Oppo ने लाँच केला त्यांच्या K सीरिजमध्ये अजून एक दमदार फोन Oppo K13 Turbo. आपण जर पाहिलं तर Oppo ची K सीरिज ही मजबुतीची सीरिज मानली जाते, पण आता Oppo ने मजबुतीसोबत गेमिंगचाही विचार केला आणि आता हा प्रीमियम गेमिंग फोन लाँच केला(oppo k13 turbo specifications in marathi).
फोनकडे जर आपण पाहिलं तर फोनचं लुक अगदी प्रीमियम दिसतं. पण आता Oppo K13 Turbo हा एक गेमिंग फोन असल्यामुळे, गेमिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिस्प्ले. डिस्प्ले चांगला नसेल तर गेम खेळायला मजा येत नाही. या फोनमध्ये तुम्हाला 6.8-इंच 1.5K LTPS डिस्प्ले मिळतो जो गेमिंगसाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी खूपच चांगला आहे आणि त्यासोबत एक प्रीमियम फील सुद्धा देतो.
Oppo K13 Turbo च्या डिझाईनकडे पाहिलं तर या फोनमध्ये तुम्हाला रेसिंग फंक्शन डिझाईन मिळतं जे खरोखरच भारी दिसतं आणि पूर्णपणे गेमिंगचा फील देतं. एवढंच नाही तर गेमर्ससाठी Oppo K13 Turbo मध्ये तुम्हाला E-स्पोर्ट्स लेवल डिस्प्ले मिळतो. गेमर्सना गेमिंगसाठी एक फ्लॅट स्क्रीन लागते आणि त्यामुळे हे त्यांच्या दृष्टीने एक गुड न्यूज आहे असं म्हणता येईल.
Oppo K13 Turbo गेमिंग फीचर्स, परफॉर्मन्स
जसा तुम्ही आधी टायटलमध्ये वाचलं असेल की यात कूलिंग फॅन आहे, तर कॅमेऱ्याच्या बाजूने बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की यात दोन कॅमेरे आहेत. पण तसं नाही — वरचा जो गोल आहे तो कॅमेरा आहे आणि त्याच्या खाली कूलिंग फॅन आहे. ओप्पो चा हा स्वतः बिल्ट केलेला स्टॉर्म इंजिन आहे जो फोनला थंड करण्यास मदत करतो.

Oppo K13 Turbo मध्ये फक्त कूलिंग फॅनच नाही तर एअरव्हेंट सुद्धा दिलं आहे. म्हणजे तुम्ही जास्त वेळ गेमिंग करत असाल तर फोन जास्त गरम होऊ नये म्हणून एअरव्हेंटच्या मदतीने फोनमधली गरम हवा बाहेर सोडतो. आता तुम्ही विचार करत असाल की कूलिंग फॅन दिला आहे तर जर चुकून त्यात पाणी गेलं तर काय होईल? याबाबत काळजी करण्यासारखं काहीच नाही, कारण Oppo K13 Turbo मध्ये IPX6, IPX8 आणि IPX9 या सर्टिफिकेशन्स दिल्या आहेत. म्हणजेच फोन जर पाण्यात पडला तरीसुद्धा त्याला काहीही होणार नाही आणि तो एकदम व्यवस्थित चालू राहील.
गेमिंग फोन आहे तर परफॉर्मन्स पण टगडा पाहिजेच आणि इथे परफॉर्मन्स खरंच जबरदस्त आहे कारण या फोनमध्ये तुम्हाला मीडियाटेक डायमेंसिटी 8450 हा प्रोसेसर मिळतो. यामुळे गेमिंग असो किंवा मल्टिटास्किंग, सगळं अतिशय स्मूद चालतं. AI फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर यात तुम्हाला एआय एन्हान्स क्लॅरिटी, एआय रिफ्लेक्शन रिमूव्हर, एआय अनब्लर, एआय इरेझर 2.0, एआय रिप्लाय, एआय रायटर, एआय समरी, एआय लिंकबूस्ट, आणि एआय हायपरबूस्ट असे दमदार AI फिचर्स मिळतात.
फोनबद्दल अजून माहिती पाहूया आपल्या टेबल दादा कडे.
Oppo K13 Turbo स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत(oppo k13 turbo specifications in marathi)
| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 15(ColorOS 15.0) 2 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 3 वर्षे सुरक्षा अपडेट्स |
| प्रोसेसर | मीडियाटेक डायमेन्सिटी 8450 |
| इंटरनल स्टोरेज | 128 GB |
| रॅम | 8 GB |
| सुरक्षा | इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर |
| बॅटरीची क्षमता | 7000 mAh |
| अॅडॉप्टर | 80W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.8 इंच (एमोलेड डिस्प्ले) |
| रिझोल्यूशन | 2800 × 1280 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IPX6, IPX8, IPX9 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)नॉर्मल ब्राइटनेस:- 600 निट्स 2)हाय ब्राइटनेस मोड:- 1600 निट्स 3)120Hz रिफ्रेश रेट 4)टच सॅम्पलिंग रेट:- 240Hz 5)FHD+ |
| सेंसर | 1)प्रॉक्सिमिटी सेन्सर 2)ई-कंपास 3)अॅम्बियंट लाईट सेन्सर 4)ॲक्सेलरोमीटर 5)जायरोस्कोप 6)इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल 7)कलर टेम्परेचर सेन्सर |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 16 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- ५० मेगापिक्सेल + २ मेगापिक्सेल (मोनोक्रोम) 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K,1080P, 720P |
| ऑडिओ | स्टीरिओ स्पीकर्स |
| रंग | 1)पर्पल फॅण्टम 2)मिडनाईट मॅव्हरिक 3)व्हाईट नाईट |
| कनेक्टिविटी | 5G, 4G, 3G, 2G ब्लूटूथ v5.4, Wi-Fi 6 |
| किंमत | ₹27,999 |
Oppo K13 Turbo मध्ये तुम्हाला 2 व्हेरियंट मिळतात – 8GB+128GB आणि 8GB+256GB. हा फोन खास करून ज्यांना गेमिंग करायला आवडते त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. कारण यामध्ये तुम्हाला कूलिंग फॅन आणि एअरव्हेंट मिळतात. तुम्ही १ तास गेम खेळा, २ तास खेळा किंवा अगदी ३ तास खेळलात तरीही कूलिंग फॅन असल्यामुळे हा फोन अजिबात गरम होणार नाही.
तुम्हाला हा गेमिंग फोन कसा वाटला, ते कमेंट करून नक्की सांगा आणि पेजला सदस्य/सबस्क्राइब व्हायला विसरू नका, म्हणजे वेळेवर तुम्हाला टेक बातम्या आणि टिप्स सगळ्यात आधी मिळतील!


