Samsung ने लॉन्च केला आहे त्याच्या Monster Series मधला अजून एक दमदार फोन — तो म्हणजे Samsung Galaxy M36 5G. Samsung ने काही वर्षांपूर्वी त्यांची खास Monster Series सुरू केली होती आणि त्या अंतर्गत त्यांनी M30, M32, M33, M34, आणि
M35 हे फोन यशस्वीपणे लॉन्च केले. आता या यशाची परंपरा पुढे नेत, त्यांनी आणखी एक दमदार फोन बाजारात आणला आहे —
Galaxy M36 5G. तर सॅमसंग ची M सिरीज ही एक व्हॅल्यू फॉर मनी सिरीज आहे जी आपल्याला बजेटमध्ये खूप चांगला फोन प्रोव्हाइड करते. एवढंच नाही तर या M सिरीजला खूप सारे अॅवॉर्ड्स देखील मिळाले आहेत जसे की – बेस्ट बजेट कॅमेरा फोन, नंबर 1 सेलिंग 5G फोन, आणि नंबर 1 सेलिंग स्मार्टफोन.
Galaxy M36 AI फीचर्स
Samsung Galaxy M36 मध्ये तुम्हाला मोठा डिस्प्ले, जबरदस्त परफॉर्मन्स, चांगले कॅमेरे आणि भरभरून फीचर्स मिळणार आहेत. AI फीचर्समध्ये तुम्हाला:- सर्कल टू सर्च – सर्चसाठी गोल काढा, AI निवड – स्क्रीनवर जी माहिती हवी आहे, ती निवडण्यासाठी AI मदत करतं. तुम्हाला फक्त टेक्स्ट किंवा वस्तू सिलेक्ट करायची आहे, बाकी माहिती AI देते. ऑब्जेक्ट इरेझर – फोटोमध्ये नको असलेली वस्तू किंवा व्यक्ती हटवण्यासाठी वापरता येतो. फक्त हटवायच्या भागावर टच करा आणि तो फोटोमधून अदृश्य होतो. इमेज क्लिपर – एखाद्या फोटोमधून व्यक्ती किंवा वस्तू कापून (कट करून) स्टिकरमध्ये किंवा दुसऱ्या फोटोमध्ये वापरता येईल असा इफेक्ट देतो.
Samsung Galaxy M36 डिस्प्ले, प्रोसेसर
डिस्प्लेबद्दल बोलायचं झालं तर ह्या वेळेस Samsung ने ह्या फोनच्या डिस्प्ले मध्ये थोडा बदल केला आहे. M सिरीजमधील M35 मध्ये तुम्हाला 6.6″ sएमोलेड डिस्प्ले मिळत होता, पण आता M36 मध्ये तुम्हाला 6.7″ FHD+ sएमोलेड+ डिस्प्ले मिळतो. त्यासोबत वॉटर ड्रॉप नॉच मिळते त्यामुळे स्क्रीन अजून मोठी आणि क्लीन दिसते. आता ह्याच डिस्प्लेला वाचवण्यासाठी Samsung ने ह्यामध्ये गोरिला ग्लास विक्टस+ दिलं आहे. जास्त करून हे प्रोटेक्शन प्रीमियम फ्लॅगशिप लेव्हलमध्ये दिलं जातं, पण Samsung ने ते अंडर बजेटमध्ये तुम्हाला दिलं आहे.तुम्ही जर गेमिंग लव्हर असाल आणि खूप वेळ गेमिंग करत असाल, आणि तेही अंडर बजेटमध्ये हवं असेल, तर हा फोन तुम्ही नक्कीच निवडू शकता. रण ह्यामध्ये तुम्हाला एक्सिनॉस 1380 (5nm) प्रोसेसर मिळतो, जो तुमची गेमिंग एकदम स्मूथ करतो आणि फोन थोडा जरी गरम झाला तरी काळजी करण्याची गरज नाही, कारण ह्या फोनमध्ये “वॅपौर कुलिंग चेंबर” दिलं गेलं आहे, जे फोन थंड ठेवण्यास मदत करतं.
आणखी कोणते फीचर्स दिले आहेत ते पाहूया आपल्या टेबल दादाच्या मदतीने, जे आपल्याला सगळी माहिती स्पष्टपणे दाखवतील!”
(Samsung galaxy m36 specifications marathi)फीचर्स,स्पेसिफिकेशन्स आणि किंमत



| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 15 (Oxygen 15) 6 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 6 वर्षे सुरक्षा अपडेट्स |
| प्रोसेसर | एक्सिनॉस 1380 |
| इंटरनल स्टोरेज | 128 GB |
| रॅम | 6 GB |
| सुरक्षा | फिंगरप्रिंट सेन्सर |
| बॅटरीची क्षमता | 5000 mAh |
| अॅडॉप्टर | 25W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.7 इंच (सुपर एमोलेड प्लस डिस्प्ले) |
| रिझोल्यूशन | 2340 × 1080 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | नाही |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)120Hz रिफ्रेश रेट 2)पीक ब्राइटनेस:- 1200 निट्स |
| सेंसर | 1)व्हर्चुअल प्रॉक्सिमिटी सेन्सिंग 2)जायरो सेन्सर 3)जिओमॅग्नेटिक सेन्सर 4)ॲक्सेलरोमीटर 5)लाईट सेन्सर |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 13 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल OIS + 8 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड कॅमे 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- UHD 4K |
| ऑडिओ | आहे |
| रंग | 1)व्हेल्वेट ब्लॅक 2)सेरीन ग्रीन 3)ऑरेंज हेज |
| कनेक्टिविटी | 5G, 4G, 3G, 2G ब्लूटूथ v5.3, Wi-Fi |
| किंमत | ₹17,999 |
Galaxy M36 हा फक्त 7.7 मिमी जाडीचा असून, यावेळी तुम्हाला अल्ट्रा थिन डिझाइन पाहायला मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे,
या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी मिळते, जी या बजेटमध्ये योग्य आहे.
Galaxy M36 हा फक्त 7.7 मिमी जाडीचा असून, यावेळी तुम्हाला अल्ट्रा थिन डिझाइन पाहायला मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे
, या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी मिळते, जी या बजेटमध्ये योग्य आहे . तुमच्यापैकी जर कोणाकडे M34 किंवा M35 या सिरीजमधले फोन असतील, तर कमेंट करून तुमचा अनुभव इतरांसोबत शेअर जरूर करा —म्हणजे नवीन खरेदी करणाऱ्यांना त्याचा उपयोग होईल. जर तुम्हाला 20 हजारांच्या आत Samsung ब्रँडचा फोन हवा असेल, तर Galaxy M36 हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये प्रीमियम फीचर्स मिळतात आणि तो दीर्घकालीन वापरासाठी योग्य आहे.