Vivo ने लॉन्च केला त्यांचा नवीन V60 मोबाईल – फोटोग्राफी प्रेमींसाठी खास मोबाईल,फक्त मोबाईल नाही, एक कॅमेरा मास्टरपीस.

Vivo ने लॉन्च केला सर्वांच्या आवडत्या V Series मधला आणखी एक शानदार स्मार्टफोन – Vivo V60. जर आपण Q2 2025 कडे पाहिले तर Vivo ने सर्वाधिक डिव्हाइसेस शिप केले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की लोकांचा या ब्रँडवरचा विश्वास आणि प्रेम सतत वाढत आहे. Vivo ची V Series ही अशी सिरीज आहे जी लोकांना खूप आवडते – मग तो डिझाईन असो, कॅमेरा असो किंवा परफॉर्मन्स.

आता पाहूया, या Vivo V60 मध्ये कोणते नवे फीचर्स दिले आहेत जे Vivo V50 पासून वेगळे आणि खास आहेत.

Vivo V60 डिस्प्ले, कॅमेरा, परफॉर्मन्स, AI फीचर्स

सुरुवात करू या डिस्प्लेपासून. V60 च्या डिस्प्ले कडे पाहिलं तर यात 6.77″ 1.5K अल्ट्रा स्लिम क्वाड कर्व्ड डिस्प्ले मिळतो. स्क्रीन साईजमध्ये काहीही बदल केलेला नाही; जितका Vivo V50 मध्ये होता तितकाच साईज यात दिला आहे. मात्र बदल फक्त एका गोष्टीत केला आहे – पीक ब्राइटनेस मध्ये. आधी 4500 nits ब्राइटनेस होता, पण आता तो वाढवून 5000 nits केला आहे. व्हिडिओ शूट केल्यानंतर किंवा यूट्यूबवर मूव्हीज पाहताना व्हिडिओतील रंग खूप नैसर्गिक दिसतील.

आता येऊ या त्या महत्त्वाच्या गोष्टीकडे ज्यासाठी Vivo ची V सीरीज खूप प्रसिद्ध आहे, ते म्हणजे कॅमेरा. विवो ने यावेळी कॅमेरामध्ये खूप चांगला अपग्रेड केला आहे. Vivo V60 मध्ये आता टेलिफोटो कॅमेरा दिला आहे, जो Vivo V50 मध्ये नव्हता. Vivo V60 मध्ये Sony IMX882 हा टेलिफोटो सेन्सर दिला आहे, जो Vivo च्याच आणखी एका फोनमध्ये (Vivo X200) दिला आहे. यामुळे तुमचे पोर्ट्रेट फोटो खूप कमाल आणि नैसर्गिक येतील. एवढंच नाही तर व्हिडिओ शूट करण्यासाठी वेगवेगळे मोड्स देखील दिले आहेत, जसे की डेली व्लॉग, वेडिंग व्लॉग आणि अजून बरेच मोड्स उपलब्ध आहेत.

परफॉर्मन्सकडे पाहिलं तर यामध्येही Vivo ने चांगला अपग्रेड केला आहे. Vivo V60 मध्ये तुम्हाला Snapdragon 7 Gen 4 हा दमदार प्रोसेसर मिळतो. Vivo V50 मध्ये Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर दिला होता, आणि आता त्याचं अपग्रेडेड व्हर्जन दिलं आहे. Snapdragon 7 Gen 4 हा खरोखरच एक पॉवरफुल प्रोसेसर आहे, जो डेली यूज किंवा मल्टीटास्किंगसाठीही अतिशय वेगाने चालतो.

Vivo V60 मध्ये AI फीचर्ससुद्धा असणार आहेत जसे की सर्चसाठी वर्तुळ, गूगल जेमिनी, एआय इमेज एक्स्पांडर आणि एक खास एआय फीचर – एआय मॅजिक मूव्ह. हे फीचर नक्की काय करतं? समजा तुम्ही एखादा फोटो काढला आणि त्या फोटोमध्ये काही वस्तू इकडून तिकडे हलवायच्या असतील, तर या फीचरच्या मदतीने तुम्ही ते सहज करू शकता.

चला तर पाहूया अजून कोणकोणते नवे फीचर्स किंवा अपग्रेड्स Vivo V60 मध्ये करण्यात आले आहेत. खाली दिलेल्या टेबलच्या मदतीने तुम्हाला सर्व फीचर्स स्पष्टपणे दिसतील.

Vivo V60 स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत(vivo v60 specifications marathi)

ऑपरेटिंग सिस्टमअँड्रॉइड 15(Funtouch OS 15)
3 वर्षे ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट्स + 4 वर्षे सुरक्षा अपडेट्स
प्रोसेसरस्नॅपड्रॅगन® 7 जनरेशन 4
इंटरनल स्टोरेज128 GB
रॅम8GB
सुरक्षाइन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर
बॅटरीची क्षमता6500 mAh
अ‍ॅडॉप्टर90W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार6.677 इंच (एमोलेड डिस्प्ले)
रिझोल्यूशन2392 × 1080 पिक्सेल
पाणी संरक्षणIP68, IP69 जल-प्रतिरोधक डिझाइन
डिस्प्ले तंत्रज्ञान1)60Hz,120Hz रिफ्रेश रेट
2)पीक ब्राइटनेस:- 5000 निट्स
सेंसर1)प्रॉक्सिमिटी सेन्सर
2)जायरोस्कोप
3)ई-कंपास
4)ॲक्सेलरोमीटर
5)अ‍ॅम्बियंट लाईट सेन्सर
6)इन्फ्रारेड ब्लास्टर
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल ZEISS
2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल ZEISS OIS मुख्य कॅमेरा + 50 मेगापिक्सेल ZEISS सुपर टेलिफोटो कॅमेरा + 8 मेगापिक्सेल ZEISS अल्ट्रा वाइड-अँगल कॅमेरा
3)फुल एचडी रेकॉर्डिंग
4)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4k, 1080P, 720P
ऑडिओड्युअल स्टीरिओ स्पीकर्स
रंग1)मूनलिट ब्लू
2)मिस्ट ग्रे
3)ऑस्पिशियस गोल्ड
कनेक्टिविटी5G, 4G, 3G, 2G
ब्लूटूथ v5.4, Wi-Fi
किंमत₹36,999

हा होता आपला कॅमेरा किंग Vivo V60. Vivo ने या फोनमध्ये खरोखरच खूप महत्त्वाचे अपग्रेड केले आहेत आणि कोणते अपग्रेड केले आहेत, ते तुम्हाला समजले असेलच. Vivo V60 मध्ये तुम्हाला ४ व्हेरियंट मिळणार आहेत – 8GB+128GB, 8GB+256GB, 12GB+256GB आणि 16GB+512GB.

तुम्हाला हा फोन कसा वाटला? कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे जर Vivo V50 असेल, तर त्या फोनबद्दलचा तुमचा अनुभवही कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आपल्या इतर सदस्यांनाही कळेल.

आपल्या परिवाराचा अजून तुम्ही सदस्य झाला नसाल, तर आत्ताच पेजला सबस्क्राइब/सदस्य व्हा आणि नवीन टेक बातम्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment