Poco F7-भारतातील सर्वात मोठी बॅटरी असलेला फोन, तोही Sony camera आणि Snapdragon 8s Gen 4 सारख्या दमदार प्रोसेसरसह!

पोकोने त्यांच्या F सीरिजमध्ये अजून एक दमदार फोन लाँच केला आहे, तो म्हणजे Poco F7. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, पोकोची ही F सीरिज ही परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांमध्ये या सीरिजमधील प्रत्येक फोनमध्ये काही ना काही सुधारणा करण्यात आली आहे. या सगळ्या सुधारणा एकत्र घेतल्या तर त्याचा परिणाम म्हणजेच Poco F7 हा फोन आहे. आजपर्यंत या सेगमेंटमध्ये जितके फोन लाँच झाले आहेत, त्यामध्ये डिझाइनच्या बाबतीत Poco F7 5g ने बाजी मारली आहे. असंही म्हणता येईल की हा “सर्वोत्कृष्ट डिझाईनपैकी एक” आहे.

हा फोन केवळ दिसायलाच प्रीमियम नाही तर वापरताना देखील तुम्हाला प्रीमियम फील देतो. Poco F7 5gच्या मागील बाजूला ग्लासफिनिश आहे आणि फ्रेम मेटल ची आहे. ग्लास आणि मेटल हे दोन्ही जास्त करून प्रीमियम फ्लॅगशिप फोन्समध्येच दिसतात, पण पोकोने या फोनमध्येही ते दिलं आहे. एवढंच नाही तर दोन्ही साईड्सना गोरिल्ला ग्लास 7i चं संरक्षण दिलं आहे. म्हणजे कितीही वेळा फोन हातातून खाली पडला तरी त्याला काहीही होणार नाही.

परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर, यात तुम्हाला स्नॅपड्रॅगन 8s जनरेशन 4 प्रोसेसर मिळतो. तुम्ही गेमिंग करत असाल, मध्येच मूव्ही बघायची इच्छा झाली, किंवा फोटो/व्हिडीओ काढायचे असतील – हे सगळं एकदम स्मूदली करता येतं, आणि फोन कधीही हँग होत नाही.

आता विषय निघालाच आहे तर बॅटरीबद्दल बोलूया – या फोनमध्ये तुम्हाला मिळतेय जबरदस्त 7550 mAh ची बॅटरी. म्हणजे तुम्ही दिवसभर 3-4 चित्रपट पाहिलात तरीही हा फोन सहज 12 तासांपर्यंत चालतो . भारतात सध्या सर्वात मोठी बॅटरी असलेल्या फोन्समध्ये याचं नाव घेतलं जातं. एवढी मोठी बॅटरी असून सुद्धा हा फोन तुम्हाला जड अजिबात वाटणार नाही, कारण हा फक्त 8.2 mm जाड आहे आणि वजन फक्त 215.7 ग्रॅम आहे. त्याचबरोबर, Poco F7 5g हा फोन “ट्रिपल टीयूव्ही ” प्रमाणपत्र सोबत येतो, म्हणजेच जर चुकून फोन पाण्यात पडला, किव्हा त्यावर पाणी उडालं, तरी देखील फोनला काहीच होणार नाही.

चला तर मग, ह्या स्टायलिश फोनमध्ये अजून काय काय फीचर्स(Poco f7 specifications marathi) दिले आहेत ते पाहूया आपल्या टेबल दादामार्फत.

(Poco f7 specifications marathi)फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, आणि किंमत

Poco f7 specifications marathi
फ्रॉस्ट व्हाइट
Poco f7 specifications marathi
सायबर सिल्व्हर एडिशन
Poco f7 specifications marathi
फॅन्टम ब्लॅक
ऑपरेटिंग सिस्टमअँड्रॉइड 15(HyperOS 2.0)
4 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 6 वर्षे सुरक्षा अपडेट्स
प्रोसेसरस्नॅपड्रॅगन 8s जनरेशन 4
इंटरनल स्टोरेज256 GB
रॅम12 GB
सुरक्षाइन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर
बॅटरीची क्षमता7500 mAh
अ‍ॅडॉप्टर90W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार6.83 इंच (कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i)
रिझोल्यूशन2772 × 1280 पिक्सेल
पाणी संरक्षणIP66+IP68+IP69 जल-प्रतिरोधक डिझाइन
डिस्प्ले तंत्रज्ञान1)पीक ब्राइटनेस:- 3200 निट्स
2)120Hz रिफ्रेश रेट
3)कलर: ६८ अब्ज रंग
4)HDR10+
5)इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेट:- 2160
6)टच सॅम्पलिंग रेट:- 480Hz
सेंसर1)प्रॉक्सिमिटी सेन्सर
2)जायरोस्कोप
3)ई-कंपास
4)फिंगरप्रिंट सेन्सर
5)ॲक्सेलरोमीटर
6)अ‍ॅम्बियंट लाईट सेन्सर
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 20 मेगापिक्सेल
2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल Sony OIS ड्युअल रिअर कॅमेरा + EIS (IMX 882), सोनी अल्ट्रा वाईड कॅमेरा 8 मेगापिक्सेल
4)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4k
ऑडिओड्युअल स्टीरिओ स्पीकर्स डॉल्बी अ‍ॅटमॉस® सह,
Hi-Res ऑडिओ प्रमाणपत्र
रंग1)फॅन्टम ब्लॅक
2)फ्रॉस्ट व्हाइट
3)सायबर सिल्व्हर एडिशन
कनेक्टिविटी5G, 4G, 3G, 2G
ब्लूटूथ v6, Wi-Fi 7
किंमत₹31,999

या फोनमध्ये तुम्हाला रिव्हर्स चार्जिंग ही करता येणार आहे. यासाठी फक्त एक चार्जिंग केबलची गरज आहे – ज्या फोनला चार्ज करायचं आहे तो आणि Poco F7 हे दोन्ही केबलद्वारे एकमेकांशी कनेक्ट करा आणि लगेच दुसऱ्या फोनचं चार्जिंग सुरू होईल. AI फिचर्स बद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये तुम्हाला पुढील शानदार फीचर्स मिळतात: एआय क्रिएटिव्हिटी असिस्टंट, एआय नोट्स, एआय इंटरप्रिटर, सर्कल टू सर्च,एआय रेकॉर्डर आणि जेमिनी हे सगळे फीचर्स Poco F7 ला अजूनच दमदार बनवतात.

पोको F7 मध्ये तुम्हाला २ व्हेरिएंट्स मिळणार आहेत: 12GB + 256GB आणि 12GB + 512GB. जर तुम्ही बँक ऑफर लावून हा फोन घेत असाल, तर हा फोन तुम्हाला ₹३०,००० च्या खाली मिळू शकतो. तर नक्की एकदा लिंकवर क्लिक करा आणि पाहा! तुम्हाला या फोनमध्ये कोणते फीचर्स आवडले ते कमेंट करून नक्की सांगा.
पुन्हा भेटूया अशाच एका नव्या लॉन्च सह. तोपर्यंत खुश राहा आणि काळजी घ्या.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment