टेकनो आता मोबाईल इंडस्ट्रीमध्ये मोठा धुमाकूळ घालणार आहे कारण सेगमेंटमधला सर्वात स्लिम फोन Tecno POVA Slim 5G लॉन्च केला आहे. आतापर्यंत आपण इंडस्ट्रीमधले स्लिमेस्ट फोन पाहिले आहेत जसे की Samsung Galaxy S25 Edge, Galaxy Z Fold 7, Galaxy M36 5G. Apple देखील त्यांचा सर्वात स्लिम फोन लॉन्च करणार आहे ज्याचं नाव iPhone Air आहे, पण तोसुद्धा इतका पातळ नसेल जितका Tecno Pova Slim 5G आहे.
आपण जर स्लिम फोनबद्दल बोललो तर एक गोष्ट त्यात कॉम्प्रोमाईज होते ती म्हणजे बॅटरी आणि किंमती. पण जर किंमतीकडे पाहिलं तर त्या खूप जास्त असतात. उदाहरणार्थ, Galaxy S25 Edge कडेच पाहिलं तर त्याची किंमत १,०९,९९९ रुपये आहे. पण Tecno POVA Slim ची एवढी किंमत नाही आहे. हा स्लिमेस्ट फोन २०,००० हजार, ३०,००० हजार किंवा ५०,००० हजारच्या खाली मिळणार आहे.
Tecno Pova Slim 5G डिझाईन आणि डिस्प्ले

डिझाईनकडे पाहिलं तर जरा नवीन डिझाईन देण्याचा प्रयत्न केला आहे. Tecno ने यात एक खास फीचर दिलं आहे – जेव्हा तुम्ही फोन फ्लिप करता तेव्हा मागच्या बाजूला लाईट्स लागतात आणि Tecno ने या लाईटला “डायनॅमिक मूड लाईट डिझाईन” असं नाव दिलं आहे. तुम्ही ही लाईट सेटिंगमध्ये जाऊन कंट्रोल करू शकता. समजा तुम्हाला जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा ही लाईट ऑन व्हावी असं सेट करू शकता, फोनची बॅटरी कमी असेल तेव्हा ही लाईट ऑन करायची किंवा चार्जिंगला लावताना देखील लाईट ऑन होईल असं करू शकता.
डिस्प्ले खूप भारी दिला आहे Tecno Pova Slim मध्ये. यात 6.78 इंचाचं 1.5K 3D कर्व्हड डिस्प्ले दिलं आहे जो दिसायला खूप मोठा दिसणार आहे. व्हिडिओ पाहताना त्यामधले रंग अगदी नैसर्गिक दिसणार. तुम्ही या डिस्प्लेला जगातील सर्वात स्लिम 3D कर्व्हड डिस्प्ले असंही म्हणू शकता त्याच्या शेप आणि क्वालिटी पाहून. इतकं भारी डिस्प्ले दिलं आहे तर त्याला प्रोटेक्शन तर लागणारच, चुकून हातातून खाली पडला तर? त्यासाठी डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी गोरिला ग्लास 7i स्क्रीन प्रोटेक्शन दिलं आहे म्हणजे आता काळजी करण्याची गरज नाही. हातातून खाली पडलं तरी तुटणार नाही. एवढंच नाही तर यात मिलिटरी ग्रेड प्रोटेक्शन सुद्धा दिलं आहे.
स्लिम फोन असला की खूप ब्रँड्स एवढी मोठी बॅटरी देत नाहीत, पण Tecno ने असं काही केलं नाही. बॅटरीचं सांगायचं झालं तर Tecno POVA Slim मध्ये तुम्हाला ५१६०mAh ची बॅटरी मिळते आणि तेही एका स्लिम फोनमध्ये. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. Samsung चा सर्वात स्लिम फोन म्हणजे Samsung S25 Edge मध्ये फक्त ३९००mAh ची बॅटरी आहे.

आता तुम्ही विचार करा – १ लाख रुपयांचा फोन असून बॅटरी किती मिळते आणि Tecno POVA Slim जो २०,००० रुपयांच्या खाली मिळतो, त्यात किती मोठी बॅटरी आहे! मोठी बॅटरी असूनही फोन फक्त 5.95mm स्लिम आहे. तुम्हाला कळूनसुद्धा येणार नाही की हातात फोन आहे, म्हणूनच कंपनीने या फोनला “जगातील सर्वात पातळ फोन, तोही मोठ्या बॅटरीसोबत” असं नाव दिलं आहे.
Tecno Pova Slim 5G कॅमेरा, परफॉर्मन्स, AI फीचर्स
कॅमेऱ्यात तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. फोटो यात खूप छान येतात, कलर बॅलन्सिंग हे उत्तम होतं. टेकनो यात एक भन्नाट AI फीचर दिलं आहे. यात एक पोर्ट्रेट मोड आहे ज्यात तुमचे फोटो वेगळ्या पद्धतीने एडिट करून मिळतात. जसं की हेअरस्टाईल बदलून मिळते, तुमच्या फोटोमधले कपडे बदलता येतात. हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच खूप खुश होणार यात शंका नाही.
स्लिम फोनमध्ये परफॉर्मन्स कसा आहे हे बघू या. टेक्नो पोवा स्लिममध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6400 हा प्रोसेसर मिळतो. मीडियाटेक डायमेंसिटी 6400 हा साधा प्रोसेसर आहे म्हणजे तुम्ही यात नॉर्मल गेमिंग करू शकता आणि मल्टी-टास्किंगलाही हे सपोर्ट करतो.
टेकच्या दुनियेत AI ची गरज तर लागतेच, म्हणून टेक्नोने यात AI फीचर्स दिले आहेत जसे की कॉल असिस्टंट, ट्रान्सलेशन असिस्टंट, सोशल असिस्टंट, एआय नोट, रेकॉर्डिंग समरी रायटिंग असिस्टंट, डॉक्युमेंट असिस्टंट. यासोबत टेक्नोचा स्वतःचा AI मिळतो ज्याला “Ella AI” असं नाव दिलं आहे. बाकीच्या ब्रँड्स जसे Apple कडे सिरी आहे, Amazon कडे अलेक्सा आहे, तसंच Tecno स्वतःचं Ella आहे. Ella चं एक वैशिष्ट्य म्हणजे ते भारतीय भाषांला ला सपोर्ट करतं. तुम्ही तुमच्या भाषेत Ella सोबत बोलून तुमचं काम करून घेऊ शकता.
Tecno Pova Slim 5G स्पेसिफिकेशन्स फीचर्स आणि किंमत(tecno pova slim marathi)



| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 15 (HiOS 15) 1 वर्षे ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट्स |
| प्रोसेसर | मीडियाटेक डायमेंसिटी 6400 |
| इंटरनल स्टोरेज | 128 GB |
| रॅम | 8 GB |
| सुरक्षा | अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर |
| बॅटरीची क्षमता | 5160 mAh |
| अॅडॉप्टर | 45W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.78 इंच (एमोलेड डिस्प्ले) |
| रिझोल्यूशन | 2720 x 1224 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IP64 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)144Hz रिफ्रेश रेट 2)टच सॅम्पलिंग रेट:- 240Hz 2)पीक ब्राइटनेस:- 4500 निट्स |
| सेंसर | 1)जायरोस्कोप 2)ई-कंपास 3)G-सेन्सर 4)प्रॉक्सिमिटी सेन्सर 5)अॅम्बियंट लाईट सेन्सर 6)इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 13 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेल 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 2K |
| ऑडिओ | आहे |
| रंग | 1)कूल ब्लॅक 2)स्लिम व्हाईट 3)स्काय ब्ल्यू |
| कनेक्टिविटी | 5G, 4G VOLTE, 4G, 3G, 2G ब्लूटूथ v5.4, Wi-Fi |
| किंमत | ₹19,999 |
फोनकडे जर पाहिलं तर डिझाईनला काही तोड नाही, कॅमेरा क्वालिटी देखील नॉर्मल फोटोग्राफी साठी उत्तम आहे. फक्त एवढंच नाही तर, सेगमेंट मधला सर्वात स्लिम फोन असूनही यात तुम्हाला 5160mAh ची बॅटरी मिळते, तेही ₹20,000 च्या आत, ही खरंच मोठी गोष्ट आहे जर आपण बाकी ब्रँड्ससोबत तुलना केली तर.
तुम्हाला या सर्वात पातळ फोनबद्दल काय वाटतं? आणि सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आवडली तेही नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवीन लॉन्चेससाठी आमच्या WhatsApp Channel ला फॉलो करा आणि सर्वात आधी अपडेट मिळवा!