Oppo ने लॉन्च केली आहे त्यांची नवीन सिरीज —Reno 14 सिरीज. या सिरीजमध्ये तुम्हाला दोन फोन पाहायला मिळणार आहेत: एक आहे Oppo Reno 14 5G आणि दुसरा Oppo Reno 14 Pro 5G. आज आपण पाहणार आहोत Oppo Reno 14 Pro 5G,
आणि Reno 14 5G बद्दल मी एक वेगळा ब्लॉग लिहीन,म्हणजे तुम्हाला दोघांमध्ये गोंधळ होणार नाही.
तुम्हाला कदाचित माहिती नसेल,पण Oppo ची ही Reno सिरीज ऑफलाइन मार्केटमध्ये, म्हणजे दुकानांमधून, खूपच मोठ्या प्रमाणावर विकली गेलेली सिरीज आहे. मागच्या 2-3 वर्षांकडे जर आपण पाहिलं, तर Oppo Reno सिरीजच्या फोनमध्ये डिझाईन आणि कॅमेरा या दोन गोष्टी नेहमीच हायलाईट होत आल्या आहेत. आता Reno 14 सिरीजमध्ये देखील Oppo ने ह्याच गोष्टी कायम ठेवल्या आहेत — फारसे बदल न करता.
पण यावेळी Reno 14 सिरीजमध्ये डिझाईन आणि कॅमेरासोबतच काही नव्या गोष्टी देखील मिळणार आहेत, जसं की: वायरलेस चार्जिंग, उत्तम परफॉर्मन्स आणि मोठा डिस्प्ले. Oppo च्या या सिरीजला आपण एक सर्वगुणसंपन्न फोन सिरीज म्हणू शकतो, कारण ती डिझाईन, कॅमेरा, परफॉर्मन्स आणि फीचर्स यांचा परिपूर्ण मेळ देतात.

Reno 14 सिरीजमध्ये काय नवीन फीचर्स दिले आहेत, याबद्दल आधी बोलून घेऊया. Oppo Reno 14 Pro मध्ये आता तुम्हाला खूपच प्रिमियम डिझाईन मिळणार आहे. म्हणजे, जर तुम्ही पर्ल व्हाइट हा कलर निवडला, तर त्याच्या बॅकसाईडवर रंग बदलताना दिसणार आहे – खूपच स्टायलिश लूक.या फोनमध्ये Oppo ने वेल्वेट ग्लास चा वापर केला आहे, ज्यामुळे फोनला मखमली टेक्श्चर मिळतो. विशेष म्हणजे, वेल्वेट ग्लास वापरणारा हा इंडस्ट्रीतला पहिलाच फोन आहे.
ओप्पो रेनो 14 pro डिस्प्ले,परफॉर्मन्स
डिस्प्ले मध्ये यावेळी एक नवीन वैशिष्ट्य म्हणजे स्प्लॅश टच दिलं आहे. याचा अर्थ असा की, तुमचे हात थोडे ओले असले किंवा फोनवर थोडंसं पाणी सांडलेलं असलं, तरीसुद्धा फोनचं टच व्यवस्थित काम करतं. त्याचबरोबर यामध्ये हातमोजे टच हे फीचरही दिलं आहे. म्हणजे, जर तुम्ही बाईक चालवत असाल आणि तुम्हाला कॉल आला, तर हातमोजे घातलेल्या स्थितीत सुद्धा तुम्ही तो कॉल रिसीव्ह करू शकता.
परफॉर्मन्स बाबतीत Oppo ने यावेळी खूप जबरदस्त अपग्रेड दिलं आहे. Oppo Reno 14 Pro मध्ये तुम्हाला मीडियाटेक डायमेंसिटी 8450 (4nm) हा प्रोसेसर मिळतो. कंपनीचा दावा आहे की, हा इंडस्ट्रीमधला पहिला डिव्हाइस आहे ज्यामध्ये 8450 मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे — खरंच एक खास गोष्ट! हा प्रोसेसर तुम्हाला स्मूद गेमिंग आणि मल्टीटास्किंगचा जबरदस्त अनुभव देतो.
तुम्ही जास्त वेळ गेम खेळला तरी काही अडचण जाणवणार नाही, कारण Oppo ने ह्या फोन मध्ये दिलं आहे नॅनो ड्युअल-ड्राइव्ह कूलिंग आर्किटेक्चर,हे एक अॅडव्हान्स्ड कूलिंग सिस्टीम आहे. म्हणजे,जेव्हा तुम्ही गेमिंग करता किंवा एखादा हेवी टास्क चालू असतो आणि फोन गरम होऊ लागतो, तेव्हा हे सिस्टीम त्या उष्णतेला नियंत्रित करतं आणि फोनला थंड ठेवतं.
फोनमध्ये AI फीचर्स नसतील तर आजच्या काळात तो अपूर्णच वाटतो, बरोबर ना? Oppo Reno 14 Pro मध्ये तुम्हाला काही भन्नाट आणि खूपच उपयोगी AI फीचर्स मिळतात:
(Oppo reno 14 pro specifications marathi) AI फीचर्स
1)AI परफेक्ट शॉट – समजा तुम्ही कुणाचा फोटो काढलात आणि त्या फोटोमध्ये त्या व्यक्तीचे डोळे चुकून बंद झाले असतील, तर या फीचरच्या मदतीने तुम्ही त्या व्यक्तीचे डोळे उघडे करू शकता. फोटो सुधारण्यासाठी एकदम परफेक्ट टूल!
2)AI अनब्लर – जुने, हललेले किंवा थोडे ब्लर झालेले फोटो असतील तर हे फीचर ते फोटो एकदम क्लियर आणि शार्प बनवू शकतं.
3)AI इरेझर – फोटोमध्ये जर कुणी नको असलेली व्यक्ती, वस्तू किंवा पार्श्वभूमी असेल आणि ती काढायची असेल, तर या फीचरने तुम्ही ती साफपणे डिलीट करू शकता – अगदी सहज!
आता चला आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या गोष्टीकडे – म्हणजेच कॅमेरा ! Oppo Reno 14 Pro चा कॅमेरा सेगमेंट खरोखरच जबरदस्त आहे. या फोनमध्ये तुम्हाला ५० मेगापिक्सेलचे ३ कॅमेरे दिले गेले आहेत, जे वेगवेगळ्या अँगल्स आणि सिच्युएशन्समध्ये उत्तम काम करतात. त्याचबरोबर यात ट्रिपल एआय फ्लॅशलाइट पण दिले गेले आहे, जे रात्रीच्या वेळी किंवा कमी लाइटमध्ये फोटो काढताना तुमच्या फोटोंना अजून चमकदार आणि स्पष्ट बनवतात.
स्पष्टपणे अजून ह्या(oppo 14 pro specifications marathi) फोनमध्ये काय-काय दिलं आहे हे पाहण्यासाठी चला तर मग जाऊया आपल्या टेबल दादाकडे — जे आपल्याला प्रत्येक फीचर, कॅमेरा, रंग यांची संपूर्ण आणि नीट माहिती दाखवतील.
(Oppo reno 14 pro specifications marathi) – तपशील, फीचर्स आणि किंमत



| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 15(ColorOS 15.0) 3 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 4 वर्षे सुरक्षा अपडेट्स |
| प्रोसेसर | मीडियाटेक डायमेंसिटी 8450 (4nm) |
| इंटरनल स्टोरेज | 256 GB |
| रॅम | 12GB |
| सुरक्षा | इन डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर |
| बॅटरीची क्षमता | 6200 mAh |
| अॅडॉप्टर | 80W वायरलेस चार्जिंग:- 50W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.83 इंच (कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i) |
| रिझोल्यूशन | 1272 × 2800 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IP66, IP68, IP69 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)सामान्य ब्राइटनेस:- 600 निट्स 2)हाय ब्राइटनेस मोड(HBM):- 1200 निट्स 3)60/90/120 हर्ट्झ रिफ्रेश रेट 4)कलर डेप्थ:- 1.07 अब्ज रंग 5)टच सॅम्पलिंग रेट:- 120Hz, 240Hz |
| सेंसर | 1)ॲक्सेलरोमीटर 2)प्रॉक्सिमिटी सेन्सर 3)अॅम्बियंट लाइट सेन्सर 4)जायरोस्कोप 5)ई-कंपास 6)इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल 7)रंग तापमान सेन्सर 8)हॉल सेन्सर |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल वाईड अँगल + 50 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड कॅमेरा + 50 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- |
| ऑडिओ | स्टीरिओ ड्युअल स्पीकर्स |
| रंग | 1)पर्ल व्हाइट 2)टायटॅनियम ग्रे |
| कनेक्टिविटी | 5G, 4G LTE, 3G, 2G ब्लूटूथ v5.4, Wi-Fi 5, Wi-Fi 6 |
| किंमत | ₹49,999 |
तुम्हाला हा प्रीमियम डिझाइन, अॅडव्हान्स AI फीचर्ससह आणि जबरदस्त कॅमेरा असलेला फोन कसा वाटला, कमेंट करून नक्कीच सांगा.
अशाच नवीन फोन लॉन्चबद्दल पहिल्यांदा माहिती मिळवण्यासाठी पेजला सबस्क्राइब करा आणि व्हॉट्सअॅप चॅनेलला नक्की फॉलो करा.