Samsung Galaxy Z Fold 7 सर्वात पॉवरफुल, स्लिम फोल्डेबल फोन, आणि 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा सोबत

सॅमसंग ने लाँच केला आहे त्यांचा आजवरचा सर्वात जबरदस्त फोल्डेबल फोन – Samsung Galaxy Z Fold 7. जर तुम्ही नीट पाहिलं तर लक्षात येईल की सॅमसंग दरवर्षी त्यांच्या फोल्डेबल फोनमध्ये काही ना काही छोटे अपडेट्स करतच असतो. पण यावेळी सॅमसंगने या नवीन फोल्डेबल फोनमुळे पूर्ण मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्याची तयारी केली आहे. नवीन Galaxy Z Fold 7 हा आतापर्यंतचा सर्वात स्लिम, टिकाऊ आणि हलका फोल्डेबल फोन ठरतोय. चला तर मग, पाहूया हा फोन नेमका कसा आहे.

मी या फोनला “सर्वात स्लिम” असं का म्हणतोय, यामागे कारण आहे – Samsung Galaxy Z Fold 7 हा फोन फक्त 8.9 mm इतका पातळ आहे आणि जर आपण हा फोन अनफोल्ड म्हणजेच उघडला, तर तो फक्त 4.2 mm इतका पातळ होतो! तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण आजपर्यंत जेवढे फोल्डेबल फोन आलेत ते सर्वसाधारणपणे 11 mm ते 13 mm दरम्यान पातळ असतात जेव्हा ते फोल्ड केलेले असतात. उदाहरण म्हणून बघा, Vivo चा एक फोल्डेबल फोन सध्या मार्केटमध्ये आहे, जो 11.3 mm आहे. त्याच्या तुलनेत
Galaxy Z Fold 7 फक्त 8.9 mm असल्यामुळे तुम्ही सहज अंदाज लावू शकता की Samsung ने हा फोन किती स्लिम आणि स्टायलिश बनवला आहे.

Samsung Galaxy Z fold 7 डिस्प्ले

Samsung galaxy z fold 7 specifications marathi

डिस्प्लेमध्येही मोठं अपग्रेड केलेले आहे. Samsung चा मागील फोल्डेबल फोन पाहिला, तर त्याचा फोल्ड असताना स्क्रीन साइज 6.3 इंच होता. मात्र आता Galaxy Z Fold 7 मध्ये तो 6.5 इंच करण्यात आला आहे आणि जेव्हा तुम्ही हा फोन अनफोल्ड करता, तेव्हा त्याचा मोठा
8 इंचांचा डिस्प्ले समोर येतो. जर तुम्ही या फोनवर सिनेमे पाहिले, तर तुम्हाला एकदम भारी आणि प्रीमियम फील मिळणार आहे, कारण प्रत्येक बारीकसारीक गोष्टसुद्धा खूप स्पष्ट आणि सुंदर दिसते. मूव्ही पाहताना मजा तर खूप येणारच आहे, त्यासोबतच तुम्हाला जर गेमिंगचीही खूप आवड असेल तर तुमची लॉटरीच लागली आहे.

मोठ्या डिस्प्लेमुळे तुम्हाला सगळी गेम्स HD मध्ये खेळायला मिळणार आहेत – तेही कोणतंही लॅगिंग न होता, एकदम स्मूथपणे. यामध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 8 एलिट (3nm) प्रोसेसर मिळतो. म्हणजे तुम्ही गेमिंग करा, मल्टीटास्किंग करा, कितीही अ‍ॅप्स ओपन करा – तुमचा फोन अगदी मक्खनसारखा चालणार!

Samsung ने कॅमेराबाबत तर खरोखरच धुमाकूळ घातला आहे. Galaxy Z Fold 7 मध्ये तुम्हाला तब्बल 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो आणि त्यासोबत 3x ऑप्टिकल झूम सुद्धा. तुमच्या फोटोमधील प्रत्येक बारकाईची गोष्ट अतिशय स्पष्ट आणि नैसर्गिक दिसते.

Samsung Galaxy Z fold 7 AI फिचर्स

Samsung ने AI फिचर्समध्येही काहीच कमी ठेवलेलं नाही. भाषांतर मोड, चॅट सहाय्यक, थेट भाषांतर, शोधण्यासाठी वर्तुळ करा, Google सहाय्यक लिप्यंतर सहाय्य, नोट सहाय्यक, ब्राउझिंग हे सगळे भन्नाट AI फिचर्स तुम्हाला Samsung Galaxy Z Fold 7 मध्ये मिळणार आहेत. या फोनमध्ये Gemini Live(जेमिनी लाईव्ह) सुद्धा मिळणार आहे, जे तुमच्या शॉपिंग, गेमिंग, फोटो किंवा इतर गोष्टींमध्ये खूपच मदत करणार आहे.

समजा तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत आहात आणि तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची आहे, जसं की शर्ट, तर तुम्ही जेमिनी सोबत तुमची स्क्रीन शेअर करू शकता. डाव्या बाजूच्या स्क्रीनवर तुम्ही वेगवेगळ्या शर्ट्स दाखवू शकता. मग जेमिनी तुमचा एक Live फोटो घेईल आणि उजव्या स्क्रीनवर तो फोटो त्या शर्टसह दाखवेल. जेमिनी तुमच्या त्वचेचा रंग, चेहऱ्याची बनावट यावरून तुम्हाला कोणता शर्ट चांगला शोभेल हे सुचवेल.

तुम्हाला गेमिंग करायला आवडत असेल, जेमिनी गेमिंगमध्येही तुमची मदत करणार आहे. समजा तुम्ही एखादी गेम खेळत आहात — उदाहरणार्थ आपण सगळ्यांचा आवडता BGMI गेम घेऊया. जर तुम्ही हा गेम खेळत असताना जेमिनी सोबत स्क्रीन शेअर केली, तर ते तुम्हाला सुचवू शकते की तुम्ही कुठली गन निवडावी, किंवा जर तुम्ही दुसरी कुठलीतरी गेम खेळत असाल, तर ते लेव्हल कसं पास करायचं हेही जेमिनी Live तुम्हाला सांगेल.

आपण आता जाऊयात आपल्या टेबल दादाकडे, जे आपल्याला (Samsung galaxy z fold 7 specifications marathi) बद्दलची संपूर्ण माहिती व्यवस्थित आणि स्पष्टपणे दाखवतील.

(Samsung galaxy z fold 7 specifications marathi)फीचर्स,विशिष्टता आणि किंमत

सिल्व्हर शॅडो
जेटब्लॅक
ब्लू शॅडो
ऑपरेटिंग सिस्टमअँड्रॉइड 16 (One UI 8)
7 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 7 वर्षे सुरक्षा अपडेट्स
प्रोसेसरस्नॅपड्रॅगन 8 एलिट (3nm)
इंटरनल स्टोरेज256 GB
रॅम12 GB
सुरक्षासाइड माउंटेड फिंगरप्रिंट
बॅटरीची क्षमता4400 mAh
अ‍ॅडॉप्टर25W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकारफोल्ड केल्यावर:- 20.24 cm (गोरिला ग्लास व्हिक्टस सिरेमिक २), 158.4mm x 72.8mm x 8.9mm

अनफोल्ड केल्यावर(उघडल्यावर):- 20.31 cm (गोरिला ग्लास व्हिक्टस २), 158.4mm x 143.2mm x 4.2mm
रिझोल्यूशनअनफोल्ड केल्यावर(उघडल्यावर):- 2184 x 1968 पिक्सेल
फोल्ड केल्यावर:- 2520 x 1080 पिक्सेल
पाणी संरक्षणIP48 जल-प्रतिरोधक डिझाइन
डिस्प्ले तंत्रज्ञान1)120Hz रिफ्रेश रेट
2)पीक ब्राइटनेस:- 1600 निट्स
3)कलर डेप्थ: 16M
4)QXGA+
5)FHD+
सेंसर1)इलेक्ट्रॉनिक कंपास
2)प्रॉक्सिमिटी सेन्सर
3)ऍक्सेलरोमीटर
4)बॅरोमीटर
5)जायरो सेन्सर
6)हॉल सेन्सर
7)जिओमॅग्नेटिक सेन्सर
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 10 मेगापिक्सेल
2)पाठीचा कॅमेरा:- 200 मेगापिक्सेल + 12 मेगापिक्सेल + 10 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स
3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- UHD 8K, 4K
ऑडिओस्टीरिओ स्पीकर्स
रंग1)ब्लू शॅडो
2)सिल्व्हर शॅडो
3)जेटब्लॅक
4)मिंट
कनेक्टिविटी5G, 4G, 3G, 2G
ब्लूटूथ v5.4, Wi-Fi 7
किंमत₹1,74,999

गॅलेक्सी Z Fold 7 मध्ये तुम्हाला 3 व्हेरिएंट्स मिळणार आहेत – 12GB+256GB, 12GB+512GB आणि 12GB+1TB. खास करून, तुम्हाला जर मिंट कलर आवडत असेल, तर तो फक्त Samsung च्या वेबसाईट वरच मिळणार आहे. इतर साइट्स जसं की Flipkart, Amazon यावर हा कलर उपलब्ध नाही. तुम्ही जर फोल्डेबल फोन घेण्याचा विचार करत असाल, तर माझ्या मते तुम्ही Galaxy Z Fold 7 हा फोन नक्की एकदा पाहा, कारण या फोनमध्ये तुम्हाला सगळंच प्रीमियम मिळणार आहे — डिझाईनपासून अनुभवापर्यंत. हा फोन कोणत्याही बाबतीत कमी पडत नाही.

जर फोल्डेबल फोनमध्ये एखाद्या फोनला फोल्डेबल फोनचा राजा असं म्हणायचं असेल, तर तो नक्कीच Samsung Galaxy Z Fold 7
आहे.तुम्हाला हा फोन कसा वाटला किंवा तुमच्या जवळच्या Samsung स्टोअरमध्ये जाऊन फोल्डेबल फोनचा राजा ला एकदा बघा आणि कॉमेंट करून नक्की सांगा की फोनचा फील कसा वाटला.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment