Vivo v60e marathi language
Vivo ने त्यांच्या V सिरीजमध्ये आणखी एक शानदार फोन Vivo V60e लाँच केला आहे. यावेळी Vivo ने E सिरीजमध्ये खूप बदल केले आहेत. तुम्ही जर पाहिलंत तर भारतात Vivo ने अनेक फोन लाँच केले आहेत — साधे-सुधे नाही, तर खूप छान आणि पैसे वसूल फोन मार्केट मध्ये आणले आहेत.
आपण Vivo V50e सोबत या Vivo V60e ची तुलना करणार आहोत — म्हणजेच या वेळी काय बदल केले आहेत आणि असे कोणते नवीन फीचर्स दिले आहेत जे Vivo V50e मध्ये नव्हते. चला तर पाहूया, काय खास आहे या नवीन फोनमध्ये!
डिस्प्ले
Vivo V60e च्या डिझाइनकडे पाहिलं तर तो खूप प्रीमियम फील देतो. स्लिम बॉडी आणि मॅट फिनिश असल्यामुळे फोन अजूनही अधिक आकर्षक दिसतो. या फोनचं डिझाइन अगदी Vivo V60 सारखंच आहे — जवळजवळ काहीच फरक नाही. बर्याच वेळा मोठी बॅटरी असली की फोनचं वजन वाढतं, पण या फोनमध्ये तसं नाही. मोठी बॅटरी असूनही Vivo V60e चं वजन फक्त 192 ग्रॅम आहे आणि जाडी फक्त 7.8 mm आहे.
डिस्प्ले पाहिलं तर, डिस्प्लेमध्ये काही मोठा बदल केलेला नाही. आधी जसा दिला होता तसाच 6.78-इंच क्वाड कर्व्ह्ड एमोलेड डिस्प्ले या फोनमध्ये मिळतो. फक्त एक छोटा अपडेट करण्यात आला आहे तो म्हणजे स्क्रीन प्रोटेक्शन मध्ये — आता तुम्हाला यात नवीन डायमंड शिल्ड ग्लास मिळणार आहे. त्यामुळे फोन खाली पडला तरी एवढं काही नुकसान होणार नाही. व्हिडिओज किंवा मूव्हीज पाहताना मोठ्या डिस्प्लेमुळे एकदम छान आणि प्रीमियम अनुभव मिळतो.
कॅमेरा
आता येऊ या कॅमेराकडे ज्याची खूप चर्चा चालू आहे. जितके लोक Vivo चा फोन घेतात त्याचं मुख्य कारण म्हणजे कॅमेरा आणि Vivo ही कंपनी कॅमेरासाठी पण ओळखली जाते.

ह्यावेळेस कॅमेरामध्ये एक मोठा बदल केला आहे तो म्हणजे आता Vivo V60e मध्ये तुम्हाला तब्बल 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा OIS सोबत मिळणार आहे. फोटो पूर्णपणे क्लियर, नैसर्गिक आणि खूपच छान येणार आहेत, आणि Vivo V50e पेक्षा खूप भारी फोटो येणार यात काही शंकाच नाही.
व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला 4K रेकॉर्डिंग मिळणार आहे आणि ते फक्त मुख्य कॅमेऱ्यातूनच नाही, तर सेल्फी कॅमेऱ्यातूनसुद्धा 4K रेकॉर्डिंग देण्यात आले आहे. 4K रेकॉर्डिंग मिळत असल्यामुळे व्हिडिओची क्वालिटी अतिशय उत्कृष्ट असणार आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणाचे व्हिडिओ काढायला विसरू नका, कारण तुम्ही जेव्हा हे व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्हाला खूपच छान, ब्राइट आणि नैसर्गिक क्वालिटीचे व्हिडिओ पाहायला मिळतील.
एक फीचर आहे जे प्रत्येक Vivo च्या V Series मध्ये पाहायला मिळतं ते म्हणजे मल्टी-फोकल पोर्ट्रेट मोड. यात तुम्हाला 4 पर्याय मिळणार आहेत — 23mm, 35mm, 50mm आणि 85mm. आता लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे आणि Vivo ने खास लग्नामध्ये वापरता येईल असं एक फीचर दिलं आहे ज्याला वेडिंग स्टाईल पोर्ट्रेट मोड म्हणतात. या मोडचा वापर करून तुम्ही लग्नामध्ये अतिशय सुंदर फोटो काढू शकता.
फीचर
Vivo ने कॅमेऱ्यामध्ये खूप सारे AI फीचर्स भरभरून दिले आहेत. जसे की, भारतातील पहिला फोन ज्याच्या कॅमेऱ्यामध्ये एआय फेस्टिव्हल पोर्ट्रेट मोड दिला आहे, जो तुमच्या फोटोंमध्ये लाइट अॅड करतो. मग येतो एआय फोर सीझन पोर्ट्रेट मोड, ज्यामध्ये तुमचे फोटो वसंत, उन्हाळा, शरद ऋतू आणि हिवाळा या चार ऋतूंमध्ये मिळतात.
एआय रिफ्लेक्शन हा फीचर तुमच्या फोटोंमधील अवांछित प्रतिबिंब (reflection) काढून टाकतो. एआय इरेझर या फीचरमुळे फोटोंमधील नको असलेल्या वस्तू काढून टाकता येतात, आणि एआय इमेज एक्सपँडर तुमचे फोटो अजून चांगल्या प्रमाणात (ratio) रूपांतरित करून देतो.
परफॉर्मन्स आणि बॅटरी
Vivo V60e मध्ये परफॉर्मन्स खूप जबरदस्त दिला आहे. Vivo ने यात मीडियाटेक डायमेन्सिटी 7360-टर्बो हा प्रोसेसर दिला आहे. मात्र, हा प्रोसेसर गेमिंगसाठी नाही. जर तुम्ही गेम खेळण्यासाठी फोन घ्यायचा विचार करत असाल, तर हा फोन तुमच्यासाठी योग्य नाही. पण दररोजच्या वापरासाठी, मल्टी-टास्किंगसाठी आणि थोड्या फार लाइट गेमिंगसाठी हा फोन अगदी छान कामगिरी करतो.

बॅटरी मध्ये Vivo ने यावेळी एक मोठं अपग्रेड केलं आहे. Vivo V60e आता 6500mAh ची बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंगसह येतो. आधीच्या Vivo V50e मध्ये 5600mAh ची बॅटरी होती, पण आता ती वाढवून 6500mAh करण्यात आली आहे. हा खरंच एक खूप चांगला अपग्रेड आहे जो Vivo युजर्स आणि चाहत्यांसाठी उत्तम काम केलं आहे.
Vivo V60e स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत


| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 15(Funtouch OS 15) 4 वर्षे ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट्स + 6 वर्षे सुरक्षा अपडेट्स |
| प्रोसेसर | मीडियाटेक डायमेन्सिटी 7360-टर्बो |
| इंटरनल स्टोरेज | 128 GB |
| रॅम | 8GB |
| सुरक्षा | इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर |
| बॅटरीची क्षमता | 6500 mAh |
| अॅडॉप्टर | 90W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.67 इंच (एमोलेड डिस्प्ले) |
| रिझोल्यूशन | 2392 × 1080 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IP68, IP69 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)रिफ्रेश रेट:- 120Hz 2)पीक ब्राइटनेस:- 1600 निट्स 3)कलर्स: 1.07 अब्ज रंग |
| सेंसर | 1)प्रॉक्सिमिटी सेन्सर 2)जायरोस्कोप 3)ई-कंपास 4)ॲक्सेलरोमीटर 5)अॅम्बियंट लाईट सेन्सर |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 200 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेल 3)फुल एचडी रेकॉर्डिंग (HDR 10+) 4)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K, 1080P |
| ऑडिओ | ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स |
| रंग | 1)एलीट पर्पल 2)नोबल गोल्ड |
| कनेक्टिविटी | 5G, 4G, 3G, 2G ब्लूटूथ v5.4, Wi-Fi |
| किंमत | ₹29,999 |
vivo v60e हा तुम्हाला 3 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे — 8GB + 128GB ज्याची किंमत ₹29,999 आहे, 8GB + 256GB ₹31,999 आणि 12GB + 256GB ज्याची किंमत ₹33,999 आहे. vivo चा हा पहिला फोन आहे ज्यात 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिलेला आहे आणि तोही ₹30,000 च्या आत.
आपण जर vivo v50e सोबत तुलना केली तर vivo ने यावेळी (vivo v60e marathi) खूप चांगले अपग्रेड केले आहेत — मग ते कॅमेरा असो, बॅटरी असो किंवा डिझाईन. आपण असं म्हणू शकतो की, ज्या गोष्टींची एका स्मार्टफोनमध्ये सर्वाधिक गरज असते त्या सगळ्या गोष्टी vivo ने सुधारल्या आहेत, आणि हे खरंच कंपनीचं एक उत्कृष्ट काम आहे.
तुमच्याकडे जर vivo V50e असेल तर कमेंट करून नक्की सांगा की त्या फोनबद्दल तुमचा अनुभव कसा आहे आणि आता नव्या vivo v60e marathi बद्दल तुमचं मत काय आहे. भेटूया एका नवीन लॉन्चसोबत!
