Realme GT 7, 7000 mAh टायटन बॅटरी, वेगवान परफॉर्मन्स आणि स्मार्ट बॅक पॅनलसह!

Realme ने 2025 साठी त्यांचा धमाकेदार फ्लॅगशिप किलर स्मार्टफोन लॉन्च केला आहे – Realme GT 7. पण या वेळेस एक खास गोष्ट आहे… कारण या फोनमध्ये तुम्हाला मिळणार आहे एक Special Edition — Realme GT 7 Dream Edition. हा विशेष एडिशन इतकाच खास आहे कारण Realme ने हा फोन ‘ॲस्टन मार्टिन’ या जगप्रसिद्ध लक्झरी कार कंपनीसोबत मिळून डिझाइन केला आहे. बर्‍याच लोकांना कदाचित माहीत नसेल, ॲस्टन मार्टिन ही कंपनी फार प्रसिद्ध असून ती लक्झरी आणि फॉर्म्युला 1 रेसिंग कार्स बनवते. त्यामुळे या फोनला एक खास रेसिंग डिझाइन टच देण्यात आलेला आहे.

Realme GT 7 या नावामधील “GT” हा शब्द वेगाशी संबंधित आहे, आणि म्हणूनच या फोनला अत्यंत वेगवान आणि पॉवरफुल बनवण्यात आलं आहेया फोनमध्ये भारतात पहिल्यांदाच वापरण्यात आलेला मीडियाटेक डायमेंसिटी 9400E प्रोसेसर मिळतो आहे, जो गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी एकदम परफेक्ट आहे. या व्यतिरिक्त, फोनमध्ये देण्यात आलेली 7000 mAh टायटन बॅटरी एक मोठं वैशिष्ट्य आहे, जी एकदा चार्ज केल्यानंतर खूप वेळ फोन चालू ठेवण्याची हमी देते.

realme gt 7 specs marathi

या फोनचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा स्मार्ट बॅक पॅनल. या पॅनेलचं वैशिष्ट्य म्हणजे उन्हात असताना ते थंड राहतं आणि थंडीत असताना ते गरम होतं. म्हणजे वातावरणानुसार फोन स्वतःचा तापमान नियंत्रित करतो. हे एकदम नवीन आणि पहिल्यांदाच दिसणारे फीचर आहे, जे Realme GT 7 ला इतर फोनपासून वेगळं आणि खास बनवतं.

Realme GT 7 मध्ये तुम्हाला आइससेंस ग्राफीन डिझाइन मिळतो, जो फोनला सतत थंड ठेवण्याचं काम करतो. यामुळे हे डिव्हाइस दीर्घ वेळ वापरलं तरी गरम होत नाही. या फोनमध्ये तुम्हाला LPDDR5X ची 16 GB RAM आणि UFS 4.0 स्टोरेज मिळतं, जे परफॉर्मन्सच्या दृष्टीने खूप प्रगत आहे.

Realme gt 7 कॅमेरा

कॅमेराबद्दल बोलायचं झालं, तर 50 मेगापिक्सेलचा 2x टेलीफोटो कॅमेरा दिला आहे, जो फोटोला सुंदर, ग्लो आणि एकदम क्लियर डिटेलिंग देतो. AI च्या जगात जर फोनमध्ये AI फीचर्स नसतील, तर त्याला स्मार्टफोन कसं म्हणणार, बरोबर ना? म्हणूनच Realme GT 7 मध्ये खूप सारे स्मार्ट AI फीचर्स दिले आहेत.

Realme gt 7 AI फीचर

यात एक भन्नाट फीचर आहे एआय प्लॅनर — जर तुम्ही एखाद्या मित्रासोबत जेवायला जायचं ठरवलं, तर फक्त स्क्रीन ओपन करा आणि बॅक पॅनलवर डबल टॅप करा. लगेचच AI त्या प्लॅनला तुमच्या फोनमध्ये रिमाइंडर म्हणून सेव करेल. याशिवाय, या फोनमध्ये तुम्हाला एआय इरेझर, एआय ट्रान्सलेटर, एआय रेकॉर्डिंग सारांश, एआय स्मार्ट लूप आणि आय रायटरer सारखे भन्नाट फीचर्सही मिळतात, जे GT 7 ला एकदम फ्युचर रेडी फोन बनवतात.

चला, या फोनबद्दल(realme gt 7 specs marathi) अजून व्यवस्थित फीचर्स पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या टेबल दादाकडे, जे आपल्याला अगदी स्पष्ट आणि सुसंगत पद्धतीने दाखवतील की या धमाकेदार स्मार्टफोनमध्ये नेमकं काय काय नवीन आहे!

Realme GT 7 स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत(realme gt 7 specs marathi)

realme gt 7 specs marathi
realme gt 7 specs marathi
realme gt 7 specs marathi
ऑपरेटिंग सिस्टमअँड्रॉइड 15(UI 6.0)
4 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 6 वर्षे सुरक्षा अपडेट्स
प्रोसेसरमीडियाटेक डायमेन्सिटी 9400e
इंटरनल स्टोरेज256 GB
रॅम8 GB
सुरक्षाइन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर
बॅटरीची क्षमता7000 mAh
अ‍ॅडॉप्टर120W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार6.78 इंच (एमोलेड डिस्प्ले)
रिझोल्यूशन2780 × 1264 पिक्सेल
पाणी संरक्षणIP69 जल-प्रतिरोधक डिझाइन
डिस्प्ले तंत्रज्ञान1)पीक ब्राइटनेस:- 6000 निट्स
2)120Hz पर्यंत रिफ्रेश रेट
3)HDR10+
4)इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेट:- 2600 पर्यंत
5)टच सॅम्पलिंग रेट:- 360Hz पर्यंत
सेंसर1)प्रॉक्सिमिटी सेन्सर
2)जायरोस्कोप
3)ई-कंपास
4)कलर टेम्परेचर सेन्सर
5)ॲक्सेलरोमीटर
6)अ‍ॅम्बियंट लाईट सेन्सर
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 32 मेगापिक्सेल + 32 मेगापिक्सेल (Sony IMX 615)
2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल + 50 मेगापिक्सेल + 50 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेल (Sony IMX 906)
3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 8K, 4K,1080
ऑडिओ1)ओ रिअलिटी ऑडिओ
2)हाय-रेझ ऑडिओ सर्टिफिकेशन
3)ड्युअल माइक नॉइस कॅन्सलेशन
रंग1)आइससेन्स ब्लॅक
2)आइससेन्स ब्ल्यू
3)ऍस्टन मार्टिन ग्रीन
कनेक्टिविटी5G, 4G, 3G, 2G
ब्लूटूथ v5.4, Wi-Fi 7
किंमत₹39,999

Realme GT 7 मध्ये तुम्हाला तीन पर्याय मिळतात: 8GB + 256GB, 12GB + 256GB, आणि 12GB + 512GB. जर आपण ह्या फोनला मागील व्हर्जन म्हणजेच realme GT 6 सोबत तुलना केली, तर दिसून येतं की प्रत्येक भागात रियलमी ने मोठं अपग्रेड केलं आहे – मग तो डिस्प्ले, परफॉर्मन्स, डिझाइन, किंवा बॅटरी असो. हा होता 2025 मधील realme चा फ्लॅगशिप किलर स्मार्टफोन!

तुम्हाला ह्या फोनबद्दल काय विशेष वाटलं? किंवा अजून काही फीचर असायला हवं होतं असं वाटतं का? तर खाली कमेंट करून नक्की सांगा.अशाच नव्या टेक लॉन्चसाठी पुन्हा भेटूया! Page ला subscribe करा आणि आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला फॉलो करा, म्हणजे तुम्हीही व्हाल LT Family चे सदस्य. ही तुमची सपोर्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे – कारण हा फक्त टेक ब्लॉग नाही, तर आपला एक छान टेक परिवार आहे! राधे राधे!

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment