Realme P4 Power Marathi
आजपर्यंत भारता मध्ये तुम्ही सर्वात मोठी बॅटरी असलेले स्मार्टफोन पाहिलेच असतील किंवा भारतात आतापर्यंत जितकेही स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत त्यामध्ये बहुतांश स्मार्टफोन 6000mAh, 6500mAh, 7000mAh किंवा 7300mAh बॅटरीसह आले आहेत. पण Realme च्या या स्मार्टफोनमध्ये 7300mAh पेक्षाही मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
भारता मध्ये पाहिले तर आता पर्यंत सर्वात मोठी बॅटरी असलेल्या स्मार्टफोन मध्ये 7300mAh ची बॅटरी देण्यात आली होती आणि हीच 7300mAh बॅटरी सध्या भारता मध्ये आजपर्यंत सर्वात मोठ्या बॅटरीसह लॉन्च करण्यात आलेली आहे.
सध्या भारतात असे २ ब्रँड्स आहेत ज्यांनी आपल्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बॅटरी असलेले स्मार्टफोन उपलब्ध करून दिले आहेत. हे दोन ब्रँड कोणते आहेत? तर पहिला ब्रँड आहे iQOO आणि दुसरा Vivo. iQOO Z10 5G या स्मार्टफोनमध्ये 7300mAh बॅटरी देण्यात आली आहे आणि Vivo T4 5G या स्मार्टफोनमध्येही 7300mAh बॅटरी देण्यात आलेली आहे.
पण आता या स्मार्टफोन्सपेक्षाही अजून मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन Realme ने आज लॉन्च केला आहे आणि भारतात सर्वात मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन देणारा Realme हा पहिला ब्रँड ठरणार आहे. Realme ने या स्मार्टफोनमध्ये इतकी मोठी बॅटरी दिली आहे यामागे एक खास कारण आहे.
Realme चे CMO (चीफ मार्केटिंग ऑफिसर) यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितले आहे की लोकांना नेहमीच ही चिंता असते की बॅटरी लवकर संपते का किंवा स्मार्टफोनमधील बॅटरी किती वर्षे टिकते. तसेच बॅटरी खराब झाली तर ती लगेच बदलावी लागेल का हा प्रश्नही अनेकांच्या मनात असतो.
अनेक युजर्सना असा अनुभव आलेला आहे की २–३ वर्षे फोन वापरल्यानंतर बॅटरी पूर्वीसारखी जास्त वेळ टिकत नाही किंवा बॅटरीसंबंधी काही अडचणी येऊ लागतात. जरी बॅटरी खराब झाली तरी लोक लगेच नवीन स्मार्टफोन घेत नाहीत. एकदा लोकांनी नवीन स्मार्टफोन घेतला की किमान ३–४ वर्षे तरी ते पुन्हा नवीन फोन घेत नाहीत.
Realme च्या रिपोर्टनुसार एक सामान्य युजर दररोज ६ तासांपेक्षा जास्त वेळ स्मार्टफोन वापरतो. ही सगळी गोष्ट लक्षात घेऊन लोकांची बॅटरीबाबतची चिंता दूर करण्यासाठी Realme ने 10001 mAh बॅटरीसह Realme P4 Power हा स्मार्टफोन तयार केला आहे.
चला तर मग सुरू करूया Realme P4 Power Marathi Review आणि पाहूया बॅटरीसोबत अजून कोणते जबरदस्त फीचर्स दिले आहेत.
Realme P4 Power डिस्प्ले & डिझाइन
डिस्प्ले बद्दल बोलायचं झालं तर Realme ने यामध्ये 144Hz हायपरग्लोव 4D कर्व्ह+ डिस्प्ले दिला आहे. कर्व्हड डिस्प्ले असल्यामुळे गेमिंग करताना आणि व्हिडिओ पाहताना तुम्हाला अधिक चांगला अनुभव मिळेल. तसेच सध्या खूप लोक कर्व्हड डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोनना जास्त पसंती देत आहेत.
डिझाइन कडे पाहिलं तर हा स्मार्टफोन पाहून कोणीही सांगू शकणार नाही की यामध्ये 10001 mAh battery आहे. याचं मुख्य कारण म्हणजे फोनची जाडी. Realme P4 Power हा फक्त 8–9 mm स्लिम आहे. तुम्हाला वाटत असेल की 10001 mAh battery असल्या मुळे फोनचं वजन जास्त असेल पण तसं नाही. या फोनचं वजन फक्त 219 ग्रॅम आहे. Realme P4 Power हातात घेतल्यावर असं अजिबात वाटत नाही की हा स्मार्टफोन जाड किंवा जड आहे.
रिअलमी P4 Power हा स्मार्टफोन 3 रंगान मध्ये launch होणार आहे ट्रान्सऑरेंज, ट्रान्ससिल्व्हर आणि ट्रान्सब्लू. या स्मार्टफोनचं डिझाइन भारतातील विद्यार्थ्यांसोबत मिळून तयार करण्यात आलं आहे. भारतामध्ये पर्ल अकॅडमी नावाचं एक डिझाइन इन्स्टिट्यूट आहे आणि याच इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यां सोबत Realme ने या फोनच्या डिझाइन साठी एकत्र काम केलं आहे.
Realme P4 Power परफॉर्मन्स
परफॉर्मन्स साठी Realme ने यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 अल्ट्रा प्रोसेसर दिला आहे. तसंच गेमिंग दरम्यान चांगला परफॉर्मन्स मिळावा यासाठी यासोबत हायपरव्हिजन प्लस AI चिप देण्यात आला आहे. या चिप मुळे बॅटरी ची कार्यक्षमता सुधारते आणि कॅमेरा प्रोसेसिंग मध्येही वेग वाढतो.
तुम्ही MS Excel रोज वापरता का? मग या शॉर्टकट कीज तुम्हाला नक्कीच माहित असायला हव्यात, ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल.
तुम्ही हा स्मार्टफोनमध्ये नॉर्मल गेमिंग साठी तसेच रोजच्या वापरासाठी सहज वापरू शकता. कोणत्याही चिप च्या समस्येशिवाय हा फोन सुरळीत चालतो.
Realme P4 Power कॅमेरा
Realme P4 Power मध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा IMX 882 OIS सेन्सर देण्यात आला आहे, तसेच यासोबत 8 मेगापिक्सेल वाइड अँगल कॅमेरा मिळतो. Realme P4 Power मध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा IMX 882 OIS सेन्सर देण्यात आला आहे तसेच यासोबत 8 मेगापिक्सेल वाइड अँगल कॅमेरा मिळतो.
फोटो आणि व्हिडिओ क्वालिटीबद्दल बोलायचे झाल्यास दोन्ही मध्ये चांगली गुणवत्ता मिळते. प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला क्लिअर, रंगीत आणि ब्राइट दिसतो. पाहायला गेलं तर Realme ने कॅमेरा मध्ये फारसे मोठे अपडेट्स केलेले नाहीत.
Realme P4 Power बॅटरी
Realme ने हा फोन मुख्यतः बॅटरीवर जास्त लक्ष देऊन तयार केला आहे. जे लोक बॅटरीला अधिक महत्त्व देतात, त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन बनवण्यात आला आहे. भारतामधील हा आतापर्यंतचा पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये 10001 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
यासोबत 80W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 27W वायर्ड रिव्हर्स चार्जिंग चा सपोर्ट मिळतो. कंपनीने दावा केला आहे की Realme P4 Power एकदा पूर्ण चार्ज केल्यावर तब्बल 32.5 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक आणि 932.6 तासांचा स्टँडबाय टाइम देतो.
आता जेवढी मोठी बॅटरी असते, तेवढीच मोठी रिस्कही असते. इतकी मोठी बॅटरी दिली आहे म्हणजे जास्त वेळ फोन वापरल्यावर तो गरम होईल का किंवा बॅटरी फुटेल का? असे विचार आपल्या डोक्यात येतातच, आणि ते साहजिकही आहे. पण तुम्हाला या सगळ्या चिंतेपासून दूर ठेवण्यासाठी कंपनीने यावर खूप विचार करून आणि पूर्ण काळजी घेऊनच ही बॅटरी Realme P4 Power मध्ये दिली आहे.
बॅटरीची काळजी घेण्यासाठी कंपनीने ही बॅटरी सिलिकॉन कार्बन मटेरियलपासून तयार केलेली आहे कारण लिथियम बॅटरीपेक्षा सिलिकॉन कार्बन मटेरियलपासून बनवलेली बॅटरी अधिक चांगली आणि टिकाऊ असते. यासोबतच बॅटरीची अधिक सुरक्षितता राखण्यासाठी 5-लेयर बॅटरी आर्किटेक्चरचाही सपोर्ट देण्यात आला आहे.
या 5-लेयरमध्ये नेक्स्ट जनरेशन सेफ्टी अंडरकोटिंग टेक्नॉलॉजी, जाड Cu/Al फॉइल्स, जाड Cu/Al फॉइल्स, स्मार्ट पॉवर डिस्कनेक्ट प्रोटेक्शन तसेच सेफ्टी क्लिअरन्स डिझाइन अशा पाच लेयर्सचा समावेश आहे.
Realme P4 Power AI Features
Realme ने यामध्ये काही नवीन AI फीचर्स दिले आहेत. जसे की AI इंस्टंट क्लिप ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या टेम्पलेटची निवड करून त्या व्हिडिओला रीलसारखा तयार करू शकता. AI इंस्टंट क्लिप जो तुमच्या फोटोंमध्ये अतिरिक्त लाईट अॅड करून देतो. तसेच AI स्टाइल मी जो तुमच्या फोटोला वेगवेगळ्या स्टाईलमध्ये कन्व्हर्ट करतो जसे की AI स्टाइल मी, 3D इमोजी आणि मॉडेलिंग फोटो.
AI Smart Reply ज्यामध्ये तुम्ही शॉर्टकटच्या मदतीने पटकन रिप्लाय करू शकता. तसेच AI AIM Assist जो गेम खेळताना खूप उपयोगी पडणार आहे.
Realme P4 Power Marathi



| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 15(UI 7.0) 3 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 4 वर्षे सुरक्षा अपडेट्स |
| प्रोसेसर | मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 Ultra 5G |
| इंटरनल स्टोरेज | 128 GB |
| रॅम | 8 GB |
| सुरक्षा | इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर |
| बॅटरीची क्षमता | 10001 mAh |
| अॅडॉप्टर | 80W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.8 इंच (एमोलेड डिस्प्ले) |
| रिझोल्यूशन | 1280*2800 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IP66, IP68, IP69 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)पीक ब्राइटनेस:- 6500 निट्स 2)144Hz पर्यंत रिफ्रेश रेट 3)HDR10+ |
| सेंसर | 1)प्रॉक्सिमिटी सेन्सर 2)जायरोस्कोप 3)ई-कंपास 4)कलर टेम्परेचर सेन्सर 5)ॲक्सेलरोमीटर 6)अॅम्बियंट लाईट सेन्सर 7)रिअर इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 16 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेल (Sony IMX 882 OIS) 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K,1080P, 720P |
| ऑडिओ | ड्युअल स्टेरिओ स्पीकर्स |
| रंग | 1)ट्रान्ससिल्व्हर 2)ट्रान्सऑरेंज 3)ट्रान्सब्लू |
| कनेक्टिविटी | 5G + 5G ब्लूटूथ v5.4, Wi-Fi 5, Wi-Fi 6 |
| किंमत | ₹25,999 |
Realme P4 Power Price
Realme P4 मध्ये तुम्हाला 3 व्हेरिएंट पाहायला मिळणार आहेत आणि त्यांची किंमत व्हेरिएंटनुसार वेगवेगळी असणार आहे. पहिला व्हेरिएंट 8GB + 128GB चा असून त्याची किंमत ₹25,999 आहे. दुसरा व्हेरिएंट 12GB + 256GB चा असून त्याची किंमत ₹30,999 आहे. तर तिसरा व्हेरिएंट 8GB + 256GB चा असून त्याची किंमत ₹27,999 असणार आहे.
