“Oppo ने लाँच केला त्यांचा सर्वात मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन – Oppo K13 5G. याआधी K सिरीजमधील Oppo K12x 5G हा फोन लाँच झाला होता आणि तो त्या सेगमेंटमधील सर्वात ड्युरेबल फोन मानला गेला होता. आता Oppo घेऊन आला आहे त्याचा पुढचा जनरेशन – Oppo K13 5G.”
Oppo K13 5g वैशिष्ट्ये
चला करूया सुरुवात, पाहूया काय आहे Oppo K13 5G मध्ये. सुरुवात करूया कॅमेरापासून – Oppo K13 मध्ये तुम्हाला दोन सेन्सर मिळणार आहेत: एक आहे Sony LYT सेन्सर आणि दुसरा आहे Sony IMX 480. Sony LYT सेन्सर हा तुम्हाला मेन कॅमेरामध्ये दिला आहे आणि Sony IMX 480 हा सेन्सर सेल्फी कॅमेरामध्ये आहे. त्यामुळे फोटोग्राफीमध्ये कुठलीही कमी तुम्हाला Oppo K13 मध्ये दिसणार नाही.
परफॉर्मन्समध्ये Oppo ने एक पॉवरफुल प्रोसेसर दिला आहे. जर तुम्हाला वाटलं की या फोनमध्ये गेमिंग करायचं आहे, तर तुम्ही यात खरोखर खूप स्मूद गेमिंग करू शकता. या फोनमध्ये Oppo ने Snapdragon 6 Gen 4 हा प्रोसेसर दिला आहे आणि हा प्रोसेसर 4th जनरेशनचा आहे. मल्टीटास्किंग आणि गेमिंग तुम्ही या फोनमध्ये आरामात करू शकता – लागिंगचा काहीच प्रॉब्लेम नाही. आणखी एक खास गोष्ट म्हणजे, गेमर्ससाठी Oppo ने या फोनमध्ये डेडिकेटेड गेमिंग अँटेना देखील दिला आहे.
चला आता पॉवरबँक बद्दल बोलूया. या फोनसोबत पॉवरबँक दिलेली नाही, पण पॉवरबँक सारखीच मोठी बॅटरी दिली आहे. 7000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, त्यासोबत 80W चा अॅडॉप्टरही दिला आहे जो मोबाईलला फास्ट चार्ज होण्यासाठी मदत करतो. Oppo K13 मध्ये जी बॅटरी वापरली आहे ती ग्राफाइट तंत्रज्ञानावर आधारित आहे. ग्राफाइट तंत्रज्ञानाची खास गोष्ट म्हणजे तुमच्या बॅटरीचे लाइफ सायकल जास्त काळ टिकण्यास मदत होते. इतकी मोठी बॅटरी असूनही फोन जड नाही, तो स्लिमच आहे.
तर तुमच्यासाठी हे सगळं Oppo ही मोबाइल कंपनी घेऊन आली आहे. सध्या Oppo त्यांचा सर्वात मोठी बॅटरी, जबरदस्त परफॉर्मन्स आणि प्रीमियम लूक असलेला फोन ज्याचं नाव आहे Oppo K13 5G. तुम्हाला मोठी बॅटरी, स्मूथ परफॉर्मन्स आणि गेम खेळायला आवडत असेल, तर हा फोन तुमच्यासाठीच आहे.
चला तर मग जाऊया आपल्या टेबल दादा कडे – जे आपल्याला अगदी सोप्या भाषेत या फोनबद्दल सगळे फीचर्स सांगतील!
Oppo K13 5g – स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत(oppo k13 5g specifications marathi)



| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 15(ColorOS) 2 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 3 वर्षे सुरक्षा अपडेट्स |
| प्रोसेसर | स्नॅपड्रॅगन 6 जनरेशन 4 |
| इंटरनल स्टोरेज | 128 GB |
| रॅम | 8GB |
| सुरक्षा | इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर |
| बॅटरीची क्षमता | 7000 mAh |
| अॅडॉप्टर | 80W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.67 इंच |
| रिझोल्यूशन | 2400 × 1080 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IP65 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)1200 निट्स ब्राईटनेस 2)1100आउटडोअर ब्राइटनेस 3)60/120/240 हर्ट्झ रिफ्रेश रेट 4)एचडी+ |
| सेंसर | 1)ॲक्सेलरोमीटर 2)प्रॉक्सिमिटी सेन्सर 3)एआय अॅडॅप्टिव्ह तापमान नियंत्रण अल्गोरिदम 4)जायरोस्कोप 5)ई-कंपास 6)ओले हात असतानाही टच काम करणारी सुविधा 7)इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल 8)हाय एनर्जी आउटडोअर मोड 9)AI स्पष्टता वाढवा 10)AI इरेझर 11)AI अनब्लर |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 16 मेगापिक्सेल (IMX480 Sensor) 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेल 3)फुल एचडी रेकॉर्डिंग |
| ऑडिओ | स्टीरिओ ड्युअल स्पीकर्स |
| रंग | 1)आइसि पर्पल 2)प्रिझम ब्लॅक |
| कनेक्टिविटी | 5G, 4G VOLTE, 4G, 2G ब्लूटूथ v5.2, Wi-Fi 6 |
| किंमत | ₹17,999 |
Oppo K13 5G मध्ये एआय फीचर्सदेखील दिले आहेत. एआय इरेझर, एआय अनब्लर आणि एआय रिफ्लेक्शन रिमूव्हर ही सर्व एआय फीचर्स तुम्हाला या फोनमध्ये मिळणार आहेतOppo K13 मध्ये तुम्हाला दोन व्हेरिएंट मिळतात – एक आहे 8GB + 128GB आणि दुसरा 8GB + 256GB.
कसे वाटले फीचर्स मग? आहेत ना ताबडतोब. तुम्हाला असाच फोन हवा असेल जो दिसायला अगदी प्रीमियम, ७०००mAh ची मोठी बॅटरी असलेला, गेमिंगसाठी जबरदस्त परफॉर्मन्स देणारा आणि तेही बजेटमध्येच हवा असेल.
तुम्हाला जर हा फोन घ्यायचा असेल तर दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन वर जाऊन हा फोन खरेदी करू शकता.कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा फोन, फीचर्स आणि डिझाईन पाहून.