत पण भारतात हे नेमके कधी लाँच होतील हे अद्याप निश्चित झालेले नाही. माझ्या मते बहुतेक नोव्हेंबर 2025 किंवा डिसेंबर 2025 मध्ये हे दोन्ही व्हेरिएंट भारतात लाँच होऊ शकतात.

चला तर पाहूया vivo x300 pro marathi मध्ये कोणता कॅमेरा आणि आणखी कोणती नवी वैशिष्ट्ये दिली आहेत जी एका DSLR लाही मागे टाकू शकतात.

Vivo X300 Pro डिस्प्ले

विवोने यात एक प्रिमियम डिस्प्ले दिला आहे जो 6.78 इंच 1.5K एमोलेड डिस्प्ले आहे आणि दिसायला खूप मोठा व आकर्षक वाटतो. व्हिडिओंबद्दल बोलायचं झालं तर, यातले व्हिडिओ अत्यंत क्लिअर, व्हायब्रंट आणि नैसर्गिक दिसतात. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी यात आर्मर ग्लास प्रोटेक्शन दिलं आहे, जे फोनच्या डिस्प्लेला कोणतंही नुकसान होऊ देत नाही.

विवोने यात आता iPhone सारखा शॉर्टकट बटण (Action Button) सुद्धा दिला आहे. हे शॉर्टकट बटण तुम्ही दाबून ठेवले तर फोनला साइलेंट, रिंग किंवा व्हायब्रेट मोडमध्ये ठेवू शकता. दोन वेळा दाबल्यावर फ्लॅशलाइट सुरू होते. तसेच सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्ही स्वतः ठरवू शकता की दोन वेळा दाबल्यावर नेमकं काय उघडायचं जसं की कॅमेरा, फ्लॅशलाइट, रेकॉर्ड, सॉंग रेकग्निशन, ब्लू AI किंवा कुठलाही ॲप.

X300 Pro चा डिस्प्ले जर आपण X200 Pro सोबत तुलना केली तर दोन्हीमध्ये फारसा फरक नाही, जवळजवळ सर्व काही समान आहे.
फक्त एकच बदल करण्यात आला आहे X200 Pro मध्ये क्वाड कर्व्ह्ड डिस्प्ले होता तर आता X300 Pro मध्ये पूर्ण फ्लॅट डिस्प्ले दिलं आहे.

Vivo X300 Pro प्रोसेसर

परफॉर्मन्ससाठी विवोने यात मीडियाटेक चा नवीन डायमेन्सिटी 9600 प्रोसेसर दिला आहे जो 3nmचा प्रोसेसर आहे. तुम्ही या फोनमध्ये कोणताही गेम खेळलात तरी तो अगदी स्मूद चालणार. यात तुम्हाला दोन मोड मिळतात जे गेमिंग मध्ये खूप कामी येणार आहेत एक म्हणजे गेमिंग मोड आणि दुसरा बूस्ट मोड. गेमिंग मोड मध्ये तुम्ही गेम वेगाने आणि बिना लेगचा खूप छान खेळू शकता आणि बूस्ट मोड हा मल्टिटास्किंग किंवा रोजच्या वापरासाठी उपयुक्त आहे.

विवोने आधी X200 Pro मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9400 प्रोसेसर दिला होता पण आता X300 Pro मध्ये नवीन आणि अधिक पॉवरफुल मीडियाटेक डायमेन्सिटी 9600 प्रोसेसर दिला आहे. आपण असं म्हणू शकतो की फक्त कॅमेरामध्येच नाही तर फोनच्या परफॉर्मन्स मध्येही काही कमी ठेवलेली नाही.

Vivo X300 Pro कॅमेरा

आता येऊ या त्या गोष्टीकडे, ज्यासाठी Vivo हा ब्रँड प्रसिद्ध आहे ते म्हणजे कॅमेरा. Vivo X300 Pro मध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. कॅमेरामध्ये विवोने ZEISS सोबत काम करून कॅमेरा क्वालिटी आणखी सुधारली आहे. या फोनचं खास वैशिष्ट्य म्हणजे विवोने यात 200MP पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा दिला आहे.

याव्यतिरिक्त पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा मध्ये विवोने Samsung सोबत हातमिळवणी करून त्यात Samsung चा HPB सेन्सर दिला आहे. तसेच विवोने यात आणखी दोन महत्त्वाचे सेन्सर्स दिले आहेत लेझर ऑटो फोकस सेन्सर आणि कलर स्पेक्ट्रम सेन्सर.

vivo x300 pro marathi

X200 Pro या व्हेरिएंटकडे पाहिलं तर आधी त्यात टेलिफोटो कॅमेऱ्यात HP9 हा सेन्सर दिला होता पण आता Samsung सोबत हातमिळवणी करून HPB हा नवीन सेन्सर देण्यात आला आहे. या अपडेटमुळे तुमच्या फोटोमधील क्लॅरिटी आणखी वाढवण्यात आली आहे.

कॅमेऱ्यात आणखी पाहिलं तर यात Sony चा LYT–828 हा सेन्सर मिळणार आहे म्हणजे फोटोमध्ये तुम्हाला कोणतीही कमतरता जाणवणार नाही अतिशय सुंदर आणि पूर्णपणे स्पष्ट फोटो मिळतील यात काही शंका नाही. सेन्सरमध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. आधी X200 Pro मध्ये Sony LYT–818 हा सेन्सर दिला होता पण आता X300 Pro मध्ये Sony LYT–828 हा सेन्सर देण्यात आला आहे, ज्यामुळे कॅमेऱ्याची क्वालिटी आणखी सुधारली आहे.

लोकांना Vivo चे कॅमेरे इतके का आवडतात याची दोन मुख्य कारणे आहेत. पहिले म्हणजे कॅमेरा क्वालिटी जी प्रत्येक वर्षी विवोच्या स्मार्टफोन्समध्ये सतत सुधारत जाते आणि दुसरे म्हणजे विवोच्या फोनमध्ये दिलेले अनेक आकर्षक फिल्टर्स जे लोकांना खूप आवडतात. हे फिल्टर्स फक्त देण्यासाठी दिलेले नसून लोकांच्या आवडीनुसार तयार केलेले असतात जे त्यांच्या फोटोंना अजून चार चाँद लावतात.

कॅमेऱ्यात VS1 आणि VS3+ चिपसेट्स

vivo x300 pro marathi

कॅमेरासाठी विवोने यात VS1 आणि VS3+ हे दोन चिपसेट्स दिले आहेत. आता हे चिपसेट्स काय करतात तर जेव्हा तुम्ही फोटो काढता तेव्हा त्या फोटोची प्रोसेसिंग होण्यासाठी थोडा वेळ लागतो. या प्रोसेसिंगला जलद, स्पष्ट, व्हायब्रंट आणि उत्कृष्ट रंगांसह दाखवण्यासाठी हे चिपसेट्स मदत करतात. त्यामुळे फोटोंची प्रोसेसिंग स्पीड आणि क्वालिटी दोन्हीही आणखी वाढतात.

खास जिओ ग्राहकांना मिळणार ₹३५,००० प्लॅन अगदी मोफत तेही पूर्ण १८ महिन्यांसाठी! आत्ताच फायदा घ्या.

व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही 8K 30FPS, 4K 30FPS आणि 1080P 30FPS किंवा 60FPS मध्ये शूट करू शकता. तसेच सेल्फी आणि रिअर कॅमेऱ्यामधून तुम्ही 4K 60FPS मध्येही शूट करू शकता. व्हिडिओ क्वालिटी अतिशय जबरदस्त येते प्रत्येक वस्तू नैसर्गिक, उजळ आणि रंगीबेरंगी दिसते.

Vivo X300 Pro बॅटरी

बॅटरी मध्ये यावेळी एक मोठं अपग्रेड करण्यात आलं आहे. X200 Pro मध्ये आपल्याला 6000 mAh ची बॅटरी मिळत होती पण आता Vivo ने ती वाढवून 6510 mAh बॅटरी दिली आहे ज्यासोबत 90W फास्ट चार्जिंग आणि 40W वायरलेस चार्जिंग सुद्धा उपलब्ध आहे.

फास्ट चार्जिंग असल्यामुळे तुमचा फोन फक्त एका तासात पूर्ण चार्ज होऊ शकतो आणि एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर दिवसभर फोन चार्जिंगला लावण्याची गरज नाही कारण या फोनची बॅटरी इतक्या लवकर उतरतेच नाही.

Vivo ने फक्त कॅमेरा आणि प्रोसेसरमध्येच नाही तर बॅटरीमध्येही उत्कृष्ट अपग्रेड केलं आहे. मोठी बॅटरी असल्यामुळे चार्ज संपण्याची काळजी राहत नाही आणि एकदा पूर्ण चार्जिंग केल्यानंतर दिवसभर वापरला तरी काही अडचण येत नाही.

Vivo X300 Pro Marathi स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत (Vivo x300 pro specifications and price)

vivo x300 pro marathi
फॅन्टम ब्लॅक
vivo x300 pro marathi
क्लाऊड व्हाईट
vivo x300 pro marathi
मिस्ट ब्लू
vivo x300 pro marathi
ड्यून ब्राउन
ऑपरेटिंग सिस्टमअँड्रॉइड 16(Origin OS 15)
4 वर्षे ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट्स + 7 वर्षे सुरक्षा अपडेट्स
प्रोसेसरमीडियाटेक डायमेन्सिटी 9600
इंटरनल स्टोरेज256 GB
रॅम12GB
सुरक्षाइन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर
बॅटरीची क्षमता6510 mAh
अ‍ॅडॉप्टर90W
पोर्ट्सटाइप – C पोर्ट
डिस्प्ले आकार6.67 इंच (एमोलेड डिस्प्ले)
रिझोल्यूशन1260 x 2800 पिक्सेल
पाणी संरक्षणIP68, IP69 जल-प्रतिरोधक डिझाइन
डिस्प्ले तंत्रज्ञान1)120Hz रिफ्रेश रेट
2)पीक ब्राइटनेस:- 4500 निट्स
3)HDR+
सेंसर1)प्रॉक्सिमिटी सेन्सर
2)जायरोस्कोप
3)ई-कंपास
4)ॲक्सेलरोमीटर
5)लाईट सेन्सर
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल ZEISS वाइड-अँगल कॅमेरा
2)पाठीचा कॅमेरा:- 200 MP ZEISS
APO टेलिफोटो कॅमेरा + 50 मेगापिक्सेल ZEISS अल्ट्रा वाइड-अँगल कॅमेरा JN1 + 50 मेगापिक्सेल ZEISS गिंबल-ग्रेड मेन कॅमेरा Sony LYT-828 
3)फुल एचडी रेकॉर्डिंग
4)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 8K, 4K, 1080P, 720P
ऑडिओस्टीरिओ स्पीकर्स
रंग1)ड्यून ब्राउन
2)फॅन्टम ब्लॅक
3)क्लाऊड व्हाईट
4)मिस्ट ब्लू
कनेक्टिविटी5G, 4G, 3G, 2G
ब्लूटूथ v5.4, Wi-Fi 7
(vivo x300 pro marathi price)किंमत₹66,085

चीनमध्ये विवोने X300 Pro चे दोन व्हेरिएंट्स लाँच केले आहेत 12GB + 256GB आणि 16GB + 1TB. 12GB + 256GB या व्हेरिएंटची किंमत vivo x300 pro price चीनमध्ये CNY 5,299 आहे जी भारतात रूपांतरित केली तर सुमारे ₹66,085 होते तर 16GB + 1TB या व्हेरिएंटची किंमत सुमारे ₹1,03,499 इतकी आहे. भारतामध्ये हा फोन लाँच झाला तर किंमत थोडी वाढण्याची शक्यता नक्कीच आहे.

फोनकडे पाहिलं तर विवोने खरंच एक शक्तिशाली स्मार्टफोन तयार केला आहे DSLR सारखा कॅमेरा आणि प्रिमियम फीचर्स यांसह हा फोन भारतीय बाजारात नक्कीच गाजवणार आहे.हा फोन iPhone 17, iPhone 17 Pro Max, Samsung S25, iQOO 15 आणि OnePlus 15 सारख्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सशी थेट स्पर्धा करू शकतो.

तुम्हाला या vivo x300 pro marathi फोनमधली कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. भेटू या पुन्हा एका नव्या स्मार्टफोन लॉन्चसोबत!

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment