Oppo Reno 15 Series Marathi
Oppo ने भारता मध्ये त्यांची नवीन धमाकेदार Oppo Reno 15 Series लॉन्च केली असून ही सिरीज 8 जानेवारी 2025 रोजी सादर करण्यात आली आहे. यावेळी Oppo ने Reno 15 Series मध्ये 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. ओप्पो Reno 15, Oppo Reno 15 Pro आणि Oppo चा पहिला कॉम्पॅक्ट स्मार्टफोन Oppo Reno 15 Pro Mini असे हे तीन स्मार्टफोन Reno 15 Series मध्ये लॉन्च झाले आहेत.
ओप्पो ने मागील वर्षी Reno 14 Series लॉन्च केली होती आणि ती सिरीज लोकांना प्रचंड आवडली होती. याच कारणामुळे Oppo ने त्यांची पुढची सिरीज म्हणजेच Oppo Reno 15 Series लॉन्च केली आहे. तुम्ही जर Reno 15 Series मधील स्मार्टफोन्सचे डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स पाहिले तर मला खात्री आहे की ही सिरीज तुम्हाला 100 टक्के आवडेल.
आज आपण या सिरीजमधले 2 स्मार्टफोन पाहणार आहोत. पहिला म्हणजे Oppo Reno 15 आणि दुसरा Oppo Reno 15 Pro Mini.
Oppo Reno 15 Pro Mini आणि Reno 15 Pro यामध्ये फारसा काही फरक नाही, फक्त साइजमध्ये फरक आहे. स्पेसिफिकेशन्समध्ये जर कुठला मोठा बदल असेल तर तो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे.
चला तर मग पाहूया अशा कोणत्या नविन गोष्टी आहेत ज्या Oppo Reno 14 Series पासून या सिरीजला वेगळं करतात. तुम्हाला जर Oppo Reno 14 Pro बद्दल माहिती नसेल त्याची डिझाइन कशी आहे आणि कोणते स्पेसिफिकेशन्स आहेत तर आपल्या Lekhakachi Tippani वर त्याची संपूर्ण माहिती दिली आहे.
Oppo Reno 15 Series Marathi
डिस्प्लेबद्दल बोलायचं झालं तर Oppo Reno 15 मध्ये 6.59” 1.5K एमोलेड LTPS डिस्प्ले मिळतो तर Oppo Reno 15 Pro Mini हा 6.32” 1.5K एमोलेड LTPS डिस्प्ले सोबत येतो. आजकाल लोकांना कॉम्पॅक्ट स्मार्टफोन म्हणजेच आकाराने छोटे असलेले फोन जास्त आवडू लागले आहेत. हे लक्षात घेऊनच Oppo ने Reno 15 Series मध्ये Reno 15 Pro Mini हा व्हेरिएंट लॉन्च केला आहे. जे लोक Oppo चे फॅन आहेत आणि ज्यांना Oppo ब्रँडचाच कॉम्पॅक्ट स्मार्टफोन हवा आहे त्यांच्यासाठी Oppo Reno 15 Pro Mini हा खास पर्याय आहे.

आपण जर दोन्ही स्मार्टफोनकडे पाहिलं तर Oppo ने डिझाइनमध्ये कसलीही कसर ठेवलेली नाही. Reno 15 आणि Reno 15 Pro Mini या दोन्ही मॉडेल्सना खूपच सुंदर डिझाइन देण्यात आलं आहे. तुम्ही जर नीट लक्ष दिलंत तर मागच्या बाजूला Oppo ने एक रिबन पॅटर्न दिला आहे, जो प्रकाशात किंवा उजेड पडल्यावर अधिक ठळकपणे दिसतो. अशी डिझाइन तयार करण्यासाठी Oppo ने इंडस्ट्री-फर्स्ट होलोफ्युजन टेक्नॉलॉजी चा वापर केला आहे ज्यामुळे ही डिझाइन 3D मध्ये दिसते असा अनुभव येतो.
दोन्हींच्या डिस्प्लेमध्ये व्हिडिओ क्वालिटी पाहिली तर खूपच प्रीमियम आणि व्हायब्रंट व्हिडिओ अनुभव मिळतो. यासोबतच Reno 15 Pro आणि Reno 15 Pro Mini मध्ये स्क्रीन प्रोटेक्शनसाठी Oppo ने कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i दिला आहे ज्यामुळे फोन चुकून खाली पडला तरी फारसं नुकसान होणार नाही. डिस्प्ले फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर यात फ्लॅश टच आणि ग्लोव्ह टच सपोर्ट मिळतो म्हणजेच हात ओले असले तरी किंवा रायडिंग ग्लोव्हज घातले असतील तरीसुद्धा तुम्ही डिस्प्ले सहज वापरू शकता.
Oppo Reno 15 Series Camera Marathi
तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण Oppo हे Reno सिरीजमध्ये कॅमेऱ्यावर विशेष लक्ष देते म्हणजेच त्यांच्या युजर्सना कॅमेऱ्यामध्ये कुठलीही कमतरता जाणवू देत नाही. Oppo Reno 15 series चा कॅमेरा रिव्ह्यू पाहता तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल Sony IMX882 प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड लेन्स आणि 50 मेगापिक्सेल JN5 टेलिफोटो लेन्स दिला आहे. यासोबतच सेल्फी कॅमेरा देखील 50 मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे.
कॉम्पॅक्ट स्मार्टफोन Oppo Reno 15 Pro Mini मध्ये तुम्हाला थेट 200 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा पाहायला मिळतो. त्यासोबत 50 मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आणि 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड लेन्स दिला आहे. सेल्फी कॅमेऱ्यामध्ये देखील तोच 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळणार आहे जो Oppo Reno 15 मध्ये देण्यात आला आहे.

कॅमेऱ्यामध्ये Oppo ने या मिनी व्हेरिएंटमध्ये मोठा बदल केला आहे. दोन्ही स्मार्टफोन मध्ये फोटो खूपच नॅचरल, ब्राइट आणि व्हायब्रंट कॅप्चर होतात. मात्र Oppo Reno 15 Pro Mini मध्ये Reno 15 पेक्षा अधिक चांगले फोटो मिळतात कारण तुम्ही पाहिल्या प्रमाणे मेन कॅमेऱ्या मध्ये दोन्ही स्मार्टफोनमध्ये मोठा फरक देण्यात आला आहे.
Oppo ने कॅमेऱ्यामध्ये काही खास AI फीचर्स दिले आहेत. जसे की AI पोर्ट्रेट ग्लो ज्यामुळे ज्या फोटोंना लाईटची गरज वाटते ते फोटो अधिक ब्राइट आणि ग्लोइंग दिसतात. AI मोशन फोटो इरेझर या फीचरच्या मदतीने तुमच्या फोटो किंवा व्हिडिओ मध्ये नको असलेली वस्तू तुम्ही सहज काढू शकता.
व्हिडिओ रेकॉर्डिंगबाबत बोलायचं झालं तर Oppo Reno 15 आणि Oppo Reno 15 Pro Mini या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये तुम्ही 4K 60FPS आणि HDR मध्ये व्हिडिओ शूट करू शकता. तसेच सेल्फी कॅमेऱ्यामधूनसुद्धा 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
Oppo Reno 15 Performance Marathi
परफॉर्मन्सकडे पाहिलं तर दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये वेगवेगळे चिपसेट/प्रोसेसर देण्यात आले आहेत त्यामुळे परफॉर्मन्स मध्ये तुम्हाला फरक जाणवेल. Oppo Reno 15 मध्ये स्नॅपड्रॅगन 7 जन 4 प्रोसेसर मिळतो तर Oppo Reno 15 Pro आणि Oppo Reno 15 Pro Mini या दोन्ही मॉडेल्स मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8450 प्रोसेसर देण्यात आला आहे.
दोन्ही चिपसेटकडे पाहिलं तर दोन्हीही शक्तिशाली चिपसेट्स आहेत. त्यामुळे तुम्ही गेमिंग, एडिटिंग किंवा मल्टी-टास्किंग काहीही केलं तरी हे स्मार्टफोन्स कोणताही लाग न होता पूर्णपणे स्मूथ चालतील.
Oppo Reno 15 Battery Marathi
ओप्पोने यावेळी Reno 15 सीरिजमध्ये बॅटरीची क्षमता वाढवली आहे. Reno 15 मध्ये तुम्हाला 6500mAh बॅटरीसोबत 80W फास्ट चार्जिंग अॅडॅप्टर मिळतो तर Oppo Reno 15 Pro Mini मध्ये 6200mAh बॅटरी आणि 80W अॅडॅप्टर देण्यात आला आहे. Reno 15 मध्ये तुम्हाला 6500mAh बॅटरीसोबत 80W फास्ट चार्जिंग अॅडॅप्टर मिळतो तर Oppo Reno 15 Pro Mini मध्ये 6200mAh बॅटरी आणि 80W अॅडॅप्टर देण्यात आला आहे.
तुम्हाला आता अनोळखी कॉल कधीच येणार नाहीत! CNAP या सेवेमुळे समोरच्या व्यक्तीचं खरे नाव दिसणार. CNAP म्हणजे काय
Oppo Reno 15 Series AI Features
आजच्या AI च्या दुनियेत प्रत्येक स्मार्टफोनमध्ये आपल्याला AI फीचर्स पाहायला मिळतात आणि Oppo ने या स्मार्टफोन्समध्ये सुद्धा AI फीचर्स दिले आहेत. पहिलं फीचर म्हणजे AI माइंड स्पेस. हे फीचर काय करतं समजा उद्या तुमची Zoom वर ५ वाजता मीटिंग आहे तर तीन बोटांनी वर स्वाइप करून तुम्ही ती माहिती तिथे सेव्ह करू शकता आणि AI माइंड स्पेस तुम्हाला त्या वेळेला आठवण करून देईल.
AI व्हॉइसस्क्राईब तुम्हाला कामामध्ये लाईव्ह ट्रान्सलेशन करून देणार. उदाहरणार्थ Zoom वर मीटिंग चालू असताना समोरची व्यक्ती इंग्रजीमध्ये बोलत असेल आणि तुम्हाला इंग्रजी समजत नसेल तर या AI फीचरच्या मदतीने तुम्हाला हिंदी मध्ये सबटायटल्स दिसून येतील.
Oppo Reno 15 Series Marathi




(Oppo Reno 15 Pro Mini Marathi)

(Oppo Reno 15 Pro Mini Marathi)
| Oppo Reno 15 | Oppo Reno 15 Pro Mini | |
| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 15(ColorOS 16.0) 5 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 5 वर्षे सुरक्षा अपडेट्स | अँड्रॉइड 15(ColorOS 16.0) 5 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 5 वर्षे सुरक्षा अपडेट्स |
| प्रोसेसर | स्नॅपड्रॅगन 7 जन 4 | मीडियाटेक डायमेन्सिटी 8450 |
| इंटरनल स्टोरेज | 256 GB, 512 GB | 256 GB, 512 GB |
| रॅम | 8GB,12GB | 12GB |
| सुरक्षा | इन डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर | इन डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर |
| बॅटरीची क्षमता | 6500 mAh | 6200 mAh |
| अॅडॉप्टर | 80W | 80W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.59 इंच (कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i) | 6.32 इंच (कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i) |
| रिझोल्यूशन | 2760 × 1256 पिक्सेल | 2640 × 1216 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IP66, IP68, IP69 जल-प्रतिरोधक डिझाइन | IP66, IP68, IP69 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)सामान्य ब्राइटनेस:- 600 निट्स 2)हाय ब्राइटनेस मोड(HBM):- 1200 निट्स 3)120 हर्ट्झ रिफ्रेश रेट 4)कलर डेप्थ:- 1.07 अब्ज रंग 5)टच सॅम्पलिंग रेट:- 120Hz, 240Hz 6)FHD+ | 1)सामान्य ब्राइटनेस:- 600 निट्स 2)हाय ब्राइटनेस मोड(HBM):- 1800 निट्स 3)120 हर्ट्झ रिफ्रेश रेट 4)कलर डेप्थ:- 1.07 अब्ज रंग 5)टच सॅम्पलिंग रेट:- 120Hz, 240Hz 6)FHD+ |
| सेंसर | 1)ॲक्सेलरोमीटर 2)प्रॉक्सिमिटी सेन्सर 3)अॅम्बियंट लाइट सेन्सर 4)जायरोस्कोप 5)ई-कंपास 6)इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल | 1)ॲक्सेलरोमीटर 2)प्रॉक्सिमिटी सेन्सर 3)अॅम्बियंट लाइट सेन्सर 4)जायरोस्कोप 5)ई-कंपास 6)इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल वाईड अँगल + 8 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड कॅमेरा + 50 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K,1080P, 720P | 1)सेल्फी कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 200 मेगापिक्सेल कॅमेरा + 8 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड कॅमेरा + 50 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K,1080P, 720P |
| ऑडिओ | स्टीरिओ स्पीकर्स | स्टीरिओ स्पीकर्स |
| रंग | 1)ग्लेशियर व्हाइट 2)ऑरोरा ब्लू 3)ट्वायलाइट ब्लू | 1)ग्लेशियर व्हाइट 2)कोकोआ ब्राउन |
| कनेक्टिविटी | 5G, 4G LTE, 3G, 2G ब्लूटूथ v5.4, Wi-Fi 5, Wi-Fi 6 | 5G, 4G LTE, 3G, 2G ब्लूटूथ v5.4, Wi-Fi 5, Wi-Fi 6 |
| किंमत | ₹45,999 | ₹59,999 |
Oppo Reno 15 Series Marathi Price
ओप्पो रेनो 15 मध्ये तुम्हाला 3 व्हेरिएंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत आणि प्रत्येक व्हेरिएंटनुसार त्यांची किंमत वेगवेगळी आहे. Reno 15 चे 3 व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले आहेत. 8GB + 256GB ज्याची किंमत ₹45,000 आहे, 12GB + 256GB ज्याची किंमत ₹48,999 आहे आणि 12GB + 512GB ज्याची किंमत ₹53,999 आहे.
आता Oppo Reno 15 Pro Mini कडे पाहिलं तर यात तुम्हाला 2 व्हेरिएंट मिळतात. पहिला व्हेरिएंट 12GB + 256GB चा असून त्याची किंमत ₹59,999 आहे आणि दुसरा व्हेरिएंट 12GB + 512GB चा असून त्याची किंमत ₹64,999 आहे.
