Vivo V70 Specs Marathi
Vivo ने त्यांच्या सर्वांना आवडणाऱ्या V सीरीज मध्ये आणखी दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यावेळी Vivo ने एक नाही तर दोन स्मार्टफोन Vivo V70 आणि Vivo V70 Elite बाजारात आणले आहेत. तुम्हाला माहीतच असेल की Vivo ची V सीरीज ही लुक्स, डिझाइन आणि कॅमेरा साठी ओळखली जाते पण आता Vivo ने यामध्ये अजून एक नवी ओळख जोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती म्हणजे परफॉर्मन्स.
V70 चा मागचा व्हर्जन म्हणजे Vivo V60 आणि Vivo V60e या दोन्ही स्मार्टफोन्सना लोकांनी भरभरून प्रेम दिल्यानंतर त्यांच्या सक्सेसर म्हणून Vivo ने V70 आणि Vivo V70 Elite हे मॉडेल्स लॉन्च केले आहेत. आपण जर Vivo V70 आणि Vivo V70 Elite या मॉडेल्सकडे पाहिलं तर दोन्हींच्या डिझाइनमध्ये फारसा काही फरक नाही फरक असेल तर तो फक्त प्रोसेसर मध्येच दिसून येतो.
तुमचा जर असा प्लॅन ठरला असेल की नवीन V70 सीरीज मधला फोन घ्यायचा आहे पण Vivo V70 घ्यायचा की Vivo V70 Elite घ्यायचा यामध्ये तुम्हाला संभ्रम असेल तर आज मी तुमचा हा संभ्रम पूर्णपणे दूर करणार आहे. आज आपण Vivo V70 आणि Vivo V70 Elite या दोन्ही स्मार्टफोन बद्दल संपूर्ण माहिती अगदी स्पष्टपणे पाहणार आहोत.
तुम्ही हा लेख पूर्ण वाचल्यानंतर तुमचा सगळा संभ्रम पूर्णपणे गायब होईल. चला तर मग सुरू करूया Vivo V70 Specs Marathi लेख.
Vivo V70 & Vivo V70 Elite डिस्प्ले
Vivo V70 आणि Vivo V70 Elite मध्ये तुम्हाला मोठी 6.59 इंच 1.5K OLED डिस्प्ले मिळणार आहे. एवढंच नाही तर Vivo ने यावेळी डिस्प्लेमध्ये एक महत्त्वाचा अपग्रेड केला आहे जो लोकांना नक्कीच आवडेल. तो अपडेट म्हणजे V70 आणि V70 Elite मध्ये आता तुम्हाला फ्लॅट स्क्रीन डिस्प्ले मिळणार आहे.
आपण जर मागच्या मॉडेल्सकडे पाहिलं तर V60 मध्ये कर्व्ड डिस्प्ले मिळत होता पण आता त्याला अपग्रेड करून V70 मध्ये फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे. व्हिडिओ क्वालिटीबद्दल बोलायचं झालं तर V70 आणि V70 Elite च्या फ्लॅट डिस्प्ले डिस्प्ले मुळे तुम्हाला पूर्णपणे ब्राइट, कलरफुल आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये व्हिडिओ पाहायला मिळतील.
दोन्ही स्मार्टफोन्सच्या डिझाइनमध्ये फारसा काही फरक नाही. फक्त कॅमेरा मॉड्यूल आता स्क्वेअर डिझाइन मध्ये मिळणार आहे. V60 मध्ये कॅमेरा व्हर्टिकल मॉड्यूल डिझाइन मध्ये होता. Vivo V70 आणि Vivo V70 Elite हे फोन हलक्या आणि स्लिम डिझाइन मध्ये तयार केले आहेत. वजनाबद्दल पाहिलं तर Vivo V70 Elite चे वजन 196 ग्रॅम आहे आणि Vivo V70 Elite चे वजन देखील 196 ग्रॅमच आहे.
बिल्ड क्वालिटी बद्दल बोलायचं झालं तर Vivo ने याची चांगली काळजी घेतली आहे. Vivo ने यासाठी स्कॉट एक्सेन्शन कोअर प्रोटेक्शन दिलं आहे ज्यामुळे फोन चुकून खाली पडला तरी सहज नुकसान होणार नाही. यासोबतच फक्त बिल्ड क्वालिटी नाही तर फोन चुकून पाण्यात पडला किंवा धुळीपासून सुरक्षित राहावा यासाठी यात IP68 आणि IP69 जल-प्रतिरोधक डिझाइन देण्यात आलं आहे. म्हणजेच फोन पाण्यात पडला तरी जास्त ताण घेण्याची गरज नाही.
Vivo V70 & Vivo V70 Elite कॅमेरा
विवो ने या मॉडेल मध्ये कॅमेरासाठी त्यांच्या सोबत कायम काम करून कॅमेरा डिझाइन करणाऱ्या Zeiss सोबत हातमिळवणी केली आहे. V सीरीज मध्ये लोकांना जर एखादी गोष्ट विशेष आवडत असेल तर ती म्हणजे कॅमेरा. Vivo V सीरीज मध्ये कॅमेरा नेहमीच उत्तम प्रकारे सुधारलेला असतो, ज्यामुळे तुमचे फोटो आणि व्हिडिओ अधिक दर्जेदार आणि स्पष्ट येतात.
Vivo V70 आणि V70 Elite मध्ये कॅमेरा सेटअप सारखाच मिळणार आहे. यात 8 मेगापिक्सेल ZEISS अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, 50 मेगापिक्सेल ZEISS OIS टेलीफोटो कॅमेरा (Sony IMX882 sensor सोबत) आणि 50 मेगापिक्सेल ZEISS OIS मेन कॅमेरा (Sony LYT-700V sensor सोबत) असे कॅमेरे देण्यात आले आहेत.

सेल्फी कॅमेरा तुम्हाला दोन्ही मॉडेल मध्ये 50 मेगापिक्सेल ZEISS ग्रुप सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. मागील मॉडेलकडे पाहिलं तर Vivo V60 मध्ये आणि आता V70 च्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये फारसा काही फरक दिसणार नाही. तोच समान कॅमेरा सेटअप पुन्हा V70 सीरीज मध्ये देण्यात आला आहे.
फोटोच्या क्वालिटी कडे पाहिलं तर फोटो अक्षरशः सुंदर, क्लिअर क्वालिटी, ब्राइट आणि नॅचरल येतात. सध्याच्या V70 सीरीज कडे पाहिलं तर कॅमेरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. Vivo V60 सीरीज पेक्षा अधिक चांगला कॅमेरा V70 सीरीज मध्ये देण्यात आला आहे.
Vivo V70 & Vivo V70 Elite प्रोसेसर
सर्वात महत्त्वाचा फरक तुम्हाला प्रोसेसर मध्ये पाहायला मिळणार आहे. हो Vivo V70 आणि V70 Elite मध्ये वेगवेगळे चिपसेट दिले आहेत. Vivo V70 Elite या टॉप व्हेरिएंट मध्ये स्नॅपड्रॅगन 8s जेन 4 चिपसेट मिळणार आहे तर बेस व्हेरिएंट Vivo V70 मध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 चिपसेट देण्यात आला आहे.

दोन्ही व्हेरिएंट मध्ये स्नॅपड्रॅगन सारखा पॉवरफुल प्रोसेसर मिळतो पण तुम्ही जर गेमिंग करत असाल तर तुम्हाला ग्राफिक्स मध्ये फरक जाणवेल. V70 Elite आणि V70 या दोन्ही मॉडेलमध्ये तुम्ही कोणतीही काळजी न करता हाय ग्राफिक्स वर गेमिंग करू शकता.
तुम्ही MS Excel रोज वापरता का? मग या शॉर्टकट कीज तुम्हाला नक्कीच माहित असायला हव्यात, ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल.
हाय ग्राफिक्स वर गेम खेळत असतानाही तुम्हाला V70 आणि V70 Elite मध्ये लॅगिंग जाणवणार नाही कारण स्नॅपड्रॅगन सारख्या पॉवरफुल प्रोसेसर मुळे परफॉर्मन्स उत्तम मिळतो. फक्त तुम्ही खूप वेळ गेम खेळत असाल, तर फोन थोडा गरम होत असल्याचं जाणवू शकतं. बाकी परफॉर्मन्स च्या दृष्टीकोनातून पाहिलं तर Vivo V70 आणि V70 Elite मध्ये तुम्हाला नक्कीच स्मूथ परफॉर्मन्स अनुभवायला मिळेल.
Vivo V70 & Vivo V70 Elite बॅटरी
बॅटरी बद्दल बोलायचं झालं तर Vivo V70 आणि V70 Elite मध्ये 6500mAh ची बॅटरी मिळणार आहे. यासोबत 90W फास्ट चार्जिंग अॅडॅप्टरही दिला जाणार आहे, ज्यामुळे फोन कमी वेळेत फुल चार्ज होतो. Vivo ने बॅटरी मध्ये कोणताही बदल केलेला नाही. V60 व्हेरिएंट मध्ये जितकी बॅटरी मिळत होती तितकीच बॅटरी V70 सीरीज मध्येही देण्यात आली आहे.
Vivo V70 आणि Vivo V70 Elite वैशिष्ट्ये (Vivo v70 specs marathi)



| Vivo V70 | Vivo V70 Elite | |
| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 16(OriginOS 16.0) 4 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 6 वर्षे सुरक्षा अपडेट्स | अँड्रॉइड 16(OriginOS 16.0) 4 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 6 वर्षे सुरक्षा अपडेट्स |
| प्रोसेसर | स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 | स्नॅपड्रॅगन 8s जेन 3 |
| इंटरनल स्टोरेज | 256 GB | 256 GB, 512 GB |
| रॅम | 8GB | 8GB, 12GB |
| सुरक्षा | 3D अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेन्सर | 3D अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेन्सर |
| बॅटरीची क्षमता | 6500 mAh | 6500 mAh |
| अॅडॉप्टर | 90W | 90W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.59 इंच (एमोलेड) | 6.59 इंच (एमोलेड) |
| रिझोल्यूशन | 2750 × 1260 पिक्सेल | 2750 × 1260 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IP68, IP69 जल-प्रतिरोधक डिझाइन | IP68, IP69 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)सामान्य ब्राइटनेस:- 5000 निट्स 2)120 हर्ट्झ रिफ्रेश रेट 3)टच स्क्रीन :- कॅपॅसिटिव मल्टी-टच 4) कलर गॅमट :- पी3 वाइड 5)HDR10+ | 1)सामान्य ब्राइटनेस:- 5000 निट्स 2)120 हर्ट्झ रिफ्रेश रेट 3) टच स्क्रीन :- कॅपॅसिटिव मल्टी-टच 4) कलर गॅमट :- पी3 वाइड 5)HDR10+ 6)पिक्सेल डेन्सिटी :- 459 PPI |
| सेंसर | 1)ॲक्सेलरोमीटर 2)प्रॉक्सिमिटी सेन्सर 3)अॅम्बियंट लाइट सेन्सर 4)जायरोस्कोप 5)ई-कंपास 6)इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल | 1)ॲक्सेलरोमीटर 2)प्रॉक्सिमिटी सेन्सर 3)अॅम्बियंट लाइट सेन्सर 4)जायरोस्कोप 5)ई-कंपास 6)इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल 7)कलर टेंपरेचर सेन्सर |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल Zeiss कॅमेरा 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल OIS मेन कॅमेरा + 50 मेगापिक्सेल OIS टेलीफोटो कॅमेरा + 8 मेगापिक्सेल वाईड अँगल कॅमेरा 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K,1080P, 720P | 1)सेल्फी कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल Zeiss कॅमेरा 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल OIS मेन कॅमेरा + 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा + 50 मेगापिक्सेल OIS टेलीफोटो कॅमेरा 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K,1080P, 720P |
| ऑडिओ | स्टीरिओ स्पीकर्स | स्टीरिओ स्पीकर्स |
| रंग | 1)पॅशन रेड 2)लेमन यलो | 1)पॅशन रेड 2)सॅन्ड बेज 3)ऑथेंटिक ब्लॅक |
| कनेक्टिविटी | 5G, 4G LTE, 3G, 2G ब्लूटूथ v5.4 | 2.4G, 5G ब्लूटूथ v5.4 |
| किंमत | ₹45,999 | ₹51,999 |
Vivo V70 आणि Vivo V70 Elite किंमत (vivo v70 specs marathi price)
भारता मध्ये Vivo V70 आणि Vivo V70 Elite ची किंमत कन्फर्म करण्यात आली आहे. Vivo V70 ची किंमत 45,999 रुपयांपासून सुरू होते. तुम्ही जसं स्टोरेज निवडाल तसं किंमत कमी-जास्त होत जाईल
V70 मध्ये तुम्हाला दोन व्हेरिएंट मिळणार आहेत. पहिला 8GB + 256GB, ज्याची किंमत 45,999 रुपये आहे आणि दुसरा 12GB + 256GB असा व्हेरिएंट उपलब्ध आहे.
टॉप व्हेरिएंट Vivo V70 Elite तुम्हाला तीन व्हेरिएंट मध्ये मिळणार आहे. यात 8GB + 256GB ची किंमत 51,999 रुपये आहे, 12GB + 256GB ची किंमत 56,999 रुपये आहे आणि 12GB + 512GB ची किंमत 61,999 रुपये आहे. मात्र हा 12GB + 512GB व्हेरिएंट फक्त एकाच रंगात उपलब्ध आहे तो म्हणजे पॅशन रेड. तुम्हाला जास्त स्टोरेजची गरज असेल तर 12GB + 512GB हा व्हेरिएंट पॅशन रेड या रंगातच घ्यावा लागेल.
