रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन नियमावली तुम्ही वाचली का? ज्यात ATM वापरण्यापासून डिजिटल पेमेंटपर्यंत बऱ्याच गोष्टी मोफत झाल्या आहेत!

RBI Savings Account Rules Changes: रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांमध्ये ATM वापर, चेकबुक आणि डिजिटल पेमेंट मध्ये मोठे फायदे-काय मोफत झाले ते जाणून घ्या!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही नवीन नियमावली जाहीर केली आहे जी फक्त बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट्स (BSBD) ज्यांना झिरो बॅलन्स अकाऊंट किंवा जनधन अकाऊंट असेही म्हटले जाते या खात्यांसाठीच लागू होणार आहे.

RBI च्या या बदलामुळे ग्राहकांसाठी बँकिंग प्रक्रिया आणखी सोपी, स्वस्त आणि अधिक उपयुक्त होईल असा या नवीन नियमावलीचा दृष्टिकोन आहे. नवीन सेव्हिंग्स अकाऊंटसाठीची ही नियमावली सर्व बँकांवर लागू होणार आहे. मग त्या लहान फायनान्स बँका असोत, पेमेंट बँका असोत, को-ऑपरेटिव्ह बँका असोत, कमर्शियल बँका असोत किंवा रीजनल रुरल बँका आणि लोकल एरिया बँका असोत या सर्व बँकांना हे नियम लागू होणार आहेत.

नवीन नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. आता तुम्ही तुमचे सध्याचे रेग्युलर सेव्हिंग्स अकाऊंट केवळ 7 दिवसांत झिरो बॅलन्स BSBD अकाऊंट मध्ये रूपांतरित करू शकता. मात्र यासाठी एक अट आहे. तुमच्या नावावर त्याच बँकेत दुसरे कोणतेही सेव्हिंग्स अकाऊंट नसावे. हे रूपांतर करण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल किंवा बँकेत लेखी अर्ज सादर करावा लागेल. यापूर्वी हे करण्यासाठी बँका खूप वेळ लावायचे किंवा अतिरिक्त अटी सांगितल्या जात असायचे.

RBI ने आता स्पष्ट सांगितले आहे की ज्यांच्या कडे हे खाते बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट्स (BSBD) आहे त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि या खात्यांना लो-क्वालिटी अकाऊंट असे म्हणू नये.

खूप बँकांनी असा सुचवले होते की झिरो बॅलन्स अकाउंट फक्त काही ग्राहकांना द्यायला पाहिजे ज्यांची इनकम किंवा प्रोफाइल ठरावीक निकषांमध्ये बसते. RBI ने हे सगळे सुचव नाकारले आणि बँकांना बजावून सांगितले की प्रत्येक भारतीय नागरिकाला कोणतीही तडजोड न करता मोफत बँकिंग सेवा दिल्या पाहिजेत.

नवीन नियमावली जाहीर का केली?

Reserve Bank of India ला अनेक लोकांनी तक्रारी केल्या की बँका त्यांना पुरेशा डिजिटल सेवा देत नाहीत, काही गोष्टींसाठी अतिरिक्त शुल्क आकारतात, एटीएममधून विथड्रॉ करण्यासाठी मर्यादा लावतात आणि बेसिक अकाऊंट उघडण्यासाठी खूप अडचणी निर्माण करतात.

शाओमी 17 प्रो मॅक्स — जगातील पहिला फोन ज्याच्या मागे स्क्रीन आहे जी फोटो पासून मेसेजपर्यंत खूप काही करू शकते.

या सगळ्या तक्रारी लक्षात घेतल्यानंतर RBI ने लोकांना पुढे कोणताही त्रास होऊ नये म्हणून हे नवीन नियम जाहीर केले आहेत.

काय आहेत नवीन नियम आणि मोफत सुविधा? (rbi savings account rules changes marathi)

1) तुम्हाला आता कोणत्याही बेसिक सेव्हिंग्स अकाऊंट्स च्या ATM Card वर वार्षिक फी लागणार नाही आणि त्यासोबत तुम्ही जर नवीन खाते उघडले तर Debit Card साठीही कोणतीही फी लागणार नाही. खूप बँका आधी मेंटेनन्स चार्ज म्हणून फी लावत असतात पण आता ते सगळे शुल्क कायमस्वरूपी बंद होणार. असेही म्हणता येईल की Debit Card आता तुम्हाला आयुष्यभर मोफत मिळणार आहे.

2) पहिल्यांदा असं होत असे की काही बँका पहिल्या 2–3 वेळा कॅश विथड्रॉल फ्री देतात आणि नंतर ATM वापरल्यावर छोटे-छोटे चार्ज लावून पैसे कापायच्या, पण आता असं होणार नाही. RBI ने जाहीर केले आहे की प्रत्येक बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट्स (BSBD) धारकाला महिन्यातून 4 वेळा कोणत्याही बँकेच्या ATM मधून कॅश विथड्रॉल मोफत करता येणार आहे आणि ही सुविधा सर्वांसाठी मोफत असेल.

आता इथून पुढे पैसे किती वेळा काढू किंवा किती पैसे कट होतील याचा विचार करण्याची गरज नाही. प्रत्येक महिन्याला तुम्ही 4 वेळा ATM मधून पूर्णपणे मोफत पैसे काढू शकता

3) सर्व बँकांना आता त्यांच्या बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट्स (Basic Savings Bank Deposit Account) च्या ग्राहकांना मोफत चेकबुक द्यावे लागणार आहे. हो RBI ने यात असे सांगितले आहे की प्रत्येक वर्षी या खात्याचे ग्राहकांना २५ पानांचे चेकबुक मोफत दिले जाणार आहे.

आधी काय व्हायचं म्हणजे काही बँकांमध्ये १० ते १५ चेकबुक झाल्यानंतर चार्जेस लागायचे आणि नवीन चेकबुक मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागायचे पण आता असे काही होणार नाही. कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तुम्हाला प्रत्येक वर्षी नवीन चेकबुक मोफत मिळणार आहे.

4) हे ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. आता तुम्हाला Google Pay, UPI, IMPS, NEFT, RTGS करताना कोणताही शुल्क लागू होणार नाही. हे सर्व तुम्ही अगदी मोफत वापरू शकता. या निर्णयामुळे डिजिटल ट्रान्झॅक्शन्स वाढतील आणि डिजिटल इंडिया अभियान अधिक मजबूत होईल.

5) इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, पासबुक किंवा मंथली स्टेटमेंट (Monthly Statement) हे सर्व आता पूर्णपणे मोफत केले गेले आहे.

6) अ‍काउंट मध्ये मिनिमम बॅलन्स असणे आता गरजेचे राहिले नाही.

7) आता तुम्ही जितकी रक्कम हवी तितकी तुम्ही BSBD अकाउंट यात मोफत मध्ये डिपॉझिट करू शकता आणि ती कुठल्या ही माध्यमातून करता येईल.

हे सर्व सुर्विधा फक्त नवीन बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट्स (BSBD) अकाउंट धारकांनाच नाही तर ज्यांचे अकाउंट जुने आहे त्यांनाही मिळणार आहेत. तुम्हाला ही सुविधा हवी असल्यास ज्या बँकेमध्ये तुमचे बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट्स (BSBD) अकाउंट आहे, त्या बँकेमध्ये जाऊन सांगावे की आम्हाला RBI चे नवीन मार्गदर्शक तत्त्वे / मोफत सुविधा हवी आहेत आणि बँक तुम्हाला नकार देऊ शकणार नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या ह्या नवीन नियमांमुळे सर्व BSBD अकाउंटधारकांना खूप फायदा होणार आहे. आता पुढे कोणतीही काळजी करण्याची गरज नाही की कोणत्या कामासाठी किती शुल्क कापले जाईल कारण आता सर्व बँकिंग सेवा तुम्हाला मोफत मिळणार आहेत.

तुम्हाला RBI चे हे नवीन rbi savings account rules changes marathi नियम फायदेशीर वाटले का? कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवीन अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp चॅनेल लेखकाची टिप्पणी ला फॉलो करा आणि सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment