टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) यांनी घोषणा केली आहे की TCCCPR 2025 च्या अॅमेन्डमेंटअंतर्गत, ज्या कोणत्याही कंपनीला तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे, त्यांना आता त्यांच्या मेसेजमध्ये सफिक्स (suffix) जोडणं बंधनकारक असणार आहे. हा नियम ६ मे २०२५ पासून लागू करण्यात आला आहे.
हेडर सफीक्स (Header Suffix) म्हणजे काय(trai sms header marathi)?
हेडर सफीक्स म्हणजे असे छोटे कोड्स असतात जे कंपनीच्या मेसेजमध्ये ऑटोमॅटिकली जोडले जातात, जे टेलिकॉम प्रोवायडर्सकडून दिलेले असतात. यामुळे तुम्हाला लगेच समजतं की: हा मेसेज कुठून आला आहे, तो विश्वासार्ह आहे का नाही आणि तुम्ही तो मेसेज ओपन करायचा का नाही हे ठरवू शकता.
हे TRAI चं पाऊल ग्राहकांच्या सुरक्षेसाठी असून, फसवणूक करणारे, स्पॅम मेसेज करणारे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे. आता हे कोड म्हणजे इंग्रजी अल्फाबेट्स असतात जे एकाच अक्षरात दाखवलेले असतात. हे अक्षर कुठले आहे, यावरून तुम्हाला कळू शकतं की मेसेज नेमका कशासाठी आहे आणि कोणी पाठवलेला आहे. चला, आता या अक्षरांचा अर्थ समजून घेऊया:
शेवटचे ४ कोड कुठले?
G, S, T, P ही चार कोड्स असतात आणि त्यांचे अर्थ खालीलप्रमाणे आहेत:trai sms header marathi
- जर तुमच्या मेसेजच्या शेवटी G लिहिलं असेल तर त्याचा अर्थ तो मेसेज सरकारकडून(Government) आलेला आहे.
- मेसेजच्या शेवटी S असेल तर तो सेवा-संबंधित (Service) मेसेज असतो.
- शेवटी जर T असेल तर तो ट्रांजॅक्शनल (Transactional) मेसेज असतो.
- P असेल तर तो प्रोमोशनल (Promotional) मेसेज असतो.
- G – Government message
- S – Service message
- T – Transactional message
- P – Promotional message
हे कोड तुमच्या SMS च्या शेवटी दिसतील, जसं की — VK-ABCBNK-S, इथे शेवटचं S म्हणजे तो सेवा-संबंधित (service message) आहे.
आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे — जर मेसेजच्या शेवटी काहीच लिहिलेलं नसेल, तर तो मेसेज नेमका कोणाकडून आलेला असतो? तर असा मेसेज स्कॅमर्स (फसवणूक करणारे) लोकांकडून पाठवलेला असतो.
अशा मेसेजमध्ये भूलथाप देणाऱ्या लिंक्स दिलेल्या असतात, ज्या तुमच्याशी फसवणूक करण्यासाठी वापरल्या जातात. म्हणून लक्षात ठेवा अशा मेसेजमधील कोणत्याही लिंकवर कधीही क्लिक करू नका. आता तुम्ही विचार करत असाल की, “स्कॅमर्स हे कोड्स स्वतः लिहून का पाठवत नाहीत?” बरोबर ना? पण हे त्यांच्यासाठी शक्य नाही. कारण असं कोड असलेला मेसेज पाठवण्यासाठी कंपनीने TRAI मध्ये स्वतःची नोंदणी (registration) करणं आवश्यक असतं.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा आणि हो, पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे सगळ्यात आधी महत्वाची बातमी तुम्हाला मिळेल!
