Samsung A सिरीजमध्ये आणखी एक बजेट फोन लाँच झाला – Samsung A17.

सॅमसंगने त्यांच्या A बजेट सिरीजमध्ये आणखी एक फोन लाँच केला आहे – सॅमसंग गॅलेक्सी A17. तुम्हाला माहिती नसेल, पण या बजेट सिरीजमधील A15 आणि A16 हे फोन फक्त भारतातच नाही तर जगभरात सर्वाधिक विकले जाणारे फोन आहेत. खास करून सॅमसंगने सर्वांसाठी या फोनसोबत एक गुड न्यूज देखील दिली आहे. सॅमसंग A17 मध्ये यावेळेस तुम्हाला 25W चा अडॅप्टर बॉक्समध्येच मिळणार आहे, असे सॅमसंगने जाहीर केले आहे.

A सिरीज ही ऑफलाइन मार्केटमध्ये सर्वात जास्त विकली जाणारी सिरीज आहे आणि ग्राहकांना फोन घेताना परत चार्जरसाठी वेगळे पैसे द्यावे लागतात ही साधी बेसिक गोष्ट खरेदीच्या अनुभवात थोडी अडथळा आणणारी होती. म्हणून यावेळेस सॅमसंगने एक चांगली संधी साधून A17 मध्ये अडॅप्टर दिला आहे.

Galaxy A17 मध्ये A16 पेक्षा चांगले अपग्रेड्स केले आहेत, मग ते बिल्ड क्वालिटी असो किंवा डिझाइन. चला तर मग सुरू करूया फोन पाहण्याचा कार्यक्रम.

Samsung A17 डिस्प्ले

ह्यावेळेस Samsung A17 हा A16 पेक्षा थोडा अजून स्लिम केला आहे. Galaxy A17 हा 7.5mm चा आहे आणि त्याची डिझाइन थोडी नवीन आहे. डिझाइनमध्ये खूप प्रीमियम फील येतो, बॅक साइडला ग्लास फायबर रीइन्फोर्स्ड पॉलिमर मिळणार आहे.

डिस्प्ले हा 6.7 इंच FHD+ आणि सुपर एमोलेड असेल. Samsung चे डिस्प्ले नेहमीच उत्कृष्ट असतात, डिस्प्लेबद्दल कधीच तक्रार नसते आणि या फोनमध्येही तसंच आहे. डिस्प्लेमध्ये सुद्धा Samsung ने प्रोटेक्शनमध्ये अपग्रेड केले आहे, जे A16 मध्ये नव्हते. Samsung A17 मध्ये गोरिला ग्लास विक्टस प्रोटेक्शन मिळणार आहे, जे २० हजारांच्या खालील फोनमध्ये क्वचितच मिळते आणि खूपच कमी फोन्समध्ये हे प्रोटेक्शन असते.

Samsung A17 परफॉर्मन्स, AI फीचर्स

परफॉर्मन्समध्ये Samsung ने यात स्वतःच बनवलेला चिपसेट वापरला आहे. A17 मध्ये Exynos 1330 हा 5nm प्रोसेसर दिला आहे म्हणजे नॉर्मल गेमिंग, मल्टीटास्किंग यात तुम्ही करू शकता. Samsung Exynos 1330 इतका पॉवरफुल नाही की तुम्ही यात जास्त वेळ गेमिंग करू शकता. तुम्ही जर एक गेमर आहात आणि जास्त वेळ गेमिंग करता तर या फोनपासून तुम्ही लांबच रहा.

Samsung ने यात AI फीचर्सही दिले आहेत जसे की सर्कल टू सर्च, एआय ट्रान्सलेशन, गूगल जेमिनी, ऑडिओ सर्च आणि बाकीचे फीचर्स जसे की सिक्युअर फोल्डर, नोट बार, सॅमसंग वॉलेट, टॅप अँड पे तसेच नॉक्स सिक्युरिटी सपोर्ट. हे सगळं Samsung A17 मध्ये मिळणार आहे.

Samsung A17 स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत(samsung a17 marathi specifications)

samsung a17 marathi
ग्रे
samsung a17 marathi
ब्लॅक
samsung a17 marathi
ब्लू
ऑपरेटिंग सिस्टमअँड्रॉइड 15 (Oxygen 15)
6 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 6 वर्षे सुरक्षा अपडेट्स
प्रोसेसरएक्सिनॉस 1330
इंटरनल स्टोरेज128 GB
रॅम6 GB
सुरक्षाफिंगरप्रिंट सेन्सर
बॅटरीची क्षमता5000 mAh
अ‍ॅडॉप्टर25W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार6.7 इंच (सुपर एमोलेड डिस्प्ले)
रिझोल्यूशन1080 x 2340 पिक्सेल
पाणी संरक्षणIP54 जल-प्रतिरोधक डिझाइन
डिस्प्ले तंत्रज्ञान1)90Hz रिफ्रेश रेट
2)पीक ब्राइटनेस:- 1100 निट्स
3)हाय ब्राइटनेस मोड:- 800 निट्स
सेंसर1)व्हर्चुअल प्रॉक्सिमिटी सेन्सिंग
2)जायरो सेन्सर
3)जिओमॅग्नेटिक सेन्सर
4)ॲक्सेलरोमीटर
5)लाईट सेन्सर
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 13 मेगापिक्सेल
2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल OIS + 5 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेल
3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- UHD 4K
ऑडिओआहे
रंग1)ब्लॅक
2)ग्रे
3)ब्लू
कनेक्टिविटी5G, 4G, 3G, 2G
ब्लूटूथ v5.3, Wi-Fi
किंमत₹18,999

Galaxy A17 मध्ये तुम्हाला ३ व्हेरिएंट मिळणार आहेत – 6GB + 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB. प्रत्येक व्हेरिएंटची किंमत वेगळी असणार आहे. किंमत जाणून घेण्यासाठी तुम्ही Flipkart किंवा Samsung च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासू शकता.

आपण जर A16 सोबत तुलना केली तर यावेळेस A17 मध्ये चांगले सुधार केले आहेत. A16 ला A17 सोबत तुलना केली तर यावेळी फोन हलका केला आहे आणि डिझाईन, फील किंवा लुक असो, सगळ्यात हा फोन खूप प्रिमियम वाटतो. कॅमेरामध्येही अपग्रेड केले आहे, Galaxy A17 मध्ये आता OIS मिळणार आहे जो Galaxy A16 मध्ये दिला नव्हता.

₹20,000 च्या खाली ऑफलाइन मार्केटमध्ये एवढे फीचर्स मिळणे ही खरंच चांगली गोष्ट आहे. ऑनलाइन मार्केटमध्ये गेलात तर खूप फोन आहेत, पण ऑफलाइनमध्ये Samsung ची ब्रँडिंग असणे ही खूप मोठी गोष्ट आहे.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment