Pixel 10 pro xl marathi
Google ने त्यांची Google Pixel 10 सिरीज शेवटी लॉन्च केली. हे फोन्स Google साठी सर्वात महत्त्वाचे डिव्हाइसेस आहेत. यावेळी Google ने डिस्प्ले, परफॉर्मन्स, कॅमेरा या सगळ्या गोष्टींमध्ये खूप बदल केले आहेत. Google Pixel चे फोन्स महत्त्वाचे का असतात? कारण हळूहळू जितकेही फीचर्स यात असतात ते Android मध्ये येतात.
गूगल ने 10 सिरीजमध्ये 3 फोन्स लॉन्च केले आहेत – Google Pixel 10, Google Pixel 10 Pro आणि Google Pixel 10 Pro XL. सर्व फोन्समध्ये जवळजवळ सारखीच फीचर्स आहे जसे की प्रोसेसर, चार्जिंग स्लॉट आणि PixelSnap. आज आपण पाहणार आहोत pixel 10 pro xl marathi review, पाहूया Google Pixel 9 Pro XL आणि Google Pixel 10 Pro XL मध्ये काय फरक आहे आणि काय नवे फीचर्स दिली आहेत.
Google pixel 10 Pro XL डिस्प्ले
Pixel 10 Pro XL दिसायलाही खूप प्रीमियम वाटतो. आधीचा जो फोन आहे Google Pixel 9 Pro XL, त्याच्यासारखाच Pixel 10 Pro XL आहे – सेम डिझाईन, सेम डायमेंशन्स, कॅमेरा मॉड्यूलसुद्धा तेच, आणि फोनची जाडीही जवळजवळ सारखीच आहे. डिस्प्ले देखील तोच आहे – 6.8 इंच QHD+ Super Actua डिस्प्ले दिलेला आहे. पण एक गोष्ट आहे जी अपग्रेड केली आहे आणि ती म्हणजे ब्राइटनेस. Google Pixel 9 Pro XL मध्ये आधी तुम्हाला 3000 निट्स ब्राइटनेस मिळत होता, पण आताच्या 10 सिरीजमध्ये तो वाढवून 3300 निट्स केला आहे. त्यामुळे बाहेर उन्हात फोन वापरताना ब्राइटनेस खूप मदत करेल.
Google pixel 10 Pro XL कॅमेरा

आता येऊ या त्या गोष्टीकडे ज्याची चर्चा सध्या खूप चालू आहे, म्हणजे Google Pixel 10 Pro XL मधल्या कॅमेऱ्याची. Pixel 10 Pro XL मध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. आता किती मेगापिक्सेलचे कॅमेरे आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या तक्त्याकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. कॅमेरा फिचर्समध्ये मात्र खूप धमाल दिली आहे. यात तुम्हाला Camera Coach हे फिचर मिळणार आहे. आता हे Camera Coach म्हणजे काय? हे एक AI आहे जे साधन मधून AI वापरतं. हे तुम्हाला सांगतं की तुम्ही कसा एकदम छान फोटो काढू शकता. ज्यांना माहित नसतं कोणत्या अँगलने फोटो काढायचा, त्यांच्यासाठी हे AI फिचर खूप उपयोगी आहे म्हणजे तुमचा फोटो एकदम छान येईल.
दुसरं फिचर आहे Guided Frame. हे तुम्हाला सांगणार की फोटोमध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत आणि त्या फ्रेममध्ये कशा बसवायच्या. सर्वात भारी फिचर जे Google Pixel 10 Pro XL मध्ये दिलं आहे ते म्हणजे ProRes Zoom, ज्याच्या मदतीने तुम्ही 100x पर्यंत झूम करू शकता. इतकं 100x झूम करण्यासाठी Google ने यात AI चा वापर केला आहे, जो Tensor G5 मध्ये आहे. AI च्या मदतीने 100x मध्ये काढलेला फोटो आणखी शार्प आणि क्लिअर करतो. रेकॉर्डिंगकडे पाहिलं तर सेल्फी कॅमेऱ्यात 4K रेकॉर्डिंगचा सपोर्ट मिळणार आहे, ज्यामुळे तुमचे व्हिडिओ खूप नॅचरल आणि उत्तम शूट होतील.
Google pixel 10 Pro XL परफॉर्मन्स
Google ने परफॉर्मन्ससाठी यावेळी नवं प्रोसेसर/चिपसेट Tensor G5 दिलं आहे आणि सोबत Titan M2 हा सिक्युरिटी चिप आहे जो प्रायव्हसीसाठी वापरला आहे. तुम्ही या फोनमध्ये गेमिंग किंवा मल्टी-टास्किंग आरामात करू शकता, तेही कोणत्याही लॅगिंगशिवाय. Pixel 9 Pro XL मध्ये तुम्हाला 5060 mAh ची बॅटरी मिळते, पण आता Google Pixel 10 Pro XL मध्ये 5200 mAh ची बॅटरी मिळणार आहे आणि चार्जिंग स्पीडमध्ये वाढ केली आहे. अजून यात PixelSnap देखील दिले आहे, जसं MagSafe असतं Apple मध्ये तसंच यातही आहे.
Google Pixel 10 XL स्पेसिफिकेशन्स फीचर्स आणि किंमत(pixel 10 pro xl marathi review)



| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 16 7 वर्षे ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट्स + 7 वर्षे सुरक्षा अपडेट्स |
| प्रोसेसर | गूगल टेन्सर G5 |
| इंटरनल स्टोरेज | 256 GB |
| रॅम | 16GB |
| सुरक्षा | इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर |
| बॅटरीची क्षमता | 5200 mAh |
| अॅडॉप्टर | वायर चार्जिंग: – 45W पिक्सेलस्नॅप वायरलेस चार्जिंग: – 25W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.8 इंच (कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस 2 कव्हर ग्लास) |
| रिझोल्यूशन | 1344 x 2992 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IP68 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)1-120Hz रिफ्रेश रेट 2)पीक ब्राइटनेस:- 3300 निट्स 3)साधारण ब्राइटनेस:- 2200 निट्स 4)HDR |
| सेंसर | 1)प्रॉक्सिमिटी सेन्सर 2)जायरोमीटर 3)मॅग्नेटोमीटर 4)ॲक्सेलरोमीटर 5)अॅम्बियंट लाईट सेन्सर 6)बॅरोमीटर 7)तापमान सेन्सर |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 42 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल + 48 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड मॅक्रो फोकससह + 48 मेगापिक्सेल ५x टेलीफोटो लेन्स, प्रो रेस झूम १००x पर्यंत 3)फुल एचडी रेकॉर्डिंग 4)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 8K, 4K, 1080P |
| ऑडिओ | स्टीरिओ स्पीकर्स |
| रंग | 1)मूनस्टोन 2)जेड 3)ऑब्सिडियन |
| कनेक्टिविटी | 5G, 4G, 3G, 2G ब्लूटूथ v6, Wi-Fi 7 |
| किंमत | ₹1,24,999 |
Google मध्ये आतापर्यंत जितकी AI फीचर्स आहेत ती सगळी या फोनमध्ये मिळणार आहेत, जसं की गूगल जेमिनी, सर्कल टू सर्च,लाईव्ह ट्रान्सलेट, कॉल असिस्ट. Google ने आणखी एक भन्नाट AI फीचर दिलं आहे ज्याला “मॅजिक क्यू” असं म्हणतात. हे एक AI असिस्टंट आहे, जे तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामाचं विश्लेषण करून लक्षात ठेवतं – जसं की ई-मेल लिहिताना, नोट्स ऍड करताना. नंतर गरज पडल्यावर हे फीचर तुम्हाला मदत करतं. उदाहरणार्थ, समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी WhatsApp वर चॅट करताय आणि त्याने विचारलं की उद्या ऑफिसमध्ये किती वाजता मीटिंग आहे, तर हे AI तुमच्या ई-मेलमधून वेळ शोधून तो मेसेजमध्ये ऑटोमॅटिक दाखवेल.
गुगल पिक्सेल 10 प्रो XL सिरीज कडे पाहिलं तर फोनमध्ये बदल फक्त फीचर्स आणि सॉफ्टवेअरमध्येच करण्यात आला आहे, बाकी डिझाईन आणि डायमेंशन्स हे गुगल पिक्सेल 9 प्रो XL सारखेच आहेत.
तुम्हाला जर हा फोन घ्यायचा असेल तर फ्लिपकार्ट वर प्री-ऑर्डर सुरू आहे. फोनचे फीचर्स पाहून आणि खास करून कॅमेऱ्यात असलेल्या 100x झूमबद्दल काय वाटतं, ते कमेंट करून नक्की सांगा.