आजच्या जगात जर आपल्याला नवीन फोन घ्यायचा असेल, तर आपण फक्त तो कसा दिसतो हे पाहून घेत नाही, तर त्यात नवीन काय टेक्नोलॉजी आली आहे आणि त्याचा परफॉर्मन्स कसा आहे हे सर्व लक्षात घेऊन निर्णय घेतो. तर या टेक्नॉलॉजीच्या दुनियेत, Samsung ने त्यांचा नवीन फोन लाँच केलाय — तो म्हणजेच Samsung Galaxy S25 Edge. हा फोन आहे परफॉर्मन्समध्ये दमदार, दिसायला एकदम भारी आणि फीचर्सने भरलेला —खरंच, एक प्रीमियम आणि स्मार्ट निवड!
Samsung चा हा सर्वात स्लिम फोन आहे, जो फक्त 5.8 मिमी जाड असून वजन आहे फक्त 163 ग्रॅम. हा फोन फक्त स्लिमच नाहीये, तर तो आहे — सर्वात मजबूत, सर्वात तेजस्वी स्क्रीन असलेला आणि Samsung चा सर्वात वेगवान फोन! डिझाइन, परफॉर्मन्स आणि टिकाऊपणा या तिन्ही गोष्टींचं परिपूर्ण संयोजन म्हणजे सॅमसंग s25 edge marathi!
Samsung Galaxy S25 Edge च्या कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर, या फोनच्या कॅमेऱ्याने खरोखरच धुमाकूळ घातला आहे. या फोनमध्ये
200 मेगापिक्सेलचा प्रचंड ताकदवान कॅमेरा देण्यात आला आहे, जो प्रत्येक फोटोमधील अतिशय बारकाव्याची माहितीही स्पष्टतेने कॅप्चर करतो. याशिवाय, व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये 8K रेकॉर्डिंगची सुविधाही देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्ही कॅप्चर केलेल्या आठवणी पुन्हा एकदा अगदी तितक्याच भावनेने अनुभवू शकता.
Samsung Galaxy S25 Edge या फोनबद्दल अजून सविस्तर आणि स्पष्ट माहिती जाणून घेण्यासाठी चला तर मग आपण आपले टेबल दादाकडे जाऊया, जे आपल्याला या फोनमधील सर्व फिचर्स अगदी बारकाईने आणि स्पष्टपणे दाखवतील.
सॅमसंग s25 स्पेसिफिकेशन्स, फीचर्स and किंमत(सॅमसंग s25 edge marathi)



| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 15(UI 7.0) 6 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 6 वर्षे सुरक्षा अपडेट्स |
| प्रोसेसर | स्नॅपड्रॅगन ८ एलिट |
| इंटरनल स्टोरेज | 256 GB |
| रॅम | 12 GB |
| सुरक्षा | फिंगरप्रिंट सेन्सर |
| बॅटरीची क्षमता | 3900 mAh |
| अॅडॉप्टर | 45W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.657 इंच (डायनॅमिक एमोलेड 2X) |
| रिझोल्यूशन | 3120 × 1440 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IP68 |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)120Hz रिफ्रेश रेट 2)कलर डेप्थ:-16M |
| सेंसर | 1)प्रॉक्सिमिटी सेन्सर 2)जायरो सेन्सर 3)जिओमॅग्नेटिक सेन्सर 4)ॲक्सेलरोमीटर 5)लाईट सेन्सर 6)बॅरोमीटर 7)हॉल सेन्सर |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 12 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 200 मेगापिक्सेल + 12 मेगापिक्सेल 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- UHD 8K |
| ऑडिओ | स्टीरिओ स्पीकर्स |
| रंग | 1)टायटॅनियम सिल्व्हर 2)टायटॅनियम जेटब्लॅक |
| कनेक्टिविटी | 5G, 4G, 3G, 2G ब्लूटूथ v5.4, Wi-Fi |
| किंमत | ₹1,09,999 |
सॅमसंग s25 एज या फोनकडे पाहिल्यावर असं स्पष्ट जाणवतं की Samsung कंपनीने या फोनमधील प्रत्येक घटक नव्या ने डिझाइन करून, या फोनला एक अत्यंत स्लिम, स्टायलिश आणि प्रिमियम लुक दिला आहे — तेही परफॉर्मन्स, डिझाईन आणि डिस्प्ले यामध्ये कोणतीही तडजोड न करता.
तुम्हाला कसा वाटला Samsung Galaxy S25 Edge? कमेंट करून नक्की कळवा!
अशाच नव्या मोबाईल लॉन्चेस, टेक टिप्स आणि ट्रिक्ससाठी आमच्या पेजला आताच सबस्क्राइब करा आणि बना LT फॅमिलीचा नविन सदस्य!