Vivo चा आणखी एक नवीन फोन तोसुद्धा खास फीचर्ससह – Dimensity 9300+ प्रोसेसर आणि पेरिस्कोप कॅमेरासारख्या दमदार वैशिष्ट्यांसह.

Vivo ने लाँच केला आहे त्यांच्या T सिरीजमधील एक दमदार फोन, तो म्हणजेच Vivo T4 Ultra. Vivo आता खरंच खूप कमाल करत आहे T सिरीजमध्ये, कारण या सिरीजमधले सगळे फोन मिड रेंजमध्ये असूनही वॅल्यू फॉर मनी असतात. असं नाही की आपण एवढे पैसे देतो आणि आपल्याला फोन आवडत नाही!. आता Vivo T4 Ultra बद्दल बोलायचं झालं, तर ह्यामध्ये Vivo ने सर्व काही दिलं आहे – परफॉर्मन्स, डिस्प्ले, बॅटरी, डिझाईन आणि अफलातून कॅमेरा – सगळंच टॉप क्लास!

सुरुवात करूया कॅमेरापासून — Vivo T4 Ultra मध्ये तुम्हाला मिळतोय: 50 मेगापिक्सेल 3x पेरिस्कोप कॅमेरा, 50 मेगापिक्सेल IMX921 OIS सेन्सर, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 10x टेलीफोटो मॅक्रो झूम. हे सर्व मिळून तुमचे फोटो अगदी टगडे आणि पूर्ण क्लियर काढतात आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत बघितलं तर Vivo T सिरीजमधील आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल प्रोसेसर –Dimensity 9300+ – हाT4 Ultra मध्ये दिला गेलाय, जो खरोखरच या सिरीजमधला एक मोठा अपग्रेड आहे, असं ठामपणे म्हणता येईल.

या फोनमध्ये(vivo t4 ultra specifications marathi) तुम्ही टेन्शन न घेता गेमिंग आणि मल्टिटास्किंग आरामात करू शकता, कारण यामध्ये तुम्हाला मिळतोय Dimensity 9300+ प्रोसेसर, 2GB LPDDR5 RAM, UFS 3.1 स्टोरेज ह्यामुळे तुमच्या फोनचा परफॉर्मन्स अजूनच स्मूद चालतो. तसंच Vivo T4 Ultra मध्ये तुम्हाला AI फीचर्स देखील मिळतात जसं की: एआय नोट असिस्ट:- आपोआप नोट्स लिहून ठेवणारे फिचर, सर्चसाठी वर्तुळ काढा:- स्क्रीनवर काही शोधायचे असेल तर त्यावर वर्तुळ काढा आणि लगेच माहिती मिळवा, एआय ट्रान्सक्रिप्ट असिस्ट:- ऑडिओ किंवा व्हिडिओचं मजकुरात रूपांतर करणारे फिचर हे फीचर्स फोनचा वापर अजूनच सोपं, स्मार्ट आणि वेळ वाचवणारा बनवतात

तुम्हाला अजून स्पष्ट आणि व्यवस्थित माहिती सांगण्यासाठी चला तर मग आपण आपल्या टेबल दादाकडे जाऊया, जे नेहमीप्रमाणे सगळी माहिती छानपणे, टप्प्याटप्प्याने सांगतील – पाहूया तर काय धमाकेदार फीचर्स आहेत Vivo T4 Ultra मध्ये:

(Vivo t4 ultra specifications marathi) स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत

vivo t4 ultra specifications marathi
vivo t4 ultra specifications marathi
vivo t4 ultra specifications marathi
ऑपरेटिंग सिस्टमअँड्रॉइड 15(Hello UI)
3 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 4 वर्षे सुरक्षा अपडेट्स
प्रोसेसरमीडियाटेक डायमेंसिटी 9300+
इंटरनल स्टोरेज256 GB
रॅम8GB
सुरक्षाइन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर
बॅटरीची क्षमता5500 mAh
अ‍ॅडॉप्टर90W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार6.67 इंच (एमोलेड डिस्प्ले)
रिझोल्यूशन2800 × 1260 पिक्सेल
पाणी संरक्षणIP64 जल-प्रतिरोधक डिझाइन
डिस्प्ले तंत्रज्ञान1)120Hz रिफ्रेश रेट
2)हाय ब्राइटनेस मोड:- 1600 निट्स
3)पीक ब्राइटनेस:- 5000 निट्स
4)डिस्प्ले कलर्स:- 1.07 बिलियन
5)HDR10+
सेंसर1)प्रॉक्सिमिटी सेन्सर
2)जायरोस्कोप
3)ई-कंपास
4)ॲक्सेलरोमीटर
5)अ‍ॅम्बियंट लाईट सेन्सर
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 32 मेगापिक्सेल
2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल (Sony IMX 921) + 50 मेगापिक्सेल (Sony IMX882) 3x पेरिस्कोप कॅमेरा
3)फुल एचडी रेकॉर्डिंग
4)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4k, 1080P, 720P
ऑडिओस्टीरिओ स्पीकर्स
रंग1)मेटिओर ग्रे
2)फिनिक्स गोल्ड
कनेक्टिविटी5G, 4G, 3G, 2G
ब्लूटूथ v5.4, Wi-Fi 6
किंमत₹37,999

विवो T4 अल्ट्रा मध्ये तुम्हाला 3 पर्याय मिळतात – 8 GB + 256 GB, 12 GB + 256 GB, 12 GB + 512 GB.

तुम्हाला कसा वाटला T सिरीजमधला हा धमाकेदार फोन? कॉमेंट करून नक्की सांगा! तुमच्याकडे जर T सिरीजमधला कुठलाही फोन असेल, तर तुमचा अनुभवही शेअर करा – म्हणजे आपल्या इतर वाचकांनाही समजेल की हा फोन वापरण्याचा अनुभव कसा आहे. आणि तुम्हालाही असेच नवीन लॉन्चेस आणि टिप्स बद्दल माहिती पाहिजे असेल,तर लगेचच पेजला सबस्क्राइब करा – म्हणजे सर्वात आधी अपडेट्स तुम्हालाच मिळतील!

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment